अमेरिकास्थित (परदेशातील) भारतीय रेस्टॉरंट मधील कामगार व अनुभव

Submitted by हायझेनबर्ग on 21 March, 2017 - 11:58

आज काल जेव्हा कधीही भारतीय रेस्टॉरंट मध्ये जाणं होतं तेव्हा तिथल्या भारतीय वेटर्स/ सर्वर्स ना बघून मला फार विचित्रं वाटतं.
विचित्रं ह्या अर्थाने - साधारणतः कॉलेजात जाण्याच्या वयातली ही मुलं सदा मलूल, दु:खी आणि बिचारी वाटतात. कदाचित ओवरवर्क्ड किंवा अंडरपेड किंवा दोन्ही ? कॉलेज सांभाळून ते हे काम करतात का? पण कुठलंही कॉलेज असं कँपस च्या बाहेर काम अलाऊड करत नाही ना?
देशी आय टी कन्सल्टिंग कंपनी सारखं हॉटेल मॅनेजमेंट किंवा तत्त्सम कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग टाईप काम असते का हे?
पण मग ही मुलं फक्तं भारतीय रेस्टॉरंट मधेच दिसतात.
मागे एका मित्राकडून ऐकलं भारतीय रेस्टॉरंट चे मालक अमेरिकन रेस्टॉरंट सारखी क्रेडिट कार्ड ने पे केलेल्या चेकमधली टीप स्टाफ मध्ये वाटत नाही तेव्हा पासून मी कॅश टीप द्यायला लागलो. तर बर्‍याच वेळा मालक /मॅनेजर च चेक देणे आणि नंतर पेमेंट कलेक्ट करणे कामं करतात. मग कॅश टीप देवूनही ती त्यांना मिळेलच असे नाही.
तसंही भारतीय रेस्टॉरंट्मध्ये फार हसून अगत्याने स्वागत होणे अपेक्षित नसले तरी एकंदर सॅड फिलिंग ही अपेक्षित नसते. अर्थात सगळ्याच भारतीय रेस्टॉरंट मध्ये असेच होते असे नाही पण एक जनरल ऑब्जर्वेशन. भा रे. मधले बहुतांश कस्टमर्सही सर्वर्स च्या प्रति वागणुकीबाबतीत अतिशय निष्काळजी आणि बेपर्वा वाटतात. पुन्हा स्वीपिंग स्टेटमेंट नाही पण एक जनरल ऑब्जर्वेशन.
ह्या मुलांचा टर्न ओवरही बर्‍यापैकी असतो. वर्षभरात नवेचेहरे दिसायला लागतात? पण ते ही तसेच बिचारे दिसतात. मालक्/मॅनेजर्स कडून त्यांना बंधनं घातली जातात म्हणून असेल का? काय होते त्यांचे पुढे कुठे जातात ही मुले? अमेरिकन रेस्टॉरंट मधली मिनिमम वेजवर काम करणारी मंडळी देखील एकदम ऊत्साही/ हसत खेळत असतात पण भा. रे. मध्ये असा अनुभव क्वचितच येतो. मी बरेचदा ह्या मुलांशी संभाषण साधायला बघतो पण ते फार मोकळं बोलत नाहीत, प्रेशर खाली वाटतात.
युके/ ऑस्ट्रेलिया वगैरे मध्ये काय स्थिती आहे कल्पना नाही पण अशीच असावी असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशी आय टी कन्सल्टिंग कंपनी सारखं हॉटेल मॅनेजमेंट किंवा तत्त्सम कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग टाईप काम असते का हे?>>>> नोप. ऑन कँपस नोकर्‍या, फंडिंग नाही मिळालं की हे सोपस्कार करावे लागतात. त्यांना परवानगी नसते आणि त्या करता प्रेशर मध्ये दिसतात ती पोरं.
राहिला मुद्दा कस्टमरांचा, तर रेस्टॉ देसी असल्यामुळे (काही) देसी कस्टमरांना देसीगिरी करायची संधी मिळत असावी आणि त्यामुळे तसे वागत असतील. सहसा ही पोरं कॅश वर काम करतात त्यामुळे अर्थातच अंडरपेड असल्याची शक्यता असते.

