व्हाट्स अप असो किंवा फेसबुक ....
कुठल्याही सोशल मीडियावर जेवहा वापरकर्ता काही अपलोड करतो,
तेव्हा ते पोस्टच्या टायमिंगसहित इतरांना दिसत असते.
हम्म ! बरं मग ?
त्यात काय एवढे विशेष.
अगदी बरोबर.
हि फक्त तंत्रज्ञानाने केलेली सोय असते.
पण हाच मुद्दा प्रश्नचिन्ह बनतो जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी लेट नाईट म्हणजे,
रात्री १२ नंतर Online राहत असेल तर..... आला कां प्रश्न !
ती एवढया रात्री online का राहते ?...........
मग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का ?......
हिच्या घरामधे काही problem असेल का?......
तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?......
की हिचं नवऱ्याशी जमतंच नसेल,
कि आणखी काही problem असतील.....
बस्स ... प्रश्न आणि प्रश्नच ...
एखादी स्त्री जर प्रेम कविता लिहित असेल तर .......
अरे बापरे ....
तिचं कोणावर प्रेम आहे का ? .......
तिला कोणी आवडतो का ? .......
किंवा तिचा कोणी प्रियकर आहे का?.....
असेल तर लग्नाआधीचा आहे कि लग्नानंतरचा ?......
पुन्हा एकदा फक्त प्रश्न आणि प्रश्नच !!
एखादी स्त्री जर फेसबुकवर आपले विविध फोटो टाकत असेल तर ........
ही असे स्वतःचे फोट टाकत का असते ?
हिला काय दाखवायचं असतं ?......
हिचं हे वय आहे का ?.....
ही अशी का वागते ?......
वगैरे वगैरे ....
प्रश्नांची न संपणारी मालिकाच जणू.
पण ह्या अश्या बऱ्याच लोकांकडून एक विचार का नाही केला जात ?
जरी ती एक स्त्री असली तरी ती सुद्धा माणूसच आहे.....
तिला तिच्या मर्जी प्रमाणे जगण्याचा संपुर्ण अधिकार आहे......
तिला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या त्या गोष्टी ती करते .........
आणि तिच्या अश्या वागण्यामागे काही कारण असतचं असं नाही ........
लास्ट सीन लपवण्याचे मार्ग तर निश्चितच आहेत व्हाटस अपसाठी ...
पण नक्की कसल्या भीतीने ह्याची गरज लागते.
काय मग ? आला का पुन्हा प्रश्न ?
--------------------------------------
वरील लिखाण फेसबुकवर वाचनात आले आणि हे असे प्रश्न का बरे उमटतात अजूनही आजच्या समाजात म्हणून खरेच खुप वाईटसुद्धा वाटले. आणि जर हे प्रश्न खरोखर जास्त जणांच्या मनात येत असतील तर आपण नक्की कुठल्या दिशेने प्रगती केली !
कारण माझ्या मते ही वैचारिक अधोगतीच झाली की...
तुमच्या सर्वांचे ह्या अनुषंगाने मत विचारावेसे वाटले .
.
फेसबुक वर हे वाचले आहे.
फेसबुक वर हे वाचले आहे. ज्या वॉलवर वाचले तिथेही ओरिजिनल होते कि नाही कळाले नाही.
स्त्री स्वातंत्र्य वगैरे ठीकच आहे. पण स्त्री असो वा पुरूष, तरूण असो वा वृद्ध, विवाहीत अथवा अविवाहीत, यातील कुणीही कारणाशिवाय रात्र रात्र उशिरा नेटवर संचार करणे आणि त्याचे समर्थन करण्यासाठी कुठलीतरी ढाल घेऊन फिरणे माझ्या दृष्टीने चुकीचे आहे.
