नाणेघाट ते जीवधन आणि अचानक भयानक झालेला दारेघाट!

Submitted by शुभम एडेकर on 30 March, 2017 - 11:45

होळी आणि धुलिवंदनच्या शुभमुहूर्तावर जिवधन आणि नाणेघाटचा ट्रेक ठरला, फक्त एवढच ठरायच बाकी होत की सकाळी निघायच का रात्री जायच. नाईट ट्रेक करायची तर खुप इच्छा होती. पण येणा-या सदस्यांपैकी काही सदस्यांचे येणे घरातुन मंजूर होत नव्हते. अखेर बसचा टाईमटेबल पाहुन रात्री जाण्यावाचून गत्यंतर नव्हते हे बऱ्यापैकी लक्षात आले. सर्वांना कसतरी समजवत रात्री निघण्याचे ठरले. कल्याणहुन संध्याकाळी 6 ची माळशेजच्या दिशेने जाणारी बस पकडली पण तिथे एक अतिशय अनपेक्षित प्रकार घडला. नाणेघाटाचे तिकीट मागितल्या मागितल्या कंडक्टर काकांनी आम्हाला तिथल्या तिथे उतरायला लावल आणि तेही दिवसभराची राहिलेली मुखशुध्दी आमच्यावर करत. आम्हीही जास्त वाद न घालता बस मधुन उतरलो आणि दुस-या बस मध्ये बसलो. तिथे आम्ही सांगितलच नाही की आम्हाला नाणेघाटला उतरायच आहे. बस सुरू झाली, खुप पुढे गेली तेव्हा तिकीट काढताना टोकावड्याच्या पुढच्या स्थानकाच म्हणजे भोईरवाडीच तिकीट काढल. रस्त्यात कंडक्टर काकांना थोडा मसका लावत राहिलो आणि जादु चालली की त्यांच्यावर. त्यांनी एकदम बरोबर ट्रेकींग पाॅइंटच्या इथे बस थांबवली आणि आमचा राम राम घेतला. गणपती बाप्पा मोरया करत नाणेघाट चढण्यास सुरूवात केली. मध्ये थोडी रस्त्याची चुकामुक झाली पण परत मुख्य रस्त्यावर आलो. जवळ जवळ 1 तास चढल्यानंतर बऱ्यापैकी भुक लागली होती. घरातुन तयार तर कोणीच काही आणल नव्हत. जेवण शिजवाव लागणार होत. योगेश ने घरून सार आणल होत. त्यामुळे खिचडी करण्याचा बेत डिलीट करून नुसता भात करायला घेतला. भात करे पर्यंत आपल्या गोंधळ्याला घरून फोन आला. गोंधळ्यानी घरी ट्रेकला चालोय ते सांगितलच नव्हत. त्याच्या पप्पानी आल्यावर तुझी शाळा घेतो बोलुन फोन ठेवला. तोपर्यंत आमचा भात तयार होता. सगळे जेवायला बसलो. पौर्णिमेची रात्र, आजुबाजुला घनदाट जंगल, कँडल लाईट डिनर आणि अजुन योगेशने आणलेली कांदा भजी आणि खाणारी पाच तोंड. सगळ कस आमच्यासाठीच चाललय अस वाटत होत. जेवण तर पोटभर झाल पण आता परत चढायचा उत्साह निघुन गेला होता. पण नाणेघाटाच्या गुहेतुन कोणीतरी टाॅर्च मारत होता आणि तिही खुप वेळ. आम्हाला वाटल त्याला काही तरी गरज असेल म्हणुन आम्ही सगळ आवरत परत नाणेघाट चढण्यास सुरवात केली. पौर्णिमा असल्यामुळे मस्त उजेड पडला होता. गुहा लागायच्या थोड आधि एक पाण्याच टाक होत. तिथल पाणी इतक पारदर्शक होत की आणि पाण्याचा तळ बघतोय की रिकामी टाकी बघतोय तेचकळत नव्हत. पाण्याची तहान भागवत आम्ही पुन्हा चढायला सुरवात केली. थोड्याच वेळात आम्ही गुहेजवळ पोचलो. तिथे आगदोरच एक ग्रुप आला होता आणि तिथे कोणालाही कशाची मदत पाहिजे नव्हती. त्यांना विचारल पण त्यांनी उत्तर द्यायच टाळल. असो त्या एका कारणामुळे आम्हाला निदान खाली थंडीत तरी झोपायला लागल नाही. गुहेत बॅगा ठेऊन जयेश आणि मी हिंडायला निघालो. आजुबाजुचा सगळा परिसर बघुन झोपण्यासाठी गुहेत गेलो. विवेक दादाने आधिच लोटांगण टाकल होत. नंतर आम्हीही झोपायचा खुप प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती. सकाळी उठल्यावर पहिले धाव मारली ती थेट नानाच्या अंगठ्यावर. नानाच्या अंगठा आजवर ब-याच ठिकाणांहुन पाहिला पण आज मी त्याच्यावर उभा होतो. खुप सुखद क्षण होता तो. काही केल्या पाय निघत नव्हते तिथुन. पण इथुन लवकारत लवकर निघुन जिवधन ही चढायचा होता. त्यामुळे आमची दिंडी नाणेघाटातुन जिवधनकडे निघाली. जिवधनच्या पायथ्याशी जाऊन थोड पोटाचा विचार करत मॅगी शिजवायला ठेवली. मॅगी खाऊन पोट मस्त टमाटम भरल. इथुन पुढे थोडासा जंगलातुन रस्ता होता. पण गोंधळ्या आणि मी एका फोटोसाठी मागे राहिलो. फोटो काढालाही पण बाकीची मंडळी कुठल्या रस्त्याने गेली ते लक्षातच राहिल नाही. रस्ता शोधत शोधत आम्ही दोघही वांदरलिंगीच्या पायथ्याशी पोहचलो. तिथे एक ग्रुप वांदरलिंगी क्लाईंम्बींगची तयारी करत होते. त्यांना रस्ता विचारला असता त्यांनी आम्हाला परत उतरण्यासाठी सांगितले. पण आम्ही जिथुन चढलो होतो तिथुन पुन्हा उतरणे आमच्याच्यानी तरी शक्य नव्हते. तितक्यात डाविकडुन जयेशचा आवाज आला आणि आवाजासोबत तोही लगेच तिथे आला. त्याला पाहुन थोडासा जिवात-जीव आला. तिथुन आम्ही परत आमच्या दिंडीत सामील झालो. पुढे गेल्यानंतर रस्त्यात एक काका भेटले. एका वाटाड्याला घेऊन ते गड फिरायला आले होते. त्यांचा उत्साह पाहुन खुप बर वाटल की अशी माणसही आहेत अपल्याइथे. त्यांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा देत आम्ही पुढे निघालो. पुढे छोटासा कातळटप्पा चढत आम्ही दरवाजाजवळ पोहचलो. अखंड कातळात खोदलेला आणि