आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 July, 2017 - 16:42

आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.

मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.

आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !

सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.

दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.

संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.

तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्‍या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.

शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.

निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अ‍ॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!

डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्‍या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनमेश भाऊ बघा लोक चिडाय ला लागलेत आता... आवरते घ्या थोडा...
पण तुमचे लेख येत राहू द्या.. काल्पनिक असो वा सत्य... तिमेपास होतो राव

घरात एक फ्रिज असतांना दुसरा फ्रिज कुठे ठेवला आहे ते कधी सांगणार आहात आता ईतक्यांदा विचारून झालं.
>>>>
मी त्यावर लेख लिहिणार आहे.. माझ्या मुंबईतील तीन घरांवर.. शब्द दिलाय .. जरा वेळ मिळू द्या.. मायबोलीच्या ईतिहासात आजवर कधी असे झाले नाही की मी एखादा धागा काढायचा शब्द दिला आणि तो पाळला नाही.

मायबोलीकराच्या नावासहित वॉट्सअ‍ॅप मॅसेजचे प्रूफ द्या म्हंटले तर तिथे ही काढता पाय घेतला म्हणजे तीही थापंच होती.
>>>
नाही हो, ती महिला आयडी आहे. तिला आपले नाव ईथे द्यायचे नाहीये. तिचा तुमच्यावर काही राग नाही. उलट ती तुम्हाला मीच समजते. तिचे मुद्देही असे आहेत की मला प्रतिवादही जमत नाहीये.

उदाहरणार्थ हे बघा ती मला काय बोलते,

1) ते हुप्पाहुय्या तुला विरोध दाखवायचे नाटक करत तुझ्या धाग्याचे प्रतिसाद वाढवतात. म्हणजे हे मुद्दाम तूच करतोय.

2) ते तुझ्या जुन्या पोस्ट ईथे संदर्भ देण्यासाठी लीलया शोधून काढतात. त्या त्यांना सहजी कश्या मिळतात. तुझी प्रत्येक पोस्ट, तू कुठे कुठे काय लिहिले आहे हे त्यांना कसे माहीत असते. कारण तो आयडी तुझाच असल्याने तुला तूच कुठे कुठे काय लिहिले आहे हे माहीत असते.

3) ते ईतर धाग्यांवर फार कमी दिसतात आणि तुझ्याच धाग्यांवर जास्त दिसतात आणि तुझ्याशीच प्रतिवाद करत तुझ्याच धाग्यांचे प्रतिसाद वाढवतात. एखादी व्यक्ती वा एखादा आयडी निव्वळ एका व्यक्तीपाठी आपला ऑनलाईन येण्याचा सारा वेळ कसा खर्च करेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो आयडी तुझाच आहे. मी तुझ्या आधीपासून मायबोलीवर आहे. तू मला फसवू शकत नाहीस.

आता बोला, काय ऊत्तर देऊ ?
माझी तुमच्यावर जबरदस्ती नाही की तुम्ही आपली ईथे ओळख द्यावी किंवा आणखी काही. ईथे प्रत्येकाला आपली ओळख गुप्त राखायचा हक्क आहे. पण तुम्ही काहीतरी करून आपण वेगळे आहोत हे तिला ईथे पटवून देऊ शकता का? काहीतरी असे करा जे मी कधी करूच शकत नाही...

एखादी व्यक्ती वा एखादा आयडी निव्वळ एका व्यक्तीपाठी आपला ऑनलाईन येण्याचा सारा वेळ कसा खर्च करेल.
एखादी व्यक्ती वा एखादा आयडी निव्वळ एका व्यक्तीचं ऑनलाइन रेकार्ड गोळा करण्यत आपला वेळ कसा खर्च करेल?

आपण दोघं एकच आहोत काय ऋ? Lol

हुपपाहुईया... वाय सो सिरीयस? रुंम्या च्या घाग्यावर तिमेपासस करायला येत पब्लिक... . > तुम्ही मराठी भाषा आणि मायबोली दोन्ही साठी आजिबात सिरिअस नसतांना कश्याचे आणि काय महत्व्व पटवून द्यायचे तुम्हाला? तुमची अशुद्धं वाक्यं वाचण्याची व त्यांचा अर्थ लावण्याची जबाबदारी वाचणार्‍याची आहे असा तुमचा समज आहे का?
इग्नोर करून सोडून द्या राव....तुमचं एखादा धागा हायजेक केला होता का रूनमेश ने... की इतका त्रस होतंय तुमाला... > ईग्नोर करण्याची वेळंच कश्याला येवू द्यावी म्हणते मी ... ईथून पुढे धागा काढणार्‍याने सरळ 'माझ्या धाग्यावर ऋन्मेष ह्यांनी न येण्याचे करावे' किंवा 'ऋन्मेष अँड क्रोनीज नॉट लाऊड' असेच लिहावे धाग्याखाली नोट मध्ये.
हे व्हायला नको असे मनापासून वाटते आणि झाल्यास मायबोलीवर एक वाईट पायंडा पडेल जे आजिबात चांगले स्पिरिट नाहीये.

