मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच.
मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले .
असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे.
तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे.
इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत.
धन्यवाद.
नास्तिक विचार मंच!!!!
Submitted by सिंथेटिक जिनियस on 3 January, 2017 - 10:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
द्या टाळी !!!! मी सुद्धा
द्या टाळी !!!! मी सुद्धा नास्तिक आहे
फक्त मी माझी नास्तिकता मिरवत नाही की कोणावर लादत नाही. आपली आपण जपायची. आपल्या नास्तिकत्वेवर आपली श्रद्धा असणे पुरेसे असते. बघा देव वगैरे काही नसते, हे सारे झूठ आहे हे कोणाला पटवायच्या भानगडीत का पडायचे? कारण देव आहे हे सिद्ध करता येऊ शकते, पण एखादी गोष्ट नाही हे कसे सिद्ध करणार? देव नाही हे मी सिद्ध करू शकत नाही. फक्त वाट बघतोय की कोणी देव आहे हे मला सिद्ध करून दाखवावे की मी आस्तिक बनेल. माझ्यामते जन्माला येणारे प्रत्येक मूल हे नास्तिकच असते. देव या संकल्पनेशी त्याचा जसा परीचय होतो तसे ते आस्तिक व्हायचे की नाही हे ठरवते. मी पहिल्याच फटक्यात देव असल्याचा पुरावा मागितला जो आवर कोणाला देता न आल्याने अजून नास्तिकच आहे
फक्त मी माझी नास्तिकता मिरवत
फक्त मी माझी नास्तिकता मिरवत नाही की कोणावर लादत नाही. आपली आपण जपायची. आपल्या नास्तिकत्वेवर आपली श्रद्धा असणे पुरेसे असते. बघा देव वगैरे काही नसते, हे सारे झूठ आहे हे कोणाला पटवायच्या भानगडीत का पडायचे?
हेच सगळे आस्तिकतेबद्दल पण म्हणता येईल. देव आहे, नि त्याला मानाच हे कुणाला पटवण्याच्या भानगडीत का पडायचे?
देव आहे हा विश्वास स्वयंस्फूर्त असावा लागतो. त्यासाठी मग काही पूजा, संध्या असे बाह्य, दृष्य असे उपचार करावे लागत नाहीत. काही उपचार आपोआप होतात, जसे देवाच्या मूर्तीस नमस्कार.
मग तसे झाले नाही तर तुम्ही नास्तिकच - कितीहि वेळा पूजा करा, गणपती, पूजा, संध्या जे काय करायचे ते करा - स्वयंस्फूर्तीने देवावर श्रद्धा निर्माण झाली नाही तर कुणाच्या सांगण्यावरून ती तयार होत नाही. बालपणी कितीहि "संस्कार" झाले असोत, मोठेपणी, तशी स्वयंस्फूर्त श्रद्धा नसेल तर सगळे केवळ दिखावू, श्रद्धा नव्हे.
असले झाटू आरोप करण्या आधी
असले झाटू आरोप करण्या आधी दुसऱ्या धर्मात पण बघा. देव मानत नाही म्हणजे धर्म पण मनात नाही. त्यामुळे आधी आपला धर्म साफ करू माग दुसऱ्याचा असले बालगंधर्व पुलावरल्या भुताचे विचार आम्हाला ऐकवू नका.
हिंदू धर्माची घाण साफ करण्यापेक्षा पार्श्वभागात दम असेल तर फक्त मुस्लिम धर्मातल्या बुरख्या वर बंदी आणून दाखवा. आस्तिक नास्तिक हे फादर सिस्टर्स ला पण सांगा. पास्टर लोक काय उच्छाद मांडतात ते बघा आधी फेसबुक वर नो कॉन्व्हर्जन (NO CONVERSION) नावाचा ग्रुप आहे तिथे जाऊन आधी ख्रिश्चन धर्मातल्या होलयु यु च्या करामती बघा माग हिंदू धर्मावर टीका करा
पॉपकॉर्न चा मोठा मोठा पॅकेट
पॉपकॉर्न चा मोठा मोठा पॅकेट द्या आणि एक कोल्ड कॉफी
चालु द्या तुमच
म्हणजे इथे फक्त नास्तिक
म्हणजे इथे फक्त नास्तिक लोकांन्नीच बोलायचं का???सिंजी सर ...
या धाग्यावर तुम्ही नास्तिक का
या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे.
>>>>
सिंजि तुम्ही आधी स्वतःबद्दल लिहा की....
प्रांजल, आवरा !
अवांतर -
सध्या फॅशनेबल असल्याने मिरवण्याची नास्तिकता जोपासणारे बहुतांश सगळेच प्रत्यक्षात आस्तिकच असतात असा अनुभव आहे. खरा नास्तिक कसा / कधी ओळखावा ?