एका न्युयोर्कच्या भारतीय रे. मधला वेटर गोव्याचा होता. आम्ही आपापसात मराठी बोलताना बघुन तो आमच्याशी मराठीत बोलत होता. तर तो म्हणाला की तो इल्लिगल आहे. लिगली आलेला पण परत गेला नाही. आता मालकाच्या टर्म्सवर काम करतो. ते हॉटेल एकदम चांगलं होतं, तो हसतमुख ही होता.
एका एडिसन, एन जे मधील वेटरने मला चेक वर टीप लिहिताना थांबवून सांगितले, टीप देणार असाल आणि कॅश असेल तर तशी द्या. अन्यथा आम्हाला मिळत नाही.

वेटर शेव केलेले नसणे, आणि गबाळे असणे ही साउथ इंडियन बे एरिया असोसिएशनची मिनिमन अट आहे.

एशिअन हॉटेलात जे मागितलय तेच मिळणं ही जशी पर्वणी असते तसं भारतीय सर्विस बाबत आहे. एकुणात एशियन आणि भारतीय फुड खावं. डेकॉर आणि सर्विस मिळाली तर बोनस अशा कन्क्लयुजनवर आलोय.
आमच्या कॅनडा बाबत विचरालं नाहीये याचा निषेध !!! तरी लिहितोच. Proud अमेरिकेपेक्षा हॅपीनेस इंडेक्स जास्त (आणि इल्लिगल लोकं कमी) असल्याने की काय माहित नाही पण इथल्यापेक्षा (अगदी काकणभरच) जास्त बरे असतात. पण एकूणच भारतीय पुर्वापार दुर्मुखलेले फार आनन्द न दाखावणारेच. असं ब्लॅन्केट स्टेटमेंट करुन थांबतो. Happy

बरोबर आहे अमित. सहसा जे हसतमुख असतात ते डायरेक इल्लिगली आलेले असतात. त्यांच्या हसतमुख राहण्याचे कारण म्हणजे त्यांच्या करता ही मोठी संधी असते, पैसे कमवून घरी पाठवण्याची. ही पबलिक सहसा फार एज्युकेटेड नसतात.
हाबं नी लिहिलय ते पबलिक वेगळं आहे. ते स्टुडंट विजा वर असतात आणि इतर खर्च, फी भागावी म्हणून काम करतात. हा त्यांचा कायमचा सोर्स नसतो राहणार आणि त्यामुळे घाबरुन असतात कारण पकडले गेले तर पुढची मोठी संधी हुकेल.

यातले बरेचसे अनुभव आम्हालाही आलेले आहेत. गेल्या १२ वर्षात काहीही बदललेले नाहीये.
टिप्स बाबत वाईट अनुभवही आलेले आहेत. जी काही टिप रिसीट वर लिहिलेली आहे त्यापेक्षा जास्त कट केलेली कार्डवर पाहिलीय.
बाथरुम मोस्टली स्वच्छ नसतातच. चवीचे म्हणाल तर यापेक्क्षा मी जास्त चांगले बनवते असे वाटते त्यामुळे आम्ही वर्षातून फारतर १-२ वेळा जातो भरतीय रेस्तॉरंत मधे.
Sad

हाबं नी लिहिलय ते पबलिक वेगळं आहे. ते स्टुडंट विजा वर असतात आणि इतर खर्च, फी भागावी म्हणून काम करतात. हा त्यांचा कायमचा सोर्स नसतो राहणार आणि त्यामुळे घाबरुन असतात कारण पकडले गेले तर पुढची मोठी संधी हुकेल. >> +१. इथे हा प्रकार सर्रास बघितला आहे नि हाबंनी दिलेले कारण ऐकलेले आहे.

ओके.
पण बुवा, इल्लिगल हसतमुखचं कारणं नाही झेपलं. दोघेही इल्लिगलच काम करतायत. एकाचा स्टेट्स लीगल आहे, पण त्याला काही फार अर्थ नाही. कोणालाही पकड्लं तरी संधी हुकेलच ना? स्टुडंटना लोन असेल किंवा असायनमेंट सबमिशन असेल Proud जे इतरांना नसेल.

लोल अमित. अरे त्यांच्या एज्युकेशनच्या मानानी त्यांना फार मोठी संधी मिळालेली असते. अजून एक म्हणजे ही पबलिक जास्त प्रिपेर्ड असतात, सर पे कफन बांधे हुए टाईप. म्हणजे आपण पकडले जाऊ शकतो ह्याची शक्यता खुप मोठी आहे हे त्यांना माहित असतं.
ह्या पबलिक कडे लायसन्स, सोशल सिक्युरिटी कार्ड काही काही नसतं इतके डेंजर असतात ते.

