खिद्रापूर
महाराष्ट्रातील खजुराहो अशी ओळख होईल इतके सुंदर आणि अप्रतिम मंदिर म्हणजेच खिद्रापुर येथील कोपेश्वर मंदिर. कोल्हापुर जिल्ह्यापासुन साधारण ६५ किमी अंतरावर कृष्णा नदीच्या काठी वसलेले खिद्रापुरचे कोपेश्वर मंदीर हे स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्री विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. या मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या रचनेत आहे. छोटय़ाशा दरवाजातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश झाल्यावर समोर कित्येक शतकांचा इतिहास उलगडत जातो. देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला छत नाही. संपूर्ण वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
नरसोबाची वाडी
नृसिंहवाडी (पर्यायी नावे: नरसोबावाडी/नृसिंहवाडी) हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील गाव. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
प्रचि ०६
कृष्णाकाठचा सूर्योदय
प्रचि ०७
श्री महालक्ष्मी मंदिर
प्रचि ०८
पंचगंगा नदीकाठ
प्रचि ०९
छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
प्रचि १०
प्रचि ११
भवानी मंडप
प्रचि १२
प्रचि १३
ज्योतिबाच्या नावानं चांगभल
प्रचि १४
प्रचि १५
रंकाळा
प्रचि १६
प्रचि १७
सिद्धगिरी म्युझियम, कणेरी मठ
कोल्हापूरहुन साधारण १५ किमी अंतरावर सिद्धगिरी म्युझियम, कणेरी मठ आहे. सदर म्युझियम तीन विभागात विभागले असुन पहिल्या विभागात प्राचीन भारतातील ऋषी व त्यांचे योगदान, दुस-या भागात ग्रामीण भागातील बारा बलुतेदारी, शेतकऱ्यांचे जीवन, विविध पारंपरिक खेळ, जुन्या पद्धतीची घरे अशा ग्रामीण संस्कृती व तिसर्या भागात भारतातील स्वातंत्र्यसैनिक इ. शिल्परूपात मांडले आहे.
(सिद्धगिरी म्युझियम मध्ये फोटोग्राफीला बंदी आहे. सदर फोटो आम्ही मठात रीतसर पत्र देऊन, परवानगी घेऊन काढले आहेत.)
भारतातील ऋषी व त्यांचे योगदान
प्रचि १९
गावातील पाणवठा आणि गावकरी
प्रचि २०
सासरी निघालेली लेक
प्रचि २१
गावातील जत्रा
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
पन्हाळा
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला.
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
वा ! मस्त फोटोज .आवडले
वा ! मस्त फोटोज .आवडले
आठवणी जाग्या झाल्या....
आठवणी जाग्या झाल्या.... Really missing Kolhapur....
फोटो सुंदर आहेत.
मस्त फोटो रे योगेश. सवड
मस्त फोटो रे योगेश. सवड झाल्यावर मला फोटो गूगल फोटो वरून कसे अपलोड करायचे ते कलव.
सुंदर
सुंदर
अप्रतिम, छान झाली भटकंती.
अप्रतिम, छान झाली भटकंती.
मस्त फोटो. पण इतके कमी कसे
मस्त फोटो. पण इतके कमी कसे काय?
आणि कोल्हापुरात खायला काहीच मिळत नाही का रे? की तुम्ही न खातापिता परतलात??? सगळे फोटो नाही तर भटकंती पुरेपूर नै वाटत ना....
फोटो सुरेख!
फोटो सुरेख!
वा! नेहमीप्रमाणेच सुंदर सफर
वा! नेहमीप्रमाणेच सुंदर सफर घडवलीस. कोपेश्वर मंदिर, रंकाळा फारच मस्त आहेत असं दिसतंय.
आणि कोल्हापुरात खायला काहीच
आणि कोल्हापुरात खायला काहीच मिळत नाही का रे? की तुम्ही न खातापिता परतलात??? सगळे फोटो नाही तर भटकंती पुरेपूर नै वाटत ना.... >>> कर्रेक्ट!
जिप्सी खादाडीचे फोटु पायजेल हायत.
जिप्सी , छान फोटो. पण
जिप्सी , छान फोटो. पण कोल्हापुरला हिरवाई खूप आहे. हे फोटो जरा भकास वाटले. खुप उन्हाळ्यामुळ का? रंकाळ्याचा फोटो सुरेख आलाय.
