तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2017 - 13:20

तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?

मुलांना एक उत्तम मनुष्य बनवायला?
त्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास घडवायला?
त्यांना देशाचा (किंवा समाजाचा) एक आदर्श नागरीक बनवायला?
की त्यांच्यावर पैश्याची गुंतवणूक करून पैसे कमवायला?

>>>>>
धागा सुचायला संदर्भ हायझेनबर्ग यांची माझ्या खालील धाग्यावर आलेली शिक्षण आणि जुगाराची तुलना करणारी पोस्ट -

>>>>>>

http://www.maayboli.com/node/63125?page=2

>>>>>>>>

एक सोपे ऊदाहरण देतो, समजा तुम्ही वडिलांकडून १लाख रुपये घेवून तुमच्या शिक्षणा वर लावले, मग कॉलेज बंक करून, कमीत कमी अभ्यास करून लाखातले ८० हजार वाया घालवले, मग पास होण्यासाठी क्लासेस लावून अजून ५० हजार लावले, वर जाण्या येण्याच्या खर्चाला, चहा पाण्याला, बिडी सिगरेटला, शाहरूख स्व्पनिल ला अजून २० हजार लावले, गर्लफ्रेंडवर अजून ३० हजार लावले अशी चार पाच वर्षानंतर अंदाजे ५ लाख लावल्यानंतर डिग्री मिळाली, मग मह्त्प्रयासाने नोकरी मिळाली आणि तुम्ही वर्षाला कसे बसे १-२ लाख रुपये कमवू लागलात.

ह्या ऊलट एखाद्या जुगार्‍याने वडिलांकडून १ लाख रुपये घेवून एका दिवसात १ का ५ करत ५ लाख केले तर सांगा बरं हुशार कोण ठरला?

पास होऊ की नाही, झालो तर डिग्री मिळेल की नाही, मिळाली तर नोकरी मिळेल की नाही, मिळाली तर टिकेल की नाही, टिकली तर खर्च भागेल की नाही, भागला तर सेविंग होईल की नाही एवढे सगळे ऑड्स असतांनाही तुम्ही शिक्षणावर पैसे लावले मग आता सांगा बरं बेटिंग कोण करतंय?
जुगार/बेटिंग मध्ये मॅथेमॅटिकल फॉर्म्युला वापरून आपले ऑड्स तरी माहित करून घेता येतात पण ह्या तुमच्या आंधळ्या बेटिंगचे काय?

>>>>>>>>>>

माझे मत -

शिक्षणाकडे आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणून बघण्यात काहीही गैर नाही. मात्र जेव्हा शिक्षणाची तुलना जुगाराशी होत आपण किती गुंतवले आणि आपल्याला किती रिटर्न्स मिळाले असा हिशोब आपण करू लागतो तेव्हा मात्र खरेच मनात शंकेची पाल चुकचुकते.

जेव्हा आपण आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना ते त्याचा पैश्यात किती परतावा करतील असा विचार करू लागतो तेव्हा आपण त्यांच्याकडून साहजिकपणे अपेक्षाही तश्याच ठेवू लागतो. मग आपल्या मुलाने नेहमी वर्गात पहिले पाचातच राहायला हवे. मग आपल्या मुलाने सर्वाधिक परतावा मिळेल अशीच शिक्षणाची शाखा निवडायला हवी.

ज्यांनी थ्री ईडियटस पाहिला असेल त्यांना वेगळे काही सांगायला नकोच, पण जर आपल्या आवडीचा एखादा जॉब जो आपल्या छण्दाशी रिलेट होतोय तो आपल्या मुलांना कमी पैसे देत असेल तर त्यांनी तो न करता आपण त्यांच्या शिक्षणावर केलेली गुण्तवणूक वसूल करणारे क्षेत्र निवडावे ही जबरदस्ती देखील मग सहजच होते.

शिक्षण आपल्याला ज्ञान देते. जसे चांगले विचार आपले आयुष्य समृद्ध करतात तसे शिक्षण घेण्यामागचा हेतूही ज्ञान प्राप्त करून आपले आयुष्य समृद्ध करणे असावा. त्यानुसार आपली आवड बघून शिक्षण घ्यावे. त्यानंतर मग आपण घेतलेल्या शिक्षणाचा समाजासाठी आणि अर्थातच स्वत:साठीही कसा वापर होईल हे बघावे.

