मायबोलीकर दिनेशदा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

Submitted by लसुणकांदा on 30 January, 2017 - 06:29

आपले एक मायबोलीकर दिनेश शिंदे (दिनेशदा) यांचा आज वाढदिवस आहे. हसतमुख व प्रसन्न व्यक्तीमत्त्व ही त्यांची ओळख जुन्या मायबोलीकरांना आहेच. माझ्यासारख्या नव्या सदस्यांना त्यांचा मायबोलीवरील अजातशत्रू व सकारात्मक वावर आकर्षक वाटत राहीला आहे. मतभेद कसे व्यक्त करावेत, गरजूंना कशी मदत करावी असे बक्कळ गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे आहेत.

एक बहुश्रुत व्यक्तीमत्व असल्याने कधीही सल्ला मागा, अचूक मार्गदर्शन मिळणार हे ठरलेलं असतं. जिथे माहीत नाही तिथे देखील कुणाला भेटायचे याचे मार्गद्रशन मिळते. गृहींणींसाठी (स्त्री+/पुरूष) जगभरातल्या एक से एक पाककृती हे एकच योगदान मायबोलीवरचं त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

आजच्या खास दिवशी त्यांना शुभेच्छा देतानाच आपल्या वाटेला आलेले त्यांचे चांगले अनुभव इथे शेअर करूयात.
(तुमच्यातला एखादा गुण घेता आला तर भाग्यवान समजू स्वतःला )

आपला नम्र
लसुणकांदा
(माझ्याशिवाय चव नाही पाकृला)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशभाऊ, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
जीवेत शरदः शतम....
दीर्घायुष्यमस्तु, कल्याणप्राप्तिरस्तु:.... सकल मनोरथ सिद्धिरस्तु !

दिनेशदा, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, अजून अनेक देश फिरायला मिळो आणि खूप नवनवीन पदार्थ खायला आणि करायला मिळो आणि हे सगळं इथे लिहिण्याची प्रेरणाही मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा

दिनेशदा एक प्रसन्न व्यक्तिमत्व. त्यांना कधी पाहिले नाही पण त्यांच्या इथल्या वावरावरुनच समजते की ते शांत, मनमिळाऊ आहेत. कोणासाठीही मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. एखाद्याच्या गंभीर प्रसंगी त्याला वडिलधार्‍या मायेने समजवतात. आणि माबोचे मास्टरशेफच ते Happy
दा, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. God bless U

दिनेशदा, उशीराने शुभेच्छा!
तुमच्या पाकृ अगदी डोळे झाकून करता येण्यासारख्या असतात. तुमच्या आणि मायबोलीमुळेच परदेशातही मी 'चुल' पेटवू शकले, हे मी अतिशय नम्रपणे कबूल करते Happy प्लीज, लिहत रहा!

Pages