तर आज रात्रीपासून मायबोली अडीच दिवस बंद रहाणार आहे.
त्या धाग्यात पॄथ्वीकरांनी "यावर अजून धागा कसा आला नाही? माबोकरांचा बुद्धयांक कमी झालाय की त्यांचा अव्यक्त सुप्तावरोध (latent inhibition) वाढलाय?" अशी शंका अव्यक्त अथवा सुप्त न ठेवता व कसालाही अवरोध न बाळगता व्यक्त केली. मी त्याचा निषेध व्यक्त करु इच्छित होतो, पण लक्षात आले की त्यांनी फक्त शंका उपस्थित केलीय कसला आरोप नव्हे, आणि मी माझ्या इच्छेला लगेच अवरोध घातला. आणि मग हे अडीच दिवस मी खरेच कसे घालवेन यावर विचार करु लागलो.
आता विषयाकडे वळलोच आहोत तर विषय जाणुन घेउ.
अडीच दिवस सासुचे: इथे सासु म्हणजे साबा नव्हेत. तर सासु म्हणजे "सामान्य सुख."
म्हणजे "अडीच दिवस सामान्य सुखाचे" असा विषय आहे.
आता सुखात सामान्य काय अन असामान्य काय? कुठले सामान्य कुठले नाही? हे कुणी ठरवावे इत्यादि उहापोह सुरु करण्यापूर्वी मी ’सामान्य सुख” असा शब्द प्रयोग का करतोय हे नमुद करु इच्छितो.
"अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरसी बाजारी?" असे खांडेकर म्हणुन गेले. त्याकाळी आंतरजाल अस्तित्वात असते तर "फिरसी बाजारी" मध्ये आंतरजालीय बाजार सुद्धा मोडतो असे त्यांनी कदाचित मान्य केले असते. आणि मग यात ऑनलाईन शॉपिंगच नव्हे तर एकंदरीत आंतरजालीय स्थळे अभिप्रेत आहेत हे ओघाने आलेच.
याच कवितेत ते म्हणतात
"पाडस घरचे कितीदा आले, गळा करुनी वर तुला बिलगले, कधी दिले त्या चारा पाणी?’
म्हणजे अशा साध्या गोष्टींमध्ये ही सुख असते, जे आंतरजालाच्या शोधा आधीही मनुष्य हरवून बसलेला खांडेकरांना दिसला.
आंतरजालामुळे आपणसुद्धा अ्शा काही सहज सामान्य सुखांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? अशी शंका मला अधुन मधुन भेडसावत असते. "अडीच दिवस माबोबंद" या धाग्यातील प्रतिसाद वाचून ती शंका आता परत भेडसावली.
तर तिकडे नियंत्रक आणि आंतरजाल विशारद आपल्या माबोच्या उर्ध्वश्रेणीकरणात मग्न असताना, आपल्या सगळ्यांनाच या शंकेचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे, भरपूर सामान्य सुख मिळवण्याची संधी आहे.
पण कदाचित आंतरजालाची एवढी सवय जडलीय म्हणुन की कशाने म्हणा, वाचन, खाणे याव्यतिरिक्त डोक्यात अजून काही कल्पना येत नाहीयेत.
"काय करता येईल बरे?" असा मी विचार करत होतो.... तेव्हा... "फिर मौसीणे बतॉयॉ अंबुजॉ सिमेंटसे ..." या उक्ती प्रमाणेच अचानक मनातून एक आवाज आला "अरे पांद्या, मायबोलीवरच विचार ना!"
झालं.मग लागलीच विचारयला घेतले.
तर तुमचे या अडीच दिवसाच्या सासुचे काय काय प्लॅन्स आहेत, काय काय नविन कल्पना सुचतील, इथे शेअर करा. सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल.
आणि मग अडीच दिवसांनी परत आल्यावर या अडीच दिवसाच्या सासुचे अनुभव सुद्धा नक्की शेअर करा.
अडीच दिवसात नेहमीप्रमाणेच इतर
अडीच दिवसात नेहमीप्रमाणेच इतर कामे करणार (हो. मी नेहमीच इतर कामाबरोबर माबो चालु ठेवते) आणि उगीचच अधुनमधुन मायबोली चालु झाले की काय बघणार
घंटा फरक पडत नाही. अमेझॉन
घंटा फरक पडत नाही.
अमेझॉन प्राइम नेट फ्लिक्स सोनी हॉट स्टार वर पिक्चर सीरी अल बघणार. घरचे काम मस्त स्वैपाक
घुमी फिरी करणार. कुत्र्याबरोबर बागडणार, पेपर पुस्तके इ पुस्तके वाचणार. गप्पा मारणार. झोपा काढणार.
मिपा ऐसी, अक्षरनामा, मैत्रीण आणि फेसबुक आहेत की. देअर इज मोअर टु माय लाइफ.
माबोवरचा माझा वावर वाढायला
माबोवरचा माझा वावर वाढायला आणि माबो अडीच दिवसासाठी बंद व्हायला एकच वेळ पडली.
आदल्या विकेंडला काहीच वाटले नसते, पण या विकेंडला ईथे जरा जुने लेख चाळेन, नव्या चर्चा करेन असा प्लान असल्याने थोडे खट्टू झाले.
आता काय, जे आजवर ईतर विकेंडसना केले तेच कंटिन्यू करेन. तसेच या काळात मायबोली आठवतेय का किंवा मला तिची सवय लागतेय का हे देखील समजेन.
अमा, त्या सिरिअल्स कोणत्या
अमा, त्या सिरिअल्स कोणत्या बघता ते सांगाल का?
