दुधी भोपळा - स्पेशल

Submitted by साज on 22 September, 2009 - 07:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"दुधी भोपळ्याची भाजी खुप आवडते" अस म्हणणारी खुप कमी जण असतील ना!
मला वाटत की जगातल्या ८०% लोकांना ,१००% हा दुधी भोपळा आवडत नसणार. मी सुद्धा दुधी भोपळा अजिबात न आवडणार्‍यांन पैकी एक (होते).
पण खर तर दुधी भोपळा अतिशय गुणकारी असतो. मी आणि माझी बहिण नेहमिची दुधी भोपळ्याची भाजी कही केल्या खात नाही, हे समजल्यावर माझ्या आईने आम्हाला न जाणो किती वेगवेगळ्या रुपात ह्या दुधी भोपळ्याचे पदार्थ खायला घातले.
असेच काही पदार्थ आज इथे पोस्टत आहे.

दुधी भोपळा - हा कॉमन जिन्नस.

क्रमवार पाककृती: 

१) दुधी भोपळ्याची भाजी (खिसुन, बेसन घालुन)
जिरे- धने खमंग भाजुन घ्या आणि त्याची मिक्सर मधे बारीक पुड करा. दुधी भोपळा सालं काढुन खिसुन घ्यावा.
पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचा.
थोड तेल (फोडणी पुरतच) कडकडित तापवुन,मोहरी -जिरे आणि हिन्ग घालुन फोडणी करावि.
मग फोडणीत लाल मिरच्या घाला. मिरच्या मस्त तडतडल्या पाईजेत. त्यात ठेचलेल्या लसुण पाकळ्या घालुन चांगल परतुन घ्या.
आता भोपळ्याचा खिस घालुन भरपुर परतुन घ्या. त्यात जिरे- धने पुड घालुन एक वाफ काढावी. भोपळा शिजला की चवीनुसार
मिठ घाला.चिमुटभर साखर घाला. खुप तिखट हव असेल तर तिखट घाला.
आता डाळीचे पिठ (बेसन) घालुन एक वाफ काढावी.बेसन नीट शिजायला हव. भाजी तयार.

२) दुधी भोपळ्याचे पराठे.
जिरे, धने, थोडी बडिशोप आणि दोन्-तीन वेलच्या खमंग भाजुन घ्या आणि त्याची मिक्सर मधे बारीक पुड करा.
हिरव्या मिरच्या, आलं, लसुण आणि कोथंबिर एकत्र करुन, पेस्ट तयार करा.
भोपळ्याची सालं काढुन भोपळा खिसा आणि त्यात गव्हाच पिठ, पेस्ट आणि पुड, मीठ घालुन पिठ मळा. मुळात भोपळ्याला पाणी
सुटत, शिवाय जरुर तेवढेच पाणी घालुन पिठ घट्ट मळा.
पराठे लाटा आणि थोड बटर/तुप लाऊन भाजुन घ्या. टोमॅटो सॉस/लोणच/चीझ स्प्रेड/चटणी सोबत गरम पराठा खाउ शकता

३) भोपळ्याचे कोफ्ते
कांद भजी साठी पीठ भिजवतो, तस करायच.
दुधी भोपळा सालं काढुन खिसुन घ्या. त्यात चविनुसार मीठ, हळद घाला. पाच - दहा मिनिटे तसच राहुदे.
भोपळ्याला भरपुर पाणी सुटेल. आता त्यात जिरं, तिखट, ओवा, कसुरी मेथी, थोडा गरम मसाला घाला.
भोपळ्याला जेवढ पाणी सुटल असेल, त्यामधे मावेल इतपत बेसन मिसळा. कांदे पकोडे साठी पीठ भिजवतो, तस करायच.
सगळ एकत्र मिसळुन थोड गरम तेल (मोहन) घाला. कोफ्ते तळा.
हे तयार कोफ्ते, वेगवेगळ्या ग्रेव्हिमधे (टोमॅटो-कांद्याची ग्रेव्हि/कोकोनट ग्रेव्हि/कढी/ग्रीन ग्रेव्हि) घालयचे. कोफ्ता करी झाली ना!

