मे महिना संपून जून सुरु झाला की गर्मीचा कहर वाढलेला असतो. पांढऱ्या, करड्या ढगांचे पुंजके दिसायला लागतात. वेधशाळेच्या नेमेची चुकणाऱ्या अंदाजांच्या (इथे कुणी वेधशाळेतले कर्मचारी असल्यास क्षमस्व :-)) बातम्या यायला लागतात. प्रत्येकालाच पावसाचे वेध लागलेले असतात. आणि मग एकदाचा तो येतो...
मुंबईत शुक्रवारी रात्री असाच धुमशान बरसला. सगळेजण झोपले असताना गुपचूप! आणि मग शनिवारचा दिवस अगदीच कोरडा गेला. बिलकुलच नामोनिशाण नव्हते. शनिवारी रात्री कधीतरी जाग आली तेव्हा चक्क चंद्रप्रकाशाचा कवडसा खिडकीतून जमिनीवर पडलेला... इतके निरभ्र आकाश होते.
मग आज रविवारची सकाळ उगवली, ती सुद्धा सूर्यदर्शनानेच! पण दिवस चढत गेला आणि ढगांनी दाटी केली आणि मग भर माध्यान्ही सूर्याला आपले तोंड लपवावे लागले. एकदम धुमशान पाउस सुरु झाला... टपोऱ्या थेंबांचा! ढग एकदम खालीच उतरले जणू! अर्ध्या एक मैलावरच्या बिल्डींग्स पण ढगात बुडून गेल्या. इतका मस्त माहोल झाला. सुरुवातीला पटापट मोबाईल काढून मस्त फोटो काढून घेतले. वाटले इतक्यात थांबेल, काय घ्या... पण तो बरसतच राहिला. मग मात्र राहवलं नाही. भिजायला बाहेरच पडलो. अगदी अर्धा तास मस्त पावसात भटकंती केली. दहिसर नदीने आपले नेहेमीचे स्थितप्रज्ञ रूप बदलले आणि प्रवाही झाली. माणसांनी तिच्या ओंजळीत टाकलेली घाण झटकून पावसाची, पावसाच्या दिवसांच्या स्वागताची तयारी केली. सगळेच लोक रविवारच्या सकाळच्या मुहूर्तावर आलेल्या पावसाच्या स्वागताला रस्त्यावर आलेले. अशा पावसाची मस्त मजा घेताना डोक्यात गाणे घुमत होते... "चिंब पावसाने रान झाले आबादानी..." कितीतरी वेळ तेच गाणे चालले. मग घरी येऊन आंघोळ करताना विचार करत बसले पावसाच्या गाण्यांचा. पण मेंदू एकदम फ्रीझ झाला दुसरे कुठचे मस्त गाणे आठवतच नव्हते. नाही म्हणायला "श्रावणात घननिळा बरसला..", "सावन का महिना पवन करे शोर.." वगैरे आठवली पण "चिंब पावसा"ची मजा त्यांच्यात नव्हती. अगदी खुपच जोर दिल्यावर शुभा मुद्गल यांचे "अब के सावन" आठवले... त्यातले पण सुरुवातीचे शब्द न आठवता फक्त "घटा सावन की, लडी बुन्दोंकी..." एवढच आठवत राहिले...
तुम्हाला काही मस्त गाणी आठवतात का सांगा ना...
त.टि.-
१. मी "चिंब पावसाने रान झाले..." चा उल्लेख केला खरा पण ते मी फक्त ऐकलेच आहे. आता लेख लिहून मग तूनळीवर शोधून बघितलं तर गाण्यात पावसाचा एक टिपूस नाहीय...
२. एक मस्त पावसाळी फोटो आहे माझ्या खिडकीतल्या पावसाचा. पण इथे टाकणे फार म्हणजे फारच कठीण
लगी आज सावन की.. मला सगळ्यात
लगी आज सावन की.. मला सगळ्यात आधी हेच आठवतं.
एकदा नक्की झाले की पावसाळा
एकदा नक्की झाले की पावसाळा सुरु झालाय, कन्फर्म सुरु झालाय की गारवा ची गाणी रिलिजियसली लावणे हा शिरस्ता गेले कैक वर्ष सुरु आहे.
गरजत बरसत सावन आयो रे....
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा...
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन... भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन...
आपला तर रूल आहे..
आपला तर रूल आहे.. शाहरूखपासूनच आठवते
कोई लडकी है.. जब वो हसती है.. बारीश होती है.. घुमड घुमड घुम घुम..