बांधलेला हा दरवाजा पाहुन सगळेच अचंबित झालो. तिथुन उजवीकडे वांदरलिंगी पहायला आम्ही निघालो. माहुलीचा एकटा उभा असलेला वजीर खुपदा पाहिला पण वांदरलिंगी सुळका इतक्या जवळुन पहायला खुप मजा आली. तिथुन पुढे जिवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. मंदिरात देवीला नमस्कार करून आम्ही खाली असलेल्या धान्याच्या कोठारांकडे निघालो. कोठार बाहेरून तर खुप लाहन दिसत पण आतमध्ये खुपच प्रशस्त आहे. आतमध्ये कातळात कोरलेल्या मोठमोठ्या खोल्या आहेत. अखेरच्या इंग्रजाच्या विरूध्द झालेल्या लाढईत या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते. कोठारांच्या बाजुलाच एका टाकीत पिण्यायोग्य पाणी आहे. होळीच्या दिवशी तर आम्हाला पुरणपोळी खायला मिळाली नाही. पण धुलिवंदनच्या दिवशी जयेशने आणलेल्या पुरणपोळीने आमच्या ट्रेकला चार चांद लावले. जिवधन वरून उतरून आम्हाला घाटघर ला जायचे होते. घाटघरहुन 3.15 ची एस.टी. होती. म्हणुन आम्ही निघण्यास थोडी घाई केली. वाटेत एक बुरूज आणि बुरूजाच्या समोर एक पाण्याची गुहा आहे. पुढे छोटासा कातळटप्पा उतरून दोन शिड्या आहेत. शिड्या संपल्यावर डाविकडे एक छोटीशी गुहा आहे अगदी एक माणुस बसुन आतमध्ये जाईल इतकी लहान. 20 ते 25 फुट आतमध्ये गेल्यावर डाविकडे आणि उजवीकडे अशी दोन्ही बाजुला एक एक खोली आहे. अंदाजे लाकड ठेवण्यासाठी या गुहेचा वापर होत असे. ही गुहा सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती. गुहा पाहुन धबधब्याच्या वाटेने आम्ही उतरण्यास सुरवात केली. 3 वाजता आम्ही घाटघर गावात पोहचलो. बस स्टॅड वर एक आजोबा भेटले. त्यांनी आमची थोडी विचारपुस केली. थोडस बोलण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला. ते म्हणाले की आता इथुन तुम्ही जुन्नरला जाण्यापेक्षा इथे एक दा-हेघाट म्हणुन आहे. तो घाट डायरेक्ट मुरबाड हायवेला पोहचतो. आम्हाला इथुन जायला फक्त पाऊण तास लागतो. त्यांच्या बोलण्यानी आम्ही पण आकर्शित झालो. म्हटल जास्तीत जास्त एक तास लागेल, बसचा प्रवास ही वाचेल आणि अजुन एक ट्रेक पण होईल. वातारवरणही इतक प्रसन्न होत की चालायला ही खुप मजा येत होती. आम्ही दा-हेघाट उतरण्यास सुरवात केली. १ तास झाला, दिड तास झाला पण हायवे काय आम्हाला लागत नव्हता. शेवटी आपण रस्ता चुकलो आहोत हे लक्षात आल. पण वरून पाहिलेला हायवे आणि हायवेला लागुन असलेला विजेचा टाॅवर आम्हाला अजुनही दिसत होता. त्यामुळे रस्ता जरी चुकलो असलो तरी आमची दिशा बरोबर होती. फरक फक्त एवढाच की आम्हाला पोहचायला वेळ लागणार होता. आम्हाला तर याची सवय होती पण आमच्याबरोबर पहिल्यांदाच आलेला विवक दादा थोडसा थकला होता. तरीपण आम्ही चालत राहिलो. शेवटी आम्हाला हायवे मिळाला. तिथे तो बेअर ग्रील्सला रस्ता भेटल्यावर म्युजिक लागते ना तशी म्युजिक आमच्या कानात गुंगत होती. हायवे तर मिळाला पण पुढे, पुढे कस जाणार. एक पण बस किंवा गाडी तिथे थांबायला तयार नव्हती. थोड्या वेळानी एक ट्रँक्टर येताना दिसला. ट्रँक्टरवालाही तिथे न थांबता आमच्या थोड पुढे जाऊन थांबला. सगळ्यांनी धबाधब ट्रँक्टरच्या ट्राॅलीत उड्या टाकल्या. ट्राॅली मातीची असल्याने आमचा धुळिवंदन बऱ्यापैकी साजरा. त्याने आम्हाला टोकावड्याला येऊन सोडले. तिथे थोडासा नाश्ता केला, हातपाय धुऊन मस्त फ्रेश झालो. तिथुन पण बस मिळणे मुश्किल होते. थोड पुढे जाऊन एका धाब्यात दोन बस थांबल्या होत्या. कंडक्टर काकांकडे थोडीशी विणवणी करत बस मध्ये शिरलो. बस मध्ये गर्दी तर खुप होती पण निदान उभ रहायला तरी जागा हाती. बसमध्ये उभ्या-उभ्या सगळे डुलत होते. सर्वजण खुपच थकलो होतो. त्यात सिटवर बसलेली मंडळी त्यांना चिटकुन उभे होतो म्हणुन आमच्याकडे खुन्नसने पाहत होते. बसमधुन शहाडला उतरलो आणि शहाडवरून आपल्या लोकलने खडवली. एक आगळीवेगळी होळी आमच्या पाचही जणांच्या आयुश्यभर लक्षात राहिल अशी होळी आम्ही साजरी करून आलो होतो. घरी आल्यावर पुन्हा तेच ते का जाता डोंगरावर, काय भेटत तिथे. म्हटल एकदा येऊन तर बघा, पुढच्या वेळी आधीच सीट बुकींग करून ठेवाल.
- शुभम एडेकर
1.jpg2.jpg3.jpg6.jpg4.jpg17353527_1847426695525760_1164030916484746453_n.jpg5.jpg7.jpg9.jpg10.jpg11.jpg12.jpg13.jpg14.jpg15.jpg16.jpg19.jpg17.jpg39.jpg20.jpg37.jpg32.jpg44.jpg50.jpg47.jpg25.jpg46.jpg26.jpg35.jpg22.jpg24.jpg29.jpg41.jpg18.jpg30.jpg31.jpg33.jpg34.jpg21.jpg23.jpg38.jpg43.jpg42.jpg36.jpg28_0.jpg48.jpg40.jpg49.jpg27_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे भारीच रे. मी आयुस्।यात केलेले पहिले व अखेरचे क्लायंबिंग वानरलिंगीच्या सुळक्यावर. त्यालाच खडा पारशी पण म्हणतात ना? मस्त आठवणी जाग्या केल्यास

