Pro Wrestling League Season 2 - Get Ready for असली दंगल.
देशभर दंगल सिनेमाचा फिवर जोरात असतानाच २ जानेवारीपासुन दिल्ली येथील खाशाबा जाधव इनडोर स्टेडियममध्ये PWL Season 2 च्या मॅचेस सुरु होत आहे. दंगल सुलतान आणि साक्षी मलिकने कुस्तीला ग्लॅमर आणलयं आणि त्यात आता PWL भर घालतेय.
PWL Season 2 च्या मॅचेस २ जानेवारी पासुन १९ जानेवारी २०१७ पर्यंत असतील , पहिलीच मॅच २ जानेवारीला मुंबई महारथी विरुद्ध हरियाणा हॅमर्स आहे.
टीम्सची नावं पण इंटरेस्टिंग आहेत , मुंबई महारथी , हरियाणा हॅमर्स , दिल्ली सुलतान्स , युपी दंगल , जयपुर Ninjas , NCR पंजाब रॉयल्स.
प्रत्येक टीममध्ये ५ भारतीय आणि ४ विदेशी रेस्लर्स आहेत , त्यात २ भारतीय महिला , ३ भारतीय पुरुष , २ विदेशी महिला आणि २ विदेशी पुरुष आहेत.
स्टारकास्ट जबरदस्त आहे , साक्षी मलिक दिल्लीकडुन खेळतेय , फोगाट भगिनी दिल्ली सुलतान्स , युपी दंगल्स , जयपुर Ninjas मध्ये विखुरल्या आहेत , मराठी कुस्तीपटु राहुल आवारे मुंबई महारथीकडुन , अमित धनकर युपी दंगल कडुन आणि उत्कर्ष काळे जयपुर Ninjas कडुन खेळतील.आणि इतर अनेक वर्ल्ड चँपियन्स वेगवेगळ्या टीम्सकडुन खेळतील.
Channels: Sony Max and Sony ESPN with Hindi and English feed.
Time: 7 PM to 9 PM
http://www.prowrestlingleague.com/ ह्या वेबसाईटवर पुर्ण टीम्सची माहिती बघता येईल.
Then Get Ready for Asali Dangal.
१३ जानेवारी मुंबई
१३ जानेवारी
मुंबई दिल्लीविरुद्ध ४-३ ने जिंकली. साक्षी मलिक जिंकली पण दिल्ली सेमीफायनला पोहोचु शकणार नाही.
मुंबई सेमीफायनलला पोहोचली.
आतापर्यंत सगळ्यात स्ट्राँग हरियाणा आहे.
दिल्ली आणि युपी कडे स्ट्रॉंग
दिल्ली आणि युपी कडे स्ट्रॉंग खेळाडू असून पण एकही सामना जिंकले नाहीत. युपी चे वाईट वाटले, इतके फोगात बहिणींना चान्स दिला पण बबिता दुखापत ग्रस्त आणि गीतालाही फार चमक दाखवता नाही अली. एक बातमी अशी होती की त्या दोघी फिल्म प्रमोशन मध्ये जास्त बिझी असल्यामुळे सरावाला वेळ देऊ नाही शकल्या.
त्यामुळे पिंकी आणि मनीषा असे दुयायमम खेळाडू उतरावे लागले.
दिल्ली तेच, बजरंग पुनिया एक match खेळला, संगीत फोगात पण नाही चमकली,फक्त साक्षी आणि मारिया यांचवरच मदार होती.
हो आशु , फोगाट सिस्टर्स कडुन
हो आशु , फोगाट सिस्टर्स कडुन खुप अपेक्षा होत्या. हरियाणा जबरी खेळलेत .
(No subject)
आज हरियाणा आणि जयपूर लढत. लीग
आज हरियाणा आणि जयपूर लढत. लीग मध्ये हरियाणाने जयपूरला 5-2 असे हणले होते. आताही तेच होईल असे वाटत आहे. सेमी ला ब्लॉक प्रकार नाही त्यामुळे 9 च्या 9 पैलवान खेळतील.
किस्सा म्हणजे रामदेव बाबा नि आंद्रे स्टॅंडणीक ला कुस्ती चे आव्हान दिले आहे. आज सेमी च्या आधी ती लढत होईल.
आंद्रे ने 2008 ला बीजिंग ऑलम्पिक ला सुशील ला हरवून अंतिम फेरी गाठली होती.
रामदेव बाबाबचे कुस्तीचे व्हिडीओ बघितले काल, फुल्ल भन्नाट.
हरियाणाने जयपुरला ६-३ ने
हरियाणाने जयपुरला ६-३ ने हरवलं आणि फायनलला पोहोचले.
आशु , रामदेव बाबांची कुस्ती कशी झाली ?
आता मुंबई पण यायला हवी फायनलला.
हरियाणा येणे अपेक्षित होते
हरियाणा येणे अपेक्षित होते आणि मुंबई तर गत विजेते आहेत. त्यामुळे त्यांच्यातच अंतिम फेरी होईल असे वाटत आहे, पण पंजाब कडे तो खत्री प्लेअर किंशेगासविली आहे, ओडूनायो आहे, तोरगुल आहे,त्यामुळे काही सांगता येत नाही.
काटेका मुकाबला
रामदेव बाबाची कुस्ती नाही पहिली, मी कामानीमत्त बाहेर होतो, त्यामुळे अक्खी सेमी च हुकली, आता नेट वर बघीन
पंजाबची स्ट्राँग वाटतेय.
पंजाबची स्ट्राँग वाटतेय. मुंबईचे फक्त एरिका , जब्रायल स्ट्राँग दिसताहेत, पावलो , राहुल आवारे आणि सरिता कडुन पण अपेक्षा आहेत.
पंजाबने मुंबईला ५-४ ने हरवलं,
पंजाबने मुंबईला ५-४ ने हरवलं, अपेक्षेप्रमाणे पंजाबच्या किंचेविगॅश्विली , ओडुयानो , इलियासने भक्कम लढती दिल्या तर मुंबईचे एरिका , ज्ब्रायल , सरिता भारी खेळले.
पंकज राणामुळे पंजाब टीम फायनलला पोहोचली.
आशु बरं झालं नाही पाहिलीस
आशु बरं झालं नाही पाहिलीस बाबा रामदेवची कुस्ती ते , सगळं स्टेज्ड होतं ते बहुतेक.
https://www.facebook.com/swami.ramdev/videos/10155079458144015/
रामदेवबाबांची कुस्ती स्टेज्ड
रामदेवबाबांची कुस्ती स्टेज्ड होती बहुधा. तो अपोनंट नुसताच हात पुढे ठेवून चालत होता. बाकी लीग भारी चालू आहे. यूट्युबवर बघायला मजा येते.
जबरदस्त लढती झाल्यात भा ,
जबरदस्त लढती झाल्यात भा , अक्षरशः हात पाय शिवशिवतात बघताना.
आतापर्यंतच्या अनबिटन हरियाणा
आतापर्यंतच्या अनबिटन हरियाणा टीमला ५-४ ने हरवुन NCR पंजाबने PWL Season 2 ची फायनल जिंकली .
कॉंग्रॅच्युलेशन्स NCR पंजाब !
Pages