राहुल,
तुमच्याबद्दल विचारणा नाही झाली...
कदाचित शंका नाही खात्री असावी..
रहाणे मस्त मारतोय आजपण..

मी त्यावर लेख लिहिणार आहे.. माझ्या मुंबईतील तीन घरांवर.. शब्द दिलाय . > 'घरात फ्रिज कुठे आहे?' ह्या एका वाक्यातल्या ऊत्तरासाठी तुम्ही तीन घरांबद्दल लेख लिहिणार हे चार वेळा लिहून झाले.

Lol
हुप्पहुय्या ताई, वरचा धागा वाचा आणि द्या सोडून.. कशाला मनस्ताप करून घेता. जाऊदेत Happy

मी कालपासून वाट बघत होतो या धाग्याची... Lol
अव्यक्त धन्यवाद, मला किती वाईट वाटत होते की लोकं विसरलेही माझ्या या लेखमालेला. आता जीवात थंडावा आला Happy

मी थापा मारतो हे सत्य स्विकारायला आणि ती माझी वाईट सवय आहे हे कबूल करायला जो एक प्रचण्ड मोठा प्रामाणिकपणा लागतो तो माझ्यात ठासून ठासून भरला आहे. पण फ्रिज मात्र मी घेतला आहे Happy

मी कालपासून वाट बघत होतो या धाग्याची > मी सुद्धा..
आता एक सांगा ऋन्मेष ह्याचा अर्थ कामशिल्प, स्टॉकिंग आणि बाकी अगणित गंभीर विषयांवर तुम्ही लिहिलेले सगळे हे तुमचा स्टँड नसून तुमची मतं नसून तुम्ही केवळ दुसर्‍यांच्या भावना भडकावणे , प्रक्षोभक लिहिल्या नंतर येणार्‍या मजेखातर, ठरवून चर्चेचा टेम्पो बिघडवणे आणि केवळ टाईमपास करण्यासाठी म्हणून मारलेल्या थापा आहेत का?
आणि ह्याचे ऊत्तर तुम्ही वरती लिहिले तसे हो असेल तर ते सगळे धागाकर्ते आणि त्यावर पोटतिडकीने लिहिणार्‍या सगळ्या प्रामाणिक मायबोलीकरांचे तुम्ही गुन्हेगार आहात आणि तुमच्या ह्य मानसिकतेचा मी निषेध आणि धिक्कार करते. अणि हेच मी ह्या धाग्याच्या सुरूवातीपासूनच म्हणत आहे.

तुमच्याच लेखा खालील तळटिप..

<<<<पुढचा किस्सा पुढच्या भागात पण त्या आधी काही तळटीपा :-
तर, आता तुमच्याकडे खालील पैकी ३ पर्याय आहेत.
१) आपणही या प्रकारचे किस्से शेअर करू शकता.
२) माझ्या किश्श्यांची चिरफाड करू शकता.
३) आपल्या आवडीनुसार टाईमपास, दुर्लक्ष, धागा भरकटवणे ईत्यादी करू शकता.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष >>>>

ऋ, ___/\___ धन्य आहात.
आपण lawyer का नाही झालांत? Wink
(येथे कोणी असेल तर वरील प्रतिसाद मनावर घेऊ नये)

पुन्हा एकदा तुमच्याच एक लेखतिल परिछेद. तो वाचुन वाटत आहे तुमची ३ घरे असु शकतात ते.... Wink

<<<<*3) घर (मुंबईत घर)*
सध्या जे मुंबईत घर आहे ते आईवडिलांचे आहे. लग्नानंतर लवकरच स्वत:चे घ्यायचा विचार आहे. किंबहुना ते बूक करून मगच लग्न करायचे आहे.
सध्याच्या आकडेमोडीनुसार दोघांचे पगार आणि बचत जोडून 55-60 लाखापर्यंत घराचे बजेट जातेय. एखाद्या छोट्या शहरात ही रक्कम मोठी वाटू शकली असती. पण मुंबईत वन बीएचके मिळायचे वांधे झाले आहेत. आणि एकीकडे मराठी माणसांनो मुंबईबाहेर पडू नकाचे नारे लावले जात आहेत.
खरे तर मलाही मुंबई सोडायची नाहीयेच. पण आता पन्नास साठ लाख खर्च करून काय मुंबईच्या वन रूम किचन मध्ये लोअर मिडलक्लास बनून राहायचे का? आणि अश्या पोराला आपली पोरगी द्यायला कोणता बाप तयार होईल? माझ्या गर्लफ्रेंडचे वडील तयार होतील का हा प्रश्नच आहे.>>>>