कोई लडका है.. जब वो हसाता है.म् सावन आता है.. झणन झणन झण झण ..
घोडे जैसी चाल.. हाथी जैसे दुम.. ओ सावन राजा.. कहासे आये तुम ..
चाक दुम दुम .. चाक दुम दुम
मुंबई पुणे मुंबई मधील स्वजोचे
मुंबई पुणे मुंबई मधील स्वजोचे कधी तू गाणे सुद्धा पावसात ऐकायला मस्त वाटते.
येरे येरे पावसा रुसलास का हे बालगीतही छान आहे
रवीन टंडनचे बहुधा टिप टिप बरसा पाणी. पाणीने आग लगाई... या गाण्यातील टिईनीनईंग नीग नींग टिईनीनींग .. मुजिक कातिल आहे..
अमिताभ स्मिताचे आज रपट जाये तो हमे ना ऊठय्यो सुद्धा मस्त..
पावसात गर्लफ्रेंडसोबत एका छत्रीत भिजत जाताना राजकपूर नर्गिसला तोड नाही.. प्यार हुआ ईकरार हुआ आठवणारच
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन, हेच सर्वात आधी आठवतं आणि मस्त त्यात चिंब भिजणारे अमिताभ, मौसमी डोळ्यासमोर येतात. अर्थात पाऊस पडत असेल तेव्हा.
पावसाची वाट बघत असते तेव्हा मात्र ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा. हे आठवतं.
धन्यवाद! इतकी छान गाण्यांची
धन्यवाद! इतकी छान गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल... माझ्या स्मरणशक्तीला काय झालेले कुणास ठाउक!
घोडे जैसी चाल पण आठवले रात्री, पण फक्त गाण्याची द्रुश्य आठवत होती, शब्द विसरलेले...
लगी आज सावनकी... मस्त आठवण!
गारवा मलाही आवडतो, पण त्यातले सौमित्रचे कवितावाचन जास्त आठवते गाण्यांपेक्षा
गाना.कॉमवर नवी प्लेलिस्ट बनवायला हवी
मस्त धागा.
मस्त धागा.
पावसाचं चिन्ह दिसलं की पाहिलं गाणं मनातच वाजायला लागतं, ते म्हणजे:
दिवाना हुआ बादल, सावन की घटा छाई
ये देखके दिल झुमा, ली प्यार ने अंगडाई
मग हळुवार पाऊस असताना:
रिमझिम रिमझिम, रुमझुम रूमझूम
भीगीभीगी रुत मे तुम हम, हम तुम
मग पुण्याच्या रिपरिप पावसाचा कंटाळा आला की कोकणचा पाऊस आठवून म्हणायचं:
अब के सावन ऐसे बरसे, बह जाए रंग मेरी चुनरसे
बहके तनमन, जियारा तरसे
जमके बरसे जरा..
जरा इंटेन्स, सोलफुल:
बहता है मन कही, कहाँ जानती नहीं,
कोई रोक ले यहीं..
डोळ्यात बदाम घेऊन प्रेमात पडताना:
सावन बरसे, तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा हैं, ये प्यार नहीं तो क्या हैं
आणि धुवांधार आसपासच्या सगळ्या गोष्टी थांबवून कोसळतो तेव्हा:
गरज बरस सावन घिर आयो
गरज बरस सावन घिर आयो
भरपुर कोसळून शांत झाला की आसपासच्या हिरव्या निळ्या रंगांच्या छटा बघताना:
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यानी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी..
पाऊस सुरू झाला की मला सर्वात
पाऊस सुरू झाला की मला सर्वात आधी "ए आई मला पावसात जाऊ दे" हे बालगीत आठवत
आणि मुसळधार पाऊस सुरू असेल तेव्हा स्वप्नील बान्दोडकरच "घन आज बरसे अनावर" हे गाण आठवत.
रिमझिम झरती श्रावणधारा
रिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात
मॅगी मस्त मस्त पोस्ट
मॅगी मस्त मस्त पोस्ट
मला सिनेमात पडणारा पाऊस नेहमीच खोटा वाटत आला आहे, पण सावन बरसे तरसे दिल, मधला आणि रिमझिम गिरे सावन (किशोर चे) त्या गाण्यात मौशुमी आणि अमिताभ हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर जे बागडतात तो अगदी खर्राखुर्रा पाऊस वाटतो.
सावन बरसे तरसे दिल मध्ये अक्षय खन्ना आणि सोनाली बेंद्रे आहेत.
