शाळेत जाण्याआधीपासूनच हातात पेन्सिल घेऊन पाटीवर, भिंतींवर रेघोट्या ओढणे, वर्तुळे, चित्रे काढण्यापासून ते हस्तलिखाणाची एक विशिष्ट ढब आत्मसात करण्यापर्यंतचा प्रवास आपणा सर्वांनीच केलेला असतो. त्यात काहींचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर असते तर काहींचे अगदीच गोंधळात टाकणारे. डॉक्टरांच्या हस्तलिखित प्रिस्क्रिप्शन्स तर सामान्यांना कळणे अवघडच. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा हस्ताक्षर हा अविभाज्य भाग. पण गेल्या दहा-बारा वर्षांत तंत्रज्ञानात इतके झपाट्याने बदल झालेत की, आता नोकरी, व्यवसाय करताना हाताने लिहिण्याचे काम अतिशय मोजक्या ठिकाणी आहे. शाळा आणि सरकारी कार्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी कॉम्प्युटरवरच काम चालते. त्यात आता अँड्रॉइड फोन्समुळे सगळ्यांनाच टायपिंग ही कला आत्मसात होऊ लागली आहे. हस्तलिखितापेक्षा टायपिंग केलेले अधिक सुटसुटीत आणि कमी वेळेत, कमी त्रासात होणारे काम आहे. शाळांमधूनही हल्ली ई-बुक्स, टॅब, लॅपटॉपवर विद्यार्थी अभ्यास करतात. आज बहुतांश लोक केवळ सहीपुरता पेन हातात घेतात. लिहिण्याचे काम फारसे पडतच नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत, वर्षांत हस्तलेखनाची कला नष्ट होईल की काय, अशी साधार भीती वाटू लागली आहे. माबोकरांना याबाबत काय वाटते?
हस्तलेखन कला नष्ट होईल का?
Submitted by टोच्या on 29 May, 2017 - 07:59
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण मग आपला स्वभाव बदलला तर
पण मग आपला स्वभाव बदलला तर आपलं अक्षर पण बदलेल का लिंबुदा?
>>> पण मग आपला स्वभाव बदलला
>>> पण मग आपला स्वभाव बदलला तर आपलं अक्षर पण बदलेल का लिंबुदा? <<<<<
होय ! अर्थात हे देखिल लक्षात ठेवाव लागते की स्वभावाला औषध नाही ! त्यामुळे मुलभूत स्वभाव सहसा बदलत नाही किंवा बदलण्यास तितकेच मोठे कारण असु शकते वा असा फरक दिसण्यास दीर्घ कालावधी लागु शकतो असे माझे मत.
पण तरीही, याव्यतिरिक्त, अन्य लोकांचे सामोरे, बाह्यात्कारी दर्शविणारा मुखवटाधारी स्वभाव /व्यक्त होणे, व अंतर्गत मूलतः स्वभाव जो व्यक्त होऊ दिला जात नाही, असे दुटप्पी वर्तन हस्ताक्षरावरुन ओळखणे ही अवघड बाब असते, अभ्यासातील ती पुढची पायरी आहे. अनुभवी जाणकार व्यक्ति ते करु शकतात.
म्हणजे सचिन काळे यांचा स्वभाव
म्हणजे सचिन काळे यांचा स्वभाव पारच बदलला म्हणायचे.
सचिनजी
सचिनजी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हल्ली लिखाण कमी झाले आहे हे
हल्ली लिखाण कमी झाले आहे हे खरेच.
एक-दोन वर्षापूर्वी मी वाचले होते की फिनलंडच्या शाळांमध्ये लिखाण शिकविण्याऐवजी टायपिंग शिकवायला चालू झाले आहे. सद्ध्याच्या काळात टायपिंगचे स्कील सर्व्हायव्हलसाठी महत्वाचे झाले आहे. पण लिखाण बंद करणे चूक की बरोबर ते कळत नाही. तंत्रज्ञानाची प्रगती इतक्या वेगाने होत आहे की हे बदल अट्ळ वाटतात. इतर विकसित देशांनी फिनलंडचे अनुकरण करायला सुरुवात केली तर लिखाण करणे पुढच्या काही वर्षात लोप पावेल ह्यात शंका नाही.
पण डार्विन च्या थेअरी नुसार
पण डार्विन च्या थेअरी नुसार पुढच्या पिढ्यांचे अंगठे टाईप करून करून लांब होतील का
हो.
इतकेच काय, फोनवर लिहिताना किंचित झुकून चालण्याची सवय लागल्याने हळू हळू ताठ उभे रहाणेहि लोक विसरतील.
नि शब्दां ऐवजी इमोजी वापरल्याने सगळे लिखाण १०००० वर्षांपूर्वीच्या माणसाने जसे जनावराचे चित्र(?) नि माणसाचे चित्र(?) काढून शिकार कशी केली ते सांगितले तसेच शब्दां ऐवजी इमोजि च सर्वत्र दिसू लागेल.
डार्विनची की लॅमार्कची ?>>>>
डार्विनची की लॅमार्कची ?>>>>
आम्हाला फक्त डार्विन माहीत होता, तो पण ऐकून....
लॅमार्क यांच्याशी ओळख करून दिल्याबद्दल हार्दिक आभार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझे अक्षर गचाळच्याही पार
माझे अक्षर गचाळच्याही पार पलीकडे आहे तर माझा स्वभावही दुर्गुणांनी भरलेला समजावा?
