"मॅssम, मॅssम.. क्या हुआ? उठीये प्लीज.." खूप दुरून घुमल्यासारखा आवाज आला आणि समिपाने प्रयत्न करून डोळे उघडले. तर समोर क्यूटी तिच्या समोर बसून तोंडावर पाणी शिंपडत होती. तिच्या शेजारी उभ्या म्हाताऱ्या बाईकडे बघून समिपाचे डोळे विस्फारले.
"अवं ताई घाबरू नका, काय तुमी शेरातल्या पुरी.. जरा काय नवीन दिसलं की लागल्या घाबराय! बोंबलाय काय लागता, चक्कर काय यिती.. अवगड हाय तुमचं जगणं बगा!" म्हातारी गालात हसत म्हणाली.
"ओ बाई तुम्ही कोण ते आधी सांगा. आणि इथे काय करताय?" समिपा उठून बसत म्हणाली.
"आत्ता! तुमीच तं फोन करून बलिवलं की हितं. माजं नाव सखुबाई पांडुरंग जेधे. शेजारच्या जेधे वस्तीवर ऱ्हायला हाव आमी" सखुबाई ठसक्यात म्हणाली.
"मॅम, ये बाई एकदम पागल है" क्यूटी समिपाला कुजबुजत सांगू लागली.. "नीचे इसने इतना डराया मुझे.. लेकिन मै भी सीखनी हूं, ऐसे थोडे ना डरुंगी! और ना इसें हिंदी बिलकुल नही समझती" म्हणत ती खळखळून हसली.
"ही पुरगी जरा ज्यास्तच शाणी हाय, मला न्हाय चालायचं असलं" सखुबाई क्युटिकडे तोंड वाकडं करत समिपाला म्हणाली.
"लेकिन मॅम, what happened? आप गिरी कैसे?" क्यूटी विचारू लागली.
"अरे कुछ नही, वो accident की वजहसे थोडा चक्करसा आ रहा है.." समिपा म्हणाली पण तिलाही आधी काय घटना घडल्या ते काहीच आठवत नव्हतं.
"ठीक आहे मावशी, आता आम्हाला हा वाडा नीट दाखवा आणि कुठे काय वस्तू ठेवल्या जायच्या, कोण कुठे राहायचं हेपण नीट सांगा". समिपाने असे सांगितल्यावर सखुबाईने जरा खुश होऊन सगळा वाडा फिरून दाखवला.
----------------------------------------------------
"सुनील, तुला काय वाटतंय,समिपाच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया का आपण? मला तरी हे फक्त ऍलर्जीचं प्रकरण वाटत नाहीये" रविवारी टेरेसच्या झुल्यात बसून कॉफी पिता पिता रेवतीने विषय काढला.
बाजूला आरामखुर्चीत बसून मोबाईलवर इमेल्स चेक करणाऱ्या सुनीलने नेहमीप्रमाणे मान वर न करता, 'तुला काय वाटतं तसं कर' म्हणायला सुरुवात केलीच होती. तेव्हा रेवतीने हात लांब करून त्याच्या हातातील मोबाईल काढून घेतला.
"मी काहीतरी महत्त्वाचं बोलतेय! समीच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया का? ती लहान असतानाही तुला विचारल्यावर तू दुर्लक्ष केलं होतं, नाहीतर आत्ता ही वेळ आलीच नसती." शेवटचं वाक्य पुटपुटत रेवती म्हणाली. "लहानपणी फक्त ताप येऊन, तापात बडबड करायची. पण आता! आता हे खूप वाढलेलं वाटतंय मला. गेल्या सहा महिन्यात निदान आठ दहा वेळा unconscious झाली ती. Do you think this is normal?"
"रेवा, तू एकदम राईचा पर्वत करू नको. काहीतरी hb, व्हिटॅमिन्स वगैरे कमी झाले असतील.. येते चक्कर अशी" सुनील तिला गप्प करत म्हणाला.
"आणि तू जरा हेल्दी फूडची सवय लाव तीला.. बघावं तेव्हा बाहेरचं खात असते, सारखे पिझ्झा नि आईस्क्रीम्स खायचे आणि मग कसली तरी फॅड डाएटस करायची! चक्कर नाही तर काय होणार.."
"अरे! झालं का तुझं सुरू.. जाऊदे.. अरे, समि परवा ऑफिसला ट्रॅडिशनल डेसाठी नऊवारी नेेसली होती आईंचीची नथ घालून! इतकी डिट्टो आईंसारखी दिसत होती.. त्या तरुणपणी अशाच दिसत असतील, इन्स्टाग्रामवर फोटो टाकलेत बघ तिने" रेवतीने विषय बदलला.
