परवाचीच गोष्ट. मुलाला आजी आजोबा घेऊन गेल्याचा फायदा घेऊन मी दिवा उजेडी खाली पाळायला गेले. व्यायाम हा हक्काचा मी टाइम मला अगदी काल परवापर्यंत मिळायचा. पण अमीर खाननी घोळ घातला. दंगल बघून आल्यापासून नवऱ्याला महावीरसिंग फोगट बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला पहाटे आणि रात्री असे व्यायामाचे स्लॉट वाटून घ्यावे लागतात. नवऱ्यानी व्यायाम केलाच पाहिजे या भूमिकेतून, मला काय फरक पडतो? त्याचं हृदय; आणि आता, 'नाही केला तर उत्तम, मला जास्त करता येईल' इथवर मला माझ्या परिस्थितीने आणून ठेवलंय. त्यामुळे मधेच हा रणवीर पेशवा किंवा दंगल खान येऊन माझी स्थिरावलेली मानसिक बैठक बिघडवून जातात. असो. तर मी माझ्या सातव्या राऊंडवर असताना मागून मला तो अत्यंत परिचित, तरीही तितकाच तिरस्करणीय आवाज ऐकू आला, "आंटी, बॉल देता का प्लिज?". मी आवाजाच्या दिशेनी पाहिलं, तर एका गुबगुबीत शेवरीच्या कापसाच्या उशीला टीशर्टचा अभ्रा घातल्यासारखा दिसणारा एक चौदा वर्षाचा मुलगा दिसला. त्याच्या त्या गोंडस चेहऱ्यावर मला आंटी म्हणल्याबद्दल कुठलाही पश्चाताप दिसत नव्हता. त्यामुळे माझा अहंकार गिळून मी चुपचाप बॉल उचलून त्याच्या दिशेने फेकला. इतका जोरात फेकला की त्याला तो आणायला शंबर एक मीटर पाळावे लागले. त्यातच समाधान मानून मी आठव्या राउंडला सुरुवात केली. मग उरलेले दोन तीन राउंड मी या आंटी न म्हणून घेण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार केला.
लोकांनी आंटी म्हणू नये म्हणून मी कित्येक दिवस मिंत्रावर "हल्लीची" पिढी काय घालते याचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून डिस्ट्रेस्ड जीन्स घ्यावी असं माझं मत बनलं. मग आधी टेप शोधून काढली आणि स्वत:ची मापं काढली! खूप दिवस शॉपिंग कार्ट मध्ये लोळवून एकदाची ती सगळीकडे एकसारखी फाटलेली जीन्स घेतली. मी अशा प्रकारचे वस्त्र मागवले आहे, तेही ऑनलाईन, हे ऐकून मातोश्रींनी विचारसुमने उधळली (नवऱ्यानी हात टेकले आहेत हे वेगळे सांगायला नकोच).
"एका मुलाची आई आहेस तू आता. शोभलं पाहिजे हे सगळं. आणि कपडे संपूर्ण अंग झाकण्यासाठी असतात"
यावर मी "हूं" असा आवाज करून बायका करतात तसं पारंपरिक वाकडं तोंड केलं.
ठरल्या दिवशी माझं पार्सल आलं आणि उघडून बघितल्यावर लक्षात आलं की चित्रात दिसत होती तशी आणि तिथेच फाटलेली नसून, त्या नकाशाच्या बाहेरही जाऊन ती जीन्स फाटली होती. आता परत न्यायला येणाऱ्या माणसाला, "ती मला हवी तशी फाटली नाहीये म्हणून तुम्ही परत न्या", असं कसं सांगायचं या विवंचनेत मी पडले. पण त्यांनी काहीही न विचारता चुपचाप ती परत नेली. मग त्यापेक्षा हजार एक रुपये कमी देऊन मी बिन फाटकी जीन्स मागवली. त्यावर देखील, "फाटलेली जास्त महाग होती?" असे उग्दार मातोश्रींनी (नाटकी) डोळे विस्फारून काढले .
