श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्याशी असणार्या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे. रहस्यमय असा आहे.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
(माहितीचा सोर्स : http://kunkeshwar.com/mahiti.html)
मस्त फोटो रे.
मस्त फोटो रे.
कुणकेश्वर बीचचा फोटो पाहिजे होता.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
अप्रतिम.
अप्रतिम.
देवगड तालुक्यात सासर असल्याने, तिथे गेल्यावर एक ट्रीप असतेच इथे.
छान
छान
खुपच सुंदर फोटो... क्लॅरीटी
खुपच सुंदर फोटो... क्लॅरीटी खुपच छान!
धन्यवाद भावना गोवेकर, जाई,
धन्यवाद भावना गोवेकर, जाई, अन्जू, sulu आणि जिप्सी
जिप्सी... तुझ्या सोबत जाणार तेव्हा घेईन बीचचा फोटो
आमचं पण गाव देवगड तालुक्यातच
आमचं पण गाव देवगड तालुक्यातच आहे म्हणून कुणकेश्वर बद्दल जरा जास्तच प्रेम .
फोटो सगळेच मस्तच आलेत पण बीचचा आणि सुर्यास्ता चा हवा होता .
जिप्सी म्हणतो तास बीच चा फोटो
जिप्सी म्हणतो तास बीच चा फोटो हवा होता ! मी टाकतो इथेच थोडा वेळाने. तसच मंदिराच्या उत्तर बाउल एक रस्ता वार्राती देवगड कडे जातो तिथून तर मंदिराचा परिसर आणि समुद्र हा देखावा पाहत राहावा असा आहे. तो फोटो पण टाकेन थोडा वेळात
कुणकेश्वर चे हे फोटो छानच आले आहेत
छान फोटो. मंदिराबद्दल अजून
छान फोटो. मंदिराबद्दल अजून माहिती मिळेल का? रहस्यमय काय?
अप्रतिम .
अप्रतिम .
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
मी गेले होते इथे २-३ वेळा.
मी गेले होते इथे २-३ वेळा.
पण मला कोकणातली ती निर्मनुष्य देवळं जास्ती आवडतात. हे असं श्रीमंती, जीर्णोद्धारीत देउळ विचित्रच वाटतं. पण जौदे.
फोटो खुपच सुंदर आहेत...
फोटो खुपच सुंदर आहेत...
एक प्रश्न... हे मंदिर सिमेंट कॉक्रीट च आहे ? कि दगडी आहे... दगडी आहे तर मग याला ऑईल पेंट ने का रंगवलय...?
दगडी देऊळ मलापण जास्त भावतं
दगडी देऊळ मलापण जास्त भावतं पण हल्ली कोकणातपण ऑईल पेंट लावतात असं दिसतं बरेचदा. काही लाल चीऱ्यांची पण असतात ती ही आवडतात मला.
आमचं पण गाव देवगड तालुक्यातच
आमचं पण गाव देवगड तालुक्यातच आहे म्हणून कुणकेश्वर बद्दल जरा जास्तच प्रेम .>>>>>>..ममो, जरा उशीरा सांगितलस. डिसेंबरातच आले होते तिकडे. कुणकेश्वर समुद्राचे भरपूर फोटो काढलेत, पण ते बहिणीच्या मोबाईलमध्ये आहेत.
शोभा, अगं हेमाताईंचं गाव
शोभा, अगं हेमाताईंचं गाव देवगड तालूक्यात आहे, हे त्यांनी कित्तीतरी वेळा आधी सांगितलं आहे, त्यांच्या आधीच्या लेखातून तसेच नि. ग. वर पण. सॉरी अवांतर लिहील्याबद्दल.
छान. देवगड मध्ये पाच वर्ष
छान. देवगड मध्ये पाच वर्ष होतो पप्पांच्या बदलीमुळ. वरचेवर कुणकेश्वर ला जाण व्हायच. फार छान किनारा आहे तिथला. मस्त वाटल फोटो बघून.