भारतीय रेस्टॉरंटवाले काय नी ग्रोसरी स्टोअर्सवाले काय नी गॅस स्टेशनवाले काय. जिथे जिथे भारतीय छोटे छोटे उद्योग धंदे असतील, तिथे असे पिळवणूकीचेच किस्से ऐकले आहेत. फार कमी उदाहरणं याचा विरूद्ध असतील.
भारतीय विद्यार्थ्यांच्या उदाहरणातली दुसरी बाजू - अमच्या इथल्या युनिवर्सिटीमधल्या कॅफेमधे भारतातून आलेले विद्यार्थी काम करू शकतात. ऑन कँपस जॉब म्हणून परवानगी आहे. युनीवर्सीटीचा संबंध असल्याने पैसे चांगले मिळतात, शिवाय विद्यार्थी काम करता म्हणून लोक सढळ हातानं टीप्स देतात. महिन्याचा खर्च सुटून वर व्यवस्थित पैसे शिल्लक राहतात. मागच्या वर्षी तिथे काम करायला नकार देणारी भारतीय मुलं पाहिली. त्यांचं म्हणणं 'हे असलं वेटरचं हलकं काम करायला अमेरीकेत आलो नाही'. मग भारतातून आईवडिलांकडून पैसे मागवून त्यावर चालवायचं. आईवडिलांची ऐपत असेल, तर ते पाठवतातच. असंही सांगतात - आम्ही पैसे पाठवतो, तू फक्त अभ्यास कर. पैसे पाठवण्याबद्दल नाही पण रेस्टॉरंमधे काम करण्याबाबत कमीपणा का दाखवायचा? 'हलकं काम' कशाच्या जोरावर ठरतं? इथली मिलेनिअर गोर्‍या डॉक्टर आईबापांच्या पोरांना ही कामं कशी हलकी वाटत नाहीत? ती पोरं तर हायस्कूलमधे असल्यापासून 'असली' कामं करून पॉकेटमनी मिळवतात.

वन ऑफ ऊदाहरण आहे म्हणून आधी लिहिले नाही, मागे जर्सी मध्ये एका मुलाशी बोललो होतो तो म्हणाला - हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स करून १ वर्षाच्या विजावर त्याला आणि त्याच्या मित्रांना कोणी तरी आणले . पहिल्याने हयात, हिल्टनला बॅक रूम्स मध्ये कामं केली. विजा संपल्यावर ट्रायवॅली तत्त्सम युनि मध्ये ऑन पेपर अ‍ॅड्मिशन घेवून वर सांगितल्यासारखी भा रे. मध्ये नोकरी करत आहेत. ज्यांना शिफ्ट नाही ते लोक ऊबर चालवतात.
तो म्हणाला की त्यांच्या बहुतांश मित्रांनी घरी लोन काढलेले आहे, घरची परिस्थिती बेताचीच आहे . काही अप्पर मिडलक्लास मधली ही मुलं आहेत पण कुणालाच परत जायचं नाहीये.
चिरा चिरी, बटाटे वडे तळण्यापासून डिशेस आणि सर्विंग अशी काहीही कामं कधीही करावी लागतात. हॉटेल मॅनेजमेंट मधे घेतलेल्या शिक्षणाशी काही संबंध नाही फक्त काही झालं तरी परत जायचं नाही असा चंग बांधून आहेत सगळे म्हणाला.

एम्प्लॉयरबद्दल विचारलं तर म्ह्णणाला पैसे सोडायला त्रास देतात पण खाणं आणि अ‍ॅकॉमडेशन देतात त्यामुळे फार तक्र्रर नाही आणि असली तरी करणार कुणाकडे तक्रार त्यामुळे निमूट कामं करतो.

मी हे गेल्या २०-२५ वर्षांपासून पहातेय. तेंव्हा इंडियन रेस्टॉरंट्स आजच्या इतकी बोकाळलेली नव्हती. वेट स्टाफ किंवा इतर मंडळी स्टूडंट वयाची वाटत नसत. पण कायम दुर्मुखलेले, उदासीन, काही प्रश्न विचारले तर गुळमुळीत उत्तर देणार . पाणी वेळच्या वेळी देणे / हाउ इज एव्हरीथिंग विचारणे असे काही केले तर आकाशच कोसळेल असे अ‍ॅटिट्यूड . कपडे कळकट. नॉन देशी लोकांना सुद्धा चांगली सर्विस देणार नाहीत.

