बिझनेस अ‍ॅनालिस्ट ह्या करीयर बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by sneha1 on 12 February, 2017 - 11:30

नमस्कार.
मला बिझनेस अ‍ॅनालिस्ट ह्या करीयर बद्दल माहिती हवी आहे. नॉन आयटी बॅकग्राऊंड चे लोक करू शकतात का? ह्या प्रोफेशन चे फायदे / तोटे असे काय असतात?
धन्यवाद!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिझनेस अॅनॅलिस्ट असे असतात.
-
लोकांना सॉफ्टवेअर टीम कडून काही टूल/अॅप्लिकेशन बनवून हवं असतं. ते बीएला सांगतात. बीए स्वतः अभ्यास करून, समजून नेमकं काय कसं करता येईल ते सांगतो/सांगते. सॉफ्टवेअर टीम बरोबर पण बीए डोकेफोड करतो/ते. मग तो/ती एक मस्त बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट - बीआरडी बनवतो/ते. प्रोजेक्ट हत्ती - चार पायांचा, मोठ्या कानांचा, लांब सोंडेचा, मस्त काळसर रंगाचा, माहूत वर बसून अंकुश ठेऊ शकेल असा. युझर खूष की आपण काय हवं ते सांगितलं आणि बीएला कळलं. सॉफ्टवेअर वाले खूष त्यांना बीएने काम समजावलं. सॉफ्टवेअर वाले थोडंथोडं करून बीएला दाखवतात. बीए खूष की काम वेळेत होतय. युझरला सांगणं सुरू असतं. काम पूर्ण झाल्यावर शेवटी बीए ते सगळं नीट तपासून घेऊन युझरला हत्ती देतो/ते.

PicsArt_02-12-11.46.07.jpg

- बीएमुळे हैराण झालेली एक युझर.

जोक्स अपार्ट.
बीए म्हणजे एक मेडिएटर. आयटीचे ज्ञान असलेच पाहिजे असे नाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फॉलोअप्स, ग्रास्पिंग असले पाहिजे. बाकी विशेष माहिती नाही. माझ्या नशिबी एक मतिमंद बीए आली होती नुकतीच म्हणून अशी प्रतिक्रीया. बाकीचे बीए छान होते. Wink
तुम्हाला सॉफ्टवेअर बीए बद्दल माहिती हवी अशी समजूत झाली आयटीचा उल्लेख आला म्हणून. बाकी बरेच प्रकार असतात बीएचे. बिझनेस समजून घेऊन त्याच्या भल्यासाठी काहीतरी उपाय सुचवून त्याप्रमाणे करवून घेण्याचं काम असतं. नोकरींच्या सायटींवर बीए पाहिजेत च्या जाहिराती वाचा, बरेच कळेल. खूप मागणी आहे.

स्नेहा कसला अगदी पर्फेक्ट वेळेला हा धागा आलाय. मी करतेय सध्या हा कोर्स . मी पण एकदम नॉन आयटी . एच आर अ‍ॅड्मिन वाली.
पण अचानक नवर्याने आणि एका मैत्रीणीने भरीस पाडून हा कोर्स करायला लावला. कारण एच४ मुळे गॅप झालीये बरीच.
असो
तर सध्या मी करतेय त्या ट्रेनिंग कन्सलंट कडे तो आयटी चे बरेच नॉलेज देतोय. अगदी पुस्तकी शिकवत नसला तरी प्रॅक्टिकल खूप करावे लाग्ताय्त. एसक्युएल, एक्सएमेल, हे सगळे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. पण एक नवीन काहितरी शिकायला मिळतेय त्यामुळे मला तरी सध्या आवडतेय.
वर सोनू यांनी सांगितलेले बरोबर आहे. सतत क्लायंटशी बोलणे, त्यांच्या बिसनेस रिक्वायरमेंट्स समजून घेणे, डेव्हलपमेंट टिम सोबत कोऑर्डीनेशन असं एकंदर मी शिकतेय त्यातून जाणवतेय. तुम्हाला जर लोकांशी संवाद साधाय्ला, मुद्देसुद एखादी गोष्ट मांडायला, ऑर्गनाइज्ड गोष्टी करायला आवडत असेल तर हरकत नाही हा कोर्स करायला.
अगदि खूप डिटेल आयटी ज्ञान पाहिजे असं मला तरी वाटत नाहिये. बाकी अजून कोर्स चालू आहे त्यामुळे एवढंच सांगू शकते.
आयटि मधे जरी अगदी जॉब नाही केला तरी बाकीचे जसं हेल्थकेअर, फार्मसी, रिटेल यातही बिजनेस अ‍ॅनेलिस्ट ची गरज असते.

