भरलेल्या शेवग्याच्या शेंगा

Submitted by आऊ on 20 January, 2017 - 03:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : १) शेवग्याच्या शेंगा गरजेनुसार ( फार जून नाही फार कोवळ्या नाही अशा बघून घ्यायच्या- माध्यम आकाराच्या)
२) बेसन एक वाटी
३) धने जिरे पूड
४) लाल तिखट मसाला ( मी कांदालसूण मसाला वापरते)
५) मीठ
६) हळद
७) तेल

क्रमवार पाककृती: 

लहान असताना आमच्या शेजारी शेवग्याचं झाड होतं त्याचं शेंगा काढायला लागले कि सगळे जमायचे शेंगा घ्यायला. आम्ही पण त्यात असायचो. शेंग झाडावरून खाली पडली कि तिकडे पाळायच आपल्याला हवी तशी असेल तर पटकन झडप मराऊन घ्यायची. आणि घरी आणायची. मग संध्याकाळी भरल्या शेंगांची खरपूस मेजवानी मज्जा असायची.
शेंगा आणल्या कि छान धुउन त्याचे बोटाएवढे ( २-२.५ इंचाचे) तुकडे करायचे चतुकडे करता करता त्याच्या हिरव्या साली (दोर) निघतील तेवढे काढायचे, नाही काढले तरी चालते. ते तुकडे एका भांड्यात घेऊन थोडे मीठ टाकून वाफवून घ्यायचे फार शिजवायचे नाहीत, फक्त कच्चेपणा काढायचा.
शेंगा वाफ येईपर्यंत तव्यावर थोडे तेल टाकून बेसन खरपूस भाजून घ्या. शेंगा वाफवलेलं पाणी टाकून द्यायचा नाही ते वरणात नाहीतर आमटीत टाकायचं छान चव येते. शेंगा थंड होईपर्यंत बेसन तव्यातून काढून त्या बेसनात चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, धनेजिरे पूड घालून चांगलं मिसळून घ्यावं. थंड झालेली शेंग घेऊन तिला शेंगेच्या कोनावर सुरीने हलकेच चीर द्यायची आणि बेसनाचंमिश्रण त्यात भरायचं. सगळ्या शेंगेचे तुकडे भरून होईपर्यंत फ्रयिंग पॅन किंवा तव्यात चार चमचे तेल टाकून तापत ठेवायचं. मग हे भरलेले तुकडे तापलेल्या तेलात चांगले परतून परतून खरपूस भाजायचे.
बेसनाचं मिश्रण उरलंच तर काळजी करायची नाही घरात भेंडी आहे का बघायची नाहीतर टोमॅटो घायचा आणि त्यात उरलेलं मिश्रण भरून ते शॅलो फ्राय करायचं. या शेंगा पोळीबरोबर किंवा नुसत्याच खायला सुद्धा मज्जा येते. शेंगेचा नुसता मसाला नाही खायचा ( न लाजता) शेंगेचा तुकडा तोंडात टाकून चांगले चावून त्याची मज्जा घेता येते. शेंग जशी चावालं तशी चविष्ट लागते बघा एकदा खाऊन.

वाढणी/प्रमाण: 
शेंगा प्रेमी आवडीप्रमाणे खाऊ शकतात.
माहितीचा स्रोत: 
आमच्या बालवाडीच्या देशमुख बाई मधल्या सुट्टीत डब्बा घेऊन आमच्या घरी यायच्या जेवायला. त्यांनी आईला हि रेसिपी शिकवली होती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त वाटतेय रेसिपी ( मी कल्पनेनेच खाऊन बघितली. मी शेवग्याची शेंग नेहमी अशीच खातो. )

मस्तय पाकृ.... आवडली....
फोटू आसला आसता तर आणखीन बरे झाले आसते....
आश्या भरलेल्या शेंगांची आमटी/वरण केले तर चालते काय? का आमटी/वरणात शेंगांचा गाळ होऊन जाईल व भरलेल सारण बाहेर पडून आमटी/वरणात मिक्स होईल?

धन्यवाद अंकु, स्वाति ,भावना ताई, रावी, दिनेश दा.
नरेश माने फोटॊ टाकता येत नाहीत मला.
कैवल्यशेंग भाऊ माफ करा , KAIVALYASHINGH भाऊ शेंगांची आमटी करतात पण त्यात सारण भरत नाहीत.

मस्त वाटतेय रेसिपी ( मी कल्पनेनेच खाऊन बघितली.)>> +१

नक्की करुन बघेल... बाकी फोटो न टाकल्याबद्दल निषेध...

लहान असताना आमच्या शेजारी शेवग्याचं झाड होतं त्याचं शेंगा काढायला लागले कि सगळे जमायचे शेंगा घ्यायला << झाड आमच्या अंगणात होत!
शेवग्याच्या शेंगाची भाजी कधीही, कशीही आवडते. अशी कधी केली/खाल्ली नाहीये. नक्की करुन बघणार.

धन्यवाद अंजु, टीना, अदिती, अकु आपल्या प्रतिसादाबद्दल.

जमलं एकदाचा फोटो टाकायला Happy पण दिसतोय ना ...

कल्पनेने नको खरी खुरी खाऊ बघा Happy

आई ग्गं...
मला आता भूक लागली..

"शेंगेचा नुसता मसाला नाही खायचा ( न लाजता) शेंगेचा तुकडा तोंडात टाकून चांगले चावून त्याची मज्जा घेता येते. शेंग जशी चावालं तशी चविष्ट लागते बघा एकदा खाऊन."
तुम्ही वर म्हणता ते अगदी खर आहे. मस्त लागतात या शेंगा. त्याचा नुसता मसाला खायला जास्त मजा येते. मी केल्या नाहीत पण आमच्या ऑफिस मधे आणल्या होत्या करुन तेव्हा खाल्या होत्या. तेव्हा रेसीपी माहीती न्हवती. आता नक्की करुन बघेन Happy