" तो नक्की येईल ना आज "
रॉनने लगबगीने गँरेजच्या मालकाला विचारलं
" हो त्याची बाईक तर तो घेऊन जाण्यासाठी रेडी आहे. तो आजच येईल असं त्याने म्हटलं होतं "
" बघूया हा दिलेल्या शब्दाचा किती मान राखतो ते " रॉन
" तो येईपर्यत आपल्याला ईथेच लपून राहावं लागेल " ते दोघंही जण गँरजमधील एका गाडीच्या आडोशाला लपून त्याची वाट पाहत होते.
" तो आला की तूम्ही आम्हाला लगेच ईशारा करा "
" हो " गँरेजच्या मालकाने मान डोलवली.
" खरंतर खूपच ऊशीर झालाय त्याने सहा ची वेळ ठरवली होती आणी आता सात वाजत आलेत " रॉन
" हा अजून कसा येत नाही, त्याला आपण ईथे असल्याचा संशय तर आला नसेल ना " जँक
" शक्यता आहे जर तो भररस्त्यात बाईकने एखाद्याला ऊडवू शकतो कँमेर्याच्या नजरेतून सूखरूप निसटू शकतो तर त्याच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही "रॉन
" बघूया अजून थोडा वेळ त्याची वाट पाहू तसंतरी आता ईथून आपल्याला सरळ घरीच तर जायचं आहे "
बाहेर रीमझीम पाऊसही सूरू झाला होता त्यामूळे त्या दोघांना थोडावेळ तिथेच थांबावं लागणार होतं.
" मला वाटत नाही हा आज येईल " जँक
" येईल नाही तो आता खरंच आलाय समोर बघ " रॉन
जँकने रॉनच्या सांगण्यानूसार समोर पाहीलं माञ त्या बाईकवाल्या ईसमाने त्या दिवसासारखाच काळा कँपवाला रेनकोट घातल्यामूळे त्याचा चेहराच स्पष्ट दिसत नव्हता.
" या खेपेला माञ मी याला सोडनार नाही " जँक
" जँक थांब घाई करू नकोस, त्याला अगोदर आतमध्ये येऊ दे " रॉन
तो बाईकवाला आत गँरेजमध्ये आला व त्याने खीशातून पैसे काढले आणी चोरट्या नजरेनं आजूबाजूला पाहीलं. रॉननेही मूद्दामूनच त्याला पकडण्याच्या हेतूने त्याची बाईक गँरेजच्या एका कोपऱ्यात लावला होती "
" माझी बाईक तयार आहे का घेऊन जाण्यासाठी ? "बाईकवाल्या ईसमाने गँरेजवाल्याला विचारले.
" हो ती बघा तीथे "
बाईकवाला ईसम जवळ येताच जँक व रॉन दोघंही त्याला पकडण्यासाठी तयार झाले.
" हे घे " मँक्यानीकच्या हातात पैसे देत तो ईसम बाईकजवळ पोहोचला आणी मग अचानकच शांतपणे तो पून्हा मागे देखील फिरला.
" आता ह्याला काय झालं हा पून्हा मागे का फिरला ? " जँकने रॉनला लगबगीने विचारले.
तेवढ्यात रॉन मोठ्याने ओरडला.
" चल जँक तो पळायच्या तयारीत आहे, तो ईथून निसटायच्या अगोदरच आपण त्याला पकडायला हवं कदाचीत आपण ईथे असल्याचा त्याला संशय आला असावा म्हणूनच तो मागे फिरला "
ते दोघंही ताबडतोब त्याच्या मागे धावले.
" ए थांब आम्ही तूला काहीही करणारा नाही "
त्या मूसळधार पावसात ते दोघं त्याच पाठलाग करत होते पंरतू थोड्या अंतरावरून तो अचानकच दिसता-दिसता एका झाडामागून नाहीसा झाला.
" शीट यार तो पून्हा आपल्या तावडीतून निसटला " रॉन ओरडला.
" नाही आपण सहजासहजी त्याला सोडायचं नाही तू या बाजूने जा मी मी तिकडून जातो "
दोघंही जण त्याला शोधण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही दिशानां धावले.
रॉन पून्हा ओरडला " जँक तो फार दूर गेला नसेल कदाचीत तो त्या झाडाच्या आडोशाला देखील लपला असेल तू तीथेही जाऊन बघ "
बहुतेक पावसाच्या पडण्याच्या मोठ्या आवाजात रॉनचा आवाज जँकपर्यत पोहोचला नसावा.