मला वाटते की अशी नोकरी करणारे नाईलाजाने करत असतात कामं. मग ती नाराजी , चिडचिड सतत त्यांच्या कामातून , बॉडी लॅंग्वेजमधून दिसत रहाते .

अंजलीचा कुठे चाललीस तू? ये इकडे परत. Lol :भागो:

मला वाटते की अशी नोकरी करणारे नाईलाजाने करत असतात कामं. मग ती नाराजी , चिडचिड सतत त्यांच्या कामातून , बॉडी लॅंग्वेजमधून दिसत रहाते .>>>> +१ स्टुडंट असतील स्पेशली तर इथे येऊन बरच काही करायची स्वप्नं असतात आणि सरवात महत्वाचं म्हणजे मिनियल लेबरची सवय नसते त्यामुळे सतत डिप्रेस्ड असतात. अ‍ॅटिट्युडचाही प्रश्न असतो. काही पबलिक एकदम अपबिट असतं कारण त्यांना खात्री/कॉन्फिडन्स असतो की ही टेंपररी फेज आहे ते.

आमच्या कॅनडा बाबत विचरालं नाहीये याचा निषेध !!! तरी लिहितोच. >> ती देशांची नावं काँटिनेंटस आहेत असं समज Wink

अमेरिकेपेक्षा हॅपीनेस इंडेक्स जास्त >> नाही आमचा प्रेसिडेंट हँडसम, त्याला सिक्स पॅकही नाहीत म्हणून एवढं घालून पाडून बोलू नका लगेच Proud
करमणूक कोण चांगली करतो ते सांग मग बघू कोण कितीहॅप्पी आहे

हे अजुनही लोकं म्हणतात??>>> हो. विशेषतः FOB विद्यार्थी. हा किस्सा माझ्यासमोरच घडला म्हणून डिटेल्स माहिती झाले.
बुवा, या परत, सगळं आल वेल Wink

नाही आमचा प्रेसिडेंट हँडसम, त्याला सिक्स पॅकही नाहीत म्हणून एवढं घालून पाडून बोलू नका लगेच Proud
करमणूक कोण चांगली करतो ते सांग मग बघू कोण कितीहॅप्पी आहे>>> Lol

धाग्याचा विषय नाही पण तरीही
अंजली 'हलकं काम' हा शब्दं सोडला (त्याचा अर्थ सबजेक्टिव आहे - माझ्यासाठी त्याचा अर्थ कमी प्रतीचं नाही तर पोटेंशिअल वा टॅलेंट ला जस्टिफाय न करणारं) तर मला नाही वाटत असं काम नाकारण्यात काही गैर आहे. आणि फंड्स चा प्रॉब्लेम नसल्यास तर आजिबतंच नाही.
तू अमेरिकन मुलांचं ऊदाहरण दिलंस पण देशी आणि अमेरिकन मुलांमधला महत्त्वाचा फरक म्हणजे देशी मुलांसाठी क्लॉक कायम टिकिंग असतं त्यांचा टेन्यूर ठरलेला असतो त्यामुळे कोर्स साठी भरलेले पैसे अभ्यासातून मॅक्सिमम वसूल करणे , लोकल मुलांच्या ईतके काँपिटिटिव बनणे , पुढे जावून विजा वगैरे कटकटी येणार आहेत गृहित धरून त्या दृष्टीने धडपडत राहणे ह्यासाठी लागणारी टाईम कमिटमेंट आणि एफर्ट्स गृहीत धरले तर टेंपररी पैसे मिळ्वून देणार्‍या वेटिंग जॉब पेक्षा पुढे कामाला ऊपयोगी पडणार्‍या गोष्टी करण्यात भारतीय मुलांचा कल जास्तं असतो.
अगदीच गरज नसेल आ णि वेळ असेल तर मी टेबल वेटिंग करण्याऐवजी रिसर्च असिस्टंटशिप बघेन, एखाद्या स्टुडंट्स क्लब चे काम बघीन, एक्स्ट्रा क्रेडिट घेईन, ड्रायविंग शिकेन ई. ई.

