ऑर्कुट ... नाम तो सुनाही होगा
काही लोकांच्यामते ऑर्कुट हे फेसबूकपेक्षा सरस होते, ज्यात मी एक आहे.
तर काही लोकांना आज फेसबूक आवडत असले तरी ऑर्कुट हे त्यांचे पहिले प्रेम होते.
अश्या सर्वांचे या धाग्यावर स्वागत आहे.
ईथे आपण ऑर्कुट काळातल्या गंमती जमती आणि आठवणी जागवूया.
मी माझ्या आठवणी हळूहळू प्रतिसादांत जागवतो, आता फक्त प्रस्तावना देतो.
प्रामुख्याने या ऑर्कुटचे दोन भाग पडतात. याला दोन भिन्न विश्वही बोलू शकता.
एक म्हणजे आपले फोटो शेअरींग आणि कीप स्क्रॅपिंग. ऑर्कुटवर आपली एंट्री शक्यतो याच कारणाने होते. माझी एंट्री एका मुलीच्या शोधात झाली. थोडक्यात मी वयात आणि ऑर्कुटवर एकाच वेळी आलो. असो, तर ती मुलगी काही माझ्या आयुष्यात आली नाही. पण ईतर कैक आल्या. तुम्हालाही ऑर्कुटने कैक आंतरजालीय मित्रमैत्रीणी दिल्या असतील, त्याचे कैक किस्से असतील. ते मित्र आयुष्यात आजही असतील तर तुमच्या भेटीचे कारण म्हणून ऑर्कुटलाही तुमच्या आठवणीत एक स्थान असेल. त्या आठवणी ईथे शेअर करा ..
या ऑर्कुटचे दुसरे विश्व म्हणजे समूह, कम्युनिटीज!
विविध जाती, धर्म, भाषा, प्रांत, प्रदेशांच्या नावाने असलेले हे समूह म्हणजे एकेक मायबोली, मिसळपावसारखी संकेतस्थळे होती. तिथेही असेच धागे (फोरम) काढायची सोय होती. पोलही काढता यायचा. मॉडरेटर नामक प्राण्याशी पटले नाही तर भांडताही यायचे. त्याने आपला राग करत आपल्याला बाहेर हाकलले तर फेक प्रोफाईल्स काढत त्या समूहात घुसून एकेकाची दाणादाणही उडवता यायची. मग त्यांचा कंपू आपल्या अंगावर यायचा. आणि आपल्याला हेच हवे असायचे. डिटेल नंतर देतो, पण नुसती धमाल होती. ईथे लोकांना धाग्यावर शंभर प्रतिसाद झाले तर कौतुक वाटते, तिथे माझे प्रोफाईल्सचे शतक झाले होते. एका ठराविक आकड्यानंतर मी माझे प्रोफाईल मोजणे सोडून दिले होते.
क्रिकेटमध्ये जसे दिग्गज खेळाडू एकदिवसीय मधून निवृत्ती घेतात आणि क्लासिकल कसोटी क्रिकेट खेळत राहतात तसेच ऑर्कुट कारकिर्दीच्या दुसर्या टप्प्यावर मी या फॉर्ममध्ये रमलो. सोशलसाईट म्हणजे नवनवीन मुलींशी मैत्री करा, आपले फ्लर्टींगचे स्किल वापरा, त्यांचे फोन नंबर मिळवा, त्यांच्यासोबत डेटला जा वगैरे माझ्या वयाला शोभणार्या थिल्लर ध्येयांच्या पलीकडे जात विविध चर्चांत भाग घेणे पासून नवनवीन धागे काढत चर्चा घडवून आणने यात रमू लागलो. आणि म्हणूनच ऑर्कुटवर शेवटच्या श्वासापर्यंत होतो.
प्रॉब्लेम असा झाला की बहुसंख्य लोक सोशलसाईट ज्या मौजमजेसाटी वापरतात त्यात फेसबूक सरस ठरली आणि तो लोंढा तिथे वळला. आमच्यासारखे चर्चाप्रेमी किडेकर तुलनेत फार कमी असल्याने निव्वळ आमच्यासाठी ऑर्कुट चालवणे फायदेशीर नव्हते. तसेच हळूहळू ईतरही चर्चांची संकेतस्थळे आकार घेत होती. त्यामुळे चर्चाप्रेमी लोकांनाही पर्याय उपलब्ध झाले होते. ते हळूहळू तिथे वळले. अश्यातच एके दिवशी ऑर्कुट बंद होणार याची कुणकुण लागली आणि नवीन जागेच्या शोधात मी मायबोलीवर आलो. आणि ईथेच रमलो. कारण फेसबूक वगैरे माझी आवड आणि हौसमौज भागवायला जराही पात्र नव्हते.
असो, धाग्याची प्रस्तावना जरा लांबलीच.
असे वाटेल कदाचित,
पण ऑर्कुट हा तीन अक्षरात सामावून जावा ईतका चिर्कुट विषय नाही.
याची कल्पना असणार्या सर्वांचे या धाग्यावर स्वागत आहे ..
ऑर्कुट ... नाम तो याद होगा ना
आर्कुट आय मिस यु!
आर्कुट आय मिस यु!
मस्त धागा... जुन्या आठवणींना
मस्त धागा... जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..
मी ऑर्कुटवर कधीही नव्हतो. लेख
मी ऑर्कुटवर कधीही नव्हतो. लेख वाचून ऑर्कुट पहायची फार उत्सुकता वाटतेय. पण आता ते शक्य नाही. नेहमीप्रणानेच ऋन्मेष यांचा लेख मस्त आहे. ऋन्मेष यांच्या लिखाणाचा वेग आणि त्यांचे चातुर्य पहाता, त्यांचे शंभरच्यावर प्रोफाईल असतील यावर नक्कीच विश्वास बसतोय.
२०१७ चि सुरुवात खस्स वतत नहि
२०१७ चि सुरुवात खस्स वतत नहि आहे रुम्नेश्भओ सथि...
फक्त ४ प्रतिसद ... फोर्म जतोय ...
बाबाऊ माणसाने स्वचुका मानायला
बाबाऊ माणसाने स्वचुका मानायला स्वप्रमाद एक्सेप्ट करायला लाजू नये म्हणतात. तर ऑर्कुट!!!
होतो ना आपण ऑर्कुटवर. चांगले ऍक्टिव्ह होतो म्हणजे आपले राकु लाजावेत असल्या मेगाबायटी प्रतिसादांचा लेखक पण होतो. मराठी टायपिंगची कला तिथेच शिकलो. त्याकाळी गूगल आयएमई नसते मग बाराहाचे चकटफू व्हर्जन वापरीत असू आम्ही. स्वतःच्या तथाकथित जातीच्या ग्रुपवर सुद्धा होतो. तिथे एक अतिशय सफल 'कु दे टाट' उर्फ बंड घडवून प्रस्थापित संपादकमंडळी घालवून नंतर त्या विविक्षित गटाचा मी मॉड सुद्धा झालो होतो. बालिशपणा असे पण मजा असे एकंदरीत.
२०१७ चि सुर्वत खस वतत नहि
२०१७ चि सुर्वत खस वतत नहि रुन्मेश्भौ सथि... अरे वा मला पण यायला लागलं च्रप्स यांच्या सारखं बोलायला. च्रप्स तुम्ही असंच लिहित जा. फ्रेंच माणूस मराठी बोलत आहे असे वाटते. वाचायला पण भारी मजा येते