<<<<मी नेहमीच खोटे बोलतो !
या वाक्यातली गंमत ओळखा >>>>

मी लिहलेल मला लागु पडतेच असे नाही

अजुन एक...
पुन्हा एकदा तुमच्याच एक लेखतिल

<<<कोणी, किती, केव्हा आणि कुठले धागे काढावेत याबाबत मायबोली प्रशासनाचे ठाम नियम नाहीत. धागा आक्षेपार्ह वाटला की उडवा आणि सभासद डोक्यात जायला लागला की त्याच्यासकट उडवा, एवढेच ढोबळमानाने ते करतात.
पण यामुळे दोन गोष्टी होतात.
१) धाग्यांचे पीक अमाप येते.
२) कोणीही कोणाच्याही धाग्यावर आक्षेप घेते.
आता यात कधी धागाकर्त्याची चूक असते, तर कधी नसते. पण दोन्ही स्थितीत इतर प्रतिसादकांना ते त्याला सुनवायची गरज वा हक्क नसतो. मग वाद होतात. कोणाला कसलाच हक्क वा अधिकार नसल्याने वातावरण गढूळ होते. आणखीनच...

<<<< तर धागा भरकटवणे आणि त्यावर धागाकर्त्याला अपेक्षित चर्चा होऊ न देणे, यासाठीच काही आयडी सोशलसाईटसवर भटकत असतात.
अश्यांविरुद्ध एकत्र येत आघाडी उघडू शकतो. एकट्याचा आवाज अ‍ॅडमिनपर्यंत पोहोचत नसला तरी संघटनेचा नक्की पोहोचेन. >>>>

त्यांच्या लेखावर जाणे बँड कर ना रुन्मेषभाऊ...
पण तू नाही गेला तर प्रतिसाद येणार नाहीत हे पण खरं हाये...

फार चिडलेल्या दिसतायत ... केवडे मोठं रिप्लाय टाकटायत...
आवघड आहे

प्रत्येक धाग्यावर , गंभीर विषयांवरच्या चर्चेवर असे खोटे बोलण्यात, थापा मारण्यात तुम्हाला खूप गंमत वाटत असली ऋन्मेष तरी बाकीचे मायबोलीकर त्या विषयाशी त्यांच्या त्या विषयातल्या अभ्यासाविषयी, माहिती विषयी आस्था बाळगून असतात आणि तो अभ्यास, माहिती, मतं ईतरांशी शेअर करण्यास ऊत्सुक असतात. तुमची ही थापा मारत गंमत बघण्याची मानसिकता न जाणो आजवर किती मायबोलीकरांचा मायबोलीतला रस घालवण्यास कारणीभूत ठरली असेल, किती जणांनी चर्चेतून काढता पाय घेतला असेल आणि किती चांगल्या माहितीला, साहित्याला मायबोली मुकली असेल.
तुम्ही मायबोलीच्या स्पिरिटला सुरूंग लावत आहात असे मी म्हंटले तेव्हा कोणी तरी विचारले 'काय आहे मायबोलीचे स्पिरिट' मी त्यांना सांगू ईछिते तीन महिने एकंही शब्दं न लिहिता 'वाचनमात्रं' राहून धागा न धागा वाचून बघा .. तुम्हाला आपोआप कळेल मायबोलीचे स्पिरिट काय आहे ते.
शब्दांचे खेळ करून जिंकायचेच असेल तर त्यासाठी पगारावर एखादा खखराखुरा माणूस ठेवा त्याला सांगा मी बोलेन त्याच्या ऊलटे बोलत जा आणि बघ वादविवादात मला जिंकता येते का? आपल्या मागे मागे करणारे शेपूट हवे असेल तर ते पाळता येते त्यासाठी प्रत्येक पोस्टीनंतर आपलीच वाहवा करणारे प्रतिसाद टाकण्याची गरज नसते.
तुम्ही हवे तसे शब्दं फिरवत ईथे लिहू शकता पण लक्षात ठेवा लिहित नसले तरी धागान धागा, शब्दन शब्दं वाचणारे मायबोलीकर आहेत आणि ते हा धागाही वाचत आहेत. मुठभर मायबोलीकर तुमच्या 'कूल' बोलण्याला भुलतही असतील पण सूज्ञ मायबोलीकरांचा कलेक्टिव विसडम तुम्हाला आणि तुमच्या ऊद्योगाला आणि माझ्यासहित ईतर कोणत्याही आयडीच्या हेतूंना चांगला ओळखतो हे कायम ध्यानात ठेवा.
मला आता ईथे पुन्हा लिहायची गरज वाटत नाही आणि ईच्छाही नाही, तुमच्या मायबोली प्रवासाला शुभेच्छा!

हुप्पाहुय्या यांची तळमळ भिडली.
ऋन्मेष यांचे चटपटीत प्रतिसाद वाचायला तात्पुरती मजा येत असली तरी त्याने होणारे दूरगामी दुष्परिणाम जाणवले.

Pages