मुंबईतील किल्ले -- भाग २

Submitted by मध्यलोक on 25 April, 2017 - 07:22

मुंबईतील किल्ले -- भाग १: http://www.maayboli.com/node/61998

====================================================================================================

मुंबईतील किल्ले ह्या लेखण मालिकेतील पहिल्या भागात वर्णन केल्या प्रमाणे आता आम्ही आमचा मोर्चा सायन मधीलच तिसऱ्या किल्ल्याकडे वळविला. घनदाट जंगला प्रमाणे येथे घनदाट मनुष्य वस्ती असलेल्या "धारावी" भागात हा किल्ला आहे. हा किल्ला बांधताना उपयोगात आणलेल्या काळ्या पाषाणामुळे ह्या किल्ल्याचे नाव "काळा किल्ला" असे पडले आहे. इ. स. १७३७ मधे ह्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे आपल्याला येथे असलेल्या इंग्रजीतील शिलालेखाच्या वाचनावरून कळते. किल्ल्याला प्रवेश मार्ग नाही परंतु प्रवेश करण्यासाठी शिडीचा वापर करून आत मधे जाता येते. आम्ही हा किल्ला बघण्यास गेलो असता शिडी विदिर्ण अवस्थेत होती आणि ती वापरताना अपघात होण्याची शक्यता होती म्हणून सिमेंटच्या राशीचा उपयोग करून आम्ही आत मधे प्रवेश मिळविला. आत मध्ये बघण्यासाठी अवशेष नाहीत, पूर्वी येथे एक भुयार होते जे त्याकाळी शेजारी असण्याऱ्या नदीच्या पल्याड घेऊन जात असे आणि ह्या मार्गाचा उपयोग सुटके साठी केला जात असावा असा अंदाज आहे. सद्यस्थितीत उंदीर, घुशी किंवा इतर प्राण्यांच्या उपद्रवा पासून वाचण्या साठी हा भुयारी मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे आणि ह्या मार्गाच्या प्रवेश द्वाराचे ठिकाण तेवढे दिसून येते

स्थळ दर्शक माहिती : 19.046838, 72.867615 (19°02'48.6"N 72°52'03.4"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : सायन उर्फ शिव (सेंट्रल मार्गिका)

शिलालेख
Kala Killa - 1.jpegबंद करण्यात आलेला भुयारी मार्ग
Kala Killa - 2.jpeg

दिवस आता सरत चालला होता आणि आमच्या लिस्ट मधे अजूनही काही किल्ले बघायचे बाकी होते. वरळी - प्रभादेवी च्या रस्त्याने पुढे जात आम्ही मुंबईच्या पश्चिम किनारपट्टी वर असलेल्या वरळी किल्ल्यावर आलो. कोळीवाड्यात असल्याने किल्ल्याकडे जाताना दिसले ते कामात मग्न असलेले कोळी मित्र. कोळीवाड्यातील शेवटच्या बस स्टॉप वरून साधारण १५ मिनिटे चाल करून किल्ल्याच्या प्रवेश द्वाराशी आम्ही पोहोचलो होतो पण आता दिवसभराच्या दगदगीने थकवा जाणवायला लागला होता पण किल्ल्यात प्रवेश करताच बांद्रा - वरळी सी लिंक च्या विहंगम दृष्याने आमचा थकवा पूर्णपणे नाहीशा झाला. किल्ल्यात हनुमानाचे एक छोटेखानी मंदिर आहे आणि एक छोटीशी व्यायामशाळा सुद्धा आहे. मुंबईतील सकाळपासून बघितलेल्या किल्ल्यापैकी हा किल्ला सगळ्यात स्वछ असा किल्ला होता. किल्ल्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा होत असल्यामुळे सुद्धा स्वच्छता असावी.

स्थळ दर्शक माहिती : 19.023675, 72.816998 (19°01’25.2″N 72°49’01.2″E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : एल्फिस्टन मार्ग (पश्चिम मार्गिका)

वरळी किल्ला
Worli Fort - 1.jpegप्रभादेवीच्या टोलेजंग इमारती
Sky Line - 1.jpegबांद्रा - वरळी समुद्री पुल
Sea Link - 1.jpeg

आता संध्याकाळ आपले पंख पसरवायला लागली होती आणि नभात रंगाची उधळण होत होती. एका बाजूला सुंदर असा समुद्री पुल आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या प्रभादेवीच्या टोलेजंग इमारती ह्या रंगसंगती मधे तर फारच आकर्षक दिसत होत्या. त्यांची छबी टिपण्याचा केलेला हा एक प्रयत्न

गगनचुंबी इमारती
Standing Tall.jpegसंधीप्रकाशात उजळलेला सी-लिंक
Sea Link and Sunset.jpegवळण वाट
Sea Link - Curve.jpegरंगांची उधळण
Evening Sky.jpegभटक्यांची टोळी
The Gang.jpeg

संध्याकाळ सरून अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि म्हणून आम्ही आमच्या भटकंती मधील उर्वरित किल्ले बघण्याचा कार्यक्रम रद्द केला. पुन्हा ह्याच प्रदेशातील किल्ले बघण्याचे निम्मित हाताशी ठेवून आम्ही पुण्या कडे मार्गस्थ झालो

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईच्या नकाशावर ठिपक्यांनी हे किल्ले दाखवुन तसे चित्र इकडे दिलेत तर मुंबईची माहिती नसलेल्या मजसारख्याला उपयोगी होईल.
लेखमाला छान. Happy

छान ..

लिंबूटिंम्बू, आशु चॅम्प , रोमा धन्यवाद

मुंबईच्या नकाशावर ठिपक्यांनी हे किल्ले दाखवुन तसे चित्र इकडे दिलेत तर मुंबईची माहिती नसलेल्या मजसारख्याला उपयोगी होईल.>> हो नक्कीच, मुंबईच्या नकाशावर हे किल्ले दाखवितो

एवढंच? >> हो, पहिल्या भागात ४ किल्ले तर दुसऱ्या भागात २ किल्ले, अजून एक किंवा दोन भाग येतील त्यात उर्वरित किल्ल्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न असेल

>>> अजून एक किंवा दोन भाग येतील त्यात उर्वरित किल्ल्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न असेल <<<<
ऐतिहासिक सामरिक दृष्ट्या, इंग्रजांना (युरोपियनांना) वेसण घालण्यासाठी मुंबई जवळ जे किल्ले बांधले गेले, त्याबद्दलही काहि देऊ शकलात तर दुधात साखर पडेल. Happy शक्य असल्यास मुंबईनजिकचे /मुंबईच्या वाटेवरचे पहाडी दुर्ग/समुद्री किल्ले /भुईकोट आदी किल्ल्यांबद्दल अगदी फोटो नसले, तरी स्थळ/महत्व/अखत्यारी कुणाची, याबाबत माहिती दिलीत तर फार उपयोगी होईल. Happy