नास्तिक विचार मंच!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 3 January, 2017 - 10:43

मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच.
मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले .
असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे.
तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे.
इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू, पोस्टी फार आवडल्या..

मी देव मानते ... नक्कीच! एक फार मोठी शक्ती आपल्या सगळ्यांना सांभाळतेय. कोणी तिला देव म्हणतं, कोणी पॉजिटिव्हिटी, कोणी मानसिकता, कोणी विज्ञान तर कोणी काय.... पण एक शक्ती आहे हे नक्कीच. आणी ती एकच आहे हे तर त्याहुनही नक्की...

मी उपवास करते, पण ज्यादिवशी माझं शरिर काही कारणांनी उपवासाला नकार देतं तेंव्हा मी तो सोडुन देते कारण माझ्या शरिराला त्रास देऊन मी काही केलं तर ते माझ्या देवाला नक्कीच आवडणार नाही.

मी पुजा आणि आरती करते कारण मला कापुराचा वास आणि भजनाचा/आरतीचा ताल आवडतो

मी अनेक गोष्टी मानत नसतानाही फक्त आईने सांगितल्या म्हणून करते कारण आईचा शब्द माझ्यासाठी महत्वाचा आहे.

मी देव मानते,आस्तिक आहे पण कर्मकांडाच्या अतिशय विरोधात आहे.

मी काहीतरी क्ष गोष्ट केली नाही म्हणूण आता देवाचा माझ्यावर कोप होऊन माझं काही तरी वाईट होणार असं सांगणार्यांना मी वेड्यात काढते कारण मी काही तरी न केल्याने त्रास करुन घ्यायला देव हा माणुस नाहीये आणि त्यावरुन शिक्षा द्यायला तर नाहीच नाही

मी देवाला घाबरत नाही पण माझं देवावर मनापासून प्रेम आहे Happy

ही पोस्ट फारच फ्लो मधे लिहिलीये, विस्कळीत असु शकते

>>> ऋन्मेषने त्याच्या गर्लफ्रेंड ला स्पष्ट शब्दात सांगावे की "मी हे मानत नाही, मी तुझ्या बरोबर रांगेत उभा राहणार नाही," आणि मगच इथे गमजा माराव्यात <<<< Biggrin
अस कसं? अस कसं? अहो गर्लफ्रेन्डबद्दलच्या "भक्तिभावामुळेच" तर तो तिथे उभा रहात अस्तो ना///// शेवटी काये? भक्तिभाव, श्रद्धा महत्वाची. हिंदू धर्म चराचरांत इश्वर मानतो, अर्थात त्या गर्लमधेही इश्वर आहेत. त्या गर्लमधिल इश्वराबद्दलचा भक्तिभाव त्यास तिथे रांगेत उभे रहायला लावतो... Lol
मग प्रश्न उरतो की या उदाहरणात श्रद्धा कुठली ? तर ती गर्लफ्रेंड कायम माझीच राहील, वा उद्याही तिजबरोबर मला असेच रांगेत उभे रहाता येईल, ही झाली श्रद्धा... Proud

माझा प्रश्न अजुनही निरुत्तरीत आहे..... कृपया धागाकर्त्याने उत्तर द्यावे Happy

>>>> >>>>> तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे. <<<<<
"नास्तिक" म्हणजे काय?
ते कळले तर मग मी नास्तिक आहे वा नाही हे तपासता येईल.

(माझा प्रश्न धागाकर्त्याला आहे. धागाकर्त्याने कृपया स्वतःच्या मोजक्या व नेमक्या शब्दात , लिखित उत्तर द्यावे. लिन्का डकवु नये/कॉपीपेस्टही नको. ढीगभर/हातभर मजकुर/रोमन स्क्रिप्ट अनुल्लेखाने मारले जाईल, दखल घेतली जाणार नाही) <<<<<<

.

देवाला काही जण आपल्या स्वार्थासाठी वापरतात. कोणी देवाचे नाव घेत दक्षिणा उकळतो. तर कोणी दक्षिणा दिल्यास देव आपले भले करेन म्हणून दक्षिणा देतो. मी देखील गर्लफ्रेण्डला खुश करायचा एक मार्ग म्हणून देवदर्शनाकडे बघतो. माझ्यासकट वर उल्लेखलेले दक्षिणा घेणारे देणारे यापैकी कोणीही आस्तिक नाहीये Happy

आणि हो, मी माझ्या गर्लफ्रेंडला घाबरतोही आणि ती माझ्यावर प्रसन्न व्हावी म्हणून तिच्या आवडीचे करतोही. यात गमज्या मारणे वगैरे कुठे आले? आपल्या प्रेमाच्या लोकांना खुश ठेवणे आणि ते कबूल करणे यात काही कमीपणा असतो का?

आणि हो, मी नास्तिक आहे म्हणजे देवाला मानत नाही ईतकेच.
याचा अर्थ कुठल्या मण्दिरात दुसरा कुठला हेतू ठेवत जाणारच नाही. देवाचा प्रसादाचा गोड शिरा मिठाई म्हणूनही खाणार नाही वगैरे अव्यावहारीक दृष्टीकोण ठेवून वागत नाही.