स्त्रीशिक्षण ही आपल्या देशासमोर एक समस्या आहे. याचे कारणही हा पैश्याची गुण्तवणूक हाच विचार आहे. मुली तर शिक्षण घेऊन चूल आणि मूलच सांभाळणार, तर मग त्यांना शिक्षण का द्या? किंवा मग मुलींच्या शिक्षणावर खर्च आपण करणार आणि तिचा पगार मात्र सासरच्या घरात जाणार. मग कोणी सांगितलेय मुलींना शिकवायला? आणि मग आपल्याला मुलगीच नको जी आपली गुण्तवणूक वायाच घालवणार आहे..

मला कल्पना आहे की हायझेनबर्ग यांनी वरची पोस्ट सिरीअसली लिहिली नसावी आणि मला प्रतिवाद म्हणून गंमतीत लिहिली असावी.
मात्र मला हा विषय सिरीअस वाटला. कारण समाजात बरेच जण असा विचार करणारे खरेच असू शकतात. नव्हे असतीलच. त्या धाग्यावर जुगाराला मी विरोध करतोय ते येणारी पिढीची उर्जा चुकीच्या मार्गाला लागू नये. आपला देश बदलतोय. आणि या देशाची ताकद आहे भावी पिढी. आणि त्यांचे सर्वात मोठे हत्यार आहे शिक्षण. पण तेच घेण्याचा उद्देश चुकत असेल तर मात्र ....
चूक भूल माफ !
पण तो विषय तिथेच थांबवून तातडीने हा धागा काढावा लागला.. काही चुकत असेल तर जरूर सांगा __/\__

आपलाच,

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण काय म्हणालय याचा सोयीस्कर अर्थ लावून तिकडे उत्तर न देता टोटल टाळ्याखाऊ धागे काढण्याच्या प्रवृतीचा निषेध.
हाच प्रकार पूर्वी दक्षिणाच्या धाग्यावर पण झालेला. तेव्हा मी चुकीच्या बाजूने अर्ग्युमेंट केलेलं हे आज प्रकर्षाने जाणवतंय.

बर... आधी लग्न का करायचं, मग हनिमूनला का जायचं... का तो धागा आधीच काढलाय तुम्ही ??? मग मुलं निर्माण कशी करायची याच्या प्रशिक्षणाचा धागा काढा की राव. मायबोलीकरांना शहाणे करूनच सोडा.

चूर्ण लावलेले पॉपकॉर्न रे. पोटभरी आणि पोट्सफाई एकाच वेळेस. Lol
आमित ला अनुमोदन... But if you can't do anything about it laugh it all away.

सुप्रभात !

हायझेनबर्ग, आपल्या शिक्षण विरुद्ध जुगार या मुद्द्यावरून मला हा धागा सुचला. आणि हा विषय सिरीअसली चर्चेला घ्यावासा वाटला.
जर आपण वरची शिक्षण आणि जुगार ही तुलना सिरीअसली केली असेल तर माझे उत्तर हेच असेल. जर आपण सिरीअस असाल पण अमित म्हणतात तसे काही वेगळा अर्थ असेल तर तो देखील या किंवा त्या धाग्यावर वाचायला आवडेल. जर आपण तेथील ईतर काही पोस्टींसारखे मला प्रतिवाद करायला गंमतीने लिहिले असेल तर प्लीज हे आपल्यापुरते इग्नोर करा.

पण या निमित्ताने या धाग्यावर या विषयावर छान चर्चा मात्र होऊ शकते.

तुम्ही शिक्षण का घेता? का घेतले? आपल्या मुलांना का देता? शिक्षणाकड केवळ उपजिविकेचे साधन बघता की आणखी काही?

तुम्ही १०० रु देऊन् टामाटू आणले का ?

ते तसेच बशीत ठेवून बघत बसा , खाऊ नका.

कराल ?