४) भोपळ्याच्या रिन्ग्ज्.
दुधी भोपळ्याची सालं काढुन घ्या.
भोपळ्याच्या गोल चकत्या करुन घ्या साधारण अर्धा CENTIMETER (आता हे मराठीत कस लिहु?) जाडीच्या. भोपळ्यात खुप
जास्त बीया असतिल तर त्या काढा. ह्या चकत्या थोडस मीठ आणि ऑरिगेनो घालुन वाफवाव्यात.
तांदुळा ची पिठी, चिली फ्लेक्स, थोड मीठ , काळी मिरी पाउडर,ऑरिगेनो आणि थोडसा लेमन जूस( ऐच्छिक) हे सगळ निट एकत्र
मिसळुन घ्या.
वाफवलेल्या चकत्या, तयार केलेल्या तांदुळा च्या पिठी च्या मिश्रणात घोळुन तव्यावर थोड तेल्/बटर टाकुन मस्त shallow fry करा.
टोमॅटो सॉस/ मेयोनीझ सोबत खा.

अधिक टिपा: 

लहान असताना, आई - बाबा मला ओरडायचे, कि अग जरा शुद्ध लेखन कर, किती अशुद्ध लिहितेस.
मी लेखन करायचे , हेच पुश्कळ होत(माझ्यासाठी).लेखन शुद्ध /अशुद्ध हा माझा प्रांतच नव्हता.
तर हे इथ लिहायच कारण अस की या पाककृती ची खात्री देते, पण शुद्ध लेखनाची नाही.
काही चुकल असेल तर मज पामराला माफ करा.

माहितीचा स्रोत: 
आम्ही भाज्या खाव्यात यासाठी आईने केलेले प्रयोग!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत रेसिपीज. Happy वांग्याच्या कापासारखी रिन्ग्ज ची आयडिया आवडली.

इथे अजून काही दुधीच्या भाज्या, सांबार, चटण्या इत्यादी पदार्थ आहेत -
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/82292.html?1192586783

माशा ,लालू धन्यवाद.

लालू तुम्ही दिलेली LINK पाहिली. छान रेसिपीझ आहेत. नक्की करुन पाहीन.
मनापासुन धन्यवाद.

साज
मला दुधी भोपळ्याची भाजी प्रचंड आवडते, योगायोगाने आज डब्यात ही आणली आहे.
तुम्ही दिलेल्या सर्व रेसिपीज एकदम इंटरेस्टींग आहेत. करून पाहीन. Happy

धन्यवाद दक्शिणा,
तुम्ही देलेला प्रतिसाद वाचुन छान वाटल.
यु मेड माय डे. रेसिपीज करुन पहा आणि मला कळवा कश्या झाल्या ते.

साज, मस्त पाकृ.... दुधीचे पराठे जास्त आवडले. मी करते तेव्हा त्यात तो कोरडा मसाला घालत नाही. आता घालून बघेन.
दुधीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं. बाळंतिणींना मुद्दाम दुधीचे पदार्थ खायला घालतात. मला फक्त दुधीहलवा आवडत असे. पण बाळंतीण झाल्यावर रोज रोज तो खाणं परवडणारं नव्हतं. Proud त्यामुळे माझी आई रोज रात्री जेवणात दुधीचं भरीत करायची. ते मात्र मला खूप आवडू लागलं.

त्याची कृती एकदम सोप्पी आहे:

दुधीच्या फोडी वाफवून घ्यायच्या. थंड झाल्यावर त्यात मीठ, दही आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आणि वरून मस्त तूप, जीरे, हिंगाची फोडणी घालून ते सगळं एकत्र कालवायचं आणि खायचं. Happy

माझ्या डोक्यात,
दूधी = हलवा,
हेच बरीच वर्षे लहानपणापासून(कारण घरी सुद्धा कधीच भाजी केली नाही ह्याची आईने बहुधा) तेव्हा एकदा शाळेत मैत्रीणीने भाजी बनवून आणली तर अरे ह्याची भाजी करून खात नाहीत, चांगले नसते असा मी गोंधळ घातला खरेच व तिला गोंधळवले एकदम. ती पंजाबी मैत्रीण हमारे मे तो खाते है. Happy मग मी त्यानंतर आजारी झाले तेव्हा आईन रोज सूप पाजून बेजार केले मला. आजही भाजी कोणीही खात नाही. तेव्हा हे करून पाहिन. Happy