हो सपनाजी अगदी बरोबर
हो सपनाजी अगदी बरोबर
मीसुद्धा वाचले पण मलाही खरेच प्रश्न पडला म्हणून इथे मांडला कि का वागत असतील हे लोक असे
तुम्हाला हे सगळे प्रश्न पडलेत
तुम्हाला हे सगळे प्रश्न पडलेत?? नेटवर कधी, कस, केव्हा किती वेळ, काय करत, कोणत्या साईट्/अॅप वर राहायच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
अदितीजी हे सर्व प्रश्न मला
अदितीजी हे सर्व प्रश्न मला नाही पडले कृपया पुन्हा नीट वाचला तर लक्षात येईल मला काय म्हणायचे आहे ते
हे असे प्रश्न उद्भवतातच का ? हा माझा प्रश्न आहे आणि हे सर्व वरील प्रश्न विचारणाऱ्या लोकांची का अशी मानसिकता बनलीय हा मुख्य प्रश्न मला मांडवासा वाटला म्हणून हा प्रयास ..
>>तुम्हाला हे सगळे प्रश्न
>>तुम्हाला हे सगळे प्रश्न पडलेत?? नेटवर कधी, कस, केव्हा किती वेळ, काय करत, कोणत्या साईट्/अॅप वर राहायच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.>> सहमत. बाकीच्यांनी दुसर्यांच्या झोपेची उठाठेव का करावी?
ती एवढया रात्री online का
ती एवढया रात्री online का राहते ?........... तेवाच वेळ असते
ग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का ?......नाहा
हिच्या घरामधे काही problem असेल का?......ना
तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?......ना
की हिचं नवऱ्याशी जमतंच नसेल ---- ना
कि आणखी काही problem असतील.....ना
.
Dont indulge in poetry writing
Do not put photos on f b
{चला तर मग सोडवूया हे सारे
{चला तर मग सोडवूया हे सारे प्रश्न आपल्या चर्चेतून ...
अर्थात तुम्हां सर्वांच्या प्रतिसादावरून}
छान! एकदम मस्तच!! इथे चर्चा करुन आणि प्रतिसाद देउन सारे प्रश्न सोडवले की नक्की कळवा.
अंबज्ञ, मग तुम्ही सपना
अंबज्ञ, मग तुम्ही सपना यांच्या >>स्त्री स्वातंत्र्य वगैरे ठीकच आहे. पण स्त्री असो वा पुरूष, तरूण असो वा वृद्ध, विवाहीत अथवा अविवाहीत, यातील कुणीही कारणाशिवाय रात्र रात्र उशिरा नेटवर संचार करणे आणि त्याचे समर्थन करण्यासाठी कुठलीतरी ढाल घेऊन फिरणे माझ्या दृष्टीने चुकीचे आहे.>> पोस्टला चुकून अनुमोदन दिलं आहेत का?
@ व्यत्यय आपण इकडे जे
@ व्यत्यय आपण इकडे जे प्रतिसाद वाचणार त्यावरून तर नक्कीच काही फरक पडेल वरील प्रमाणे प्रश्न मांडणाऱ्या मंडळीच्या मनात ही एकच भाबड़ी अपेक्षा
शेवटी हे सोशल मीडिया आहे
इकडे प्रत्येकाच्या प्रतिसादा अनुसार त्याची इमेज प्रिंट होत असते ह्या मायाजालावर
सायोजी ते पोस्टला नाही ओ
सायोजी ते पोस्टला नाही ओ दिलाय अनुमोदन
ही पोस्ट फेसबुकवर वाचली आहे ऑलरेडी ह्यासाठी होते ते वाक्य.
तुमचीही काही चूक नाही म्हणा.कदाचित मी मुद्दा नीट मांडला नसेल म्हणून असे घडले बहुतेक
कोणी कधी काय करायचं याचं
कोणी कधी काय करायचं याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला हवंच. टोटली सहमत.

पण तुम्ही म्हणताय असा विचार जो करतो त्याने कसा विचार करायचा हे ही आता तुम्हीच सांगणार का? त्याला काय विचार करायचा याचं स्वातंत्र्य द्या की.
ते प्लेजरीझमला अनुमोदन आहे.
हेही बरोबर आहेच की अमित.
हेही बरोबर आहेच की अमित.
