मायबोलीकर दिनेशदा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

Submitted by लसुणकांदा on 30 January, 2017 - 06:29

आपले एक मायबोलीकर दिनेश शिंदे (दिनेशदा) यांचा आज वाढदिवस आहे. हसतमुख व प्रसन्न व्यक्तीमत्त्व ही त्यांची ओळख जुन्या मायबोलीकरांना आहेच. माझ्यासारख्या नव्या सदस्यांना त्यांचा मायबोलीवरील अजातशत्रू व सकारात्मक वावर आकर्षक वाटत राहीला आहे. मतभेद कसे व्यक्त करावेत, गरजूंना कशी मदत करावी असे बक्कळ गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे आहेत.

एक बहुश्रुत व्यक्तीमत्व असल्याने कधीही सल्ला मागा, अचूक मार्गदर्शन मिळणार हे ठरलेलं असतं. जिथे माहीत नाही तिथे देखील कुणाला भेटायचे याचे मार्गद्रशन मिळते. गृहींणींसाठी (स्त्री+/पुरूष) जगभरातल्या एक से एक पाककृती हे एकच योगदान मायबोलीवरचं त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

आजच्या खास दिवशी त्यांना शुभेच्छा देतानाच आपल्या वाटेला आलेले त्यांचे चांगले अनुभव इथे शेअर करूयात.
(तुमच्यातला एखादा गुण घेता आला तर भाग्यवान समजू स्वतःला )

आपला नम्र
लसुणकांदा
(माझ्याशिवाय चव नाही पाकृला)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लसुण्कांदा, आयडी अगदी appropriate घेतलाय हा! आणि एकदम ताजा ताजा! Happy
हे म्हणजे मला पहा आणि फुले वाहा.
बाकी सौम्य वावर सकारात्मक झालेला पाहून छान वाटले. Happy
असो. चालू द्या.

Pages