"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी ६व्या सिझन चा आणि मार्टिन च्या बुक्स चा काही संबध नसेल अस वाचलं.. यात तो नवे एपिसोड्स लिहिणार सुद्धा नाही म्हणे.. >> हो खरे आहे. एका अर्थाने चांगलेच आहे. प्रामाणिकपणे वाटते कि म्हातारा पुस्तकांमधे उगाच धागे सोडत चालला आहे . शेवटी नुसता गुंता होऊन काहीच निघणार नाही असे राहून राहून वाटतेय. प्रत्येक भागाला वेळ ह्याचमूळे लागत असावा कि आधी काय घोळ घातलाय तो आठवून तो कसा निस्तरायचा हे बघण्यात वेळ जात असेल :). आधीच्या भागांमधे एखादे पात्र लोकांना आवडले वाटले कि कलाटणी म्हणून त्याला उडवायचे असे प्रकार मुद्दाम केलेत अशी चुटपुटती शंकाही आहे .

केदार शी सहमत. जानराव जिवंत होणार. माझा एका कलिगने सांगितल की याच्यातच 'स्नो अँड फायर' च एकत्र अंश आहे.

बाकी नवीन ट्रेलर पण धांसू आहे.

जॉन जर लिएना आणि राहेगरचा मुलगा आसेल तर तेच बरोबर आहे ना? स्टार्क आणि ड्रॅगनचा अंश.

एका अर्थाने चांगलेच आहे. प्रामाणिकपणे वाटते कि म्हातारा पुस्तकांमधे उगाच धागे सोडत चालला आहे . शेवटी नुसता गुंता होऊन काहीच निघणार नाही असे राहून राहून वाटतेय. >>> +१. डान्स ऑफ ड्रॅगन्स वाचताना असंच जाणवत होतं.

ईथे वाचुन मी पण पहायला सुरुवात केली..भरपुर मागे आहे मी तुम्हा सगळ्यान्च्या..
आत सिजन १ संपत आलाय.. नेड स्टार्क ला मारलेले नै आवड्ले :अओ:...डेनिसि आणी आर्या आवड्तायेत..सेरीसि पण डेंजर!
बर्याच गोष्टी क्लियर नै झाल्या सीजन १ संपत आला तरी.. ऊडत उड्त पाह्तेय म्ह्णुन कदाचित

पुस्तकापासून फार जास्त फारकत घेतली आहे असे वाटत नाही. म्हणजे मुख्य घटना तशाच घडताहेत.
यावेळी 'बिहाईंड द थ्रोन' असा अ‍ॅडीशनल कार्यक्र्मही असणार आहे.
जॉन स्नोपेक्षाही आर्याचे काय होणार हा माझ्या जीवाला घोर लागला आहे!

साँग ऑफ आईस अँड फायर असे असल्यामुळे, स्टार्क आणि टार्गेरिअन यांची रेलचेल होणार सहा-सातव्या सिझन मध्ये. ब्रॅन आणि रिकन स्टार्क जिवंत आहेत, सान्सा आणि आर्या जिवंत आहेत. जॉन स्नो बद्दल थेअरीज आहेत. स्पॉईलर : केटलीन बद्दल पुस्तकात ती जिवंत असल्याचा उल्लेख आहे. डिनेरीस चा एक भाऊ जिवंत असल्याचा उल्लेख आहे. सो एकंदरीत पुस्तकापेक्षा सिरीज उत्कंठावर्धक होणार, पुस्तकांची वाट पहावी लागणार.

बहुधा स्टार वर्ल्ड वर लागते.

पण संवाद सुद्धा सेन्सॉर केलेत.
जॉन स्नो ला मेलिसान्ड्रे 'बास्टर्ड ऑफ नॉर्थ' म्हणते तेव्हा सब टायटल्स मध्ये 'illegitimate child of north' असं लिहून येतं.

पुस्तकात चिकार फापटपसारा आहे पण पुस्तकं वाचायची मजा काही औरच आहे >> पुस्तकांचा आकार बघून टीव्ही सीरीजच बघावा असा विचार करत होते. पण री-रनदेखील होऊन गेलेत असं दिसलं, त्यामुळे पुस्तकच आणलंय पहिलं. <मजा काही औरच आहे> हे वाक्य मला धीर देऊन जातंय Happy

तर मागे इथे लिहिल्यासारखे जॉन स्नो परत जिंवत झाला. आता तो बॅक फ्रॉम डेड असल्यामुळे वॉलशी त्याचा संबंध नाही राहिला तरी चालेल. कारण एकदा तो मेला होता. त्यामुळे अन्टिल द डेड हे वचन पूर्ण होते.

माझे इतर प्रिडिक्शन्स.

