महाराष्ट्र राज्य ,मराठी बाणा मराठी अस्मिता ,छत्रपती शिवाजी महाराज खूप गर्व आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ..
पण कधी? जेंव्हा ह्या गोष्टी कानावर येतात तेंव्हा, गणेश आगमन-विसरजन होत असताना,आणि शिव जयंती साजरी करताना...इथे आपण आपली संस्कृती जगाला अभिमानाने दाखवत असतो..
पण प्रश्न येतो आपल्या मराठी अस्थित्वाचा,आपल्या हयातीचा,आपल्या एकजुटीचा तेंव्हा मात्र काही
पैशांसाठी आपण ते विकतो....होय आपण विकतो...
मराठी माणसांची,आमची मुंबई म्हणणारे आपण जेंव्हा उमेदवार म्हणून उभा राहिलेला गुजराती(परप्रांतीय) त्याला आपलं अस्थित्व विकतो..अरे..लाज वाटली पाहिजे आपलं भविष्य आपलं अधिकार कोणा गुजरात्यांच्या हाती देताना....
कुठे हरवतो मग आपला मराठी बाणा,आपलं मराठीवरच प्रेम....
खंत वाटते हे सगळं होत ते फक्त काही पैशांसाठी.....?
साधी सरळ गोष्ट समजू शकत नाही ज्याला आपला विकास,आपला भविष्य म्हणजेच आपलं मत देता तो एक परप्रांतीय आहे...अरे मराठी मेलेत का ?...
उद्या मुंबई मधून मराठी भाषा,मराठी माणसं कमी व्हायायला कारण कोण....?
इथेच सुरुवात होतेय आपलं मराठी अस्थित्व संपायची.....
आज महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे ६०-७०% उमेदवार गुजराती (परप्रांतीय) आहेत...ह्याला जबाबदार कोण?...
आज नगर सेवक त्यांचे परप्रांतीय आहेत..उद्या आमदार असतील परवा खाजदार असतील..
मुंबईत रस्त्यावर,शाळांमध्ये,स्टेशनवर गुजराती पाट्या,गुजराती भाषा वापरली जाईल..ह्याला जबाबदार कोण..?
काहीसे पैसे घेऊन आज आपण त्यांना आपल्यावर वर्चस्व करून देतोय....उद्या ते मुंबईच गुजरात करायला कमी नाही करणार...
आणि दुर्दैव म्हणजे हे सगळं आपण आपल्या डोळ्यादेखत आपल्याच हाताने करून घेतोय...
कोणाची मजल नव्हती आपल्या राज्यात हे बाहेरचे लोंढे उमेदवार उभे करण्याची....आज ते आपल्यामुले ह्या भाजपा..सरकारने केलय....त्यांचा हेतूच आहे मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करायची..
जेवढ झालं ते पुरे झालं ..आपल्या महाराष्ट्रात,मुंबईत मराठी म्हणूंन जगा...मराठी बोला....पैशासाठी लाचारी पत्करू नका....निषेध करा प्रत्येक गोष्टीचा ज्या मराठी अस्मितेला, मराठी माणसाला, मराठी भाषेला मुंबईतून दूर नेत आहेत....आपण आहोत तो पर्यंत मुंबई मराठी माणसांची आहे आपल्या भावी मराठी पिढी साठी ती आपणच जपून ठेवायला पाहिजे...नाहीतर पैशासाठी मुंबईच गुजरात व्हायला वेळ नाही लागणार.....
जय हिंद ..
जय महाराष्ट्र ....
मराठी अस्मिता...
Submitted by पोलेकर प्रसन्न on 3 March, 2017 - 05:10
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ही कविता आहे का???
वाचते...
विषय: भविष्य राजकारण समाज
विषय: भविष्य राजकारण समाज
Groups audience:
गुलमोहर - ललितलेखन
Group content visibility:
Use group defaults.......
बापरे! खतरनाक लिहिलय....
बापरे!
