झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या आठवड्यात चुकून हम टिव्हीवर एक मालिका नजरेस पडली. दुसर्‍या दिवशी पण बघितली मग. दियार-ए-दिल चं पुनः प्रक्षेपण चालू होतं. पुढचे भाग मग युट्यूबवर बघितले.

मालिका तशी बर्‍यापैकी एका पठडीतली आहे. पण सगळ्यांची कामं नेहमीप्रमाणेच मस्त. सनम सईद अजिब्बात निराश करत नाही. Wink (नेहमीच्याच दुर्मुखलेल्या चेहर्‍याने काम केलंय इथे पण :फिदी:) या मालिकेत काम केलेल्या वली आणि फारा यांची बघितलेली ही दुसरी मालिका.

काय आवडलं :- टायटल साँग यारे मन अफ्फाट आवडलं. फारसी भाषेतल्या दोन ओळी पण अधे मधे वाजतात. मी टोट्ल प्रेमात पडले. आणि खूपसं शुटींग जिथे झालंय ते लोकेशन. स्कार्दू, गिलगिट बाल्टीस्तानमध्ये झालंय बरंचसं चित्रीकरण. एकंदरीत काय तर मला आवडली ही सिरीयल पण.

आता पाहिला हा धागा मी... वाह...म्हणजे मी एकटीच नाहीये हा चँनल पाहणारी..

>>>>>जिंदगी गुलझार है>>>> माजी पण फेवरेट......
फवादच्या मी जामच प्रेमात पडल्ये. 'जिंदगी गुलझार है', 'हमसफर', 'बेहद' अशा पाकिस्तानी मालिकांमधून उत्कृष्ट अभिनय करून सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत ( चित्रपट - खुबसूरत) पावले रोवण्याच्या मार्गावर असलेला अभिनेता 'फवाद अफझल खान' ... सध्या जाम प्रेमात पडल्ये मी त्याच्या (आणि त्याच्या अभिनयाच्याही) त्याचं बोलणं, त्याचे डोळे, समोरचा बोलत असताना तो जेव्हा लक्षपूर्वक ऐकत असतो तेव्हा त्याच्या चेह-यावरचे भाव, त्याचे लुक्स, त्याची भाषा... सगळचं सुंदर वाटतं. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो एका कॉमेडी शोमध्ये आला होता परवा, पण एकदम डाऊन टू अर्थ. >>>>>.मी पण...... मी पण....... Blush >>अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका...+१>>>>
खूपच सहमत...

>>>दुर्रे शेहवार
एक तमन्ना लाहासिल सी>>>>
या पाहिल्या मी...
>>>>आपल्या मालिकावाल्यांनी बरच काही शिकण्यासारखं आहे खरच यांच्याकडून>>>
खरच... या मालिका रिअल वाटतात..बटबटित नाहीत आपल्या सारख्या....
आता लेटेस्ट फातमागुल पाहिली.. टर्की मधली मालिका... सेन्सिटिव टॉपिक संयंत पधतीने हाताळला....
आता सध्या काहीच नाही पाहत आहे...

जिज्ञासा तुम्ही उल्लेख केलेल्या कुठल्याच मालिका मला झी-जिंदगी चॅनेलवर दिसत नाहीत. इन् फॅक्ट एकही पाकिस्तानी मालिका दिसत नाही. टर्की, युक्रेन, हिंदी (आणि मध्यंतरी कोरिअन) मालिकाच दिसतात.

@जिज्ञासा: Sang-e-Mar Mar बघ. खुप छान आहे. स्टोरी प्रेडिक्टेबल आहे पण acting खुपच छान आहे सगळ्यान्चे. and title song खुपच छान. आणि सध्या चालु आहे Kesi Ye Paheli पण छान आहे.

जिज्ञासा तुम्ही उल्लेख केलेल्या कुठल्याच मालिका मला झी-जिंदगी चॅनेलवर दिसत नाहीत. इन् फॅक्ट एकही पाकिस्तानी मालिका दिसत नाही.>>>> मध्यंतरी झालेल्या वादंगामुळे या चॅनेल्सवर पाकिस्तानी मालिका दाखवणे बंद आहे.

@बिपिन, ह्या मालिका मी युट्यूबवर बघते.

@अनघा, संग-ए-मरमर चे पहिले दोन भाग पाहिले. सगळे आवडते कलाकार आहेत (सानिया सईद, नोमन इजाज)! मी पाहते आता पुढचे भाग! कैसी ये पहेली पण बघते.
दियार - ए-दिल पण अर्धवट राहिली आहे.