की मी माझे गचाळ अक्षराची लाज न बाळगता जसे आहे तसे लिहीतो म्हणून मला धाडसी आणि प्रामाणिक समजावे?
माझ्या दोन अक्षरांमध्ये वा शब्दांमध्ये एकसमान जागा नसते म्हणून माझ्यात टापटीपतेचा अभाव आहे असे समजावे का?
मी घाणेरडे का असेना पण प्रचण्ड वेगात लिहितो म्हणून मला वेळेचे महत्व असणारा समजावे की घाईगडबडीतली व्यक्ती समजावे?
मी बाकीचे कसेही घाण लिहिले तरी स्वत:चे नाव चांगलेच लिहिले जाईल याची काळजी घेतो तर मला एक आत्मकेंद्रीत व्यक्तीमत्व म्हणता येईल का?
मी उद्या जमल्यास माझ्या डायरीचा एक फोटो काढून टाकतो.. हवे तर नवा धागा काढूया.. घ्या तरी कोणीतरी च्यैलेंज माझा स्वभाव ओळखून दाखवायचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे अक्षर गचाळच्याही पार
माझे अक्षर गचाळच्याही पार पलीकडे आहे तर माझा स्वभावही दुर्गुणांनी भरलेला समजावा?
>>
This is one of the top most misunderstanding about Graphology and I am not even surprised that, it came from you.
Beautiful Handwriting is not equal to Nice Human Nature
Ugly Handwriting is not equal to Evil Human Nature
मी उद्या जमल्यास माझ्या डायरीचा एक फोटो काढून टाकतो.. हवे तर नवा धागा काढूया.. घ्या तरी कोणीतरी च्यैलेंज माझा स्वभाव ओळखून दाखवायचे
>>
and btw, Graphology do not reveal "Writers Nature(स्वभाव)" in exact truest sense.
आपल्याला ज्या ज्या
.
This is one of the top most
This is one of the top most misunderstanding about Graphology and I am not even surprised that, it came from you.
Beautiful Handwriting is not equal to Nice Human Nature
Ugly Handwriting is not equal to Evil Human Nature
>>>>
येस्स आय माय एग्री विथ यू सर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉमनसेन्स वापरून आपण हे ओळखू शकतो की अक्षरातले सौण्दर्य आणि मनाचे सौण्दर्य यांचा आपसात संबंध नसावा. अन्यथा पुर्वी लग्नाच्या वेळी जसे मुलगे लोकं मुलीला म्हणायचे की पोरी जरा चालून दाखव तसे मुलगी लोकंही मुलाला म्हटले असते की बाळा जरा लिहून दाखव
मी ते प्रश्न माझ्यातर्फे नाही तर आम आदमी (पार्टी नाही) तर्फे विषय छेडायला विचारले की कसे विविध प्रकारचे समज असू शकतात. तुम्ही एकच वाक्य कोट केले, पण पुढे बरीच आहेत. त्यावरही टिप्पणी करा. किंवा एकण्दरीतच या विषयावर कोणी जाणकाराने माहिती दिल्यास आवडेलच. मला कल्पना आहे की एका दिवसात वा एका लेखात शिकावा असा हा विषय नाही. पण शिकायचा नाही तर जाणून घ्यायचा आहे. उपग्रह अंतराळात कसे सोडतात यावर लेख वाचल्यावर जसे आपल्या ज्ञानात भर पडते पण लगेच काही नासा वा ईस्रोत नोकरी मिळावे ईतके ज्ञान येत नाही तसेच हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ते प्रश्न माझ्यातर्फे नाही
मी ते प्रश्न माझ्यातर्फे नाही तर आम आदमी (पार्टी नाही) तर्फे विषय छेडायला विचारले
>>
पुढच्या वेळेपासुन तु ही तुझी युटर्न्सची लिस्ट आधीच देत जाशील का? म्हणजे त्याप्रमाणे प्रतिसाद द्यायला. वेळ वाचेल.
यात यू टर्न नाही. मी देखील
यात यू टर्न नाही. मी देखील त्याच आम आदमी (पुन्हा पार्टी नाही हा) चे प्रतिनिधीत्व करतो. पण मलाच याची उत्तरे हवीत असेही म्ह्टले असते तर कदाचित आपण आपल्याकडचे ज्ञान ईथे माझ्याशी शेअर केले नसते अशी आपली वरची पोस्ट पाहून वाटले. कदाचित ज्योतिषविद्येची जशी खिल्ली उडवली जाते तशी मी या विषयाची उडवत आहे असा आपला गैरसमज झाला असेल. ही सुद्धा एक टिपिकल मिस अंडर स्टॅन्डींग असते की अश्या विषयावर प्रश्न उपस्थित केले की अविश्वास दाखवायलाच विचारले जाताहेत हे गृहीत पकडले जाते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋन्मेऽऽष सरांच्या डायरीतल्या
ऋन्मेऽऽष सरांच्या डायरीतल्या हस्ताक्षराचं माहित नाही पण ऋन्मेऽऽष सरांच्या ऑनलाईन हस्ताक्षरावरुन मी हे नक्की सांगू शकतो की त्यांचा प्रतिसाद आला की अशक्य फाटे फोडून धाग्याची वाट लागली म्हणून समजा.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
प्रतिसादांबद्दल सर्वांचे
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
Pages