Submitted by जाई. on 11 April, 2017 - 13:00
व्यायाम , आहार इत्यादी बाबत एके ठिकाणी चर्चा करत असताना सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या, प्रोटीन पावडर वगैरेचा विषय निघाला. नेहमीप्रमाणे चर्चेत हे सगळे घेतल्याने फायदा होतो आणि फायदा होत नाही असे दोन गट पडले. मात्र ह्या सर्वांच्या वाटेला कधीही न गेलेल्या अस्मादिकांची मात्र पंचाईत झाली. तर या चर्चेतून पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा बाफ
१) हे सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या म्हणजे नेमकं काय असत ?
२) ह्या सगळ्याचे शरीरावर काय परिणाम होतात? (दीर्घकालीन /अल्पकालीन )
३) मध्येच बंद केल्यास दुष्परिणाम होतात का ?
४) ट्रेनर लोंकांवर त्यांच्या ज्ञानावर कितपत विश्वास ठेवावा ? कि नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
५)ह्या सगळ्याने खरंच फायदा होतो का ?
तूर्तास इतकेच !
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे माझे मत.
ट्रेनर पेक्षा डॉक्टर बरा. पण
ट्रेनर पेक्षा डॉक्टर बरा. पण डॉक्टर सांगतो म्हणून तेच रिलिजिअसली डोळे बंद ठेवून करू नये हे माझं मत.
आपला रिसर्च आणि गटफील विचारात घ्यावा आणि त्या अनुषंगाने डॉक्टरला प्रश्न विचारावे. टेस्ट असतील त्या ६ महिन्यातून एकदा कराव्या आणि री कॅलिबरेट करत रहावं. अर्थात हे डॉक्टरने करणं अपेक्षित आहेच.
थंड देशात रहात असाल तर व 'ड' जीवनसत्त्व कमी असण्याची भरपूर शक्यता असते.
ज्या कमतरता आहारात बदल करून घालवता येतील त्यावर प्रयत्न जरूर करावे, पण गोळी चालू करून मगच.
इंडिया मध्ये multivitamins ची
इंडिया मध्ये multivitamins ची गरज नाही, आणि परदेशात त्याला पर्याय नाही।
इंडिया मध्ये multivitamins ची
इंडिया मध्ये multivitamins ची गरज नाही >>>>>>>
म्हणजे...?
प्रोटिन पावडर घेत असाल तर
प्रोटिन पावडर घेत असाल तर त्याचा दुरूपयोग काही होणार नाही. रिकव्हरी साठी ल्युसिन इ असणारे प्रोटिन पावडर चांगले असते.
सप्लिमेंट म्हणून BCCA सारख्या गोळ्या घेत असाल तर मसल बिल्ड व्हायला मदत होते. ( मी घेत नाही )
व्हिटामिन घ्यायच्या की नाही, हे ब्लड टेस्ट वरून कळते. उदा डी व्हिटामिन हे बरेचदा कमी असते आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही. जास्तीचे व्हिटामीन डी घेतले तर बॉडीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे व्हिटामिन गोळ्या घ्यायच्या आधी टेस्ट करून घेणे उत्तम. ट्रेनरला हे सगळे माहीत असेलच असे नाही.
हे सगळे जर तुम्ही खूप अॅक्टिव्ह असाल तर. जर फॅट कमी करणे उद्देश असेल तर सप्लिमेंट गोळ्या घेऊ नका कारण त्यात भरपूर कॅलरीज असतात. किंवा घेत असाल तर त्या पूर्ण आहाराच्या कॅलरीज मधून वजा करा.
ओह ! असंही असत का . धन्यवाद
जर फॅट कमी करणे उद्देश असेल तर सप्लिमेंट गोळ्या घेऊ नका कारण त्यात भरपूर कॅलरीज असतात. किंवा घेत असाल तर त्या पूर्ण आहाराच्या कॅलरीज मधून वजा करा.>>>> ओह !, थँक्स माहितीबद्दल
मस्त धागा. वाचतेय.
मस्त धागा. वाचतेय.