आस्तिक आणि नास्तिक ह्या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत.देव आहे रे, देव नाही रे इतकंच.दोघांची आपापल्या विचारांवर श्रद्धा आहे.सुनीता देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे आस्तिक माणसाचे जगणे नास्तिक माणसापेक्षा सोपे जाते.(हे त्यांचे मूळ वाक्य नव्हे,तर त्या अर्थाचे होय)
बाकी रिया, तुझा प्रतिसाद झकासच.

आस्तिक आणि नास्तिक ह्या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत.देव आहे रे, देव नाही रे इतकंच.
>>>

एक तिसरी बाजूही आहे.
असला तर असेना देव, नसला तर नसेना देव, मला काय करायचेय Happy

तिसरी नाही रे, चौथी सुद्धा आहे, त्यालाच त्रिकोणाचा चौथा कोन म्हणतात.

आणि आपल्या ऋषी आणि स्टीव्हन हॉकिंगनी म्हणल्याप्रकारे खरे तर सात किंवा नऊ सुद्धा आहेत.

प्रत्येकाची आपली एक बाजू असते, आणि व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार जितके लोकं या जगात आहेत तितक्या बाजू असतात

ऋषी कोण रणबीर चा बापुस का??
नास्तिकतेवरती श्रद्धा ठेवणारा आस्तिक च म्हणायचा...

नास्तिकतेवरती श्रद्धा ठेवणारा >>>>> कुठेही श्रद्धा ठेवणार्‍याला आस्तिक बोलतता की फक्त देवावर श्रद्धा ठेवणार्‍याला आस्तिक म्हणतात. काय कन्फ्यूजन आहे?

कुठेही श्रद्धा ठेवणार्‍याला आस्तिक बोलतता की फक्त देवावर श्रद्धा ठेवणार्‍याला आस्तिक म्हणतात. काय कन्फ्यूजन आहे?>>>>>.>>>>.आपली कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा असते म्हणजेच एक प्रकारचा विश्वास असतो/आपुलकी असते(प्रेम असते).
खरं तर इथे देवावर असलेली श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यावर चर्चा व्हायला पाहिजे..
राहिला प्रश्न नास्तिकते बाबत तर तो ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे,आपण कोणाला फोर्स करू शकत नाही कि बाबारे तू देवाला मान/नको मानू...सर्वस्वी त्याचा निर्णय असेल...

मी देवाला मनापासून मानते,किंवा माझा देवावर विश्वास आहे असं म्हटलं तरी चालेल....देव पाहायचा नसतो तो अनुभवायचा असतो....मग तो कोणाचाही रूपात असू शकतो ...
पण त्याचबरोबर एक सांगेन कि माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट होत त्यासाठी मी देवाला कधीच दोष देत नाही .
आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार असतो देव नाही,हि झाली श्रद्धा ...आणि मी एवढी पूजा करते ,उपवास करते ,वगैरे वगैरे तरी माझं चांगलं होत नाही यासाठी देवाला दोष देणं हि झाली अंधश्रद्धा...

म्हणजे चांगले झाले तर देवाला श्रेय द्यायचे आणि त्याच्या भक्तीत तल्लीन व्हायचे आणि वाईट झाले तरी दोष नाही द्यायचा, स्वतःकडेच घेत आपणच कमी पडले म्हणत आणखी जोमाने भक्ती करावी. थोडक्तात देवाला त्याचे देवत्व सिद्ध करायचे टेंशनच नाही Happy

देवाला त्याचे देवत्व सिद्ध करायचे टेंशन >>> Lol

ऋन्मेष सर, तुम्ही तुमच्या गफ्रेला मानता की नाही? या माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत?
तुम्ही कोणत्याच प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळत नाही असा तुमचा लौकिक ऐकला होता तो खोटाच म्हणायचा.

देवाला त्याचे देवत्व सिद्ध करायचे टेंशनच नाही>>>>तुम्हाला असं म्हणायचंय का,कि आपण जो निर्णय घेतो चूक किंवा बरोबर त्यामागे देव जबाबदार असतो...
म्हणजे हे असं झालं एखाद्याचा खून करायचा आणि म्हणायचं माझा काही दोष नाही शिक्षा द्यायचीच झाली तर देवाला द्या त्याने केलंय...

तुम्हाला असं म्हणायचंय का,कि आपण जो निर्णय घेतो चूक किंवा बरोबर त्यामागे देव जबाबदार असतो...
>>>>>>
मी देवच मानत नाही तर मी असे कसे म्हणेन? Happy

ऋन्मेष सर, तुम्ही तुमच्या गफ्रेला मानता की नाही? या माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत?
>>>>>>
याचे उत्तर मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेकडो धाग्यात सहस्त्रवेळा दिले आहे.
तरी तुम्हाला ते आजवर कुठे आढळले नसल्यास मी एक वेगळा धागाच काढतो ज्यात मी माझ्या गर्लफ्रेंडला किती मानतो आणि तिच्यावर माझे किती प्रेम आहे हे लिहून ठेवतो.

>>तुम्ही तुमच्या गफ्रेला मानता की नाही?

हा प्रश्न कळला नाही. गफ्रेला *काय* मानता की नाही?
उदा.
गफ्रेला गफ्रे मानता की नाही?
गफ्रेला देव मानता की नाही
गफ्रेला होणारी बायको मानता की नाही?

नक्की प्रश्न काय आहे?

Pages