पावसाला म्हटला की, आधी आठवतात
पावसाला म्हटला की, आधी आठवतात शाळेतल्या कविता...
अगदी 'डरांव डरांव, का ओरडता उगाच राव' पासून सगळ्या..........
आले नवे नवे पाणी
उसळत घुसळत फेसाळत जळ धावे दाही दिशांनी.... किंवा
पावसाच्या धारा येती झरझरा
झांकोळले नभ, सोसाट्याचा वारा ....
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले ......... ह्या कविता हमखास आठवतातच.
आणि हिंदी /मराठी चित्र संगीत, मराठी भावसंगीत तर पर्जन्य काळावर आशिकच असतं जसं काही
ओ सजना बरखा बहार आयी, रस की फुहार लायी,
अँखियों में प्यार लायी, ओ सजना....
रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन .....
घर आजा घिर आयी बदरा सांवरिया
घनन घनन घिर घिर आये बदरा
घन घनघोर कारे छाये बदरा .....
अब के सजन सावन में, आग लगेगी बदन में,
घटा बरसेगी, नयन तरसेंगे मगर मिल न सकेंगे दो दिल
एकही आंगन में.............
घन घनमाला नभी दाटल्या कोसळती धारा...
रिमझिम झरती श्रावणधारा ....
पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू....
टप टप टप बाहेर काय वाजतंय ते पाहू
चल गं आई, चल गं आई पावसात जाऊ...
भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
वादल वारं सुटलं गं, वाऱ्यानं तुफान उठलं गं
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात, सजनानं होरीला पान्यात लोटलं .....
रिमझिम पाऊस पडे सारखा,
रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे गं बाई गेला मोहन कुणीकडे .... राहिलंच की
हाय हाय ये मजबुरी,
हाय हाय ये मजबुरी,
ये मौसम और ये दुरी,
मुझे पलपल है तडपाये,
तेरी दो टकीयाकी नौकरी मे मेरा लाखों का सावन जाये...........
गेल्या रविवारीच नवर्याला हे गाणं ऐकवुन ऐकवुन घरी राहायला भाग पाडलं..... (ऑफ्फीसला जाणार होता तो, ते ही संडेला त्यातपण इतका रोमँटीक पाऊस पडत अस्ताना.... )
अजुन एक गाणं आठवत नेहमी,
"रिमझिम के गीत सावन गाये, हाये, भिगी भिगी रातों मे'
शत्रुघ्न सिन्हा वर चित्रित
शत्रुघ्न सिन्हा वर चित्रित झालेलं गाणं
बरखा रानी , जरा जमके बरसो
मेरा साजन जा ना पाए झूमकर बरसो...
अक्शय आणि ऐश्वर्या - ताल मधलं गाणं
दिल ये बेचैहैवे (?) , रस्ते पे नैन वे (?)
जिंदडी बेहाल है , सुर है ना ताल है
आजा सावरिया आ आ
ताल से ताल मिला
पद्मजाजींच्या,'रंग बावरा
पद्मजाजींच्या,'रंग बावरा श्रावण'मधील...
हसरा,नाचरा,जरासा लाजरा...
सुंदर साजिरा श्रावण आला!
शिवाय,
१) जिंदगीभर नहीं भूलेगी,वो बरसात की रात
एक अन्जान हसीनासे मुलाकात की रात
२)एक लडकी भीगी-भागीसी,सोयीं रातोंमें जागी सी
मिली ईक अजनबीसे,कोई आगे न पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
आणि 'पत्थर के फूल'मधील,
३)कभी तू छलिया लगता है
कभी दिवाना लगता है
कभी अनाडी लगता है
कभी आवारा लगता है
>>>पावसात गर्लफ्रेंडसोबत एका छत्रीत भिजत जाताना राजकपूर नर्गिसला तोड नाही.. प्यार हुआ ईकरार हुआ आठवणारच>>>+१११
Hya rimzhimi jhirmir paus
Hya rimzhimi jhirmir paus dhara,
tan man phulaun jati
oo hya rimzhimi jhirmir paus dhara,
tan man phulaun jati
shwaas tuzha madhumass phulacha,
rang sukhacha haati
ha dhund gaar wara, ha kowala shahara
ujalun rang aahe, swachand pritiche
Chimb bhijalele, rup sajalele
barasuni aale rang pritiche.
kon jaage raat sari, antari sukhauni
sapt rangi pakharu he, endradhanu banu aale
laat hi , waadali, mohuni gaate
hi mithi ladaki mogara hote.
padasaad bhawananche, re bandh na kunache
daahi dishat gaane , be dhund pritiche
Chimb bhijalele, rup sajalele,
barasuni aale rang pritiche.