जीन्सचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मी माझ्या अस्मितेच्या शोधात एका काव्यवाचनाच्या मेहफिलीत गेले. डाव्या मतवादी लोकांनी बुजबुजलेल्या एका कॉफी शॉपच्या अंगणात हे असले कार्यक्रम होतात. आणि त्याला हजेरी लावणारे लोक अतिशय "इन" असतात. म्हणजे बसतात ते बाहेरच, ते पण अशा इतरवेळी फडतूस दिसणाऱ्या, पण अशा प्रसंगांची शोभा वाढवणाऱ्या बांबूच्या चटयांवर. काही महत्वाचे कवी पुढे गोमुखासनात बसून आपल्या टॅब्लेट्सवर आपले ब्लॉग्स उघडून कविता वाचून दाखवत होते. आणि बाकीचे आपापल्या फोनवर काहीतरी भलतंच करत बसले होते. कविता ऐकण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला पण लक्ष्य सारखं तिथे बसलेल्या कवींच्या चेहऱ्यांकडे जात होतं. सगळ्यांनी एकसारख्या झुडपासारख्या दाढ्या,आणि एखाद्या राजपुत योध्दयाला लाजवतील अशा पिळदार मिश्या ठेवल्या होत्या. पण माझ्या आंटीपणाचा पुरावा म्हणूनच की काय, त्यांच्या त्या रुपाकडे बघताना माझ्या मनात, ते सगळे किती "इन" किंवा "हॉट" आहेत या ऐवजी, सारखा एकच विचार येत होता. या सगळ्यांच्या आया आत्ता यांना घ्यायला आल्या तर आपला मुलगा कुठला हे कसं ओळखणार?
हे सगळे प्रकार झाल्यावर मी, आपण खरंच आंटी झालोय का, याची अशी वेळ आणि पैसे खर्च करून फेरतपासणी करणे बंद करायचे ठरवले. आणि माझ्या दैनंदिन जीवनातूनच डेटा गोळा करायला सुरुवात केली. आधी आंटी होणं याची व्याख्या करायचा प्रयत्न केला. त्यात अर्थातच आधी, पंचवीस वर्षांपूर्वी आई जे काय काय डायलॉग मारायची ते मारले. मी कशी लवकर उठते, घरातलं सगळं बघते (नवऱ्याच्या मदतीचा करेक्शन फॅक्टर लावून), किती अवघड आहे आजकालच्या काळात. "जबाबदाऱ्या" आल्या की कसं आपटूडेट राहता येणार? पेपर वाचायला सुद्धा वेळ नसतो (हा अनालॉग पेपर. डिजिटल पेपरचं सलाईन दिवसभर चालू असतं, तसं). मग स्वस्तुती आणि स्वदया (सेल्फ पिटी?) मधून बाहेर आल्यावर लक्षात आलं, की "तरुण मनात" असतात तितक्या तीव्र भावनाच आता बहुतेक मनात उरल्या नाहीयेत.
पूर्वी आपण कसे दिसतो, आरशात कसे दिसतो आणि चार चौघात कसे दिसतो वगैरे फार महत्वाचं वाटायचं. आता जर कुणी येऊन माझ्या दिसण्यावर टिप्पणी केली, तर "गेलास/गेलीस उडत", याखेरीज दुसरे वाक्य डोक्यात येत नाही. फक्त कानाला अजून आंटी शब्द खटकतो (पण त्याचीही सवय होईल). किंवा कुणी बिचारा प्रेमात मजनू झाला असेल तर त्याच्या मोहब्बतीचे कौतुक न वाटता, त्याचे रडे संपल्या संपल्या, "तू अनुरूपवर जा. तिथे खूप ऑप्शन्स आहेत" असं सुचवायची खुमखुमी मारून टाकावी लागते. विशीतला बराच काळ स्वतःच्या भावनाच मॅनेज करण्यात गेला. आणि आता बराचसा वेळ स्वतःचा आणि कुटुंबाचा वेळच मॅनेज करण्यात जातो. त्यामुळे बऱ्याचदा, ज्यांच्याकडे स्वतःबद्दल खूप विचार करायला वेळ आहे त्यांची असूया वाटू लागते. आणि यातच आपले आंटीकरण सामावलेले आहे असा निष्कर्ष मी काढला. पण या छोट्याशा साक्षात्काराचे रूपांतर, "आमच्यावेळी" या शब्दाने सुरु होणाऱ्या असंख्य कंटाळवाण्या प्रवचनांमध्ये होऊ नये म्हणून, अधून मधून विशीत एक फेरफटका मारून आलेच पाहिजे.
@राजसी लग्नानंतर मी एवढं
@राजसी
लग्नानंतर मी एवढं ऑब्झर्वेशन केलं नव्हतं जितकं आत्ता करतीये.
@अदिती, प्रीतीची ट्रिक चांगली आहे. तिला ऑफिसमध्येच आजी म्हणायला सुरुवात करावी. ऑफिस मध्ये आंटी काय. चूक आहे हे!
@अर्चना बापरे फारच रिसर्च केले आहे. पण हे जाड/बारीक विशीत जास्त अप्लिकेबल आहे असं वाटतंय. मी अजून स्लीव्हलेसचा प्रायोग केला नाही. पण आत्ता नको! फार थंडी आहे. आंटी म्हणलेलं परवडलं!