त्या दोघांनीही आजूबाजूचा संपूर्ण परीसर धूंडून काढला पण त्याला शोधण्यात ते अपयशी ठरले होते. पून्हा एकदा त्याच्यां नजरेदेखत, फसवून तो निसटण्यात यशश्वी झाला होता.
" आता तो आपल्याला पून्हा सापडणे खूपच कठीण आहे जँक " रॉन
" नाही, आता तो फार दिवस आपल्यापासून लपून राहू शकत नाही " जँक
" म्हणजे कसं काय ?
तो तर आत्ताच आपल्यासमोरून पळाला "
" अरे वेड्या, त्याची बिघडलेली बाईक दुरूस्त करण्यासाठी तो जेव्हा गँरेजमध्ये आला असणार तेव्हां म्यँक्यानीकने त्याला नक्कीच पाहीलं असेल "
" मग "
" मग काय ?, जर मँक्यानीकने त्या ईसमाला पाहीलं असेल तर त्याच्या मदतीने आपण त्या ईसमाचा स्केच देखील बनवू शकतो शिवाय त्याची बाईक सूद्धा अजूनही गँरेजमध्येच आहे ना " जँक
" पण त्याचा काय फायदा ? त्या बाईकची नंबर प्लेट तर त्याने ऑलरेडी गायब केली होती त्यामूळे त्या बाईकच्या मालकाची ओळख पटवण देखील आपल्याला आता अशक्य आहे " रॉन
" आता तो मँक्यानीकच फक्त आपली मदत करू शकतो " जँक
" हो चल पटकन आपण त्याला आत्ताच विचारू "
ते दोघंही घाईघाईत पून्हा गँरेजमध्ये परतले.
" तो बघ "
मँक्यानीककडे बोट दाखवत रॉनने ईशारा केला मग ते दोघंही त्याच्याजवळ पोहोचले. तो आपल्या कामात व्यस्त होता.
तरीही जँकने फार आवेडावे न घेता त्याला स्पष्टच विचारलं.
" तो बाईकवाला जेव्हा गँरेजमध्ये त्याची बिघडलेली बाईक देण्यासाठी आला होता, तेव्हां तूम्ही त्याला पाहीलं असेलच ना ?"
तो मँक्यानीक तर जँकच्या प्रश्नाने प्रथम घाबरलाच पण मग परीस्तीतीची जाणीव होताच स्वतःला सावरत त्याने शांतपणे जँकच्या प्रश्नाचं ऊत्तर दिलं
" नाही ओ, तो आला तेव्हां तो खूप घाई-गडबडीत होता. आपली बिघडलेली बाईक माझ्याकडे सोपवत तो लवकरात लवकर निघाला. मी तर त्याची बिना नबंर प्लेटची बाईक घेण्यास तयारच नव्हतो पण त्याची विनवनी पाहून मी बाईक ठेवून घेतली.
जाताना त्याने मला सांगीतले की तो सात दिवसानंतरच त्याची रिपेअर झालेला बाईक घेण्यासाठी परत येईल. त्या ईसमाने या वेळेसारखाच काळया रंगाचा कँपवाला रेनकोट घातल्यामूळे अंधारात मी त्याचा चेहरा देखील निट पाहू शकलो नाही. पण मग मला त्याचां संशय आल्यामूळे मी तूम्हांला ताबडतोब फोन करून कळवलं "
" ठीक आहे चालेल काही हरकत नाही तूम्ही जाऊ शकता " जँक
" हा बाईकवाला जो कोणी आहे तो खूपच सावध आहे जँक, म्हणूनच तर मी गँरेजच्या एका कोपऱ्यात ऊभ्या केलेल्या बाईकमूळे त्याला आपला संशय आला असावा " रॉन
" असो जे झालं ते झालं आता फार विचार करण्यात काही अर्थ नाही चल आपण लवकर घरी जाऊ ऑलरेडी या बाईकवाल्या नादात आपल्याला खूपच ऊशीर झालाय " जँक
त्या बाईकवाल्या ईसमाला पकडण्याची एवढी तयारी करूनही त्यांच्या हाती निराशाच लागली होती मग दोघांनीही त्या मूसळधार ओल्या पावसातून भिजत घरची वाट धरली.
" तूला काय वाटंत रॉन तो बाईकवाला माझ्या जिवावर का बेतला असेल " जँक
" त्याची नक्कीच तूझ्याशी कसलीतरी दूश्मनी असणार नाहीतर ऊगाचच तो तूला मारण्याची रीस्क घेणार नाही " रॉन
" पण तो कोण आहे आणी अंस का करतोय हेच मला अजून समजलेलं नाही मी अशी कोणती चूक केली आहे की तो मला मारण्यासाठी "
" ........थांबं जँक तू काय म्हणालास ?
