काळ्यावरचं सोनं

Submitted by विद्या भुतकर on 17 April, 2017 - 23:29

थोड्या दिवसांपूर्वी मायकल्स(Michaels) नावाच्या माझ्या आवडत्या आर्ट आणि क्राफ्ट दुकानात कॅनवास सेलवर होते. तेही मोठे. आता सध्या वेळ असल्याने हौस म्हणून ५-५ कॅनव्हासचे २ सेट आणले. शेजारीच नवऱ्याला काळ्या रंगाचे कॅनवास दिसले आणि तेही एकदम मोठे आणि स्वस्त. १८*२४ इंचाचे. थोड्या दिवसांपूर्वी मंडल डिझाईन लहान आकाराच्या कॅनवास वर काढून पहिले होते. तेव्हापासून मोठे करायचे इच्छा होती. मग काळ्या रंगाचे ४ कॅनवास घेऊन आले. यात मोठं फायदा हा होता की मागच्या वेळी काळा रंग देण्यातला बराच वेळ आणि रंग वाचला. लगेचच डिझाइन्स सुरु करता आले. पेन्सिलने आधी काढून त्यावर ब्रशने रंगवले. पण यावेळीही आधीसारखाच प्रॉब्लेम आला तो म्हणजे सोनेरी रंगाच्या मागून काळा कॅनवास दिसतोच. रंगाचे ३ हात दिले तरी अजूनही थोडे फिकट वाटत आहे. थोड्या दिवसांनी हुरूप आला तर अजून १-२ हात पुन्हा देईन पण सध्या इतकेच. Happy घरात भिंतीवर लगेच टांगून टाकले. Happy

मोठा कॅनवास आणि बारीक डिझाईनमुळे थोडं दमायला झालं. पण एकदा सुरु केलं की एकदम तंद्री लागते. करत राहावंसं वाटतं. दमल्यासारखं वाटतं ते बंद केल्यावरच. ५ दिवसात साधारण पूर्ण झाले. खूप छान अनुभव आला. माझ्यासारख्या बेसिक चित्रकलाही येत नसलेल्या लोकांसाठी चांगले आहे हे असे वाटले. एकदा वर्तुळं काढली की झालं. एकदम सोपे आकार काढून चांगला परिणाम साधता येतो. स्वतः काहीतरी केल्याचा आनंद आहेच.

विद्या भुतकर.

17884309_1542452215828748_7281662325410013497_n.jpg17991184_1542452212495415_4661594753218548681_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

पहिल्या फोटोवरुन भव्यतेची कल्पना नाही आली ... छानच...
तू ब्रश ने काढते म्हणजे खतरनाक..
साष्टांग _/\_ स्विकारावा Happy

वा:! मस्तच!! सुरेख!!!

मल्टिटेलेंटेड आहात..>>> +786 (ऋन्मेष स्टाईलने!)

Nice vidya.
You can Hang the painting in the center of the blank wall and an inch higher ( at the same height of the rack) for better effect.
Yes, i have slight ocd Wink Hope u dont mind.

छान. खुप पेशन्सच काम असत अस पॅटर्न डिझाइन बनवण.

नताशा Lol मग तुला बेडींगही त्रास देइल. बर्याच ठिकाणी ऑफ आहे Happy