अंजली,
सुंदर पोस्ट साठी मनापासून धन्यवाद!
तुम्हाला संपर्कातून मेल पाठवली आहे.

रोल्बद्दल वर सान्गितलेली माहिती बरोबर आहे.
मी बी ए आहे गेल्या ७ वर्षापासून. त्याआधी टेक्निकल काम होते त्यामुळे तसे सोपे जाते. शिवाय मला या रोलमधे सर्वात जास्त आवडते ते म्हण्जे नवीन बिझनेसबद्दल शिकता येते. त्याना काय हवे आहे हे समजून घेणे, योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारणे आणि एखादे सोल्युशन शक्य आहे की नाही हा विचार न करता सर्व माहिती टेक्निकल टीमला समजावणे हे अतिशय महत्वाचे आहे. एखादे प्रॉडक्ट चुकले तर सर्वात आधी त्याची रिक्वायर्मेन्ट बरोबर मान्डली होती का हा प्रश्न उभा राहतो, शिवाय ते प्रोड्क्ट हवे तसे बन्वले आहे की नाही हेही पडतालून पाहणे या जॉब मधे येते.
स्नेहा तुझे शिक्षण ज्यात झाले आहे उदा: बन्किन्ग वगैरे तर बी ए च्या रोलमधे त्याचा फायदा होतो. त्यान्चे रिक्वायर्मेन्ट पाहून सम्जावून ते लोकान्स्मोर माण्डणे मह्त्वाचे आहे. तू तुझ्या आधिच्या शिक्ष्णाशि सम्बन्धित कम्पनीत असा रोल घेतलास तर सोपे जाईल.

विद्या.

स्नेहा, बिझनेस अ‍ॅनालिस्ट हा तसा एक उत्तम करियर चा पर्याय होऊ शकतो..
माझ्या मते खालील बाबी महत्वाच्या आहेत... ( कमी जास्त असल्यास जाणकार बदल सुचवतीलच )

रोल आणि स्किल्स :
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये बी.ए. चा रोल हा दुभाष्या सारखा असतो...
- बी.ए. ला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रोसेसची माहिती असणे आपेक्षीत असते (व थोडिफार बेसिक टेक्नोलॉजी हि..)
- बी.ए. ला बिझनेस प्रोसेसची व्यवस्थीत माहीती असणे आवश्यक असते ( बँकींग, हेल्थ, ईन्शुरन्स इ..इ..)
- बी.ए. ला उत्तम कम्यनिकेशन येण आवश्यक असते.
- बी.ए. ला उत्तम डॉक्यमेंटेशन येण आवश्यक असते.

उ.दा:
एक व्यवसाइक आहे, त्याला त्याच्या व्यवसायासाठी एक "सेल्स + अकाऊंटींगच" सॉफ्टवेअर डेव्हलप करुन हव आहे. तेव्हा त्या क्लायंटला नेमक काय काय बनवुन हव आहे ते समजवुन घ्यायची पहिली जबाबदारी ही बी.ए. ची असते. बी.ए. ला त्यावेळी "सेल्स + अकाऊंटींग" कस असत हे माहीत असण अवश्यक असत.
बी.ए. मग क्लायंटला काय व कस बनवुन हव याची यादी बनवतो. बी.ए. व क्लायंटला मध्ये ढीगभर मीटींग्स होतात. त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे बी.ए. हा डेव्हलपमेंट टीम साठी "रिक्वायरमेंट्स लिहतो"

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टिम बी.ए. ने लिहलेल्या "रिक्वायरमेंट्स" प्रमाणे तंतोतंत जुळेल अस सॉफ्टवेअर बनवतात वा तसा प्रयत्न करतात...

बी.ए. व क्लायंट ते सॉफ्टवेअर त्याना हव तस बनल का ते पहातात व स्वीकारतात....

खाचाखोचा :
- रिक्वायरमेंट्स लिहुन झाल्यावर वा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सुरु झाल्यावर क्लायंट मध्येच एकादी नवी गोष्ट घेउन येतो.
- रिक्वायरमेंट्स लिहुन झाल्यावर वा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सुरु झाल्यावर क्लायंट एकादी गोष्ट काढुन टाकतो.
- रिक्वायरमेंट्स मधला काही भाग डेव्हलप होउ शकत नाही ( फोर एनी रीजन)..
- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टिम चे सगळे प्रश्न हाताळणे...

आजुन बरच आहे..लिहीतो सावकाश...

Back to top