मागच्या वर्षी जिंदगी चेनेल वर आधे अधूरे नावाची मालिका दाखवली होती.. अगदी लिमिटेड भागांची होती...भारतातल्या पंजाब मधल्या कुटुम्बाचि कहाणी.. पण विषय भयंकर होता.. भाभी देवर सम्बंध.... जस्सी नामक स्त्रीचे नरिंदरशी लग्न झाले असते पण तो आखाती देशात नोकरीला असतो...ही मग त्याच्या छोट्या भावा सोबत वरिंदर आणि बीजी सोबत कपूरतला येथे राहते..

जिज्ञासा,

यूट्यूबवर कुछ प्यार का पागलपन भी था ही मालिका पाहिली पण क्वालिटी फारच खराब आहे. पात्रांचे चेहरेदेखील नीट ओळखू येत नाहीत.

बिपिन, हो ना! मी पण नेटाने बघायचा प्रयत्न केला पण एकतर खराब व्हिडिओ आणि गोष्ट ही संथपणे चालू होती. मग मी सोडून दिली ती मालिका! फवाद खानची अगदी सुरुवातीच्या काळातली मालिका..

फालतू लडकी
ही मालिका संपून आता काही दिवस उलटले आहेत. एका ब्लॉगवर वाचले म्हणून पाहायला सुरुवात केली ही मालिका. इतकी पात्रे (खरोखरी पात्रे) आहेत ह्या मालिकेत आणि एक एक नमुना आहेत. अशी माणसे कुठे असतात असा विचार आपल्या मनात येतोच पण मग लक्षात येतं की असतात. फक्त ह्यात जी माणसं आहेत ती जत्रेतल्या चित्रविचित्र आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबासारखी आहेत. ही मालिका जणू समाजाचं एक प्रतिबिंब आहे..एका भिंगवाल्या आरशात पडलेलं. आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्याला स्वतःविषयी अधिक जाणून घेता येतं. जे आपल्याला सहजी दिसत नाही ते आरसा आपल्याला दाखवतो. आणि हो तो कधी खोटंही बोलत नाही.
तर ह्या मालिकेत भरपूर पात्रं आहेत. आणि प्रत्येकाची आपली कथा आहे. दोन भाऊ आहेत. मोठ्या भावाला (अन्वार) दोन बायका - पहिल्या बायकोपासून (रास्का) एक मोठा मुलगा (भाईजान) आणि दोन मुली (फाईजा आणि इरम) आणि दुसऱ्या बायकोपासून (पारो) एक मुलगी (पाशी). धाकट्या भावाला (सिराज) आणि वहिनीला (अल्मास) एक मुलगा (यासीर) आहे. रास्काचे विचार आधुनिक आहेत पण तोंडाची महाफटकळ आहे. पारो तरुण, देखणी आहे आणि पक्की मीठी छुरी आहे. कधी काळी तिचा भाईजानवर प्रेम होतं पण लग्न झालं त्याच्या वडिलांशी. तिने भाईजानच्या होणाऱ्या बायकोला जादूटोणा करून मारलं आणि तेव्हापासून भाईजान बिचारा बिनलग्नाचाच राहिला आहे. इरमचं लग्न एका अत्यंत कर्मठ मुस्लिम घरात होऊ घातलं आहे आणि तिची सासू एक नमुना आहे. तिची सासरची मंडळी म्हणजे आईचा बाहुला असलेला नवरा, दोन भोचक नणंदा आणि अबोल सासरा. आणि हो, ह्या रास्काकडे येणारी धोबीण (मुश्तरी) ही लग्न जुळवणारी पण आहे. तिला एका मोठ्या हवेलीत नोकरी लागते. ह्या हवेलीत तर सगळ्यात अजब नमुने राहतात! हवेलीत पुरुषांना प्रवेश नाही. जी बेगमसाहिबा आहे ती ठार वेडी आहे! तिचा मुलगा (मौजूमजा) त्याला वेडाचे अधूनमधून झटके येतात ज्यात त्याला स्त्री-पुरुषांत गोंधळ होतो (ही गोष्ट फार फसू शकली असती पण त्याचा हा आजार खुबीने आणि कुठेही vulgar होऊ न देता मांडलाय) आणि त्याची मोठी बहिण (ताजवर) – ती हवेलीची जबाबदारी तिच्यावर आहे (it’s hinted that she isn’t straight and has the lady chauffeur of the house as her love interest).
आता ह्या पात्रांच्या भाऊगर्दीत महत्वाची ओळख राहिलीच! जहाँरा – द फालतू लडकी! ही भारतीय आहे, भोपाळहून येते. म्हणजे तिचे छोटे मामू तिला घेऊन येतात कारण तिच्या आई वडील दोघांचा ही मृत्यू झाला आहे आणि तिचे भारतात कोणी जवळचे नाही. ह्या सगळ्या अजबखान्यात ही मुलगी नॉर्मल आहे पण तिचे मन काही इथे रमत नाही. आता सुरुवात होते ती जहाँराच्या येण्याने. त्यावेळी इरमचं लग्न काही दिवसांवर आलेलं असतं. पुढे कथेत काय होतं ते मी सांगणार नाही. पण ह्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडतं. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागतो. ते वागणं चूक/बरोबर/abnormal वाटतं पण अतार्किक वाटत नाही. खरी माणसं जशी आयुष्यात वागतात तशी ही पात्रे वागतात त्यामुळे आपण त्यांच्यात भावनिकदृष्ट्या गुंतू शकतो. If whatever is displayed on the screen can enter the realm of the virtual reality of our minds in my opinion it is successful as a form of entertainment. त्यामुळे अगदी संस्मरणीय अशी नसली तरी हटके मांडणी असलेली आणि एकदा बघण्याजोगी मालिका अशी ही मालिका आहे.

