गेल्या काही महिन्यांपासुन पुण्यात चिकुन्गुनिया सदृश एक नवीनच प्रकारचा विषाणुजन्य आजार पसरला आहे.
माझ्या माहितीतल्या घरटी एकातरी व्यक्तीस हा आजार झालेला मी ऐकला/पाहिला.
याची लक्शणे साधारण खालील प्रमाणे असतात :
- थंडी वाजुन अतिशय तीव्र स्वरुपाचा ताप येणे ( १०२ ते १०४ )
- सांधे,स्नायु दुखणे
- ताप उतरला की ३-४ दिवसांनी अंगावर रॅशेस येणे
- क्वचित जुलाब्/उलटी असा त्रास
ताप १-२ दिवसात कमी होतो. पण थकवा बराच राहातो.
डेंगु आणि चिकुन्गुनिया दोन्हीच्या टेस्ट निगेटीव्ह येतात.पण प्लेटलेटस काही प्रमाणात कमी होतात.
ताप उतरला आणि रुग्ण पूर्ण बरा झाला तरी पुढे कित्येक दिवस सांधे व स्नायु आखडणे व दुखणे असा त्रास होतो.
मला अशाप्रकारचा ताप येउन उद्या ७ आठवडे पूर्ण होतील.
परंतू अजुनही मला प्रचंड सांधेदुखी आणि स्नायुदुखी चा त्रास होत आहे.ऑफिसमद्धे एसी मधे बसुन अजुनच त्रास होतो.रोज एखादे नवीनच हाड जास्त दुखायला लागते.८ आठवडे सांधेदुखी राहिल असे डॉकटर म्हणाले होते त्यानुसार आत्तापर्यंत दुखणे कमी व्हायला हवे होते पण तसे काही लक्षण दिसत नाहिते.
त्यामुळे आता माझे पेशन्स पण संपत चाललेत. माझ्या ओळखिच्या बर्याच जणांना सेम त्रास चालु आहे.
यावर खात्रीशीर ईलाज किंवा औषध उपलब्ध आहे का ?
मायबोली वर कोणाला अशाप्राकारचा त्रास झाला आहे का ? असल्यास काय उपाययोजना केली ?
होमिओपॅथी चा सांधेदुखी साठी फायदा होतो असे ऐकले आहे ? हे खरे आहे का ?
ईथल्या जाणकार डॉक्टरांचा सल्ला काय आहे ?
याविषयावर ईथे तुम्हा सगळ्यांची मतं जाणुन घेण्यासाठी हा धागा.
( असा धागा अधीच येउन गेला असेल तर प्लीज मला सांगा )
मला होमिओपॅथी च्या औषधांनी
मला होमिओपॅथी च्या औषधांनी साधारण १.५ महिन्यात बरं वाटलं
होमिओपॅथी मुळे नक्की फरक पडतो...
धन्य वाद स्मिता ताई , होमिओ
धन्य वाद स्मिता ताई , होमिओ पॅथी चे पण पथ्य वैगेरे असते का
Pages