काही जण बहुदा स्वतःच घर साफ
काही जण बहुदा स्वतःच घर साफ स्वच्छ करण्याऐवजी दुसर्यांच्या घरी साफसफाई करायला जातात असे वाटत आहे
>>>>> तर या धाग्यावर तुम्ही
>>>>> तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे. <<<<<
"नास्तिक" म्हणजे काय?
ते कळले तर मग मी नास्तिक आहे वा नाही हे तपासता येईल.
(माझा प्रश्न धागाकर्त्याला आहे. धागाकर्त्याने कृपया स्वतःच्या मोजक्या व नेमक्या शब्दात , लिखित उत्तर द्यावे. लिन्का डकवु नये/कॉपीपेस्टही नको. ढीगभर/हातभर मजकुर/रोमन स्क्रिप्ट अनुल्लेखाने मारले जाईल, दखल घेतली जाणार नाही)
देव आहे की नाही
देव आहे की नाही ?
https://www.youtube.com/watch?v=z9GXI_9DXF0
देव म्हणजे नक्की काय ?
https://www.youtube.com/watch?v=tZ0e8JRu_9U
कावेरि | 4 January, 2017 -
कावेरि | 4 January, 2017 - 00:54 नवीन
म्हणजे इथे फक्त नास्तिक लोकांन्नीच बोलायचं का???सिंजी
सर ...>>>>>>>असं काही नाही,एकंदर आस्तिक नास्तिक चर्चा झालेली आवडेल.
माचं बाबतीत बोलायच झालं तर मी
माचं बाबतीत बोलायच झालं तर मी आधी बऱ्यापैकी देवाचे वगैरे करत होतो, मी बरीच धर्मिक पुस्तके, काही पोथ्या हि वाचल्या, पण मला नंतर नंतर असे जाणवू लागले की आपल्याकडे मूळ स्वरूपात जो देव होता त्यापासून बरीच फारकत घेतली आहे. भक्ती आणि आदर यापेक्षा कोप होण्याच्या भीतीने अनेक कर्मकांडे लादली गेली. साडेसाती मध्ये त्रास होऊ नये म्हणून शनी महात्म्य, तेल वहा, मारुती ला जा, त्यानंतर पूजा आणि इतर गोष्टी मध्ये हे असे आणि असेच झाले पाहिजे या प्रकारामुळे साध्य काय करायचे या पेक्षा साधन काय यालाच जास्त महत्व दिले गेल्या सारखे वाटू लागले.
सत्यनारायण देखील तेच, अतिरंजित कथा आणि भीती घालून भक्ती. कुठेतरी मनात या सगळ्याचा उबग यायला लागलेला. त्यातुन आपल्या देवळात असलेली कमालीची अस्वचता, कुबट वास, पुजाऱ्यांची अरेरावी यालाही विटलो आणि मी माझ्यापुरते निर्णय घ्यायला सुरुवात केली.
पहिला निर्णय जिथे देव दर्शनासाठी पैसे घेऊन श्रीमंतांना स्पेशल रांग दिली जाते तिथे जायचे नाही. जिथे हा प्रकार सुरू आहे तिथे देव नाही केवळ दगडी मूर्ती आहे असे माझे ठाम मत आहे.
तिरुपती आमचे कुलदैवत आहे पण मी तिथे जाणे कायमस्वरूपी बंद केले.
दुसरे म्हणजे भीतीने केली जाणारी भक्ती.
दुसरे पाऊल उचलले ते म्हणजे सत्यनारायण पूजेला बसणार नाही. आणि माझ्या आई वडिलांचा सुरुवातीचा किरकोळ विरोध मी माझे म्हणणे पटवून दिल्याबद्दल मावळला.
ज्या गोष्टींबद्दल धाक न वाटता प्रेम वाटते असे करायला मला अवडतेच. गणपती आमच्या कडे अजूनही मीच बसवतो पण तो उत्सवी आहे आणि आम्ही मनोभावे जे काही करू ते स्विकारतो. ज्या क्षणी कुणी मला त्याचीही सक्ती करेल ते बंद करिन.
आशू +१
आशू +१
साधारण कनिष्ठ महाविद्यालयीन
साधारण कनिष्ठ महाविद्यालयीन काळात मी अज्ञेयवादाकडे वळलो.
मी अज्ञेयवादी आहे.
मानला तर देव नाही तर दगड
मानला तर देव नाही तर दगड
हात आओ तो बुथ , हात न आओ तो
हात आओ तो बुथ , हात न आओ तो खुदा हो.
हात आओ तो बुथ , हात न आओ तो
हात आओ तो बुथ , हात न आओ तो खुदा हो.
चंदेपर जिये जाते हो, तुम एक गोरखधंदा हो.
(No subject)
हर्पेन, नास्तिकत्वाची फॅशन
हर्पेन, नास्तिकत्वाची फॅशन आहे तशी आस्तिकत्वाचीही असते.