रमजान ईदच्या वेळी बहुतेक सगळ्या पाकिस्तानी वाहिन्यांवर ईद स्पेशल टेलिफिल्म्स असतात. ह्यावेळी दोन छान टेलिफिल्म्स पाहिल्या.
१. प्यार की लव्ह स्टोरी - सबा हमीद फार छान काम करते! अत्यंत हलकी फुलकी नर्मविनोदी टेलिफिल्म आहे. मजा येईल पहायला अशी! जर पाकिस्तानी मालिका पाहत असाल तर शालजोडीतले पण कळतील Happy
https://www.youtube.com/watch?v=Meof7Zkvj4s

२. लेडीज टेलर - जरा संथ सुरु होते गोष्ट आणि फार काही घडत पण नाही. पण तरीही खूप आवडली मला! कैफ गझनवी ने हूर शुमैलचे काम फार छान केले आहे. याचे पार्श्वसंगीत खूप छान आहे.
https://www.youtube.com/watch?v=CeAxOmMe9sw

दोन्ही बघाच अशी शिफारस करेन!

यकीन का सफर नावाची एक बऱ्यापैकी अपेक्षित (आणि काही अनपेक्षित) वळणे घेत जाणारी मालिका सध्या हम टीव्ही वर सुरु आहे. हम टीव्ही असल्याने चांगली निर्मितीमूल्य आहेत. कलाकारही ठीक ठाक. एकदा बघायला हरकत नाही. १५ भाग झाले आहेत. आता पुढे काय होणार याचा साधारण अंदाज आहे पण कसे होईल आणि त्यातही काही अनपेक्षित दाखवतात का याची उत्सुकता म्हणून पुढे बघेन!

तेरी रझा नावाची अजून एक मालिका नुकतीच सुरु झाली आहे. OST अली सेठी ने गायलाय आणि श्रवणीय आहे (https://www.youtube.com/watch?v=NQNWzJIrdkg).
सनम बलोच खूप दिवसांनी काम करत्येय. हमसफर ह्या मालिकेचा दिग्दर्शक सरमद खूसट इथे चक्क हिरो आहे! चार भाग झाले आहेत. so far so good.

अजून एक मालिका सुरु झाली आहे - धूंद म्हणून. Mystery/thriller/horror genre आहे. दर भागात नवीन कथा असणार आहे. बरेच चांगले कलाकार आहेत प्रोमो मध्ये. मी अजून एकही भाग पाहीलेला नाहीये.

