माझं असणं...

Submitted by मिता on 5 March, 2017 - 11:57

मी.. मी कोण? ...माझं असणंच मला उमजत नाही ... येणारा दिवस का येतो , काहीही हेतू नसताना ... अन पुन्हा मावळून का तयारी करतो पुन्हा येण्याची , जेव्हा त्याच्या येण्याने काहीही विलक्षण असं घडणार नसत ... मग का करतो तो एवढी उठाठेव .. काही प्रयोजन असेल का त्याच या मागे , जे मला कळत नाही ..

दिवसामागून दिवस भुर्रकन उडून चाललेत ... मी हि त्याच्या सोबत एक-एक पाऊल पुढं टाकत आहे.. पण या सगळ्यातून मला काय सध्या होत आहे , किंबहुना काय साध्य होणार आहे ?...
माणसं म्हणतात जीवन सुंदर आहे .. प्रत्येक क्षण हा अनमोल आहे ... आहे त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या , शायद कल हो ना हो ..

पण म्हणायला तर सगळंच सोपं असत , नाही का ? दिवसाची सुरुवात झाल्यावर आज मी कस वागू म्हणजे मी वाईट आहे असं लोकांना वाटणार नाही याचा विचार करत दिवस सुरु होतो , कारण स्वतः वरचा विश्वास कधीच मेलेला असतो ...अन मग हे सगळं वागताना झाली एखादी चूक, तर खरंच खुप मोठी चूक करतो का हो ?.. समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून नेहमी आपले शब्द आवरायचे.. अन माणसं जोडल्याच समाधान चेहऱ्यावर मिरवायचं ... मी छान आहे अशी उगाच एक प्रतिमा तयारी करण्याच्या मग दिवस रात्र झटायचं .. पण कधी कधी प्रयत्न फसतात .. अन मग सगळंच पारखं.. आनंदही अन माझी माणसंही... अशा वेळी उगवणारा दिवस हा आणखी कोणतं संकट घेऊन येईल, अजून किती विशेषण मिळतील याची हुरहूर मनाला लावतो ... मावळणारा दिवस , आज काहीच सुधारणा नाही म्हणून अपयशाच्या गर्तेत झाकोळून जातो .. अंधार प्रिय होऊ लागतो ... पडणाऱ्या थेंबांना काही मर्यादाच नसते ...ते त्यांचं काम क्षणाक्षणाला आवर्जून वठवतात.. जगण्याची दिशाच कळेनाशी होते ... त्यात आणखी एक खोड .. मनातलं सगळं मनात ठेवायची ... चांगलं , वाईट सगळंच ... मनात साठत राहत .. येणारा प्रत्येक दिवस त्यात भर टाकत जातो ...

पण माणूस आशेच्या जीवावर जगतो ... अन पुन्हा दिवसाला सुरवात होते .. बैचेनीत .. लागणाऱ्या भुकेला मारायला आसुसतो .. चुकून खुललीच कळी तरी तिला मर्यादेचा पांघरून घालायला सरसावतो ... जणू काय आपल्याला तो अधिकारच नाही हि भावना मूळ धरते ...

अन शेवटी सगळ्या प्रयत्नात काहीच न गवसल्याच दुःख मात्र मनाला घर पडत ..
दिवस संपतो .. मी माझ्या मर्यादेत राहते .. अन आसवाची वाट मोकळी होते ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users