गेल्या शनिवार रविवार पुण्याजवळील एका तळयाकाठी मुक्काम आणि परतीच्या मार्गात एक सूंदर असे पाले गावातील लेणे अशी भटकंती झाली. पुण्यापासून पाले हे साधारण ५०किमी अंतरावर आहे. पाले गावा पर्यंत थेट गाडी मार्ग आहे आणि गावतुन एखादा गावकरी मदतीस घेतला असता भटकंती सुरक्षित आणि वेळेत होईल ह्याची निश्चिंति येते.
"अशोक वाटिका" नावाच्या फार्महाउस शेजारून लेण्यापर्यन्त वाट गेली आहे. फार्म हाउसच्या शेजारी गाडी पार्क करून ५ मिनिटाची चाल आपल्याला लेण्याच्या पायथ्याला घेवुन जाते. तेथून पुढे १० मिनिटांच्या डोंगर चढाईने आपण लेण्याच्या मुखाशी येतो.
दर्शनी भागातून दिसणारी गुहा
पाले गावातील हे लेणे एक ई.स. पूर्व १ल्या शतकातील आहे म्हणजेच हे लेणे तब्बल २००० वर्षा पेक्षा जास्त जुने आहे. नैसर्गिक गुहेचा अप्रतिम वापर केलेला आपणास येथे दिसतो. लेणीच्या मुखाशी शिलालेख, त्याला असणारी चौकट, टाके, खोदीव पायऱ्या बघायला मिळतात.
खोदीव पायऱ्या आणि टाके
शिलालेख
शिलालेखाचे वाचन, संदर्भ: महाराष्ट्रातील गुंफांमधील शिलालेख
शिलालेखाची सुरुवात "नमो अरिहंता नं" अशी आहे, ह्या वरुन हे लेणे जैन लेणे असावे असा अंदाज येतो. आमच्या भटक्यांच्या ग्रुप मधील तुषार पोनम ह्याने ह्या ब्राह्मी लिपितील शिलालेखाचे वाचन करून आम्हाला अर्थ सांगितला. लेणी मधील हा शिलालेख महाराष्ट्रात असणाऱ्या जैन शिलालेखापैकी सगळ्यात जून्या लेखापैकी एक आहे.
लेण्याच्या गर्भगृहात एक छोटी विहारवजा खोली आहे, हिचा उपयोग विश्रामगृह किंवा ध्यान साधनेसाठी होत असावा.
छायाचित्रणात मग्न मित्रमंडळी
धान्यस्थ मित्र दिपक
अंतर्भागातून दिसणारी गुहा
संपूर्ण लेणी निरखुन बघण्यास अर्धा तास पुरेसा आहे. ह्या लेण्याच्या शेजारीच उकसन लेने समूह सुद्धा आहे, त्याही बघण्या सारख्या आहेत.
लेण्या बघण्या करीता आमचे मित्र साईंप्रकाश बेलसरे ह्यांच्या लेखनाचा उपयोग झाला (http://www.discoversahyadri.in/2014/06/UksanPalCaves.html)
स्थळ दर्शक माहिती: 18.830651, 73.521796 (18°49'50.3"N 73°31'18.5"E)
मार्ग : पुणे – कामशेत – कांब्रे – गोवित्री – पाले (नाने मावळ)
सवंगडी: विनीत दाते, प्रशांत कोठावदे, मुकुंद पाटे, दीपक वनारसे, चिन्मय किर्तने, तुषार पोनम व मी (विराग रोकडे)
~ विराग रोकडे
व्वा!
व्वा!
खूप छान माहिती... आणि फोटोही...
मस्त..
छान परिचय.
छान परिचय.
पुण्यापासून कुठल्या मार्गावर आहेत हि लेणी ?
धन्यवाद कावेरी आणि दिनेश
धन्यवाद कावेरी आणि दिनेश
पुण्यापासून कुठल्या मार्गावर आहेत हि लेणी ? >> मार्ग दिला आहे आहे
मार्ग : पुणे – कामशेत – कांब्रे – गोवित्री – पाले (नाने मावळ)
कधीच एकले नव्हते. नवीन ठिकाण
कधीच एकले नव्हते. नवीन ठिकाण कळाले. अशोक वाटिका फार्महाउसम्ध्ये काही जेवायची, आरामाची सोय आहे की ते प्रायवेट आहे?
मस्त
मस्त
राया आणि रोहित धन्यवाद
राया आणि रोहित धन्यवाद
अशोक वाटिका फार्महाउसम्ध्ये काही जेवायची, आरामाची सोय आहे की ते प्रायवेट आहे? >> खाजगी मालमत्ता आहे, राहणे किंवा भोजन सोय नसावी. फाटक बंद होते त्यामुळे विचारपूस नाही केली