@ वत्सला
बॅक वगैरे माहिती नाही. होपफुली.
सगळ्यांचे आभार!
हाहाहा खुसखुशीत लेख! वाचताना
हाहाहा खुसखुशीत लेख! वाचताना मजा आली
अॉफीस आणि सदृश्य ठिकाणी मॅडम हा एक आँटी च्या समानार्थी वापरला जाणारा शब्द आहे असं लक्षात आलं आहे!
नकळत्या अल्लड वयात अकाली काकू
नकळत्या अल्लड वयात अकाली काकू आणि काका झालेल्या सर्वांच्या दुख्खात मी सामील आहे.

आंटी विषयी जश्या वेदना लेखिकेने विस्ताराने मांडल्या आहेत तश्या काका किंवा अंकल्स च्या वेदना कोणी तरी मांडा रे!!!!
महावीर सिंग किंवा बाजीराव होण्याची खुम खुमी हे बायकोनी ते चित्रपट दाखवल्या मुळे येते हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.
चांगलं शनिवार रविवार घरात बसून एन्जॉय करावं तर ते नाही त्याच्या ऐवजी हे असले चित्रपट बायका दाखवतात आणि नवऱ्यांना स्फुरण चढते.
अॉफीस आणि सदृश्य ठिकाणी मॅडम हा एक आँटी च्या समानार्थी वापरला जाणारा शब्द आहे असं लक्षात आलं आहे!>>>>>
खरंच आहे ते.
छान लिहिलंय. हा आंटी शब्द
छान लिहिलंय.

हा आंटी शब्द खरंच भारीच फेमस जिकडेतिकडे.
एक लोकल फ्रुटवाला असेल २४-२५ चा. स्ट्रॉबेरीचे बॉक्स घ्यायला गेलो. तो मला म्हणे 'आंटी एकदम फ्रेश है'
माझा नवरा आणि मुलगी गालातल्या गालात हसत होते.
चोंबड्या एकतर मला आंटी म्हणतोय ते म्हणतोय आणि वर आंटी एकदम फ्रेश आहे पण म्हणतोय.
माझा भाजीवाला मात्र मला दीदी
माझा भाजीवाला मात्र मला दीदी म्हणतो. त्यामुळे १०० रुपये जास्त देते पण मी भाजी घ्यायला त्याच्याकडेच जाते.
<<<<< 'आंटी एकदम फ्रेश
<<<<< 'आंटी एकदम फ्रेश है'>>>>> हसून हसून पुरेवाट
सस्मित >>>>>> एकदम
सस्मित >>>>>>
एकदम फ्रेश
मलाही ही वाईट सवय आहे.. समोरच्याला अंकल किंवा आंटी म्हणायचा
एकदा तर मी खरच कहर केली एका कॉलेजच्या मुलाला मी सवयीने अंकल म्हणाली
सस्मित >>>>>> एकदम
सस्मित >>>>>>
एकदम फ्रेश
मलाही ही वाईट सवय आहे.. समोरच्याला अंकल किंवा आंटी म्हणायचा
एकदा तर मी खरच कहर केली एका कॉलेजच्या मुलाला मी सवयीने अंकल म्हणाली
"ती मला हवी तशी फाटली नाहीये
"ती मला हवी तशी फाटली नाहीये म्हणून तुम्ही परत न्या", >>>> हाहा
हसुन हसुन मेले. खुप सुन्दर लेख खुप आवडला.
मस्त लेख आहे... पंचेस मस्त
मस्त लेख आहे...
पंचेस मस्त जमलेत. :-ड
माझ्या घराशेजारी राहाणार्या काकु माझ्या आईच्या वयाच्या आहेत..न त्यांची २ मोठी ( चांगली टोणगी )पोरं आहेत . त्यातला एक एके दिवशी मला "काकू तुमचं कुरीअर आलंय. तुम्ही नव्हतात तर आमच्याकडे ठेवलय" असं म्हणाली.
अल्मोस्ट माझ्याचं वयाचं ते पोरगं केवळ माझं लग्न झालय न त्याच झालं नाहीये एवढ्या कारणासाठी काकू म्हणली
पहाटे ६ वाजता पोराना घेऊन
पहाटे ६ वाजता पोराना घेऊन एअर्पोर्ट वर पोचलो होतो मागच्या महिन्यात. सर्व मुल, सामान आणि आयडी घेत्ले ना या चिन्तेत होते. समोर एक २१ची मुलगी ३ तास तरी लागतील इत्के आवरुन आली होती. तिच्याकडे पाहून पुन्हा एकदा कळले, आपण 'आन्टी' झालोय. स्मित >>
Vidya - tuzya babateet kaay he patat naay..