प्रत्येक खरेदीदार हा आपण विकत घेतलेली कमोडिटी आपल्याला सुख कसे देईल , हे पहात असतो.

तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?

मुलांना एक उत्तम मनुष्य बनवायला?= होय.
त्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास घडवायला?= होय.
त्यांना देशाचा (किंवा समाजाचा) एक आदर्श नागरीक बनवायला?= होय.
की त्यांच्यावर पैश्याची गुंतवणूक करून पैसे कमवायला?>>>>> कसे कमवायचे ते जरा समजावून सांग. बाकी प्रश्नाचे उत्तर नाही आहे.

आता हा प्रश्न तु इथे विचारला आहेसच त्यामुळे तु आणि तुझी गर्लफ्रेंड यांची लग्नानंतर तुमच्या मुलांच्या शिक्षणाविषयी तुमची मते काय असतील ते सुध्दा समजू देत.

मागे 'कोण लिहितंय पेक्षा काय लिहिलंय ह्याला महत्व द्यावे' अशा आशयाचा धागा निघाला होता त्याची आठवण झाली. (मला वाटते रारने काढला होता) महत्वाचा विषय पण धाग्याकर्त्या वरील अतीव (त्यानेच कमावलेल्या) 'प्रेमा'पोटी इथे त्याला अपेक्षित अशा प्रकारची चर्चा होईलसे वाटत नाही. धागाकर्ता यापासून काही बोध घेईल का?

पण धाग्याकर्त्या वरील अतीव (त्यानेच कमावलेल्या) 'प्रेमा'पोटी इथे त्याला अपेक्षित अशा प्रकारची चर्चा होईलसे वाटत नाही.>>>> तेही खरेच आहे म्हणा. आता पर्यंत टोमॅटोचा फोटोच मागताहेत. फेकून मारायला स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत वाटते. Wink

त्याला अपेक्षित अशा प्रकारची चर्चा होईलसे वाटत नाही. धागाकर्ता यापासून काही बोध घेईल का?
>>>>

जर अपेक्षित ती चर्चा झाली नाही तर
नुकसान कोणाचे होईल?

असो,
नरेश माने यांनी वर विषयावर प्रतिसाद् दिला आहे. त्यावर मी सवडीने उत्तर देईनच. पण सांगायचा मुद्दा हा की जर पन्नास अवांतर पोस्ट का येईना, एक विषयाला अनुसरून आली तर चर्चा पुढे जाऊ शकते असा सकारात्मक दृष्टीकोण ठेवूनच मी चर्चेला उतरतो.
आयुष्य जगतानाही आपण काय वेगळे करतो. सगळेच मनाजोगते कुठे असते आपल्या आसपास, आपण आपल्या आवडीनेच हवे ते वेचतो ना, तसेच आहे हे ..

तांबाटे महाग झाले तर भोपळा वापरुन भेसळ करतात?
बापरे! भयानकच आहे हे.
बकवास गवईंनी गाण्याचे कार्यक्रम रद्द करा. तांबाट्यांच्या ऐवजी भोपळे डोक्यावर पडतील. Biggrin

मुलांना शिक्षण द्यावे ते त्याना आयुष्यात पुढे जाऊन स्वतःचे भले बुरे कशात आहे याची दूरदृष्टी यावी आणि त्यातल्या त्यात भल्या मार्गाने आपले पोट भरता यावे या दोन गोष्टींसाठी.

सध्याच्या शिक्षण पद्धतीत पहिला उद्देश सफल व्हावा याचे अजिबात शिक्षण मिळत नाही. फक्त दुसऱ्या उद्देशावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे, त्यातही ज्याला जे जमते त्याचे शिक्षण देण्याऐवजी जे शिक्षण उपलब्ध आहे त्याप्रमाणे माणसाने स्वतःला बदलावे हे अपेक्षित आहे.

यामुळे शिक्षण घेण्याचा मूळ उद्देश पूर्णपणे मोडीत निघाला आहे. एखाद्या धाडसी पालकाने स्वतःच्या मुलाला ह्या पद्धतीत न दाखल करता घरीच त्याचे शिक्षण केले तर तो मुलगा पुढे जाऊन समाधानी आयुष्य जगेल याची मला खात्री आहे.

तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?>>>>>> नाहीतर ते एखाद्या ऋन्मेष कडून शिक्षण घेतील, आणि जिंदगीचा बट्ट्याबोळ करतील ..

तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?>>>>>

ते शाळेत गेल्यावर जरा शांतपणे बसता येते, या धकाधकीच्या आयुष्यात तेवढेच चार निवांत क्षण मिळतात म्हणून. Lol

ते शाळेत गेल्यावर जरा शांतपणे बसता येते, या धकाधकीच्या आयुष्यात तेवढेच चार निवांत क्षण मिळतात म्हणून. Lol
>>> यापेक्षा वेगळे कोणतेही सत्य नसावे... Happy

कमाईला लागेपर्यंत टाइमपास म्हणून शाळा-कॉलेजं निघाली असावीत असे मला लहानपणापासून वाटत आले आहे.

कमाईला लागेपर्यंत टाइमपास म्हणून शाळा-कॉलेजं निघाली असावीत असे मला लहानपणापासून वाटत आले आहे.>> Lol

डिग्रीच्या फायनल वर्षाला असताना आमचे मास्तर एकदा म्हटले होते, 'तुम्ही आत्तापर्यंत पुस्तकात जे शिकलात त्याचा आणि बाहेर प्रत्यक्षात जे काम करणार त्यात जमिन आसमानाचा फरक असणार आहे. पुढे अवघड जाऊ नये म्हणून आतापासूनच (reference books ची यादी देऊन)जास्तीच्या अभ्यासाला सुरुवात करा.

वरील काही पोस्ट वाचून मला वाटतेय की धाग्याचा विषय समजण्यात सूक्ष्म गल्लत होतेय. तुम्ही जे म्हणत आहात ते आपल्याकडची शिक्षणपद्धती कशी चुकीची आहे त्यावर भाष्य करत आहात. तुम्ही आपल्या मनाची आदर्श शिक्षणपद्धती गृहीत धरा आणि उत्तर द्या की त्या शिक्षणपद्धतीनुसार चालत असलेल्या शाळेत अपेक्षित ज्ञान मिळायला आपण आपल्या मुलांना का धाडता?

ते शाळेत गेल्यावर जरा शांतपणे बसता येते, या धकाधकीच्या आयुष्यात तेवढेच चार निवांत क्षण मिळतात म्हणून >>>> मी फुटलेच ह्या वाक्याला Rofl
कमाईला लागेपर्यंत टाइमपास म्हणून शाळा-कॉलेजं निघाली असावीत असे मला लहानपणापासून वाटत आले आहे.>>> ह्यालापण Lol
पॉपचोर्ण >>> Biggrin

ते शाळेत गेल्यावर जरा शांतपणे बसता येते, या धकाधकीच्या आयुष्यात तेवढेच चार निवांत क्षण मिळतात म्हणून >> हे महान आहे.... फार फार हसले.

पुढेमागे माबो वर धागे काढायला पैसे द्यावे लागले तरीसुद्धा रुनमेश असे "दुसर्या कुठल्यातरी धाग्यातल्या तिसर्या कुठल्यातरी प्रतिसादां वरुन" सुचलेला धागा काढेल का ?

अरे किती विचार करतोस बाबा...जरा लोकांच्या मनाचा विचार करुन कमी धागे काढत जा की..

सध्याच्या युगात शिक्शन म्हन्जे जुगारच आहे....लावलेल्या (लक्श लक्श) रुपयांचे रिट्र्न्स किति मिलनार हे कय कोनि सांगु शकत नहि

शिक्षणावर लक्ष लक्ष रुपये लावूनही परताव्याची ग्यारण्टी नसेल, तसेच शिक्षणपद्धतीच सदोष असेल. तर मग लोकं मुलांना लक्ष लक्ष खर्चून मोठ्या शाळांमध्ये का पाठवतात? हजार हजार खर्चून स्वस्तात शिक्षण का घेत नाहीत?
कमी गुण्तवणूक म्हणजे कमी रिस्क आणि फायद्याचा टक्का जास्त नाही का?

Pages