विचार करायचा स्वातंत्र्य अगदी प्रत्येकाला आहेच पण सामुदायिक विचारांची टक्केवारी जर निगेटिव साइडला झुकत असेल तर त्याचा पुढे सर्वांनाच धोका नाही का ?
>>शेवटी हे सोशल मीडिया आहे
>>शेवटी हे सोशल मीडिया आहे
>>इकडे प्रत्येकाच्या प्रतिसादा अनुसार त्याची इमेज प्रिंट होत असते ह्या मायाजालावर
याचा ऑनलाईन चर्चा करून सारे प्रश्न सोडवण्याशी काय संबंध?
चला तर मग सोडवूया हे सारे
चला तर मग सोडवूया हे सारे प्रश्न आपल्या चर्चेतून ...>>>म्हणजे नक्की काय करायचे? रात्री अंतरजालावर हजर असल्याची कारणे द्यायची? का कोणाला विचारायची आहेत
नुसत्या चौकश्या!!!
घ्या एक किस्सा.....
एकदा एक-दोन विनोदांवर फिदीफिदी हसल्याचा प्रतिसाद दिला.
तर पुढे हा प्रश्न : एव्हढ्या रात्री तू जागी? online कशी काय?
म्हटले : मुतायला उठले होते, आता लगेच झोप येईना.
Ok
अदितीजी हे सर्व प्रश्न मला
अदितीजी हे सर्व प्रश्न मला नाही पडले कृपया पुन्हा नीट वाचला तर लक्षात येईल मला काय म्हणायचे आहे ते Happy << अहो २/३ पॅरा वरुनच पुढे वाचावस वाटल नाही.
हे असे प्रश्न उद्भवतातच का ? हा माझा प्रश्न आहे आणि हे सर्व वरील प्रश्न विचारणाऱ्या लोकांची का अशी मानसिकता बनलीय हा मुख्य प्रश्न मला मांडवासा वाटला म्हणून हा प्रयास .. << हाच तुमचा प्रश्ण असता तर तुम्ही जिथे हे लिहीले आहे तिथेच सोडवायचा प्रयत्न केला अस्ता. तुम्ही इथे परत लिहीला आहे म्हणजे तुन्हाला दोन्ही बाजुंनी चर्चा हवीये, राईट?
>>पण सामुदायिक विचारांची
>>पण सामुदायिक विचारांची टक्केवारी जर निगेटिव साइडला झुकत असेल तर त्याचा पुढे सर्वांनाच धोका नाही का ?
ख्खीक, हे वाक्य वाचून एकदम मोदीजी आणि ट्रम्पजी आठवले.
अहो जेंव्हा भारतात रात्रीचे
अहो जेंव्हा भारतात रात्रीचे बारा वाजतात तेंव्हा न्यू यॉर्क मधे दुपारचे अडीच नि कॅलिफोर्नियात सकाळचे १०:३०.
आणि जेंव्हा न्यू यॉर्क मधे रात्रीचे बारा वा़जतात तेंव्हा कॅलिफोर्नियात रात्रीचे नऊ वाजले असतात - नऊ वाजता काही लिहीले तर चालेल ना? नि भारतात तर तेंव्हा सकाळचे ९:३०! मग काय हरकत आहे?
(चू. भू. दे. घे., मुद्दा असा की एका ठिकाणी रात्र असली तरी बर्याच ठिकाणी रात्र नसते )
आणि ज्यांचे लिहिलेले तुम्ही वाचता ते जर तुमच्या ओळखीचे असतील, नि सत्राशे साठ प्रश्न मनात येत असतील तर त्यांना विचारा , काय झाले? कदाचित पार्टी करून घरी येत असतील.
एव्हढे काय मनावर घेता हो वेळेचं. आजकाल २४/७ उघडे असलेले कॉल सेंटर असतात, जर कुणि कॉल केला नसेल म्हणून त्यातल्याच एखाद्या मुलीने कंटाळून काही लिहीले तर काय बिघडले?
तर असल्या प्रश्नांपेक्षा वेगळे विचार करा - मध्यपूर्वेतील परिस्थिती कशी सुधारता येईल, कॅन्सर इ. वाईट रोग कसे बरे करता येतील? उद्या काय कामे करायची आहेत, ती कशी होतील, वगैरे बरेच प्रश्न विचार करण्याजोगे आहेत.