मी टीव्ही क्वचित पहातो आणि काय नक्की पहायचे हे कळत नसल्याने थोडी चॅनेल्स घुमुन त्यावेळेस काही इंटरेस्टिंग नाय वाटले की टिव्हीची सुत्रे इतरांकडे देउन वाचन किंवा फोनमग्न होतो.
तुम्ही चॅनेल्सची नावे पण वेगळी सांगीतली, सिरियल्सपण वेगळ्या असतील, बघेन आवडतात का ते.
अर्चनाताई, आजवर इतर
अर्चनाताई, आजवर इतर विकेंड्सना काय केले ते<--- हे जर आंतरजाल सोडून इतर काही असेल तर काय करायच्या ते सांगान का?
मी उद्या पिच्चरला जायचा
मी उद्या पिच्चरला जायचा विचार करतोय, ती सध्या काय करते
मग दोन दिवस ती' च्या आठवणीत कटतील.
अन्यथा ईतर काही विशेष प्लान नसताना मी माबोशिवाय जगायचा विचारही करू शकत नाही. टोटल फर्स्ट्रेशन येईल मला. गर्लफ्रेंड चार दिवसासाठी भेटली नाही, बोलली नाही तरी चालते मला. मनाला आणि डोक्याला तेवढीच एक शांती मिळते. पण माबोपासूनचा ब्रेक, ही शांतता मला खायला उठेन.
Kapil sharma show karan Johar
Kapil sharma show karan Johar show
मित्र-मैत्रीणींना
मित्र-मैत्रीणींना भेटणार...संक्रान्त साजरी करणार...
सकाळी 6 ला कॉलेज साठी
सकाळी 6 ला कॉलेज साठी निघणार..सर्व lectures ला बसून मग दुपारी 2.30 पर्यंत घरी... महाराष्ट्राची सुपर वुमेन या स्पर्धेबद्दल बोलण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षाच्या घरी संध्याकाळी जाणार ती 8.30-9 पर्यंत घरी.. मग tv बघता बघता जेवणार..मग झोपणार...उद्या इथे home minister ch shoot आहे..माझी मम्मी जाणार नसल्याने रविवारी सकाळीच शेजारच्या काकी येऊन शनिवारी तिथे काय काय झालं याची सविस्तर माहिती देणार ज्यात बराच टाईम पास होईल....झाल लिहून एकदाचं...
कउ, छान तुम्हा विद्यार्थांना
कउ, छान
तुम्हा विद्यार्थांना सासुची काय बरं कमतरता!
एन्जॉय.
गल्ली चुकली...
गल्ली चुकली...
मी अॅलास्काला जायचा विचार
मी अॅलास्काला जायचा विचार करतोय...!! मन व डोक दोन्ही शांत आणि थंड होतील मग..
मायबोली बंद असताना..
मायबोली बंद असताना..
(गालावरची खळी तुझ्या या गीताच्या चालीवर वाचावे)
मायबोलीच्या बंदीने वेड लागले जिवा
कुठे लिहू सांगा...
एक धाग्याला जागा द्या जागा द्या
फेसबुकवरती जाऊन आले
लोक विसरले मला,
काय सांगू त्यांना ?
माझ्या पोस्टींना
लाईक द्या लाईक द्या
एक हॉटेल फिरून आले
तिथे परकी मी झाले
वाढपी बिझी सारे
त्यांच्या कंपूमधे फिरे
त्यांना कुणी सांगा
माझ्या टेबलची
ऑर्डर घ्या ऑर्डर घ्या
माझे अक्षर सुधरेना
कुणा अर्थ मेळविना
झाली दैना बोटांची
ऐसे अक्षर समजेना
अशा स्थळाला भिऊन गेले
माझ्या पायांनी
मला जावू द्या जावू द्या
जावू द्या
(म्हणून म्हणतेय )
स्थळ बंद नका ठेवू, उभ्या रेषा नका मारू
गुदमरतो जीव बाई, अता गप्पा कुठं मारू
बंद माबोचा दृपाल कसा देतो गं आवाज
हिच्या नव्या गोड रूपाचा जरा घेते गं अंदाज
उबगलेल्या आयड्यांनो ताजेतवाने व्हा
नवमाबोला सळसळती उर्जा द्या
- सपना
१५.१.२०१७
माबोपासून दोन दिवस ब्रेक झाला
माबोपासून दोन दिवस ब्रेक झाला, गर्लफ्रेंडलाही दोन दिवस ब्रेक दिला, फॅमिलीलाही लांब ठेवले, थोडे स्वतःसाठी जगलो, एकट्यानेच थोडी जिवाची मुंबई केली, थोडी हॉटेलिंग, थोडी शॉपिंग, एकटाच जाऊन ती सध्या काय करते बघून आलो, म्हणजे तो चित्रपट बघून आलो. एकंदरीत रिफ्रेशिंग विकेंड होता. आता पुन्हा माबोच्या रूटीनमध्ये रुळायला हरकत नाही
"ती सध्या काय करते?"
"ती सध्या काय करते?"
याचे माबोबद्दलचे उत्तर
"ती चालू आहे"
हेक्ष अपेक्षित होते आत्ता
वेमा, अॅडमिन - माबोला वेळेवर चालू केल्याबद्दल आभार!
वेमा, अॅडमिन - माबोला वेळेवर
वेमा, अॅडमिन - माबोला वेळेवर चालू केल्याबद्दल आभार!>> +१
पण हे नवीन रुपडं सवयीचं व्हायला थोडा वेळ लागेल. चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय.
छान कविता सपना.
छान कविता सपना.
पण हे नवीन रुपडं सवयीचं व्हायला थोडा वेळ लागेल. चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय.
+१ सस्मित.
आभारी आहे मानव
आभारी आहे मानव