भडंग

Submitted by plooma on 3 March, 2017 - 04:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चुरमुरे , शेंगदाणे ,लसुण ,कढीलिंब,जिरे, लाल तिखट ,हळद ,तेल ,मिठ अंदाजे .फरसाण ऐच्छिक

क्रमवार पाककृती: 

भांड्यात तेल तापवून त्यात जिरे ,मोहरी , कढीलिंब ,ठेचलेला लसुण , शेंगदाणे घालावे .शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतावे .नंतर हळद, लाल तिखट, मिठ घालून थोडे परतुन लगेच चुरमुरे घालावे व चांगले परतुन गॕस बंद करावा .भडंग तयार .
आवडत असल्यास वरुन फरसाण घालावा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढे .
माहितीचा स्रोत: 
माझी आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

आता, या विभागात हलवले ते छान झाले.

तैमूर.. हा धडा मी वाईट रितीने शिकलो. एकदा कोल्हापूरला भडंगचा एकदम बकाणा भरला आणि वाईट ठसका लागला. पाणी पिऊनही थांबेना.
मग कळले कि कांदा घालून खाल्ले तर असा त्रास नाही व्हायचा.

मस्तच..
भडंग मधले मुरमुरे/चुरमुरे गोल गोल असतात ना? आमच्याइकडे नाही मिळत गोल गोल मुरमुरे..लांबुळके असतात..

भडंग आणि ते भांडे - दोन्ही पाहून लहानपणची आठवण जागी झाली. माझ्या काकूकडे नेहेमी भडंग केलेली असे. जर्मनचे भांडे Happy

टीना माझ्या माहितीप्रमाणे लांब ते चुरमुरे आणि छोटे जाडसर ते भडंग.
भडंग मिळतात की नाही माहित नाही पण चुरमुर्यांचा करता येईल.