जँकच वाक्य अर्धवट तोडतच रॉनने त्याला थांबवलं कदाचीत त्याला कसलातरी शोध लागला असावा कीवां काहीतरी आठवलं असावं.
" आता काय ? "
" तो तूला मारण्यासाठी..........नाही पण त्याने तर तूझ्यावर फक्त हल्लाच केलाय त्याला जर तूझा जीव घ्यायचं असता तर तो तेही करू शकला असता त्याच्याकडे पूष्कळ वेळ होता "
" म्हणजे तूला नक्की काय म्हणायचं आहे रॉन "
जँकला रॉन काय बोलत होता हेच कळत नव्हतं.
" म्हणजे तो बाईकवाला तूझ्यावर फक्त हल्ला करणासाठी आला होता त्याच्यापासून तूझ्या जिवाला काही धोका असेल असं मलातरी वाटत नाही. पण तरीही तू त्याच्यापासून सावध राहा. तो हे सर्व कशासाठी करतोय याचा शोध माञ आपल्याला लावायलाच हवा "
" माझं जाऊदे रे त्या बाईकवाल्याला तर आपण शोधूच यार पण हा रॉकी कूठे गेलाय कूणास ठाऊक आपण त्याला आता लवकरात लवकर शोधलं पाहीजे कदाचीत त्याच्या जिवाला देखील धोका असू शकतो. " जँक उगाचच काहीतरी बोलावं म्हणून बोलत होता.
"अरे पण वेड्या, रॉकी खंरच कूठे स्वतःहून गेलाय की कोणी त्याला किडनँप केलंय हे देखील आपल्याला अजून व्यवस्थीत समजू शकलेलं नाही. आणी तू म्हणतोस त्याच्या जिवाला धोका असेल. आपल्याला आपल्या सर्व तर्काचा आता गृहीत धरूनच विचार करावा लागेल. आता स्वस्थ बसून चालायचं नाही रॉकीला आपण लवकरात लवकर शोधलं पाहीजे. " जेव्हा रॉन काम करून खूप थकत असे तेव्हा तो असचं काहीतरी बरडत असे रॉनची ही नेहमीचीच सवय जँकच्या चांगलीच लक्षात होती पण यावेळी माञ रॉन आणखीन पूढे काही बोलायच्या अगोदरच जँक गाढ झोपी गेला होता. मग रॉननेही वीस्कीचे दोन पेग घेऊन आपल्या बिछान्यावर धाव घेतली.
टिग टॉगं, टि्ग टॉगं, टि्ग टॉगं
"दूधवाला असेल," जँक झोपेतून जागा होत डोळे चोळत दरवाज्यापाशी गेला.
रोज सकाळी भल्या पहाटे दूधवाला झोपलेल्या माणसांना ऊठवण्यसाठी येत असे.
नाही नाही सॉरी ऊठवण्यसाठी नाही मील्कबॉटल देण्यासाठी पण त्याच्यामूळेच काहींची झोपमोड होत असे तर काहींना लवकर ऊठण्याची चांगली सवय लागली होती.
" ये आज त्या बर्मन गार्डनमध्ये मी नाही येणार यार जॉगींगला, तूला जायचं असेल तर तू जा " सकाळी
ऊठल्या ऊठल्या रॉनचं रडगाण सूरू झालं.
"का रे असं काय आहे तीथे ?"
रॉन न येण्याचं खंर कारण जँकला देखील माहीत होतं. पण उगाचच रॉनची थट्टा उडवण्याच्या हेतूने जँकने मूद्दामूनच त्याला विचारलं.
" अरे यार ती बाग आपल्या घरापासून कीती दूर आहे रे, तीथे जायच्या अगोदरच पाय दुखू लागतात. मग पून्हा घरी येताना कंटाळा येतो "
" ठीक आहे, बरं बाबा तूला नसेल यायचं तर तू नको येऊस......आज मी एकटाच जातो जॉगीगला " रॉनचे रडगाणं एेकून जँक हसतच म्हणाला.
मग त्याने गँसवर ठेवलेली चहाची कीटली ऊचलून बाजूच्या दोन्ही कपात चहा ओतला
" हे घे " त्याने चहाचा एक कप रॉनपूढे केला.
