Submitted by योकु on 20 June, 2017 - 12:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक वाटी थंड्गार आणि जरासं आंबट, साधं दही
७/८ हिरव्या मिरच्या (तिखट वाली व्हेरायटी घ्यावी)
मीठ
साखर
चमचाभर तेल
अगदी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
एका लहान कढल्यात चमचाभर तेल आणि बारीक चिरलेली मिरची असं घालून अगदी मंद आचेवर तापत ठेवावं. मिरच्या मस्त कुरकुरीत व्हायला हव्या.
तोवर दही चमच्यानीच थोडं फेटून घ्यावं
यात चवीनुसार मीठ, साखर घालून तयार ठेवावं
आता कुरकुरीत केलेल्या मिरच्या यात घालाव्या आणि थोडी कोथिंबीर घालावी
फार घट्ट असेल तर अगदी थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करावी. पळीवाढी टाईप्स.
जरा आंबट, गोड्सर, खारट आणि तिखट अशी दही मिरची तयार आहे. पोळी-भाजी सोबत तोंडीलावणं म्हणून मस्त लागतं.
वाढणी/प्रमाण:
आवडेल तसं.
अधिक टिपा:
दही गार असेल तर मस्त लागतं
मिरच्या जरी जास्त वाटल्या तरी तिखट होत नाहीत. सॉर्ट ऑफ तिखटपणा जातो कुरकुरीत तळल्यामुळे.
माहितीचा स्रोत:
बायडी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही पद्धत माहित नव्हती. मी
ही पद्धत माहित नव्हती. मी नेहेमी मिरची आचेवर भाजून घेऊन दह्यात कुस्करते आणि वरून मोहरी-हिंग फोडणी देते. मीठ, साखर (ऑप्शनल)...
आता एकदा तिखट न खाता येणार्या मंडळींसाठी अशी करून बघेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोकण/रत्नागिरी कडे तिक(ख
कोकण/रत्नागिरी कडे तिक(ख)मिटलं म्हणतात बहुतेक ह्याला.
माझ्या कोकणात मूळ असलेल्या
माझ्या कोकणात मूळ असलेल्या (पण तिथे क्धी कुणी न राहिलेल्या) आजोळी याला दह्याचा चटका म्हणत.
मस्त रे योगेश. फोटो दे की .
मस्त रे योगेश. फोटो दे की .
बायदवे, डब्यात घेऊन जाता येईल का ही दहीमिरची हा विचार करतेय
मस्तच...
मस्तच...
योकु आमच्या कोल्हापूरात याला
योकु आमच्या कोल्हापूरात याला झिटलंमिटलं म्हणतात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या बाबांना खूप आवडतं
किती वेग्वेगळे नावं! जाई
किती वेग्वेगळे नावं! जाई दिसण्यात काही वेगळा नाहीय हा पदार्थ सो फोटो काही काढला नाही.
मीरा कधी कधी याला हिंग-जिरं-मोहोरीची फोडणीही देते पण ते न घालताही छान लागतं. खरपूस तळल्या मिरचीचा फ्लेवर चांगला लागतो.
मस्त आहे. आम्ही मिरच्या
मस्त आहे. आम्ही मिरच्या डायरेक्ट गॅसवर भाजून खलबत्त्यात कुटून मग दही घालतो
पण सायो, तुम्ही त्याला काय
पण सायो, तुम्ही त्याला काय म्हणता ते सांग की.
मिरच्या भाजून तिखट.
मिरच्या भाजून तिखट.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी मिरच्या डायरेक्ट विस्तवावर
मी मिरच्या डायरेक्ट विस्तवावर भाजून करते, त्याला आम्ही तिखटी म्हणतो. मी त्या हातानेच चुरडते.
हे पण मस्त आहे, करून बघेन.
दह्यातली मिरची म्हणतो आम्ही !
दह्यातली मिरची म्हणतो आम्ही !
कल्पना करून छान वाटतेय..
कल्पना करून छान वाटतेय.. शाकाहारी जेवण असले की असा दह्याचा प्रकार लागतोच.. आणि छान वाटतो..
असं मिरचीचं तिखट मुडाखि बरोबर
असं मिरचीचं तिखट मुडाखि बरोबर मस्त लागतं.
तिखमिटलं. लसूण कच्चा ठेचून पण
तिखमिटलं. लसूण कच्चा ठेचून पण भारी लागतो ह्यात.
केळा रायतामध्ये मिरचा छान
केळा रायतामध्ये मिरचा छान लागतात. आंबट ,तिखट ,गोड. खिचडी,वेज बिर्याणिबरोबर.
उफ्फ! कसलं खमंग प्रकरण
उफ्फ! कसलं खमंग प्रकरण वाटतंय.
चटकदार!!! मस्त!!!
चटकदार!!! मस्त!!!