घ्या एक किस्सा.....
घ्या एक किस्सा.....
एकदा एक-दोन विनोदांवर फिदीफिदी हसल्याचा प्रतिसाद दिला.
तर पुढे हा प्रश्न : एव्हढ्या रात्री तू जागी? online कशी काय?
म्हटले : मुतायला उठले होते, आता लगेच झोप येईना.
Ok
मला तर व्हॉट अपस न्युझन्स
मला तर व्हॉट अपस न्युझन्स वाटतो.
नातेवाईक आपापले राजकारण खेळत प्रत्येक वेगळे ग्रूप्स उघडणार आणि अॅड करणार, नाही झाले तरी त्रास. फालतु भांडण आणि चर्चांना , हो म्हणा , लाईक करा. वैताग नुसता.
नको तेवढे जोक, कळीचे प्रश्ण विचारणार( त्या अबक काकांनी , दुसरं घर घेतले कळलं ?) आणि ताबोडतोब उत्तर मागणार.
अरे आम्ही झोपेत असू, संडासात / बाथरूमात असोइ, तुमच्यासारखा फोन घेवून फिरत नसतो.
म्हणून सरळ मी लास्ट सीन - नोबडी करते.
२४/७ उघडे असलेले कॉल सेंटर
२४/७ उघडे असलेले कॉल सेंटर असतात, जर कुणि कॉल केला नसेल म्हणून त्यातल्याच एखाद्या मुलीने कंटाळून काही लिहीले तर काय बिघडले?>>>> absolutely correct नन्द्याजी ....अगदी ह्या आणि अश्याच समर्पक उत्तरांची इकडे अपेक्षा होती केव्हापासून. ह्या उत्तराला अगदी मनापासून अनुमोदन. विस्तृत आणि विविध अंगाने विचारपूर्वक प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद
सहमत आहे झंपीजी
सहमत आहे झंपीजी
बऱ्याचदा हे घडते ह्याचा अनुभव नक्कीच आपल्यापैकीसुध्दा कित्येकांना आलेला असणार.
ह्यातून अलगद मार्ग शेवटी तुम्ही वापरलेलाच उरतो कारण म्हणतात ना - "तुटे वाद संवाद तो हितकारी"
अंबद्ण्य तुम्हाला बरे किंवा
अंबद्ण्य तुम्हाला बरे किंवा खरे स्वतःचे मत नाही का?
मी माझ्या मुलांना, घरातल्या कुणालाच विनाकारण रोज रोज रात्री उशिरा नेटवर, घराबाहेर राहू देणार नाही. उगीच आजार बोलवा! तुम्ही वेगळे वागाल का यापेक्षा?
सपनाजी मी माझे मत वरच्या
पण प्रश्न माझ्या वैयक्तिक मताचा उद्भवतच नाहिये न इकडे
अंबज्ञ, मला तर तुमचा एक
अंबज्ञ, मला तर तुमचा एक प्रतिसाद चक्क सकाळी ०५:२८ चा दिसतोय.

साती,
साती,
त्यांनी कोणत्या प्रमाणवेळेप्रमाणे हे कुठे लिहिलंय ? ते जगाच्या कोणत्या भागात आहेत त्या प्रमाणे १२ ते ६ बदलेल ना ?
सातीताई आज मोबाइलला लवकर जाग
सातीताई आज मोबाइलला लवकर जाग आली
एक्चुअली आजचा दिवस स्पेशल आहे
एक्चुअली आजचा दिवस स्पेशल आहे न इकडे
रंगपंचमी...
त्यामुळे सगळी दुकाने नेहमीपेक्षा लवकर उघडणार....मिठाईवाले तर 5पासून सुरू झालेत ....अगदी सर्व दुपारच्या शाळा सुध्दा सकाळी भरल्यात आणि 12च्या आत सुटणार
Celebration will start after lunch till evening.