हो..नभ उतरू आलं...चिंब थरथर
हो..नभ उतरू आलं...चिंब थरथर वलं...अंग झिम्माड झालं..हिरव्या बहरात...
स्नेहा खान्विलकरच पावसावरंच
स्नेहा खान्विलकरच पावसावरंच
येरे येरे येरे येरे ट्रिपन सोन्ग हे ठेका धरायला लावणार
मला सगळ्यात आधी आठवतं आणि
मला सगळ्यात आधी आठवतं आणि माझं आवडतं मौसमी आणि अमिताभचं रीम्झीम गिरे सावन-लताच्या आवाजातलं.
सगळे प्रतिसाद छान.
मोहब्बत बरसा देना तु सावन आया है नाय काय आठवलं कोणाला
दादा कोंडकेंच ढगाला लागली कळ
दादा कोंडकेंच ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं...
सगळी गाणी मस्त आहेत. काही
सगळी गाणी मस्त आहेत. काही माहित नाही, शोधायला पाहिजेत.
आज रपट जाये तो हमे ना उठ्ठयो... अमिताभ, स्मिता पण भन्नाट आहे.
गच्च ढगांनी भरलेल्या संपृक्त वातावरणात बॉम्बे चं "तू ही रे, तेरे बिना मै कैसे जिऊ" आठवते.
गरजत बरसत सावन आयो रे ....
गरजत बरसत सावन आयो रे ....
बरसात में तुमसे मिले हम भी सजन, हमसे मिले तुम....
ऋतू हिरवा ऋतू बरवा .....
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ....
पाऊस कधींचा पडतो, झाडांची
पाऊस कधींचा पडतो, झाडांची भिजली पाने; हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद स्वराने.
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी.
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही.
सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग.
समुद्र बिलोरी आयना, सृष्टीला पाचवा महिना.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.
श्रावणात घन निळा बरसला.
आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासरा.
नभ मेघांनी आक्रमिले
बरसे बूंदियाँ सावन की
सावन का महीना पवन करे जोर्/शोर
रिमझिम के तराने ले के आयी बरसात.
आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
काली घटा छाये मोरा जिया तडपाये.
जब चली थंडी हवा जब उठी काली घटा.
मेघा रे मेघारे मत संदेश ला रे.
जा रे बदरा बैरी जा.
मौसम बीता जाय
नाचे मन मोरा मगन तिक ता धिगी धिगी. बदरा घिर आये रुत है भिगी भिगी.
सावन के झूले पडे.
झिल मिल सितारो़ का आँगन होगा रिम झिम बरसता सावन होगा.
निसुलताना रे प्यार का मौसम आया.
अजहुं न आये बालमा सावन बीता जाय.
उमड घुमड कर आयी रे घटा
उन्हाळा संपल्यानंतर जेव्हा
उन्हाळा संपल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा पाऊस येतो तेव्हा गारवा, वाऱ्यावर भिरभिर पारवा, नवा नवा हे गाणं सगळ्यात आधी आठवतं .
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन
पुन्हा पावसाला सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे
ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे - बालगीत
लगी आज सावन फिर वो झडी है - हे चांदनी मधील सुरेश वाडकरांचं
कोई लडकी है जब वो हंसती है - सदाबहार गाणं
अब के सजन सावन में - जुन्या चुपके चुपके मधील
बरसो रे मेघा - गुरु
मेघा रे मेघा मेघा रे मेघा , मेरा मन तरसा रे पानी क्यूँ बरसा रे - लम्हे , श्रीदेवी
बेहता है मन कहीं , कहाँ जानते नहीं - चमेली, सुनिधी चौहान
भीगी भीगी रातों में , मिठी मिठी बातों में , ऐसी बरसातों में कैसा लगता है - अजनबी , राजेश खन्ना
<<पावसात गर्लफ्रेंडसोबत एका
<<पावसात गर्लफ्रेंडसोबत एका छत्रीत भिजत जाताना राजकपूर नर्गिसला तोड नाही.. प्यार हुआ ईकरार हुआ आठवणारच >> +१०००००० बाहेर पाऊस पडत असतांना दोघांनी मिळून गायला सुद्धा खूप छान वाटतं हे गाणं