साज,
छान आहेत रेसिपीज, मंजुडि मी पण हे भरीत करते. परोठे पण करते, पण त्यात कधि वेलची, बडिशोप नाही घालुन बघितलं. मी थोडं आंबट दही घालते. हे करुन पाहीन. आणि दुधिच्या साध्या भाजीत मॅगीचा मसाला किंवा क्युबज घालुन पण छान लागतं. जरा चायनीज चव येते. दुधिची पिठ पेरुन भाजी पहिल्यांदाच बघितली. ती सुद्धा करुन पाहिलि पाहिजे.

वरच्या सगळ्या रेसिपी चांगल्या आहेत. Happy त्या, भरित याशिवाय मी मुठिया पण करते दुधीच्या. मस्त होतात. दुधी न आवडणारे पण खातात.. कळतच नाही ना.. Happy

आमच्याकडे आठवअड्यातून एकवेळेला तरी दुधी होतोच. नेहेमीची डाळ घालून भाजी किंवा कोफ्ते किंवा कधीकधी तुपावर फक्त लसण्-हिरवी मिरची घालून फोडी किंवा किस परतणे इतकेच प्रकार होतात. आता यातले पदार्थ करून बघेन. :)तसही त्याच त्याच प्रकारे भाजी खायचा कंटाळा आला होता.

असो, दुधिचा अजून एक उपयोग मला माहित आहे. दुधी किसून त्याचा फुलपात्रंभर रस काढून त्यात अर्धा लिंबू आणि चवीपुरतं मीठ घालून जर हा रस सकाळी अनोशापोटी प्यायला तर म्हणे वजन कमी होतं खूप...

सगळ्यांना धन्यवाद!
मंजु, तुमची "दुधीचं भरीत" ही कल्पना एक्दम बेस्ट.(थॅन्क्स टू युअर आई).
माझ्या नवर्‍याला सुद्धा आवडेल दुधीचं भरीत.

मनुस्विनी तुमच्या सारख, मला सुद्धा दुधी = हलवा असच हव असायच. पण मी वर लिहील्याप्रमाणे, "माझ्या आईने आम्हाला न जाणो किती वेगवेगळ्या रुपात ह्या दुधी भोपळ्याचे पदार्थ खायला घातले." आणि मग आपोआप दुधी भोपळा आवडायला लागला.

धनु तुम्ही लिहील्याप्रमाणे मी ही चायनीझ टच वाली भाजी करुन पाहीन. मस्त आयडीया.

दिनेशजी मला हे माहित नव्हत की "दूधी भोपळा हि मानवाला परिचित झालेली पहिली भाजी मानली जाते." थॅन्क्स, आज मस्त इन्फो मिळाली.

अग खास रेसेपी नाहीय्ये त्याची. दुधी किसावा त्यात गव्हाचे जाडे पीठ् १ वाटी(गुज्जू लोक भाकरी(आपले गाकर) करताना वापरतात ते), १वाटी कणीक,तिखट,मीठ,ओवा,कोथिंबीर, आवडत असेल तर थोडं आललसूण पेस्ट अस थुलथुलीत मिश्रण तेलाचा हात लावून कुकरच्या डब्यात घालून वाफवावे. आपण मेथी मुटकुळे वाफवतो तसे. नंतर कापून वड्या करून फोडणी द्यावी हिंग-जिरे-तीळ यांची. उकडलेले असल्याने थोडी फोडणी पुरते. Happy आवडत असल्यास १० मि. परतावे चांगले ब्राऊन दिसतेत मग. Happy

अजुन एक रेसिपी:

दुधीचे सुप
दुधीच्या फोडी करुन कुकर मध्ये उकडून घ्या. त्याची मिक्सर मध्ये बारीक प्युरी करुन घ्या. गाळायची गरज नाही पडत. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळायला ठेवा. यामध्ये मीठ मिरपूड घालून प्यायला देण्याआधी लिंबू पिळा.

चीज किसून सुध्दा देता येइल, फक्त त्या वेळेस लिंबू पिळू नये.