दुपार ते संध्याकाळ बाजार बंद....मग परत संध्याकाळी आपआपली कामे दुकाने वगैरे सुरु
छान विषय. माझ्या काळजाला हात
छान विषय. माझ्या काळजाला हात घातलात.
फक्त एक गोष्ट खटकली,
या टेक्नॉलॉजीने नटलेल्या तथाकथित स्त्रीपुरुष समानतेच्या जगात लिंगभेद या विषयालाही चुकला नाही. ही समस्या स्त्रीपुरुष दोघांची आहे. मी स्वत:ही भोगतोय.
रात्री जागणारी आणि त्यावेळी सोशलसाईटवर बागडणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष तिला हिणवले जातेच. मलाही कित्येकदा घुबड, वटवाघूळ, आऊल, चमगादड या नावांनी चिडवले जाते. ते देखील एखाद्याला डुक्कर, कुत्रा म्हणावे अश्या टोनमध्ये उच्चारले जाते.
रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे, त्याने स्वास्थ चांगले राहते. असे फुकटचे सल्ले दिले जातात. आणि हे आरोग्यदायी सल्ले देणारे कोण असतात, तर जे स्वत: दिवसभर दारू सिगारेटच्या नशेत चूर असतात. किती अपमानास्पद वाटते अश्यांनी आपल्याला काही सुनावने..
हे सर्व परवडले पण चारीत्र्यावर शिंपडलेले शिंतोडे असह्य होतात. आपल्या भारतीय संस्कृतीत रात्र स्वत: तर बदनाम गोष्ट आहेच पण तिच्या सानिध्यात येणारी प्रत्येक व्यक्तीही बदनाम होते. रात्रीच्या अंधारात कृष्णकृत्येच केली जातात या समजातून आपला समाज अजून बाहेर यायचा आहे. कित्येक लोकांनी माझ्यासाठी केवळ या कारणासाठी बोलणे टाकले की मी रात्री उशीरापर्यंत ऑनलाईन दिसतो म्हणजे मी नक्कीच त्या वेळी अश्लील चित्रफिती बघत असणार..
चला जरी बघतही असलो, तरी रोज?? अरे आरोप करताना जीभा झडत कश्या नाही तुमच्या? जो मुलगा शाहरूखचा फोटो डिपीला लावतो, तो ईतका आंबटशौकीन असू शकतो असे वाटतेच कसे तुम्हाला? पण हा सर्व त्या रात्रीच्या वेळेचा महिमा. रात्री एकनंतर ज्याच्या नावासमोर हिरवा ठिपका दिसतो तो कलंक म्हणूनच बघितला जातो ..
अहो अंबज्ञ
अहो अंबज्ञ
तुम्ही पुन्हा बदललात. तुम्ही जो मजकूर आणलाय तो ही व्हायरल मेसेज आहे. सहमत आहे म्हटल्यावर कुणी फटकारले की लगेच उडी मारताय, पुन्हा मी विचारले की रिव्हर्स उडी मारता. यात तुमचे मत नेमके काय आहे हे काही समजेना. आपल्याला जे आचरणात येते तेच मत मांडावे असे माझे मत आहे. बरे दिसते ते लिहायचे की खरे लिहायचे हे एकदा ठरवा बै तुम्ही !
रात्रीच्या अंधारात
रात्रीच्या अंधारात कृष्णकृत्येच केली जातात या समजातून आपला समाज अजून बाहेर यायचा आहे.>>>>> अतिशय मार्मिक टिप्पणी केलीत ऋन्मेश ....खुप आभारी आहे. अगदी आम्हा मुलांच्याही लेट नाईट ऑनलाइन बद्दलच्या कैफियती अलगद मांडल्याबद्दल.
रात्री एकनंतर ज्याच्या नावासमोर हिरवा ठिपका दिसतो तो कलंक म्हणूनच बघितला जातो . >>>>>
ह्या गोष्टींना मुलंसुद्धा अपवाद नाहीत हेच खरेय
आणि हे तर अगदी तंतोतंत अनुभवले आहे काही वर्षापुर्वी
Pages