जीवधनच्या दोन्ही वाटा खासच ..... जीवधनला शिड्या ? काय रे आता त्या वाटेची मजा गेली.

लेख छान, पण थोडा अभ्यास आणि पुर्ण तयारीनिशी गेलात तर सुरक्षितपणे ट्रेकची जास्त मजा घेता येईल.

छान पण फक्त प्र.चि. साठी धोकादायक जागेवर असुरक्षित रित्या उभे राहणे टाळा. दुर्घटना घडायला एक दोन क्षण पुरेसे असतात

छान शुभम!
तूम्ही जो घाट उतरलात तो दारा घाट नव्हे. त्या वाटेला भोरांड्याचे दार असे म्हणतात>>>>>>
हाच विचार आलेला मनात.

रहावत नाहीये पुन्हा प्रतिसाद देतोय....... कारण आवडता मुलुख. नाणेघाट पहावा तो जीवधन वरून, आणि जीवधन पहावा तो ढाकोबाहून

माफ करा... मला गावकऱ्यान त्याचा नाव दरेघाट सांगितलं आणि तिथे एक बोर्ड पण होता दरेघाट चा...

छान पण फक्त प्र.चि. साठी धोकादायक जागेवर असुरक्षित रित्या उभे राहणे टाळा. दुर्घटना घडायला एक दोन क्षण पुरेसे असतात ++१११११११