Sai lekh mast jamalay.
Aunty mhanayala harakat nahi. Pan tumhee tya vayache nasale pahije.
Baki Jadi ani looks baddal ++
'आंटी एकदम फ्रेश है' >>>
'आंटी एकदम फ्रेश है' >>> मराठी भाषा
एकदा तर मी खरच कहर केली एका
एकदा तर मी खरच कहर केली एका कॉलेजच्या मुलाला मी सवयीने अंकल म्हणाली>>>
मलाही ही वाईट सवय आहे.. समोरच्याला अंकल किंवा आंटी म्हणायचा>>>> तुम्ही कधी खामगावला गेला होतात का हो?
मस्त लिहिल आहेस
मस्त लिहिल आहेस
खामगाव >> हे कुठे आले
खामगाव >> हे कुठे आले
खुसखुशीत लेख
खुसखुशीत लेख
खुसखुशीत लेख
खुसखुशीत लेख
खामगाव >> हे कुठे आले
खामगाव >> हे कुठे आले >>>
ओके, म्हण़जे नव्हता गेलात.
माझी मागची पोस्ट वाचली तर कळेल का विचारले.
मी पण तुमच्या क्लबात आहे.
मी पण तुमच्या क्लबात आहे. एवढे पण केस पांढरे नाहीयेत झाले माझे तरी पण काका?
पण आता हे कटु वास्तव जवळजवळ स्विकारले आहे मी.
एकंदर सगळेच माबोकर मिडलाईफ
एकंदर सगळेच माबोकर मिडलाईफ क्रायसिसमध्ये आहे.
या धाग्याने पन्नाशी क्रॉस
या धाग्याने पन्नाशी क्रॉस केली असल्याने या धाग्याला काका (किंवा धागाकर्तीस आँटी) म्हणायला हरकत नसावी
एकंदर सगळेच माबोकर मिडलाईफ
एकंदर सगळेच माबोकर मिडलाईफ क्रायसिसमध्ये आहे. >>> नाही हा.. अद्याप सगळे नाही
@ मानव -
खरेच समजु शकते २४-२५ वयात कोणी अंकल्/आंटी म्हटले तर कसे वाटत असेल
केस पांढरे?? आजिबात नाहीत.
केस पांढरे?? आजिबात नाहीत. आणि मी पन्नाशीची तर नाहीच नाही.
छान लेख . आवडला. गुबगुबीत
छान लेख . आवडला.
गुबगुबीत शेवरीच्या कापसाच्या उशीला टीशर्टचा अभ्रा घातल्यासारखा दिसणारा एक चौदा वर्षाचा मुलगा दिसला>>
'आंटी एकदम फ्रेश है' >>
'आंटी एकदम फ्रेश है' >>
दुकानात काम करणार्यांना 'भैय्या कुच कम करो ना' म्ह्णुनही तो पैसे कमी कसे करतो काय माहीत.
हे घ्या सई आपल्यासाठी खास
हे घ्या सई आपल्यासाठी खास गाणे
लेख मस्त! कमेंटस पण भारी!
लेख मस्त!
कमेंटस पण भारी!
>>या धाग्याने पन्नाशी क्रॉस
>>या धाग्याने पन्नाशी क्रॉस केली असल्याने या धाग्याला काका (किंवा धागाकर्तीस आँटी) म्हणायला हरकत नसावी
याचीच मला भीती होती. आता मायबोलीवर सगळे मला आंटी म्हणणार. असो. तेवढीच प्रॅक्टिस होईल.
दीपस्त,
ते माझं तसही आवडतं गाणं आहे. सो धन्यवाद!
एकदम खुसखुशित लेख माझे लग्न
एकदम खुसखुशित लेख
माझे लग्न झाले तेव्हा मी होती २३ वर्षाची. लग्नाआधी जेव्हा होणार्या सासरी गेली तेव्हाच मी काकु, मामी झाले.
त्यातही नवर्याचे बरेच भाचे, पुतणे माझ्यापेक्षा मोठे त्यातल्या एका भाचीला मुलगी झाली आणि लग्नानंतर दोनच महिन्यात मी आजीपण झाले 
माझ्या मोठ्या बहिणीचा मावस
माझ्या मोठ्या बहिणीचा मावस दीर कॉलेजात जाणारा माझ्याच बिल्डींगमध्ये राहायचा तिला वहिनी
म्हणायचं व मला काकु
बाकी सई लेख लई खुसखुशीत!
Pages