नेक्स्ट टाईम गेलास कि सांग . घरचा पत्ता देते.
व्वा जिप्सी. फोटो बद्दल
व्वा जिप्सी. फोटो बद्दल धन्यवाद! आणी कणेरी मठा च्या माहितीसाठी तर अनेक धन्यवाद. आता कोल्हापूरला गेले की आवर्जून भेट देणार. शिल्प कसली, जिवंत माणसे वाटतायत. तुझ्या फोटोग्राफीने त्यावर कळस चढवलाय. बाकी खादाडीबाबत मामींना अनुमोदन.
व्वा, छान, इथे दिल्याबद्दल
व्वा, छान, इथे दिल्याबद्दल धन्यवाद
मस्तच.... आम्ही पण वर्षातुन
मस्तच.... आम्ही पण वर्षातुन एकदा तरी हे सगळे कडे (खिद्रापुर वगळता) जातोच
कणेरी मठात पहील्यांदा गेली
कणेरी मठात पहील्यांदा गेली होती तेव्हा जत्रा वगैरे शिल्प तयार नव्हते... हा पण आत जाताच एक बैल आणी माणुस होता असे पाहीले अन अगदी जवळ गेलो तेव्हा कळते की ते फक्त एक शिल्प आहेत जिवंत नाहीत ईतके हुबेहुब
Wow. नवीन भटकंती. कणेरी मठ
Wow. नवीन भटकंती. कणेरी मठ पाहिलाय चार वर्षापुर्वी. देखावे खूप सुंदर आणी रेखीव आहेत.
मस्त! फोटो बघून लगेच निघालं
मस्त! फोटो बघून लगेच निघालं वाटतं.
जिप्स्या तुझे फोटो म्हणजे
जिप्स्या तुझे फोटो म्हणजे पर्वणीच पण त्यातून इतिहासही किती सुंदर मांडलास.
छान फोटो! आवडले पण थोडक्यात
छान फोटो! आवडले पण थोडक्यात गुंडाळल्यासारखे वाटले.
यातील प्रत्येक ठिकाणावर एक एक धागा काढायला हवा होता, तेवढे प्रचि तू नक्कीच टिपले असणार.
आणि हो! खादाडीसाठी पण एक स्वतंत्र धागा पाहिजे होता.
बर्याच दिवसांनी जिप्सीची
बर्याच दिवसांनी जिप्सीची फोटोग्राफी.. मस्त वाटलं.
आणि हो! खादाडीसाठी पण एक स्वतंत्र धागा पाहिजे होता +१ .. राजाभाऊची भेळ, फडतरे मिसळ ... वगैरे वगैरे
आमचं कोल्हापूर सुंदर आहे पण
आमचं कोल्हापूर सुंदर आहे पण तुझ्या छायाचित्रांनी त्याचं सौंदर्य वाढलं
सुंदरच आलेत फोटो जिप्सी .
सुंदरच आलेत फोटो जिप्सी .
मस्त रे...मजा आ गया !
मस्त रे...मजा आ गया !
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर फ़ोटो व वर्णन .धन्यवाद
सुंदर फ़ोटो व वर्णन .धन्यवाद जिप्स्या.
अरे वा... मस्त फोटो आणि
अरे वा... मस्त फोटो आणि माहिती...
वाह, सुरेख, एकाहून एक बढिया
वाह, सुरेख, एकाहून एक बढिया फोटो
तू एकाच जिल्ह्यातली वेगवेगळ्या दिशांची ठिकाणं पालथी घातली आहेस. तो मार्ग कसा ठरवलास, किती दिवस फिरलास, मुक्काम कुठे, खाद्यभ्रमंती वगैरे तपशीलही दे. कोल्हापूरभेटीसाठी येणा-यांना त्या आराखड्याची मदत होईल.
मस्त फोटोज आणि वर्णन रे
मस्त फोटोज आणि वर्णन रे जिप्सी, पण खादाडी राहीलीच की.
जिप्स्या.. असले फोटो नसतात रे
जिप्स्या.. असले फोटो नसतात रे काढायचे... उगाच जळजळ होते... असे फोटो काढता येत नाहीत म्हणून..