"हो, पाहिले की कालच. गोड दिसत होती समी.. खरच आईसारखी दिसायला लागलेय हल्ली. आत्ता तर एवढीशी होती, कधी एवढी मोठी झाली आपली लेक. आपण दोघेही आपल्या करिअर्स मध्ये इतके बिझी होतो की तिचं बालपण सुद्धा धड एन्जॉय नाही केलं आपण.. " सुनील हल्ली थोडा भावनिक व्हायला लागला होता..
त्याचवेळी समिपा तिच्या खोलीत फेसबुक चेक करत बसली होती. एका मैत्रिणीचे बीचवरचे फोटो पाहता पाहता एका फोटोत शहाळ्यांचा ढीग आणि कोयत्याने शहाळे तासणारा माणूस दिसला. त्याच्या हातातल्या कोयत्याचे पाते चमकले आणि समिपाला हळूहळू सात वर्षाची ती दिसायला लागली..
------------------------------------------------------
उन्हाळ्याच्या सुट्टीत ती पहिल्यांदाच पंधरा दिवस आईशिवाय आजोबांबरोबर कासवलीच्या घरी राहायला गेली होती. सकाळी उठल्यापासून घरामागच्या नारळपोफळीच्या बागेत हुंदडणे, दुपारभर शेजारच्या ताई दादाबरोबर धुडगूस घालून, भरपूर आंबे, जांभळे, करवंदांचा फडशा पाडणे, संध्याकाळी समुद्रावर बागडणे आणि रात्री आजोबांबरोबर शुभंकरोती, पाढे म्हणून गोष्टी ऐकून झोपणे असा मजेत दिनक्रम चालला होता.
एक दिवस सकाळी धारोष्ण दूध आणि पानगीचा नाश्ता झाल्यावर आजोबा तिला म्हणाले "समीताई, आज बागेत फिरू नका हं नाहीतर नारळ पडेल डोक्यात! आज आपला विठोबा येतोय नारळ पाडायला. तुला एक काम देतो. तो माडावर चढला की लांब उभं राहायचं, तो एक एक नारळ खाली टाकेल त्याचा 'धप्प' आवाज आला की एक, दोन असे किती नारळ पडतील ते मोजायचे. एक कागद पेन घेऊन जा आणि प्रत्येक माडाचे किती नारळ पडले ते लिही. बरोबर उत्तर आलं तर संध्याकाळी बक्षीस!"
" हो आबा, मी करेन. मला count करता येतं की, मी बिग गर्ल आहे आता" समिपा खुश होऊन म्हणाली.
थोड्या वेळात विठोबा आलाच.. काडीपैलवान, मोठे चमकदार डोळे, काळाकुळकुळीत रंग, डोक्याला तुळतुळीत टक्कल, खाकी हाफपँट, कमरेला बांधलेली दोरी नि त्यात अडकवलेला कोयता आणि पाठीवर जयगणेश कबड्डी संघाचा झिजलेला लोगो असणारा पातळ पिवळा टीशर्ट घातलेला विठोबा म्हणजे अगदी काटक कणखर म्हातारा होता.
"खोतानूss मी आलोय. चाय द्या लवकर" तो दारातून ओरडला तोच समिपा समोर आली. तिच्याकडे नजर जाताच त्याचा चेहरा भूत बघितल्यासारखा पांढरा फटक पडला आणि डोळे विस्फारून तो पहातच बसला..
प्रत्येक भागात उत्सुकता वाढत
प्रत्येक भागात उत्सुकता वाढत जातेय .
छान लिहिताय .
Interesting... Pan majja
Interesting... Pan majja yayla lagtach sampla part... Waiting for new part... Best luck
छान चाललीय कथा.
छान चाललीय कथा.
प्रत्येक भागात उत्सुकता वाढत
प्रत्येक भागात उत्सुकता वाढत जातेय .
छान लिहिताय .>>>>+१
मॅगी उत्सुकता ताणू नका. छान
मॅगी उत्सुकता ताणू नका. छान चालू आहे लवकर टाका पुढचा भाग
छान चालू आहे कथा
छान चालू आहे कथा
मॅगी उत्सुकता ताणू नका. छान
मॅगी उत्सुकता ताणू नका. छान चालू आहे लवकर टाका पुढचा भाग
आज चारही भाग वाचले, मस्त फ्लो
आज पाचही भाग वाचले, मस्त फ्लो ठेवलाय !!!