>>> नाही आमचा प्रेसिडेंट हँडसम, त्याला सिक्स पॅकही नाहीत म्हणून एवढं घालून पाडून बोलू नका लगेच
हाब Lol

बाकी यात अ‍ॅड करण्यासारखं मजजवळ काही नाही. आता खरंतर मुंबईतही मॅक्डोनल्ड्समध्ये वगैरे कॉलेजच्या मुलांना आनंदाने काम करताना पाहिलं आहे - तेव्हा आपल्याकडे हे कल्चर येऊ लागलं असावं असं म्हणायला वाव आहे.

दाक्षिणात्य रेस्टॉरन्ट्स मात्र इतकी उदासवाणी आणि कळकट का असतात हे मला उलगडलेलं नाही अजून. त्यांच्या डोळ्याला तशीच रंगसंगती छान वाटत असेल का? कस्टमरला हसून ग्रीट केलं तर लुंगीची घडी विस्कटेल अशी भीती असेल का? कोण जाणे.

भारतात सर्वसाधारण उडूपी स्टाइल रेस्टॉ मधे (ज्याला आपण तेथे "हॉटेल" म्हणतो Happy ) वातावरण तसेच असते - आपल्याकडे एकूणच अनोळखी लोकांकडे बघून हसणे कमीच. तशा सोशल क्लास मधून येथे आलेले, व आल्यावर अशा कामात कसलेही सोशल/सॉफ्ट स्किल ट्रेनिंग न देता उतरलेले लोक त्यामुळे बहुधा तसे वागतात. असे असू शकेल.

हे थोडे जनरलायझेशन होईल, पण सॉफ्टवेअर, बिझिनेस रिलेटेड करीयर्स असतात त्यात आजूबाजूला पाहून सतत अ‍ॅडॅप्ट करणे, नवीन गोष्टी शिकणे हे अंगवळणी पडलेले असते. त्यामुळे अशा सोशल क्लास मधले बरेचसे भारतीय लोक हळुहळू अमेरिकन मॅनरिजम शिकतात. अगदी फॉर्मली नाही - पण आधी आलेले, मोठे भाऊ, काका/मामा - असे काहींना मेण्टर्स असतात काही लोक स्वतःच आपोआप "मुरतात".

वर्किंग क्लास्/ब्लू कॉलर मधे असे होणे अवघड असेल.

मी अशाच एका मुलाशी बोलले होते एकदा एका भा. रे. मध्ये
मराठी बोलणाराच होता तो, म्हणून जरा आपूलकी वाटली. त्याला माझा ईमेल आडी दिला होता , तोंं एम. एस. करत होतातेव्हा,, माझ्या कम्पनी मध्ये इन्टर्न शीप साठी जागा असल्यावर त्याला रेफर करण्यासाठी...आता बहूतेक त्याला जॉब मिळाला असावा चान्गला
खरतर, त्याला असे काम करताना पाहून वाईट वाटले होते....त्याने घरी तो असे काम करतो हे सन्गितले असावे की नाही हा ही प्रश्न पडला होता..असल्यास, त्याच्या आई-वडीलाना काय वाटले असेल्ल....

हाब,
तू हे म्हणावस हे आश्चर्यकारक आहे. मास्टर्ससाठी इथे आलेली मुलं कायमची ही कामं करत नसतात, हे कुणालाही कळत असेलच. रीसर्च असिस्टंटशिप मिळाली तर कशाला असली कामं करतील रादर नोकरी बघायची वेळच येऊ नये, नाही का? फंडींगचा प्रॉबलेम असणार्‍या मुलांनी काय करावं? हलकं काम म्हणून सोडून द्यावं? शिकत असताना कुठलीही नोकरी करत असल्याचे लिहीले रेझ्युमेवर तर फायदा होतोच.

देशी मुलांसाठी क्लॉक कायम टिकिंग असतं त्यांचा टेन्यूर ठरलेला असतो त्यामुळे कोर्स साठी भरलेले पैसे अभ्यासातून मॅक्सिमम वसूल करणे , लोकल मुलांच्या ईतके काँपिटिटिव बनणे , पुढे जावून विजा वगैरे कटकटी येणार आहेत गृहित धरून>>>> म्हणजे काय करणं अपेक्षित आहे? लोकल मुलांच्या इतके काँपिटीटीव्ह तर ते अभ्यासात असतातच पण बाकी काम करणे वगैरे गोष्टींमधे बरेच मागे असतात. रेस्टॉरंटमधे काम केल्यानं विजाचा काय प्रॉब्लेम येतो बुवा.
It is a matter of survival. तिथे काम हलकं म्हणून तक्रारी करून कसं चालेल?
बाकी तू म्हणतोस तर खरंच हे सब्जेक्टीव्ह आहे. पोटेंशिअलचा प्रश्न ग्रॅज्युएट झाल्यावर मिळणार्‍या नोकरीबाबत आला तर तू म्हण्तोस ते बरोबर वाटतं मला. पण 'मी भारतातून आई वडिलांकडून पैसे मागवेन पण इथे रेस्टॉरंट मधे काम करणार नाही' यात कसलं पोटेंशिएअल आहे?

