रंगोत्सव ( water colors ) - भाग २

Submitted by एम . प्रविण on 25 July, 2015 - 15:22

नमस्कार मायबोलीकर ,

मागच्या आठवड्यात काही चित्रे काढता आली ती share करत आहे.

माध्यम : जलरंग , सर्व चित्रे ९ इंच * १२ इंच water color cold press , acid free paper वरती काढण्याचा प्रयत्न केलाय .

जलरंग जवळच्या सुपर center मधून घेतलेत. खरे सांगावे तर कोणते रंग चांगले आहेत याची जास्त माहिती नाही त्यामुळे जे भेटले ते वापरत आहे

१) Forest light

हे चित्र मी एक online ब्लॉग होता त्या प्रकारे असलेल्या कलर वापरून काढण्याचा प्रयत्न केलय. concept प्रमाणे light पास होतानाचा effect धुसर होत गेला पाहिजे होता तो करायचा सर्वतोपरी प्रयत्न केलाय. २ वेळा प्रयत्न केला आणि चित्र खूप बिघडले, हवा तो effect येत न्हवता, फार depression आले मग तिसऱ्या प्रयत्नांत थोडाफार effect साधता आला. इतका छान नसेल पण प्रयत्न केलाय Happy

Forest light.jpg

२) Red Cherry and Bird

हा दुसरा प्रयत्न. फार असे जास्त कलर न वापरता चेरी आणि छोटा पक्षी काढण्याचा प्रयत्न .

Bird and cherry.jpg

३) Lakeside home

हे असे lakeside home हे माझे स्वप्न Happy निळे पाणी , थोडीशी हिरवीगार झाडी , दळणवळणासाठी छोटीशी बोट, छान शांतता छोटेसे टुमदार घर सोबत छोटे आउट हाउस साधण्याचा प्रयत्न .

Lakeside.jpg

इथे तुम्ही लोक इतके मास्टर्स आहात कि असले चित्र share करताना करू कि नको असा १० वेळा विचार येतो. चुका , सुधारणा याबद्दल प्रतिक्रिया अपेक्षित.

या पुर्विची चित्रे इथे पहा

http://www.maayboli.com/node/54753

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत चित्रं!

मायबोलीवर वॉटरकलर कार्यशाळा झाली होती तेव्हा किंवा इतर वेळेस पाटील यांनी सांगितले होते की वॉटरकलरमधील चित्रांना आउटलाइन्स काढू नयेत. ते प्युअर वॉटर कलर वाटणार नाही. मला स्वतःला अजिबात चांगले येत नाही चित्र काढता ( त्यामुळे फुकटचा सल्ला आहे ह्याची जाणिव आहे), पण हे लक्षात राहेले होते म्हणून शेअर करत आहे.

@ मस्के : आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे

वॉटरकलरमधील चित्रांना आउटलाइन्स काढू नयेत >> मी ती कार्य शाळा नाही attend केली त्यामुळे जास्त माहिती नाही मिळाली नाही पण त्यांचा लेख होईल तेवढा follow करतोय …. नक्की वरील चित्रात काय जास्त झालाय " आउटलाइन्स " कुठे न कसे सांगाल तर मी पुढील काळात त्याबद्दल लक्ष ठेवेन. खरच नाही समजले म्हणून विचारतोय । !!!

Apratim zalit sagalich chitre...
1 n 3 khupach aawadale...
Tumcha swapna laukar purna hou dya..

@ सायली : Tumcha swapna laukar purna hou dya.. >> amen . . . Happy
सायली , प्राची एस , के राज … प्रतिसादाबद्दल धन्यवाद