Submitted by कृष्णा on 20 April, 2017 - 05:06
काल उन्हाळा स्पेशल प्रयोगात हा एक सफल प्रयोग झाला म्हणून सर्वांसाठी देतोय!
आंबा लस्सी विथ व्हॅनिला आईस्क्रीम!
लहाणपणी नगरला असताना आईस्क्रीम लस्सी बर्याचदा प्यायलेली ती आठवली मग ह्यातुन हा माझा प्रयोग!
साहित्य :
१. ताजे दही १ लिटर
२. एक मध्यम हापूस आंबा
३. व्हनिला आईस्क्रीम
४ साखर.
कृती :
१. दही छान फेटून घ्या.
२. आंब्याचा रस काढून दह्यात घालून एक जीव पुन्हा फेटून घ्या.
३. साखर आवश्यक तेवढी.. आपल्या जितके गोड आवडते तसे.
४. एक अर्धा तास फ्रीझ मध्ये थंड करायला ठेवा.
५. गार गार ग्लास मध्ये ओतुन वर छान आईसक्रीमचा गोळा टाका (हवा तेवढा)
पुढे फोटो काढा थोपु कस्स्काय अपडेट साठी आणि गट्टम करा चव घेत घेत!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त लागते, जिभेला मेजवानी
आईस्कीम घालून मिल्कशेक माहिती आहे. लस्सी चाखायला पाहिजे कशी लागते.
कृष्णाजी ऐकत नाही
कृष्णाजी ऐकत नाही
मस्तच..
मस्तच..
वा.. मस्त.. आजच करून पहाते.
वा.. मस्त.. आजच करून पहाते.
मस्त!
मस्त!
अहा..तोंपासु दिसतंय एकदम.
अहा..तोंपासु दिसतंय एकदम.
सही. रोझ नाहीतर केवडा लस्सी
सही. रोझ नाहीतर केवडा लस्सी मध्ये आईस्क्रीम टाकून पण मस्त लागते. आंबा लस्सी ला साखरेची गरज नाही.
वा, मस्त प्रकार आहे !
वा, मस्त प्रकार आहे !
आंबा लस्सी मागच्याच आठवड्यात
आंबा लस्सी मागच्याच आठवड्यात केली होती. आता पाहू आईस्क्रीम पण टाकून
नगरला द्वारकासिंगची आईस्क्रीम लस्सी बर्याच वेळेला खाल्लेली आहे. मस्त असते एकदम. लहानपणी मला आंबट लस्सी आवडायची नाही पण आईस्क्रीम लस्सी म्हटले की मी एकदम तयार असायचो
किस्ना एक लिटर दह्याला एकच
किस्ना एक लिटर दह्याला एकच मध्यम आंबा?
मस्त तोंपासू!!
मस्त तोंपासू!!
किस्ना एक लिटर दह्याला एकच
किस्ना एक लिटर दह्याला एकच मध्यम आंबा? }}}}}}
जास्त आंबे घेतले तर आमरस होईल मग विथ दही आणि आईस्क्रीम!!
अरे एक लिटर दह्याला निदान २
अरे एक लिटर दह्याला निदान २-३ तरी आंबे हवेत

साखर कमी घाल हवं तर, पण असे घोळ नको घालू मित्रा
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
अरे एक लिटर दह्याला निदान २-३
अरे एक लिटर दह्याला निदान २-३ तरी आंबे हवेत }}}}
२ वापरा! आवडेल की तसेही!
मस्तं
मस्तं
मस्त दिसतोय प्रयोग!
मस्त दिसतोय प्रयोग!
लहाणपणी नगरला असताना आईस्क्रीम लस्सी बर्याचदा प्यायलेली ती आठवली मग ह्यातुन हा माझा प्रयोग!>>>> सेम हियर. आईसक्रिम लस्सी हा प्रकार पहिल्यांदा नगर मध्येच ट्राय केला. नाशिक मध्ये घट्ट लस्सी मिळायची पण त्यात आईसक्रिम नसायचं.
