मायनं अंथरूण धरलंय, शेवटच्या श्वासांची रांग संपत येत आहे...
धुगधुगी अजून आहे. मोठया कष्टाने तिने बाजूलाच बसलेल्या सवतीला खुणावले...
"काय पाहिजे...?" सवतीने विचारलं...
"माझ्या लेकराला...." शब्द घशात अडकून बसले जणू..
सवत तत्परतेनं म्हणाली, "हं, बोला ना, तुमच्या मुलाला काही त्रास होणार नाही, माझ्या सोताच्या लेकरावानी सांभाळल, जीवाला घोर नको लावून घेऊ माय... सुखाने जाय"
"माझ्या पोराला... कधी ढेकळाचा भात.... खाऊ घालू नको, .....आण त्येला कधी कोर्टाच्या आवारात... फिरकायला पण देऊ नको... माझी शपथ आहे तुला...." माय बोलली...
बस शेवटचे शब्द तिचे... माय नं जीव सोडला. पोरगं सवतीच्या छायेत कसं जगेल याची चिंता मिटली.... कायमची. सुखानं डोळे मिटले.
सवतीने दिलेला शब्द पाळायचा प्रश्नच नव्हता.... माय नं जे सांगितलं त्याच्या बिलकुल उलटं करायचं हेच तिने आधी ठरवलं होतं..... शेवटी सवतच ती.
मायच्या पोराला ढेकळाचाच भात दिला.... कोर्टाशिवाय कुठंही दिसला तर झोडूनच काढे.
बघता बघता दिन, महिने , वर्ष आणि तप गेले......
रोज कोर्टात जाणारा पोरगा महाबिलंदर झाला, जगाची भाषा, व्यवहार कळले, माणसं ओळखायला आणि त्यांना वापरायला शिकला....
ढेकळात मुदीपेक्षा जास्त भात असतो, ढेकळंची ढेकळं भात पोटभर खाऊन धिप्पाड झाला....
आईचं हृदय ते.... तिला पक्के माहित... सवत कशी वागेल.... मेली तरी सोय लावली आपल्या पोराची.
पण पोराची माय असली तरी तीही सवतीची सवतच, आपण जे सांगू त्याच्या उलटंच आपली सवत करेल माहिती होते ना.... मग?
सवतीने सोताच्या पोराला कधी ढेकळाचा भात दिला नाही... कोर्टाकडे तर पाय करून झोपू पण दिलं नाही. कोर्टाचं नाव कधी घेऊ दिलं नाही.
मरता मरता आपल्या सवतीचा बदला सवतीच्याच हाताने घेतला... मायनं.
छान .........
छान .........
मस्त.
मस्त.
भारीच
भारीच
छान आहे . फार फार वर्शापूर्वी
छान आहे . फार फार वर्शापूर्वी कधितरी वर्तमान्पत्राच्या पुरवणीत वाचलेली आठवतेय .
भारीये
भारीये
मस्त
मस्त
छान आहे
छान आहे
अप्रतिम....
अप्रतिम....
मस्तच.
मस्तच.
छान
छान
आवडली.
आवडली.
छान
छान
धन्यवाद मंडळी,
धन्यवाद मंडळी,
खूप लहानपणी कुठेतरी वाचलेली ऐकलेली होती ही कथा... माझ्या पद्धतीने सादर केली.
आवडल्याचं कळवलं ह्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मस्त...!!!
मस्त...!!!
छान आहे की..
छान आहे की..
मस्तय ..
मस्तय ..
पण माय पेक्षा "सवत" हे शीर्षक जास्त पटणार ठरलं असत .. पण हे माझं मत
वाचलीय अगोदर कुठेतरी !!!
वाचलीय अगोदर कुठेतरी !!!
=)) लॉल
=)) लॉल
पण माय पेक्षा "सवत" हे शीर्षक जास्त पटणार ठरलं असत .. पण हे माझं मत >> +१
खूप चांंगली कविता ....
खूप चांंगली कविता ....
भारी..
भारी..