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!!!
आणि कोल्हापुरात खायला काहीच मिळत नाही का रे? की तुम्ही न खातापिता परतलात??? सगळे फोटो नाही तर भटकंती पुरेपूर नै वाटत ना....
जिप्सी खादाडीचे फोटु पायजेल हायत.
बाकी खादाडीबाबत मामींना अनुमोदन.
आणि हो! खादाडीसाठी पण एक स्वतंत्र धागा पाहिजे होता.
राजाभाऊची भेळ, फडतरे मिसळ ... वगैरे वगैरे
पण खादाडी राहीलीच की. >>>>>यावेळेस खादाडीचे जास्त फोटो नाही काढता आले आणि या आधीच्या कोल्हापूरच्या २ धाग्यामध्ये त्यांचा समावेश केलेला.
http://www.maayboli.com/node/23407
http://www.maayboli.com/node/20786
जिप्सी , छान फोटो. पण कोल्हापुरला हिरवाई खूप आहे. हे फोटो जरा भकास वाटले. खुप उन्हाळ्यामुळ का? >>>>>आम्ही डिसेंबर महिन्यात गेलेलो कदाचित त्यामुळे असेल.
नेक्स्ट टाईम गेलास कि सांग . घरचा पत्ता देते. >>>>> नक्की.
आता कोल्हापूरला गेले की आवर्जून भेट देणार. शिल्प कसली, जिवंत माणसे वाटतायत.>>>>अगदी अगदी आवर्जुन बघाव असं. खुप सुंदर आहे हे संग्रहालय. हे सगळं व्यवस्थित बघायच असेल तर हाताशी कमीत कमी २ ते ३ तास पाहिजे.
आम्ही पण वर्षातुन एकदा तरी हे सगळे कडे (खिद्रापुर वगळता) जातोच>>>>>>मानिनी एकदा खिद्रापुर बघाच. अतिशय सुरेख आहे.
आवडले पण थोडक्यात गुंडाळल्यासारखे वाटले.
यातील प्रत्येक ठिकाणावर एक एक धागा काढायला हवा होता, तेवढे प्रचि तू नक्कीच टिपले असणार.>>>> खरंतर या आधीच्या कोल्हापुर भटकंतीचे फोटो टाकले असल्याने इथे कमी टाकले, पण खिद्रापुर मंदिर आणि कणेरी मठ याचे भरपुर फोटो आहे. पुढे-मागे नक्कीच त्याचा स्वतंत्र धागा काढेन.
बर्याच दिवसांनी जिप्सीची फोटोग्राफी.. मस्त वाटलं. >>>>>धन्यवाद मित
तू एकाच जिल्ह्यातली वेगवेगळ्या दिशांची ठिकाणं पालथी घातली आहेस. तो मार्ग कसा ठरवलास, किती दिवस फिरलास, मुक्काम कुठे, खाद्यभ्रमंती वगैरे तपशीलही दे. कोल्हापूरभेटीसाठी येणा-यांना त्या आराखड्याची मदत होईल.>>>>>आम्ही ४ दिवसांची भटकंती मित्राच्या गाडीने केली. पुण्याहुन (वाकड) रात्री ११ वाजता निघालो, पहाटे वाडीला पोहचलो. शुचिर्भुत होऊन दर्शन घेउन मग तिथुन जवळच असलेल्या खिद्रापुरला गेलो. खिद्रापुर नंतर मग कोल्हापूर आणि तिथे एका हॉटेलमध्ये उतरलो. संध्याकाळी महालक्ष्मी दर्शन. दुसर्या दिवशी कणेरी मठ आणि नविन राजवाडा (मुक्काम कोल्हापूर), तिसर्या दिवशी ज्योतिबा, पंचगंगा, रंकाळा (मुक्काम कोल्हापूर) शेवटच्या दिवशी पन्हाळा पाहुन पुण्याकडे रवाना आणि मग मुंबई.
असले फोटो नसतात रे काढायचे... उगाच जळजळ होते... असे फोटो काढता येत नाहीत म्हणून..>>>>>>
यावेळेस खादाडीचे जास्त फोटो
यावेळेस खादाडीचे जास्त फोटो नाही काढता आले >>>>> हा घ्या पुरावा
Pages