खतरनाक लिहिलय....
वास्तविक गोष्टी खतरनाक असतात
वास्तविक गोष्टी खतरनाक असतात का ?..
वास्तविक गोष्टी खतरनाक असतात
वास्तविक गोष्टी खतरनाक असतात का ?..>>>>
पण लेख छान लिहिला आहे.....म्हणजे तुमची चिन्ता एकदम बरोबर आहे....
काही पॉइन्टस कळले नाही...पण एकूणच वास्तविकता छान मान्डलेली आहे...
काही पॉइन्टस कळले नाही...>>>>
काही पॉइन्टस कळले नाही...>>>>>?
आणि thanks...
राजकारण मला कळत नाही हो....
राजकारण मला कळत नाही हो....
पण तुमच्याशी सहमत आहे...म्हणजे खरच ना मुम्बईमधे मराठी लोक किती आहे याचा विचार केला पाहिजे....
बाकी जाणकार लोक सान्गतीलच...
आता पुणेकरांना(अर्थात तुम्ही)
आता पुणेकरांना(अर्थात तुम्ही) ....हि गोष्ट लक्षात आली.....
मुंबईकरांना लवकर लक्षात आलं तर बरं होईल..
मला मोदीबाबा आवडतात....
मला मोदीबाबा आवडतात....
पण महाराष्ट्रात मराठी माणसाकडेच सत्ता असावी असं मला प्रामाणिकपणे वाटत...
कारण इतर राज्यात त्यांचेच लोक असतात ..मग आपल्या महाराष्ट्रात पण मराठी माणसाकडे सत्ता असावी...
पोलेकर तुमच्या मतांशी अगदी
पोलेकर तुमच्या मतांशी अगदी सहमत. इंजिनियरींगला आसताना चार वर्ष मुंबईतील मराठी माणूस त्यांचा स्वाभिमान आणि मिळणारी वागणूक जवळून बघितलं आहे. जोपर्यंत मराठी माणूस स्वतःच्या आस्मितेसाठी एकत्र येत नाही तोपर्यंत भाजपचे फोडा आणि राज्य करा तंत्र यशस्वी होईल अस वाटतय. बाकी लिखाणाची शैली छान आहे तुमची. पु.ले.शु.
मला मोदीबाबा आवडतात....
मला मोदीबाबा आवडतात....
पण महाराष्ट्रात मराठी माणसाकडेच सत्ता असावी असं मला प्रामाणिकपणे वाटत...
कारण इतर राज्यात त्यांचेच लोक असतात ..मग आपल्या महाराष्ट्रात पण मराठी माणसाकडे सत्ता असावी...>>>>>एकूण मतावर मी पण ठाम आहे.....
thanks अक्षय.....अर्थातच...हे
thanks अक्षय.....अर्थातच...हे फक्त मराठी माणसाने मनावर घेतलं पाहिजे..
जात-पात, मराठी-अमराठी, स्त्री
जात-पात, मराठी-अमराठी, स्त्री- पुरुष वगैरेच्या पलीकडे जाउन काम बघून मते द्यावीत अश्या मताचा मी आहे
प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे ते!
बाकी तुमचे चालू द्या!
जात-पात, मराठी-अमराठी, स्त्री
जात-पात, मराठी-अमराठी, स्त्री- पुरुष वगैरेच्या पलीकडे जाउन काम बघून मते द्यावीत अश्या मताचा मी आहे>>>>+१११११११११११११
काम बघून मते द्यावीत>>>>मुळात
काम बघून मते द्यावीत>>>>मुळात मुद्दा कामं आणि मत यांचा नाहीय...घरात काम करणाऱ्या मोलकरीणन ....घरावर कब्जा केलेलं पटेल का तुम्हाला...?
लेख आवडला. प्रसन्न मला तर
लेख आवडला. प्रसन्न मला तर आपला मराठी माणुस पवार साहेब प्रधानसेवक व्हावेत असे वाटत होते.