खरतर, त्याला असे काम करताना पाहून वाईट वाटले होते....त्याने घरी तो असे काम करतो हे सन्गितले असावे की नाही हा ही प्रश्न पडला होता..असल्यास, त्याच्या आई-वडीलाना काय वाटले असेल्ल....>>> काही वाटलं अभिमान वाटायला हवा की पोरगं कष्ट करून शिकतंय. तो काय कायमचा हाच जॉब करणार नाहीये. आणि घरी न सांगण्यासारखं तर काहीच नाही त्यात. मिळत असेल ती नोकरी करून, त्यातले अनुभव घेऊन, नेटवर्कींग करून बरंच शिकता येतं. अगदी ती नोकरी रेस्टॉरंट मधली असली तरी. माझ्या लेकीलाही कायम हेच सांगत आले आहे. कुठल्याही कामात कमीपणा नाही.

फा, पण मी अमेरिकन मॅनरिझम्सबद्दल बोलतच नाहीये. गुजराथी किंवा पंजाबी रेस्टॉरन्ट्स, ग्रोसरी शॉप्समध्ये अशिक्षित बायकासुद्धा कॉन्फिडन्टली आणि चिअरफुली कस्टमर्स हाताळत असतात. प्रसन्न डेकोर ठेवतात. मग यांनाच काय प्रॉब्लेम आहे?

असो, हे अवांतर झालं. मूळ धागा विद्यार्थ्यांबद्दलचा आहे. Happy

घराचं लोन फिटलं आणि पोरं कालेजला गेली की मला, बस ड्रायव्हर किंवा स्ट्रीट कार (केबल कार, ट्रेन) ड्रायव्हर आणि पार्ट टाईम कॅश काउंटर (ते जॉब ऑटोमेशन मध्ये गेले नसतील तर करायची फार इच्छा आहे.

अंजली - कमी प्रतीचं / ऊच्चं प्रतीचं काम असं काही नसतं हे तर सत्यं आहेच त्याबाबत आजिबात वाद नाही.

माझा मुद्दा Best use of my limited time असा होता. तू जशी पोटेंशिअल आणि नीड ह्यामध्ये गल्लत केलीस तशीच एक्स्पिरियन्स आणि स्कील.
समजा मला रोजच्या खर्चासाठी पैशांची गरज नाही किंवा काटकसर कराय्चची माझी तयारी आहे तर मी टेबल वेटिंग करण्याऐवजी रिसर्च असिस्टंटशिप , एखाद्या स्टुडंट्स क्लब चे काम , एक्स्ट्रा क्रेडिट , किंवा कोर्स संपल्यानंतर नोकरीसाठी हमखास करावेच लागणार असे ड्रायविंग शिकेन, नेटवर्क मधून दुसर्‍या युनि तल्या मित्रांना भेट देईन किंवा माझ्या फील्ड मधल्या सिनियर लिकांचे कॉन्फरन्स, टेनिंग प्रोग्राम करेन. माझ्या फोकस फक्त माझा कोर्स आणि पुढचा जॉब आहे.
मला डे टू डे सर्वायवल साठी पैसे लागणार असतील आणि ते घरून मिळण्याची किंवा मागण्याची शक्यता नसल्यास मी नक्कीच एखादे लीगल ईन्कम प्रोवाईडिंग काम करेन. मग ते रेस्टॉरेंट असो, लायब्ररीप, युनि ची शटल चालवणे, युनि प्रोग्राम्स चे प्रमोशन करणे असे काहीही.
मी भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार करता सध्याची गरज मागे सारुन माझं पोटेंशिअल/काँपिटिटिवनेस वाढवायला वेळ दिला तर त्याच चुकीच काही मला तरी वाटत नाही.