छान आहे, कोक फ्लोट सारखे आंबा
छान आहे, कोक फ्लोट सारखे आंबा लस्सी डुबूक डुबूक
मस्तच...मलाही नगरची
मस्तच...मलाही नगरची द्वारकसिंग लस्सी आठवली.. लस्सीमधे आइस क्रीम मला नवीन नव्हते, पुण्यात त्याला मस्तानी म्हणतात हे मात्र नव्याने कळालेले.
पुण्यात त्याला मस्तानी
पुण्यात त्याला मस्तानी म्हणतात हे मात्र नव्याने कळालेले. >> मस्तानी आणि आईस्क्रीम लस्सी वेगळी असते. मस्तानीत लस्सी नसते. ते मिल्क शेक सारखे असते.
मस्तच
मस्तच
मस्तानी म्हणजे वितळलेले आणि
मस्तानी म्हणजे वितळलेले आणि लवकरच वितळणार आईस्क्रीम मिक्स करून खाणे.
पुढच्यावेळी मॅन्गो लस्सी घरी घेऊन येणार आणि मग आईस्कीम टाकून मस्तानी बरोबर खाणार.
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
नगरला द्वारकासिंगची आईस्क्रीम लस्सी बर्याच वेळेला खाल्लेली आहे. मस्त असते एकदम>>>
यस!! ती लस्सी मस्त एकदम! आणि दुसरी एक स्वीट होमची मला वाटते! नक्की आठवत नाही आता बरेच वर्षे झाली त्याला!
कृष्णा मस्तच.. पण ती
कृष्णा मस्तच.. पण ती आईस्क्रिम ची आईडिया नाहि पटली.. दोन्ही वेगळे स्वाद ते एकत्र कसे बरे लागतील?
मिहि हापुस एक आंबा दह्यामध्ये घालुन थोडी साखर, वेलची घालुन मिक्सरला लावुन घेवुन लस्सी बनवते अन मग वरुन ड्रायफ्रुट टाकते.. काजु बदाम वगैरे.. मस्त लागते.
पण ती आईस्क्रिम ची आईडिया
पण ती आईस्क्रिम ची आईडिया नाहि पटली.. दोन्ही वेगळे स्वाद ते एकत्र कसे बरे लागतील?>>>
भावना, एकदा ट्राय करुन बघ! खूप छान लागते!
श्र्रीरामपूरच्या आमच्या दळवी
श्र्रीरामपूरच्या आमच्या दळवी सरांच्या हॉटेल पारिजात मधली मँगो लस्सी आठवली........
आहाहा......
भावना, एकदा ट्राय करुन बघ!
भावना, एकदा ट्राय करुन बघ! खूप छान लागते!>>>>> +१

आईसक्रिम टाकलेल्या लस्सी खुप घट्ट जरी नसल्या तरी स्मुथ बनवाव्या लागतात. म्हणजे जास्त आंबट नको आणि त्याही पेक्षा दह्याचे बारिक पार्टिकल्स असतात ते जाणवले नाही पाहिजेत. अशा स्मुथ लस्सी मध्ये थोडं वेगळ्या फ्लेवरचं आईसक्रिम फार मस्त लागतं!
नाशिक मध्ये पुर्वी नाशिकरोडला बादशहा म्हणून रेस्टॉरंट होतं. तिथे बादशहा स्पेशल लस्सी मिळायची. त्यात तीन वेगळ्या फ्लेवरचे आईसक्रिम टाकून द्यायचा तो. पुढचा मजकूर लिहिणे आता शक्य नाही.....
श्र्रीरामपूरच्या आमच्या दळवी
श्र्रीरामपूरच्या आमच्या दळवी सरांच्या हॉटेल पारिजात मधली मँगो लस्सी आठवली >>> अरेरे आम्ही नाही टेस्ट केली. बाकी आईस्क्रीम खायचो. आम्ही रहायचो त्या घरमालकांचे पारिजातवाले खास दोस्त त्यामुळे ओळखीचे होते, आमच्या घरीही यायचे. आता श्रीरामपुर सोडूनही अकरा वर्ष झाली.
फोटो पाठवत जाऊ नका. विनाकारण
फोटो पाठवत जाऊ नका. विनाकारण घशात थंडावा जाणवतो. आणि मोह होतो. उत्तम पेय.
अहाहा! काय मस्त फोटोय.
अहाहा! काय मस्त फोटोय. गारेगार वाटलं
Pages