उरलेल्या दोन ड्रॅगन्स पैकी
१. एक ड्रॅगन टिरियन घेईल. ( हा पण समहाऊ मला कुठून तरी टार्गारियन वाटतोय. अजून पुष्टी मिळाली नाहीये. पण दोन पुस्तक आहेत. )
२. दुसरा हा जॉन स्नोचा असेल. कारण स्नो पण टार्गारियन असण्याची शक्यता आहे. जॉन स्नो हा कदाचित रेगार टार्गारियन आणि ब्रायनाचा ( एडार्ड स्टार्कची बहिण) मुलगा आहे. रेगार एका टुर्नी मध्ये (हॅरनहॅल) स्टार्कच्या बहिणीवर बलात्कार करतो असा पुसटचा उल्लेख पुस्तकात आहे. त्यावर क्लॅरिटीनाही पण माझे अनुमान आहे ते.
३. कदाचित सातव्या सिझन मध्ये जॉन आणि डनेरिस लग्न करतील. जरी ते बहिन भाउ असले तरी टार्गारियन मध्ये ते चालते.

बघू काय होते ते. Happy

मी टीव्ही शो चे सगळे सीझन्स आधी पाहिले. मग पुस्तकं वाचली एकापाठोपाठ एक. त्यामूळे पुस्तकात गोष्टीचे धागे वहावत गेले तरी माझ्या डोक्यात गोंधळ झाला नाही. शो पाहिला नसेल तरी फार त्रास होईल पुस्तक वाचताना असं वाटत नाही.

भारतात पण सुट्टीच्या दिवशी (शनि, रवि) का बरं प्रसारीत करत नाहियेत नवे एपिसोड्स हे लोक Sad

केदार +१.
मी असाही अंदाज वाचलेला आहे की, लिआना रेगारच्या प्रेमात होती. रॉबर्ट्चा बाहेरख्यालीपणा तिला माहीत होता. त्यांचा मुलगा तो जॉन. आणि रॉबर्ट सगळ्या टार्गारियनना मारणार असल्यामुळे त्याला स्नो म्हणून वाढवले. पुस्तकात सारखा हा उल्लेख आहे- that wasn't Ned Stark's way. तसाच टिरियन हा मॅड किंगचा मुलगा आहे, टायविनचा नाही. त्यामुळे जॉन, डानी आणि टिरियन हे तिघे ड्रॅगन म्हणजे फायर आणि व्हाईट वॉकर्स आईस. आईस अँड फायर. आधीच संख्या कमी आणि त्यात गटबाजी, वॉलचा बचाव तुटणारच. त्यानंतरच्या मारामारीत हिरोज लागणारच.

जॉन आणि डानीच्या बाबत- ते बहीण भाऊ नसतील. आत्या-भाचे वरच्या अंदाजाप्रमाणे.

केदार भुत्या म्हणतो तसे 'लिआना रेगारच्या प्रेमात होती' हे उल्लेख जास्त प्रमाणात आहेत त्यामूळे .... माझा एक अंदाज .. अंदाज नाहि तर पूर्ण खात्री आहे कि 'फॅन्स ना जे वाटते किंबहुना जे व्हावेसे वाटते तेव्हढे मुद्दाम्हून घडवत नाही म्हातारा' Wink

"माय वॉच इज एन्डेड" कालचे शेवटचे वाक्य. - आणखी एक अंदाज बरोबर.

आणि ब्रायनला 'ते युद्ध' दिसते. "ही रेपड हर" असे ब्रायन काल म्हणाला. त्या बिल्डिंग मध्ये त्याच्या आत्याला ठेवलेले असते. थोडक्यात पुढच्या किंवा त्याचा पुढच्या भागात जॉन स्नोच्या आई वडिलांचा पत्ता लागेल. - हा पण अंदाज आता खरा होईल. जॉन स्नो टार्गारियनच आहे. Happy आणखी एक पुरावा - तो जिंवत झाल्यावर, रेड वुमन म्हणते की "स्टानिस वॉज नॉट द प्रॉमिस्ड प्रिंन्स"

पुढच्या भागात डनेरिसला सोडवायला तिचा ड्रॅगन येणार असे वाटतेय.

माझा आणखी एक अंदाज आहे की त्या नविन पुस्तकात आलेला ब्लडरेव्हन " ब्रायन्डन रिव्हर्स" चा उल्लेख असाच आलेला नाही. तो देखील हाफ प्रिंन्स होता. आणि तो अन एगॉन मिळून "डायमॉन ब्लॅकफायर" शी म्हणजेच त्यांच्या सावत्र भावाशी युद्ध करतात. मला वाटतंय की ब्लॅकफायर कडे पण काही तरी जादूई ताकद आहे आणि तो म्हणजे व्हाईट वॉकर आहे. किंवा त्याचा मुलगा. GRRM च्या नविन पुस्तकात , नाईट ऑफ सेव्हन किंगडम मध्ये ह्या युद्धाविषयी भरपुर लिहिले आहे. थोडक्यात ते पुस्तक योग्य वेळ साधून आणलेले आहे असे माझे मत आहे. वॉच आउट फॉर ब्लॅकफायर. Happy