गरज असतांमीही मी 'हलक्या प्रतीचं' म्हणत ही कामं टाळत असेल आणि वरती लिहिल्यापैकी करिअर फोक्स्ड अ‍ॅक्टिविटीही करत नसेल तर तू म्हणू शकतेस की मी एक तर सिरियस नाही किंवा मच्युअर नाही. युनि. मधल्या रेस्टॉरंट मध्ये काम केल्याने माझे लोकांबद्दलची समज, सेल्फ एस्टीम, कुठलेही काम करण्याची तयारी , थोडे डायवर्सिफिकेशन नक्कीच वाढेल पण एखाद्या फोकस्ड (रेस्टॉ मध्ये काम करणारे फोक्स्ड नसतात असे आजिबातंच म्हणायचे नाहीये) मुलाला त्या कामातून जर काही वॅल्यू अ‍ॅडिशन दिसत नसेल तर आपण त्याला अ‍ॅटिट्य्यूड आहे म्हणत जज करू शकत नाही किंवा करू नये ह्या मताचा मी आहे. रेस्टॉ. मधल्या कामातून मला एक्स्पिरियन्स मिळेल पण स्कील मिळणार नाही.

घराचं लोन फिटलं आणि पोरं कालेजला गेली की मला, बस ड्रायव्हर किंवा स्ट्रीट कार (केबल कार, ट्रेन) ड्रायव्हर आणि पार्ट टाईम कॅश काउंटर (ते जॉब ऑटोमेशन मध्ये गेले नसतील तर करायची फार इच्छा आहे. >> अमितंव लोकांच्या चेहर्‍याकडे टक लावून बघणे (खासकरून.... जाऊ दे) हा एअरपोर्ट वरच्या सिक्यूरिटी क्लिअरन्स वरचा जॉब मी माझ्यासाठी कधीच फिक्स केला आहे.

हाब, तुझ्या म्हणाण्यात तथ्य आहे पण ते परत त्या वय्क्तीच्या मचुअरिटी, अंजली म्हणत आहे तसं आर्थिक परिस्थिती ह्यावर अवलंबून आहे. डोक्यावर फियांच्या कर्जाचा डोंगर चढत असताना, तू म्हणत आहेस तसं फिल्ड मधल्या गोष्टी तितक्या पटकन अवेलेबल नसताना तरी त्या शोधत राहाणे हे फार अवघड काम आहे. तसा फोकस असायला खुप जास्त मचुअरिटी लागते. मचुअरिटी पेक्षा हा एक आत्मविश्वासच म्हणावा लागेल जो अननुभवी मुलांमध्ये असण्याची फार कमी शक्यता आहे. पुढे एकदा नोकरी मिळाली की हा आत्मविश्वास येतो.
आजच्या घटकेचा मी आणि १५ वर्षांपुर्वीचा मी ह्यात खुप फरक आहे. I am way too resourceful and calm in my thinking now than I was back then. And again, I am not saying there no kids who can pull that off. I am sure some kids can but I am only talking about what majority of the kids go through.