दुधी चा रस काढुन, तो रस पिण्याचा प्रयत्न मी केला आहे.पण नन्तर माझ्या पोटात मस्त गडबड झाली.
कधी कधी कच्च्या भाज्यांचा रस पोटाला पचवायला जड जातो म्हणे,तसच काही झाल असेल माझ्यासोबत.
मग मी दुधी थोडा वाफावून, त्याचा रस प्यायले, त्यावेळी पोटात गडबड झाली नाही.
मी थोडा आवळ्याचा रस त्यात मिक्स केला होता, छान चव आली.

दुधीचे भरीत जे इथे दिले आहे त्याला आम्ही रायते म्हणतो. दुधीच्या छोट्या चौकोनी फोडी वाफवुन, हळद/हिंग/हिरवी मिरचीची फोडणी आणि दही, कोथींबीर वाटल्यास नारळ/दाण्याचा कूट.

दुधीचे मुटके (मुटकुळे पण म्हणतात) एग करीला करतो तशी करी करुन त्यात खूप छान लागतात. मुटके करताना चमचा दोन चमचे थालीपीठाची भाजणी घातली तर मस्त खमंग चव येते. लहानपणी सहलीला जाताना आई असे मेथीचे, दुधीचे आणि कोथींबीरीचे मुटके डब्यात द्यायची. थोड्या तेलावर खरपूस परतून Happy

माझी आई आमच्या लहानपणी दुधीची गोड भाजी ( खरं तर हलव्याचाच प्रकार ) करायची . दुधी किसून तुपावर लवंग, दालचिनीवर फोडणीस घालायचा. चांगला परतला की त्यात ओले खोबरे टाकून एक वाफ काढायची, अन मग त्यात चवीनुसार साखर टाकून परतायचे. नेहमीच्या हलव्यापेक्षा चव थोडी वेगळी असल्याने आम्ही आवडीने खायचो Happy

दुधी भोपळा व चवळीची भाजी मस्त होते.
दुधीच्या सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करायच्या. चवळी भिजवून कुकरला वेगळी शिजवून घ्यायची. ती बाजूला ठेवायची. तेलाची फोडणी करायाची. अर्थातच मोहोरी हिंग घालून. पण यात मोहोरी तडतडली की अर्धा चमचा मेथी दाणे ही घालायचे. मग हिंग घालायचा. मग सुकी लाल मिरची कढीलिंब घालून परतून त्यावर दुधीच्या फोडी , मीठ, काळा मसाला ( १ च.) घालून अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवावे. व शिजली की मग आधी शिजवलेली चवळी घालून थोडा गूळ घालून एक वाफ काढायची. व गॅस बंद करावा. ही भाजी मेथ्या घातल्यामुळे खमं ग होते. वरून भरपूर कोथिंबीर खोबरं घातल्यास अधीक चविष्ट होते. ही भाजी रसदार करावी. पोळी/भात दोन्हीबरोबर मस्त लागते. तुमच्या काळ्या मसाल्यात तिखट नसेल तर थोडे तिखट(लाल मिरची पावडर) ही फोडणीत घालावे.

माझी आई साधारण अशाच पद्धतीने भिजवलेली मूग डाळ घालुन करते. पाणी घालत नाही. झाकण घालुन वाफ येइल तेव्हढेच पाणी. मी एकदा मोड आलेल्या मेथ्या घालुन केली होती, चांगली लागली. मोड आलेल्या मेथ्या फार कडु लागत नाहीत त्यामुळे माझ्या लेकाने पण खाल्ली होती Wink

आमच्याकडे आठवअड्यातून एकवेळेला तरी दुधी होतोच. नेहेमीची डाळ घालून भाजी किंवा कोफ्ते >>अल्पना ही कोफ्ताची रेसिपी लिही ना जरा.मला फार आवडते ही पंजाबी स्टाईल भाजी.

>>सकाळी नाश्त्या मधे दुधी भोपळा कसा वापरता येईल??
पराठे करता येतील किंवा वर लिहिलेले वाफवलेले मुठिये पण चांगले लागतील.दक्षिणा ने लिहिलेला दुधीचा रस पण ट्राय करून पहाता येइल.

Pages