Submitted by प्रकाश साळवी on 18 July, 2017 - 05:17
गुलाम तुझ्या आठवांचा !!
=============
**
तुझ्या आठवणींचा मी गुलाम झालो
भरल्या घरात मी खुले आम झालो
**१**
शोध घेतला तुझा पाताळ - अंतराळी
प्रितीच्या या खेळात मी बदनाम झालो
**२**
थांग ना लागे तुझा, तुझ्या सावलीला
तुला शोधता शोधता मी गुमनाम झालो
**३**
बाजारी मी ठेवले तुझ्या आठवांना
भरल्या बाजारीच मी निलाम झालो
**४**
सोडू पहाता साथ तुझ्या आठवांची
कैफात माझ्या मी धुंद बेफाम झालो
**५**
रास रंगात आला तुझ्या आठवणींचा
रास रंगताना मी कृष्ण घनशाम झालो
**६**
वाटले आठवांना साजिरे नांव देऊ
देताच नांव तयांना मी बेनाम झालो
**७**
किती आठवशील या आठवणींना पुन्हा
आठवता आठवणींना मी "गझलाम" झालो
**८**
प्रकाश साळवी ✍
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शीर्षक आवडले खूप
शीर्षक आवडले खूप
मस्तच...
मस्तच...
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.