शास्त्रीय, नैतिक पायावर व्यवसाय करू बघणारे, रुग्ण-संवादी, पारदर्शक डॉक्टर्स व समंजस नागरिक यांनी एकत्र येण्यासाठीचे एक पाउल म्हणून 'पुणे सिटीझन डॉक्टर फोरम' हे व्यासपीठ सुरु झाले आहे. आपल्याला ज्या डॉक्टर बाबत चांगला अनुभव आला आहे अशा डॉक्टर्सची इतर रुग्णांना शिफारस करण्यासाठी कृपया मेडिमित्र या संकेत-स्थळाला भेट देऊन त्यांचीनावे नोंदवा. या संकेत-स्थळावर खालील प्रकारचे प्रश्न दिले आहेत - डॉक्टरांनी पुरेसा वेळ दिला का; आजार व त्यावरील उपचार याबाबत पुरेशी माहिती दिली का;प्रश्नांना नीट उत्तरे दिली का? विशिष्ट दुकानातून औषध खरेदी करायचा आग्रह धरला का; फी बद्दल पारदर्शकता होती का; – –- या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पाच उपलब्ध पर्यायांपैकी एकावर टिकमार्क करायचे आहे. (इस्पितळात दाखल झालेल्या किंवा एखादी प्रोसिजर झालेल्या रुग्णासाठी आणखी काही प्रश्न आहेत.) या उत्तरांवरून आपोआप एक स्कोर तयार होईल व त्या आधारे 'रुग्णसंवादी’ डॉक्टर्सची यादी बनेल. (रुग्णांची नावे अर्थातच जाहीर होणार नाहीत.) ही यादी पाहून इतर रुग्ण या डॉक्टर्सचा अनुभव घेऊन त्याबाबतचा अनुभव या संकेतस्थळावर नोंदवू शकतील. जितके जास्त रुग्ण अनुभव नोंदवतील तेव्हढी ही यादी व्यक्ती-निरपेक्ष होईल व वाढत जाईल. पुणेकर नागरिकांनी सहकार्य केले तरच हे काम पुढे जाणार आहे.
टीप - मला ही माहिती सोशल फोरम वर मिळाली आहे. या विषयावर चर्चा व्हावी असे मला वाटते म्हणुन मी इथे देत आहे.
चांगला डॉक्टर कसा शोधायचा?
Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 April, 2017 - 06:07
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"या विषयावर चर्चा व्हावी असे
"या विषयावर चर्चा व्हावी असे मला वाटते म्हणुन मी इथे देत आहे."
- तोंडी प्रसिद्धी जलद होते आणि त्या डॅाक्टरकडे एवढी गर्दी वाढत जाते की पटकन औषध मिळणे अशक्य होते.
- एखादा चांगला डॅाक्टर कळला तरी तो आपल्या भागापासून दूर असेल तर काहीच उपयोग होत नाही॥ पेशंटला तिकडे नेऊन आणणे कठीणच.
जेव्हा आजारपण येते तेव्हा चार पावलेही चालता येत नाहीत॥
अनुभवातून लिहिलं आहे. विरोध म्हणून नाही.
ही यादी पाहून इतर रुग्ण या
ही यादी पाहून इतर रुग्ण या डॉक्टर्सचा अनुभव घेऊन त्याबाबतचा अनुभव या संकेतस्थळावर नोंदवू शकतील. जितके जास्त रुग्ण अनुभव नोंदवतील तेव्हढी ही यादी व्यक्ती-निरपेक्ष होईल व वाढत जाईल. पुणेकर नागरिकांनी सहकार्य केले तरच हे काम पुढे जाणार आहे.>>> चांगले काम.
स्तुत्य उपक्रम!
स्तुत्य उपक्रम!
नियमीतपणे बिले बुडविणारे,
नियमीतपणे बिले बुडविणारे, रुग्णालयांत येऊन कन्सेशन/वर्गण्या (!) मागणारे, उर्मटपणे वागणारे, मुद्दाम (हॅबिचुअली) लिटिगेशनमधे जाणारे, आपली जुनी हिस्ट्री लपवून ठेवून कार्यभाग साधू पाहणारे, खोटी बिले मागणारे, पेशंट आणला म्हणून कमिशन मागणारे "समाजसेवक" इ. प्रकारच्या रुग्णांचाही डेटाबेस करायचे काम डॉक्टरांनी या संपानंतर हाती घेतलेले आहे.
रुग्णांची/नातेवाईकांची नावे अर्थातच इतर डॉक्टरांकडेच उघड केली जातील. व त्यावर योग्य कार्यवाही केली जाईल.
आ.रा.रा. तो सुद्धा स्तुत्य
आ.रा.रा. तो सुद्धा स्तुत्य उपक्रम आहे.
एखाद्या डॉक्टरचा अनुभव
एखाद्या डॉक्टरचा अनुभव एखाद्याला अगदी चांगला तर त्याच डॉक्टरचा अनुभव एखाद्याला अतिशय वाईट आलेला असणे सहज शक्य आहे.श्रीमंत रुग्णाला लुटण्यात काही गैर नाही असे मानणारे ही डॉक्टर असतील. वर्षातून एखाद्यावेळी गरीब रुग्णांसाठी मोफत शिबिर घेउन पापक्षालन करणारेही डॉक्टर असतील. काळ पांढर अस काहीच असणार नाही तरी 'त्यातल्या त्यात' असा काही मार्गदर्शक रस्ता यातून सापडू शकतो. वर एसारडी यांनी मांडलेला मुद्दाही महत्वाचा आहे.
Plz suggest some good
Plz suggest some good Ayurveda doctor near SB road/Model colony Pune for neck /back pain aani for loss weight. Panchkarm karun kahi phark padel ka vajan aani neck sathi?? Plz it urgent