अंबर्स रॅमसीला फसवतील का? स्मॉलजॉन ने ओथ घेतली नाही. रॉब असेपर्यंत अंबर्स स्टार्क गटातले होते. ग्रेटजॉन तर अगदी खासच दाखवला होता. रॉबला राजा घोषित करण्यात तो सगळ्यात पुढे होता. नंतर ब्रॅन भिंतीपलिकडे जाताना रिकॉनला त्यांच्याकडे जायला सांगून गेला होता. एवढ्या विश्वासू अंबर्सनी आताच का फसवावे?
मला वाटतं की हा रॅमसीला विंटरफेलच्या बाहेर आणायचा डाव आहे. रूज बोल्टन हुशार होता. त्याने हा डाव सहज ओळखला असता किंवा त्याला पटवणे अवघड असते. रॅमसी तेवढा दूरदृष्टीचा नाही. तरी विंटरफेलवर हल्ला करून त्याला हरवणे अवघड झाले असते विशेषतः कारस्टार्क्स त्याच्यासोबत असताना. रिकॉनचे काम करणार्या अभिनेत्याचे मुलाखतीतले वाक्य - "it would be disappointing if Jon Umber did really betray us."

रॅमसी कसा मरेल माझा अंदाज- रिकॉन आणि ओशाला जंगलात सोडून त्यांची शिकार करताना शॅगीडॉग त्याच्यावर हल्ला करेल. Happy

पुस्तकात अंबर्स आणि आणखी काही लोकं मिळून एक अनोखी चाल आखतात. अर्थात पुस्तकात ही लोकं डायरेक्ट रॅमसीकडे जात नाहीत. त्यामुळे ही फक्त चाल आहे असे वाटतेय.

अंबर्स म्हणा किंवा ग्रेटजॉन ह्यांच्यासाठी एकच किंग होता. तो म्हणजे किंग ऑफ नॉर्थ. रॉब स्टार्क.

समहाऊ रॅमसी इतक्यात मरणार नाही असे वाटतेय. मेला तर बरेच. पण येत्या एक दोन भागात वॉल कडे जाईल आणि वॉल मात्र जॉन स्नोची नसेल. जॉन स्नो आणि वाईल्डलिंग हे एकत्र असतील. त्यामुळे जर पुढच्या दोन भागात युद्ध झाले तर जॉन स्नो कडे विंटरफेल असेल. आणि सान्सा, रिकॉन आणि जॉन हे फायनली एकत्र दिसतील.

मग रिकॉन लॉर्ड ऑफ विंटरफेल होईल आणि जॉन, ग्रेट वॉर साठी ओबिसिडीयन तलवारी एकत्र करण्यासाठी निघेल असे मला वाटतेय.

शॅगी मेला आहे.

बायदवे पुढचा एपिसोड Book of the Stranger आहे. हा Stranger पण सेव्हन मधील एक गॉड आहे. थोडक्यात बरीच लोकं मरू शकतात.

पुस्तकात तो युरॉन ( रिकचा काका) ऑलरेडी जहाज घेऊन ड्रॅगन हंटला निघाला आहे. आता ह्या एपिसोड मध्ये तो राजा होईल असे दिसते. इंट्रेस्टिंग असणार आहे.

मी फायनली कॅच अप केले!! शेवटचे दोन भाग तर ऑस्सम होते!

स्पॉयलर्स :

आर्या - वाल्डर फ्रे सीन बघून तर मी टाळ्याच पिटल्या!! मी अल्मोस्ट विश करत होते की ब्रिएन रिव्हररन पर्यन्त आलीच होती तर तिची आणि आर्याची गाठ पडावी आणि तिने आर्याला घेऊन विंटरफेल ला जावे. अर्थात आर्या ला आता कुणाच्या सपोर्ट ची गरज उरली नाहीये!! Happy
सान्सा चे कॅरेक्टर पण चांगले डेवलप होतंय असं वाटतंय तेवढ्यात आता त्या लिटल्फिन्गर च्या नादाने काहीतरी माती खाईल की काय असं वाटतंय Sad हेट दॅट गाय! त्यात जॉन जरा मानसिक रित्या कमकुवतच दाखवलाय. तो उत्कृष्ट योद्धा आहे पण चांगला नेता नाही असे वाटते!!
सर्सी - जेमीचं काय होईल ? समहाऊ जेमी डिड नॉट सीम हॅपी टु सी हर बीइंग क्राउन्ड!
वॅरिस ची डॉर्नला जायची स्ट्रॅटेजिक आयडिया भारी होती. तिथे मार्जरीची आजी पण! लॅनिस्टरांना किती शत्रू झालेत !! आता डेनेरिस ला कोण/ काय थांबवणार ?
हाउंड ला जिवन्त बघून मला धक्काच बसला होता. त्याच्या कॅरेक्टर ची काय गरज असेल आता पुढे ?? कदाचित माउन्टन साठी ठेवलाय का त्याला ?
अजून काय अंदाज ? !

प्रोमो मधे सान्सा म्हणते "लोन वुल्फ डाइज अँड द पॅक सर्व्हाइव्ज " या वाक्याची चर्चा आहे म्हणे सध्या Happy काय अर्थ असेल? कोण लोन वुल्फ (स्टार्क?) जो मरणार आहे? जर लिटरल मीनिंग नसेल आणि जस्ट "एकीचे बळ मोठे" अशा अर्थाने म्हणत असेल तर ठीक.

Pages