मराठी माणुस पवार साहेब
मराठी माणुस पवार साहेब प्रधानसेवक व्हावेत असे वाटत होत >>>> तुमच्या वाटण्याप्रमाणे झालं असत तर उत्तमच आहे....निदान पुन्हा दिल्लीत मराठ्यांची वर्दळ तरी झाली असती...(मुद्दा फक्त मराठी अस्मितेचा आहे )
आपल्या मराठी नेत्यांनी मराठी
आपल्या मराठी नेत्यांनी मराठी शाळांकडे दुर्लक्ष केले. स्वताची मुले मराठी माध्यमात घालुन त्यांना एक आदर्श प्रस्थापित करता आला असता. पण त्यांनी मराठी अस्मिता फक्त निवडणुकांसाठी वापरली.
आपल्या मराठी नेत्यांनी मराठी
आपल्या मराठी नेत्यांनी मराठी शाळांकडे दुर्लक्ष केले.>>>>जेवढ झालं ते पुरे झालं ..आपल्या महाराष्ट्रात,मुंबईत मराठी म्हणूंन जगा...मराठी बोला....पैशासाठी लाचारी पत्करू नका....निषेध करा प्रत्येक गोष्टीचा ज्या मराठी अस्मितेला, मराठी माणसाला, मराठी भाषेला मुंबईतून दूर नेत आहेत....आपण आहोत तो पर्यंत मुंबई मराठी माणसांची आहे आपल्या भावी मराठी पिढी साठी ती आपणच जपून ठेवायला पाहिजे...नाहीतर पैशासाठी मुंबईच गुजरात व्हायला वेळ नाही लागणार.....(मी उदाहरण म्हणून भाजपाची नोंद केली आहे...माझं आव्हान मराठी माणसांना आहे...मराठी अस्मितेसाठी....मराठीपण जपण्यासाठी..)
प्रसन्न,
प्रसन्न,
मराठी भाषा टिकवायची तर तुमच्या सारख्या धडाडीच्या तरुणांची गरज आहे.महाराष्ट्रात मराठीचाच डंका वाजायला हवा. माझ्या एका मित्राची मराठी अस्मिता तिव्र आहे पण नोकरी जेथे करतो ती आहे गुजरात्याची कंपनी त्यामुळे त्याला अस्मितेची धार बोथट करावी लागते.महाराष्ट्रात मराठी भाषेचेच वर्चस्व हवे.ह्या मल्टीनँशनल कंपन्या महाराष्ट्रात येतात आणी इंटरव्हयु इंग्रजित घेतात हे यापुढे येथे तुमच्यासारख्या तरुणांनी चालु देता कामा नये. इंग्रजित इंटरव्ह्यु घ्यायचा असेल तर इंग्लडात जा म्हणाव कंपनी टाकायला.
या निमित्ताने एक खरे खोटे
या निमित्ताने एक खरे खोटे करतो. व्हॉटसपवर गुजरातीमधील लाईट बिलचा एक फोटो फिरत होता. तो खरा आहे का? खरे असल्यास चिंताजनक परिस्थिती आहे. मराठ्यांनी सुरत लुटले, त्याचा बदला म्हणून आता मोदी शहा मुंबई लुटत आहेत
कळकळ पोचली. पण ठाकरे
कळकळ पोचली. पण ठाकरे कुटुंबाला एवढा पाठिंबा आणि संध्या असुनही ते दिल्लीपर्यंत का पोचु शकले नाहीत? की आम्हाला ईच्छाच नाही. मराठी पाउल पडते पुढे असे नुसते म्हणायचे आणि वेळ आली की पाय लावुन पळुन जायचे.
ठाकरे दिल्लीला पोहोचणार
ठाकरे दिल्लीला पोहोचणार म्हणजे स्वप्निल जोशीने मराठी चित्रपटांतच काम करून शाहरूखच्या सुपर्रस्टार पदाला धक्का लावण्यासारखे आहे ते.
