ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

Submitted by हायझेनबर्ग on 18 July, 2017 - 16:33

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचे बाफं कसे खूप खूप
बाफांवर बोलणे कसे गूळ तूप
बोलण्याचा अर्थ कसा गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या पोष्टी कश्या लांब लांब
लॉजिकने काढला घाम घाम
शब्दांचा अर्थ कसा झोल झोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या थापांचा ताम झाम
वाचक आले घेवून बाम बाम
थापांची झाली मग पोल खोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषला नाही काही काम काम
पब्लिकला केले त्याने जाम जाम
जाममध्ये टमाटर कसे गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचा हीरो कसा हकल्या
हकल्याच्या पोष्टी जश्या टिकल्या
बाफांना टिकल्यांची ओल ओल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुssझा माबोवर भरोसा नाssय काssय

आमचे प्रेरणास्त्रोत
https://youtu.be/35Bj9Tqy4XY
https://youtu.be/U5npFH8v8a4

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरोसा नाही कसा म्हणता? कुठलीही कारवाई होणार नाही याचा भरोसा असल्यानेच इतका प्रचंड उच्छाद मांडलाय.

हे नवं झाड का? Wink छान आहे.

मानलं हं बिपीनचंद्रंना. स्वतःबद्दलच इतक्या स्पष्ट शब्दांत कोणी क्वचितच लिहितं. Light 1

हाब, मस्त लिहिलेय Proud Lol

पण वर एका पोस्टमध्ये लिहिलेय तस पालथ्या घड्यावर पाणी असणारच आहे Happy

हा.ब. अन बिपीनचंद्रं >>> सहिये

पण गेल्या काही दिवसांपासून जाणवतयं की online group ragging चा दुसरा बळी निवडला गेला आहे. >>> तो ज्याप्रकारे थंड डोक्याने अन गुळ्णीच्या भाषेत सगळे सांभाळतो तुम्हाला खरचं असे वाटत का की त्याचा (आयडी) बळी जाऊ शकतो

हा बळी, बळी तो कानपिळी वाला बळी आहे Wink

फक्त आपण सर्वांनीच 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे लक्षात ठेवायला हवे.

बादवे त्यांचा तिन घरांचा धागा आला का जो ते दोन आठवड्यांपुर्वी लिहीणार होते

नाही म्हणजे मला आवडलं असत वाचायला

संपादन (4 hours left) म्हणजे काय? वरच्या वाक्यात काही आक्षेपार्ह आहे का? मी ते काढून टाकणे अपेक्षित आहे का?

माझ्या आठवणीप्रमाणे पुर्वी डॉ. गिरीश ओक यांच एक नाटक आल होत "डॉक्टर डॉक्टर" या नाटकामधे मी हे गाण ऐकल होत.
त्यात हे गाण अस होत....
' सोनू तूला सोन्याच घड्याळ घे,
घड्याळाची काच कशी गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल....'

ज ब र द स्त लिहिलंय हायझेनबर्ग! Rofl

निर्झरा, 'डॉक्टर डॉक्टर'बद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. Happy

गेल्या काही दिवसांपासून जाणवतयं की online group ragging चा दुसरा बळी निवडला गेला आहे. >>> हे ओरिगिनली कुणी लिहिलं होतं? आणि संपादित केलं. मला ती पोस्ट दिसत नाहीये.
VB च्या पोस्ट मधे हे वाक्य कोट केलेलं दिसतंय.

भारी गाण आहे. Lol

' सोनू तूला सोन्याच घड्याळ घे,
घड्याळाची काच कशी गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल....' << ह्यातच "सोनू तुला सोन्याची माळ घेईन, सोन्यापरीस लेडीज घड्याळ घेईन" आहे का?

काय हे पीनी? तुम्हीच ragging ला बळी पडलात? >>> Light 1 आजिबात नाहि मी सहजच लिहिलेल त्यांना जर हवे असेल तर त्या लिहु शकतात कारण वर म्हटल्या प्रमाणे पाल्थ्या घड्यावर पाणि आहे Happy

माझी पोस्ट quote करून दिलेलं उत्तर मला नाही, हे भारी आहे.
>>>>>

अरे पण धागा माझ्यावर असताना तुम्ही आपसात काय भाण्डता आहात.. हे त्यापेक्षा भारी आहे Lol

काय हे पीनी? तुम्हीच ragging ला बळी पडलात?
>> ☺️
मला ते वाक्य धाग्याचा मूड चेंज करणारे वाटले. म्हणून काढले.

Pages