नौमान एजाज माझा आवडता कलाकार आहे. आणि सजल अली ही सध्या तिच्या अभिनय आणि सौंदर्य दोन्हीमुळे प्रसिद्ध झाली आहे..बेहद ह्या टेलिफिल्म मध्ये तिचं काम अप्रतिम होतं. नुकत्याच आलेल्या मॉम मध्ये देखील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. यकीन का सफर मध्ये पण तिचं काम छानच आहे.
तर हे दोघे असलेली एक नवीन मालिका सुरु झाली आहे - ओ रंगरेज म्हणून.
OST फारच सुंदर आहे! (https://www.youtube.com/watch?v=zWvLSbiGnRs)
प्रोमो वरून चांगली/वेगळ्या विषयावरची मालिका वाटते आहे - https://www.youtube.com/watch?v=jU-rkdSqOgo
मी अजून पहिला भाग पाहीलेला नाही.
अजून एक नवीन मालिका आहे - बागी म्हणून त्यात सबा कमर आहे (हिंदी मिडीयम सिनेमात होती ती). ही मालिका थोडी कंदील बलोच च्या आयुष्यावर आधारीत आहे असं म्हणतात. कंदील बलोच नावाच्या एका मॉडेलचा तिच्या भावाने खून केला होता काही महिन्यांपूर्वी - a case of honor killing. सबा कमर फारच सुंदर काम करते! पहिला भाग छान होता. ह्या मालिकेत पण सरमद खूसट आहे. मी त्याला ओळखलंच नाही!! तेरी रझा मध्ये एक humble, super awkward, UK-returned, rich gentleman आणि इथे डोळ्यात सुरमा घालणारा, अत्यंत conservative आपल्या बहिणीच्या वागण्याने संतापणारा पंजाबी पुरुष! An okay TV show host, a good director (Humsafar and Sher-e jaat) and a versatile actor..I am impressed Sarmad Khoosat!

नुकतीच सबा कमर आणि झहीद अहमद ची बेशरम नावाची मालिका पाहून संपवली. छान लव्हस्टोरी आहे. सबा एक टॉप मॉडेल असते. स्वार्थी, 3 लग्न केलेली आणि 4th लग्न करायचे तयारीत असलेली आई, मॉडेलिंग न आवडणारे,राजकारणी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी लग्न कर म्हणणारे वडील असे प्रॉब्लेम असणारी मुलगी. आणि झहीद एक समाजसेवा करणारा आणि त्यासाठी राजकारणात जाऊ इच्छिणारा तरुण. घरी आई आणि बहीण. बहिणीच लग्न चुलत भावाशी ठरलेलं, चुलत्यानंची इच्छा की झहीद ने त्यांचा मुलीशी लग्न करावं.एक टीव्ही टॉक शो मध्ये सबा आणि झहीद गेस्ट म्हणून येतात. चर्चा सुरू झाल्यावर काही मुद्द्यांवर मतभेद होऊन एकमेकांवर टीका करतात. झहीदच मत की मॉडेलिंग करणाऱ्या मुली इज्जतदार नसतात. सबा चिडून त्याची कॉलर पकडते आणि माफी मग म्हणते. तिथे झहीद
सबाला गप्प करण्यासाठी म्हणतो की ' मुझसे इज्जत चाहती हो तो बन जाओ मेरी इज्जत, मुझसे शादी करो'त्याचा मित्र त्याला म्हणतो की तू चूक करतोयस ती हो म्हणाली तर? झहीद
म्हणतो की 'ऐसी लडकीया कहा करती है शादी' सबा ते ऐकते आनि
लग्न करायला तयार होते वर असा पण म्हणते की निकाह इथे टॉक शो मधेच होईल त्यामुळे झहीद माघार घेऊच शकत नाही आणि निकाह होतो मग सुरू होते नोक झोक वाली लव्हस्टोरी. S
सर्वानी छान काम केलंय. सबा नेहमीप्रमाणे superb.. आणि झहीद अहमद तर मला फवाद खान पेक्षाही जास्त आवडला. हे.मा.वै.म.

मध्यंतरी जिंगुहै बिंज वॉच केली आणि त्यामुळे नेटफ्लिक्स सारखं सारखं "आता हमसफर पण पहाच!" म्हणून मागे लागलं होतं. त्यामुळे गेल्या तीनचार दिवसांत ती ही बिंज वॉच केली. बर्‍यापैकी मसालेदार आणि पिळ मालिका वाटली. लोकांनी फवाद खाद आणि माहिरा खान मधली केमिस्ट्री ह्या विषयी इतकं बोललं होतं पण ती केमिस्ट्री काय कुठे दिसली नाही. अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ते एकमेकांपासून दुरावलेलेच होते, त्यामुळे कसली केमिस्ट्री अन काय! जिंगुहै मधे कथानक, अभिनय आणि एकूणच सगळ्या बाबतीत subtlety होती, त्यामुळे ती आवडली होती. ह्यात अभिनय subtle आणि नैसर्गिक होता पण मांडणी आणि कथानक अ आणि अ आणि मसालेदार होतं त्यामुळे ठिकच वाटली.
ह्यातल्या माहिरा खानचा कायमच विझलेला चेहेरा पाहून जिंगुहै सनम सईद एकदम टवटवीत, डॅशिंग वगैरे वाटायला लागली! Proud

इथे वाचून मागे बेहद टेलिफिल्म पण पाहिली. ती आवडली. सगळ्यांचे अभिनय मस्त आहेत एकदम.

Pages