ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

Submitted by हायझेनबर्ग on 18 July, 2017 - 16:33

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचे बाफं कसे खूप खूप
बाफांवर बोलणे कसे गूळ तूप
बोलण्याचा अर्थ कसा गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या पोष्टी कश्या लांब लांब
लॉजिकने काढला घाम घाम
शब्दांचा अर्थ कसा झोल झोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या थापांचा ताम झाम
वाचक आले घेवून बाम बाम
थापांची झाली मग पोल खोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषला नाही काही काम काम
पब्लिकला केले त्याने जाम जाम
जाममध्ये टमाटर कसे गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचा हीरो कसा हकल्या
हकल्याच्या पोष्टी जश्या टिकल्या
बाफांना टिकल्यांची ओल ओल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुssझा माबोवर भरोसा नाssय काssय

आमचे प्रेरणास्त्रोत
https://youtu.be/35Bj9Tqy4XY
https://youtu.be/U5npFH8v8a4

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ नेच यू ट्यूब वर चॅनेल काढावे आनि इथे जे धागे काढतो त्याच कंटेंटवर स्वतःचा विडिओ काढून अपलोड करावा. हाकानाका

{{{ ऋ नेच यू ट्यूब वर चॅनेल काढावे आनि इथे जे धागे काढतो त्याच कंटेंटवर स्वतःचा विडिओ काढून अपलोड करावा. हाकानाका }}}

ऋन्मेष म्हणजे माबोचे ढींच्याक् पुजा आहेत काय?

रुमणेश माबो चा सुपरस्टार आहे... माबो वर तेच तेच वाचून माबो सोडावी वाटणारे लोक फक्त रूनमयच्या ढग्यामुळे थांबलेली आहेत.

जवळपास तीन वर्षांनंतर माबो वर आले.मला याची काही हिस्टरी माहित नाही त्यामुळे कमेंटस. समजल्या नाहीत पण पोस्ट भारी आहे.


हा धागाही तीन वर्षांपूर्वीचाच आहे
ऋन्मेष प्रकरण तरी माहीत असेलच
बाकी कविता आणि प्रतिसाद धमाल आहे. पुन्हा वाचतो आज तेवढाच नॉस्टेल्जिक टीपी.

जवळपास तीन वर्षांनंतर माबो वर आले.मला याची काही हिस्टरी माहित नाही त्यामुळे कमेंटस. समजल्या नाहीत पण पोस्ट भारी आहे.
Submitted by ऋतु_निक on 2 July, 2020 - 17:01

>>>>>>

ऋतु निक
प्रतिसाद वाचताना तुमचाच जुना प्रतिसाद सापडला मला

जबरदस्त जमलं आहे.
हाब तुमचा रोबो वाला रिप्लाय पण मस्त.
Submitted by ऋतु_निक on 21 July, 2017 - 10:02

माझा काही पकडायचा हेतू नव्हता
कदाचित त्याही हे विसरल्या असतील असेही असू शकते.
सहज धागा वाचताना आयडी नाव वेगळे आणि ईंटरेस्टींग असल्यने लक्षात आले ईतकेच Happy

@हायझेनबर्ग खूप भारी लिहीलय Lol
मला त्यांचे इतके आय.डी. बघून खूप धक्के बसले आहेत आधीच
आणि असा जर का धक्का बसला की ऋन्मेष वन ऑफ दी अ‍ॅडमीन आहेत तर मग विचारूच नका Lol

बिजी आहे जरा. आताही एक सहज चक्कर टाकली. नावाचा धागा वर दिसला म्हणून ईथे चेक करायला आलो. दिवटा आत्मा माझी आठवण काढतोय हे बघून बरे वाटले Happy

Pages