प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना. त्याचे यश अपयश महाराष्ट्रापुरतेच मोजायचे. जसे दुनियादारी आणि सैराट कितीही सुपरड्युपर हिट असले तरी ते मराठी प्रेक्षकांपुरताच असल्याने सुलतान वा बाहुबली यांच्या बॉक्सऑफिस कमाईला ते मात देऊ शकत नाही तसे आहे हे.. महाराष्ट्राबाहेर सेनेला वोट कोण आणि का देणार?
प्रत्येकाला कळत आहेच...कोण
प्रत्येकाला कळत आहेच...कोण कोणाला लुटत आहे...अथवा कोण पळ काढत आहेत...आणि दिल्लीचा विचार आपण नक्की करू......पण आता खरी गरज आहे मराठी पाउल पुढे टाकायची...तेही महाराष्ट्रात ..
आपण थोडेसे गैरजबाबदार आहोतच म्हणा ....कळतंय पण वळत नाही असे....
आपल्याकडे लेखणी आहे ....लिहा प्रत्येकाने ज्याने मराठी कळवळून जागा होईल..
करूया पुन्हा मराठी चळवळ....जागवूया मराठीपण प्रत्येक मराठी माणसात ....
पुन्हा होऊन जाऊदे .....गरजा.....महाराष्ट्र माझा....
महाराष्ट्रात सेनेला जो जनाधार
महाराष्ट्रात सेनेला जो जनाधार होता तो भाजपने पळवलाय.ग्रामिण भारतात सेना साफ झालीय. फक्त ठाण्यात सत्ता आहे. मुंबईत भाजपा आरपार घुसलीय. अस्मितेच्या मुद्दयापेक्षा भाजपने जो विकासाचा मुद्दा दिला होता तो लोकांना अपिल झाला.
आपले मराठी फडणवीस हे खूपच
आपले मराठी फडणवीस हे खूपच कार्यकुशल आहेत आणि दिल्लीवर देवेंद्रांचा झेंडा लवकरच फडकेल असं मला वाटतं.
आपले मराठी फडणवीस हे खूपच
आपले मराठी फडणवीस हे खूपच कार्यकुशल आहेत आणि दिल्लीवर देवेंद्रांचा झेंडा लवकरच फडकेल असं मला वाटतं.>>> आमेन.
मराठी अस्थित्वाचा
मराठी अस्थित्वाचा
अस्थित्व म्हणजे शरीरात अस्थि असण्याचा प्रवृत्ति. अस्तित्व म्हणजे असणे. ते धोक्यात नाही. अस्मिता धोक्यात आहे.
किंवा हरवलीच आहे म्हणा ना!
आपल्या महाराष्ट्रात,मुंबईत मराठी म्हणूंन जगा...मराठी बोला....पैशासाठी लाचारी पत्करू नका....निषेध करा प्रत्येक गोष्टीचा ज्या मराठी अस्मितेला, मराठी माणसाला, मराठी भाषेला मुंबईतून दूर नेत आहेत....आपण आहोत तो पर्यंत मुंबई मराठी माणसांची आहे आपल्या भावी मराठी पिढी साठी ती आपणच जपून ठेवायला पाहिजे...
चोक्कस! आपण म्हणजे मस्ट्च अस्मिता जपली पाहिजेच. आत्ताच मी इंग्रजी लिपीत पण मराठी शब्द वापरून या विषयावर मायबोलीवरच लिहितो.
कारण मराठी बोलणे जमत नाही, बरं मग?
पण जमेल त्या भाषेत, मी हेच सांगेन की एव्हरिवन मस्ट आपली अस्मिता जपायची. विशेषतः जास्त करून इंग्रजीतच लिहीन, म्हणजे मी खूप शिकलेला आहे असे लोकांना वाटेल. प्रश्न फक्त एकच - पैसे कोण देणार? कुणाचे नेतृत्व पत्करणार? ते पैसे देतील का?
अश्या मराठी अस्थित्वाचा आहे मी!