माझा मुद्दा Best use of my limited time असा होता. >>> आणि माझा मुद्दा कामाला हलकं मानणं हा आहे.
Best use of my limited time यामधे मास्टर्स करत असलेली पोरं प्रोफेसरबरोबर चांगला रॅपो, पुढचं कोर्सवर्क, इंटर्नशिप, असिस्टंटशिप वगैरे करत असतात, करावं याबद्दल माझं ही तेच मत आहे. गरज नाही तर नोकरी करू नका असं मीही म्हणेन. कारण नोकरीची गरज असलेली बरीच मुलं आहेत. पण भारतातून आल्या आल्या कोणता प्रोफेसर असिस्टंटशिप देणार आहे? ती मिळेपर्यंत वाट पहात राहिलात तर आहे ते जॉब्ज हातातून जातील. तसंच नीड असलेल्या मुलांनाही पोटेंशिएल असतंच की. नीड आणि पोटेशिंएल्मधे माझी अजिबात गल्लत झालेली नाही, ती झाली आहे असं तुला वाटतंय. कारण,
<<<<समजा मला रोजच्या खर्चासाठी पैशांची गरज नाही किंवा काटकसर कराय्चची माझी तयारी आहे तर मी टेबल वेटिंग करण्याऐवजी रिसर्च असिस्टंटशिप , एखाद्या स्टुडंट्स क्लब चे काम , एक्स्ट्रा क्रेडिट , किंवा कोर्स संपल्यानंतर नोकरीसाठी हमखास करावेच लागणार असे ड्रायविंग शिकेन, नेटवर्क मधून दुसर्‍या युनि तल्या मित्रांना भेट देईन किंवा माझ्या फील्ड मधल्या सिनियर लिकांचे कॉन्फरन्स, टेनिंग प्रोग्राम करेन. माझ्या फोकस फक्त माझा कोर्स आणि पुढचा जॉब आहे.>>>> यामधे रोजच्या खर्चासाठी पैशांची गरज नाही हे तू गृहीत धरतोयस. मी रोजचे खर्च भागवण्यासाठी वेळ पडल्यास रेस्टॉरंटमधे काम करा, त्यात कमीपणा नाही असं म्हणते आहे. इथे मी कुणालाच जज करत नाहीये, (तू मात्र माझी गल्लत झाली असं म्हणूण मला जज केलंस Wink ..just kidding) भारतातून आलेले विद्यार्थी आजूबाजूला आहेत, ते बघून माझी निरीक्षणं नोंदवते आहे. गंमत म्हणजे युनीवर्सीटीमधल्या कॅफेत काम करताना अगदी डीन पासून प्रोफेसर्स, बाकी स्टुडंट कौन्सिलची पोरं, HOD वगैरेंशी रोजचा संबंध येतो. त्यातून मुलांना प्रोजेक्टस, रेकमेंडेशन्स, रेफरंन्स मिळू शकतात हा अनुभव आहे. आता याची 'व्हॅल्यू अ‍ॅडीशन' कशी ठरवणार?
एखाद्याला तू म्हणतोस त्या गोष्टी किंवा त्यातला काही गोष्टी करून, शिवाय जॉब करून बर्‍यापैकी ग्रेड मिळवता येतात. ड्रायव्हिंग वीकेंडला शिकू शकतो, एक्स्ट्रा क्रेडीटसाठी कामाचे तास तेव्हढ्या पुरते कमी करता येतात. रीसर्च असिस्टंटशिप मिळाली तर मग कुठे नोकरी करायची गरजच उरत नाही. प्रोफेसर इतकं काम लावून देतो की स्वतःचा अभ्यास करायला वेळ कमी पडतो.
मुद्दा असा आहे, सर्व्हाइव्ह होण्यासाठी कष्ट करायलामागे पुढे बघू नका, कुठलं काम लहान मोठं नाही तसंच त्याची व्हॅल्यू अ‍ॅडिशन काळ ठरवतो.

असो. तर मी आता रोमात जाते परत. नाहीतर फार वेळ जातो.

कारणं काहीही असो, जे काम आहे (जॉब आहे) ते नेटकेपणाने केलच पाहिजे असं मला वाटतं. हे केवळ वेट्रेसिंग बद्दलच नाही, एकंदरीतच माझं मत आहे. जी तुमची रोजी-रोटी आहे, तिथे 'जे आवश्यक आहे' ते सगळं व्यवस्थित करायला हवं.

वर मांडलेल्या चव, स्वछता (रेस्टॉरंट, रेस्टरूम्स), डेकॉर, हसतमुख - प्रसन्न चेहरा, एकंदरीतच कस्टमर सर्व्हीस अशा बर्याच मुद्द्यांशी सहमत आहे.

भारतीय रेस्टॉरंटवाले, नी ग्रोसरी स्टोअर्सवाले, गॅस स्टेशनवाले काय. जिथे जिथे भारतीय छोटे छोटे उद्योग धंदे असतील, तिथे असे पिळवणूक असतेच. बरं वरून परत मालकाचे तुमच्यावर उपकार केले हे भाव असतातच. मी गेली १०-१२ वर्ष बघतोय ... परंतु हि लोक पण लोचटासारखी तिथेच राहतात

अंजली - कमी प्रतीचं / ऊच्चं प्रतीचं काम असं काही नसतं हे तर सत्यं आहेच त्याबाबत आजिबात वाद नाही. << अस असल तरी स्टुडंट व्हिसा वर कॅम्पस बाहेर काम करण लिहली अलाउडच नाहीयेना?

ओके अंजली. शेवटी मामला ज्याच्या त्याच्या प्रायोरिटीज वर येवून थांबतो असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. प्रत्येकाचे ऑब्जेक्टिव्ज वेगळे असू शकतात.

Pages