" मग आजचा काय प्लान टूडे यू हँव हॉलीडे ना ? "
" हो रे पण मी आज घरी राहून थोडी विश्रांती करण्याचं ठरवलंय, मागच्या दोन हप्त्यांपासून मी मीसेस रोलीगं च्या केसवर काम करतोय सात जूलैला त्यांच्या एका अर्जेनटीनातील फार्महाऊसमध्ये त्यांच्या पतीचा खून झाला त्याच संदर्भात मला ऊद्या कँटीकनला जावं लागेल त्यामूळे आजचा दिवस तरी मी घरीच थांबन्याचा विचार केलाय. आणी त्यातच आपल्याला आता रॉकीच्या तपासाकडेही लक्ष द्यायला हवं खंरतर आॉलरेडी त्याला शोधण्यात आपल्याला खंरच खूप उशीर झालाय "
रॉनचं बोलणं संपेपर्यत त्याचा चहा थंड झाला होता पण जँक माञ लगेचच चहा संपवून जॉगींगला निघाला.
" चल बाय मी येतो "
जँक बाहेर पडल्यावर बराच वेळ रॉन एकटाच घरी बसून रॉकीबद्दल विचार करत होता.
तो काय करत असेल?
कुठे गेला असेल?
त्याला कोणी किडनँप केलं असेल ?
हे व असे अनेक प्रश्न एकामागून एक त्याच्या डोळ्यासमोरून दीसेनासे होत होते.
तीकडे रॉकीची आई पून्हा पोलिस स्टेशनमध्ये गेली होती परंतू अजूनही पोलिसांच्या हाती काहीच सूगावा न लागल्याने ती देखील निरीश होऊन पून्हा घरी परतली.
जवळजवळ दीड तासानंतर जँक जॉगींग वरून पून्हा घरी परतला. फ्रीजमधील थंड पाणी पीऊन गालावर आलेले घर्मबीदू पूसत फ्रेश होण्यासाठी तो हॉलमध्ये न थांबता थेट वॉशरूममध्ये गेला. पण रॉन माञ रॉकीच्या विचारमथंनात ईतका गूंतला होता की त्याचं जँककडे लक्ष देखील गेलं नसावं जणू काही रॉकी पर्यतं पोहोण्याचा एखादा मास्टर प्लानच तो बनवत असावा. मध्येच हातीतील पेनाने दाडी खांजवत तो वहीवर काहीतरी लीहत होता. पून्हा विचार करत होता कदाचीत तो तपासाच्या खूपच जवळ पोहोचला असावा. मग थोडयावळाने जँकही त्याला जॉईन झाला. तोही त्याच वहीवर काहीतरी लीहू लागला.
बघणाऱ्याला दोघंही खूप वेळ कसलातरी विचार करण्यात मग्न आहेत असेच दिसले असते पण खंरतर ते रॉकीबद्दल काही खास महत्वाचा विचार करत नसून विरंगूळा म्हणून वहीवर पूल्ली-गोळयाचा खेळ खेळत होते. मध्येच गंभीर होऊन ते एकमेकांची वेडीवाकडी व्यगंचीञे काढून एकमेकांना चिडवत होते. मनातच हसत होते.
अखेर मग थोडया वेळाने आपले वहीपूराण संपवून रॉनने टीव्ही चालू केला पण त्याचं टीव्हीतही धड लक्ष लागेना कारण विश्रांती करायच्या नादात जॉगींगला जाण्याची त्याची रोजची सवय मोडून घरीच थांबल्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर दूखू लागलं होतं. हळूहळू वेदना होत होत्या.
जँकने बनवलेल्या आमलेटच्या साथीने आपलं लंच उरकून पून्हा विश्रांती करण्याच्या हेतूने तो बेडवर उताणा झाला. मग रॉनचा आळस पाहून जँकही घराची आवराअवर करत झोपी गेला.
क्रमशः
पुढील भाग लवकरच.......
भाग ४ साठी
http//www.maayboli.com/node/61663
येएएएएएएएएए
येएएएएएएएएए
आज आम्ही पहिले....✌
या भागात फारसं काही नाही आहे पण हरकत नाही...
पण एकापाठोपाठ भाग पोस्ट करण्याचा वेग कायम असु दे...
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
इंट्रारेस्टिंग
इंट्रारेस्टिंग
एका दमात वाचले तिन्ही भाग
लअवकार येऊ द्या
पुढचे
चालु राहुदे....!!! कथा वेग
चालु राहुदे....!!! कथा वेग पकडत आहे...!!!