आम्ही याला मिरचीच भरीत म्हणतो
आम्ही याला मिरचीच भरीत म्हणतो . मिरच्या गॅसवर भाजून मग ठेचतो . ह्याला दही थोडं आंबटच लागतं .
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी भरपेट फराळ झाल्यावर दुपारी जास्त जेवण नको असतं , त्यामुळे त्या दिवशी दुपारी भात आमटी आणि हे भरीत हाच बेत असतो दर वर्षी आमच्याकडे . सकाळच्या फराळा मुळे जड झालेल्या पोटावर हे भरीत म्हणजे चांगलाच उतारा असतो .
मी कुट्ताना भाजके शेंगदाणे
मी कुट्ताना भाजके शेंगदाणे पण घालते. लैभारी टॉप क्लास टेस्ट मस्त रेसीपी.
तोंपासु. हे दुसर्या दिवशी
तोंपासु. हे दुसर्या दिवशी जास्त चांगलं लागतं. आंबटदही मुअरतं नं त्यात.
>>>> मिरच्या गॅसवर भाजून मग ठेचतो . ह्याला दही थोडं आंबटच लागतं >>>>> मी पण असंच करते.
मिरचीचा खरडा तव्यावरचा वारकरी
मिरचीचा खरडा तव्यावरचा वारकरी स्पेशल.
मल अहे माहीत नव्हतं, आमच्या
मल अहे माहीत नव्हतं, आमच्या घरी नाही केलं जात![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आमचा स्वयंपाक अति मिलमिळीत असतो, मी हे करून बघेन आज (आवडलं तर रोज करेन
)
वरदा, मोहरी-हिंग फोडणी ने चव बदलत असेल ना? ट्राय करून बघते हे ही (उद्या)
मी हे असं लाल मिरचीचं वेरिएशन
मी हे असं लाल मिरचीचं वेरिएशन करते. म्हणजे जेव्हा कधी दहीभाताला वरून चरचरीत फोडणी द्यायची असते तेव्हा सुक्या लाल मिरचीचा वापर करते. ती मिरची नंतर काढून पुन्हा एखाद्या सटात घेऊन दह्यात चुरडते. मीठ-साखर-कोथिंबीर घालते. मस्त लागतं तेही!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आम्ही पण 'मिरचीचं तिखट' असं म्हणते!
मस्त लागतो हा प्रकार!
मस्त लागतो हा प्रकार!
सध्या कूर्गमधील गोल लाल बुटक्या सुक्या मिरच्या घरी आल्या आहेत. ताकाच्या कढीला त्यांची फोडणी अतिशय रुचकर व स्वादवर्धक वाटते आहे. त्या मिरच्या तेलात भाजून दह्यात चुरडून कशा लागतात बघायला हवं.
तुम्ही त्याला काय म्हणता ते
तुम्ही त्याला काय म्हणता ते सांग की. >>>>
आम्ही ह्याला काहीही म्हणत नाही. कारण आम्ही हे करतच नाही. मुळात आमच्या भाज्या चविष्ट असतात त्यामुळे पोळी भाजी बरोबर तोंडी लावायला काही लागत नाही. आणि अगदी लागलच तर साखर तुप, गुळ तुप, गुळांबा, मेथांबा, गोड लोणचं वगैरे घेतो.
सॉरी योकु, सशलची पोस्ट वाचून टिपी केल्यावाचून अगदीच रहावलं नाही.
हे टेस्टी लागत असेल, करून पाहू एकदा.
सायो, योकु, प्रज्ञा आणि सर्व
सायो, योकु, प्रज्ञा आणि सर्व जे हे करतात, हा पराग बघा काय म्हणतो!!
(खोड्या काढल्या नाहीत कोणाच्या तर तो पराग कसला???)
आम्ही मिरचीचं भरीत करतो; गॅसवर भाजून, दही, दाण्याचं कूट इत्यादी घालून पण भोपळ्या मिरचीचं. रिया म्हणतेय तसं मिळमिळीत खाणार्यांत आम्हीही. पण हे तिक(ख)मिटलं सासरी करतात. ते सर्वजण मूळचे रत्नागिरीचे आहेत.
यम्मी लागत असणार हे, जबरदस्त
यम्मी लागत असणार हे, जबरदस्त रेसिपी.
धन्स योकु, तुमच्या रेसिपी एकदम हटके पण सहज करून बघण्यासारख्या असतात नेहमी.
धन्यवाद लोक्स!
धन्यवाद लोक्स!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
पराग
सशल, करून पाहा. नाही होत हे फार तिखट वगैरे. सहज खाता येईल असंच असतं...
आम्ही मिरच्या भाजून घेवून
आम्ही मिरच्या भाजून घेवून करतो. आता योकू तुझ्या पद्धतीने करून पाहिन.
यातच बारीक चिरलेली कांद्याची पात/ताजी कोवळी मेथी घालून बघा. फार छान लागते तेही.
मेतकुट ही घालून यात छान लागत.
Pages