३-४ मध्यम फुग्या मिरच्या ( शिमला मिर्च, कॅप्सिकम, बेल पेपर्स, ढब्बू मिरच्या इत्यादी )
१ मध्यम कांदा
१ टे स्पून शेंगदाणे
१ टे स्पून तीळ
२ पाकळ्या लसूण,
अर्धा इंच आल्याचा तुकडा
१ टे स्पून सुक्या खोबर्याचा कीस
२ हिरव्या मिरच्या
एका छोट्या लिंबा येवढी चिंच
तेल, तिखट, मीठ
फुग्या मिरच्यांचे पाऊण इंचाचे तुकडे करावेत
कांदा बारीक चिरून घ्यावा
चिंचेवर कोमट पाणी घालून ठेवावे
मंद आचेवर तीळ, शेंगदाणे वेगवेगळे, कोरडे, खमंग परतून घ्यावे. सुक्या खोबर्याचा कीस पण थोडा परतून घ्यावा. हा लगेच करपतो त्यामुळे मंद आचेवर अन लक्ष ठेवून परतावा लागेल.
थोड्या तेलात हिरव्यामिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत.
एका कढईत थोडे तेल तापवून त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
कांदा, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, तीळ , शेंगदाणे, खोबर्याचा कीस सर्व एकत्र करून अगदी बारीक वाटून घ्यावे. लागेल तसे थोडे पाणी घालून वाटावे.
फुग्या मिरच्यांचे तुकडे जरा सढळ हाताने तेल घालून त्यावर परतून घ्यावेत. अगदी पूर्ण शिजू देऊ नयेत.
हे परतलेले तुकडे एखाद्या ताटात काढून, त्याच कढईत ( पाहिजे असल्यास थोडे तेल घालून ) वाटलेला मसाला परतावा. मंद गॅसवर परतला म्हणजे खाली लागणार नाही.
मसाला पाचेक मिनिटं परतून झाला की त्यात चिंचेचा कोळ घालावा. चवीप्रमाणे तिखट व मीठ घालावे व परतत रहावे.
चिंच शिजली की परतलेले फुग्या मिरच्यांचे तुकडे घालावे . अगदी सुके वाटल्यास थोडे पाणी घालून नीट करुन २-३ मिनिटे शिजू द्यावे.
मिरची का सालन तयार.
काही ठिकाणी वाढताना तेलात तळलेल्या सुक्या मिर्च्या वरून घालायची पद्धत आहे म्हणे. मी कधी केले नाही.
अरे व्वा! मस्त आहे ही
अरे व्वा! मस्त आहे ही रेसिपी... नक्की करुन बघणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हल्ली आशिर्वाद वगैरेच्या
हल्ली आशिर्वाद वगैरेच्या रेडिमेड भाज्या मिळतात त्यात खाल्लय मिर्च का सालन. आवडलेलं.
ही रेसिपी मस्त वाटतेय. बहुधा करून बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त त्याचा रंग चिंचेच्या कोळ
फक्त त्याचा रंग चिंचेच्या कोळ घातल्यावर चॉकलेटीपणाकडे झुकलाय. सिंडीच्या भाजीसारखा पिवळा रंग कसा आणता येईल? >>>> अरेरे वाईट वाटलं बर्का वाचून
(भला मेरी भाजी तेरी भाजी जैसी पिली क्यु नही :फिदी:)
अन मी फारच खंतावत होते त्या रंगापायी. मी हाटेलात खाल्लेलं मिर्ची का सालन छान चॉकलेटी रंगाचं आणि दाट होतं. माझ्याकडून पाणी जरा जास्त पडलं. पुढल्या वेळी कमी घालेन पाणी पण उफ्फ उस रंग का क्या करे ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बर्मग, त्या भाजीत आता काही
बर्मग, त्या भाजीत आता काही बदल कर्णार नाही मी.
आज एका गटगसाठी सालन केले
आज एका गटगसाठी सालन केले होते. एक्दम हिट रेसिपी! थॅन्क्स मेधा!!
बर्याच ठिकाणी ह्या
बर्याच ठिकाणी ह्या रेस्पीबद्दल वाचले होते. शेवटी आज वाचायचा योग आला. मस्त आहे एकदम! करणार लवकर.
काल हे केलेलं. एकदम यम्मी.
काल हे केलेलं. एकदम यम्मी. फ्रोजन नान बरोबर खाल्लं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम झटपट जेवण तयार डिश. धन्यावाद.
अमित, त्या मिरच्या तिखट होत
अमित, त्या मिरच्या तिखट होत जातात ग्रेव्हीमध्ये राहून. तेव्हा पटकन संपवून टाक उरलं असल्यास.
ओके. पण संपलं कालच.
ओके. पण संपलं कालच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते दाणे, तीळ आणि खोबरं याची पावडर करून ठेवली पाहिजे. की आणखी पटकन होईल.
मसाल्याचे जिन्नस वाचूनच
मसाल्याचे जिन्नस वाचूनच तोंपासु झालंय.. अमितव म्हणतोय तसं.. दाणे तीळ खोबरं भाजून पावडर स्टोअर करून ठेवली(च) पाहिजे.. या मसाल्यात वांगी कशी बरं लागतील??
वर्षू, छोटी वांगी + चीर देऊन
वर्षू, छोटी वांगी + चीर देऊन , थोडे मीठ शिंपडून, जरा जास्त तेलात परतून घ्यायची आणि मिरचीच्या जागी वापरायची. बाकी कृती तीच. मस्त लागतात.
वर्षू, बघारे बैंगन. माझी
वर्षू, बघारे बैंगन. माझी आवडती आणि पॉट लकला वगैरे हमखास करायची भाजी आहे.
Pages