आमच्याईथे एकेकाळी मंगळवारी गणपती मंदिरात एरीयातील छान छान पोरी यायच्या म्हणून पोरांची झुंबड उडायची.
त्यामध्ये एक मी सुद्धा असायचो. त्यामुळे मला बघायला काही पोरीही यायच्या.
आता यांच्यातून असली आस्तिक कसा ओळखावा?
शाळेत बाई म्हणाल्या , "खरा
शाळेत बाई म्हणाल्या , "खरा 'देव' कोणता? या विषयावर निबंध लिहा.
एका मुलाने निबंध लिहीला; - 'दगड'
'दगड' म्हणजे 'देव' असतो. कारण तो आपल्या आजुबाजुला सर्वत्र असतो. पाहिलं तर दिसतो
अनोख्या गल्लीत तो कुत्र्यापासुन अपल्याला वाचवतो,
हायवेवर गाव किती लांब आहे हे दाखवतो,
घरा भोवती कुंपण बनुन रक्षण करतो,
स्वयंपाक घरात आईला वाटण करुन देतो,
मुलांना झाडावरील कै-या व चिंचा पाडुन देतो,
कधीतरी आपल्याच डोक्यात बसुन भळाभळा रक्त काढतो आणि आपल्याला शत्रुची आथवण करुन देतो,
माथेफिरु तरुणांच्या हाती लागला तर, काचा फोडुन त्यांचा राग शांत करतो,
रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वतःला पहारीने फोडुन घेतो,
शिल्पकाराच्या मनातील सौदर्य साकार करण्यासाठी छिन्नीचे घाव सहन करतो,
शेतक-याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो,
बालपणी तर स्टंप, ठिक-या, लगोरी अशी अनेक रुपं घेऊन आपल्याशी खेळतो,
सतत आपल्या मदतीला धावुन येतो ' देवा ' सारखा,
मला सांगा कोणी करेल का आपल्यासाठी एवढं?
बाई म्हणतात तु 'दगड' आहेस. तुला गणितं येत नाही. आई म्हणते, "काही हरकत नाही, तू माझा लाडका 'दगड' आहेस. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्याने फायदा - तोटा बघितला असता. तो व्यापारी झाला असता."
आई म्हणते, " दगडाला शेंदूर फासून त्यात भाव ठेवला की, त्याचा 'देव होतो."
म्हणजे 'दगडच 'देव' असतो विषय संपला.
पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले राव.
(साभारः- वॉट्स अॅप)
ऋन्मेषसर तुम्ही (च) तर खरे
ऋन्मेषसर तुम्ही (च) तर खरे आस्तिक!
"नास्तिक" म्हणजे काय? तसे
"नास्तिक" म्हणजे काय?
तसे काही नसते हो. आपण म्हणू तसे आपण. वाटल्यास आज आस्तिक, उद्या नास्तिक! काय फरक पडतो? कोण येणार आहे आपल्यावर पाळत ठेवायला? कुणाला एव्हढा आपल्यात इंटरेस्ट आहे की आपण केंव्हा काय बोललो ते लक्षात ठेवतील?
तेंव्हा आपण आपले आपल्या मनात केंव्हा काय वाटते तेंव्हा तसे सांगावे - उगाच वाद कशाला?
इतरांना काय फरक पडतो आपल्या आस्तिक नास्तिक असण्याचा?
इतरांना काय फरक पडतो आपल्या
इतरांना काय फरक पडतो आपल्या आस्तिक नास्तिक असण्याचा?
>>>>
फरक पडतो. मी नास्तिक असूनही ईच्छा नसूनही उगाच हारफुलाची परडी सांभाळत तिच्यासोबत तासभर रांगेत उभे राहावे लागते.
मी नास्तिक असूनही ईच्छा
मी नास्तिक असूनही ईच्छा नसूनही उगाच हारफुलाची परडी सांभाळत तिच्यासोबत तासभर रांगेत उभे राहावे लागते.
यालाच अस्तिक म्हणतात रे बाबा, भक्ती दगडी देवाची थोडीच केली पाहिजे, माणसातल्या देवाची करता येते, तीला करू दे, तु तिच्यातल्या देवाची कर
हाकानाका
वॉव! प्रेम म्हणजेच आस्तिकत्व
वॉव! प्रेम म्हणजेच आस्तिकत्व .. काय सुंदर विचार आहे
vaibhavayare12345- पोस्ट
vaibhavayare12345- पोस्ट आवडली.
वॉव! प्रेम म्हणजेच आस्तिकत्व
वॉव! प्रेम म्हणजेच आस्तिकत्व .. काय सुंदर विचार आहे
होय आणि आस्तिकत्व म्हणजे प्रेम...
ऋन्मेषसर म्हणून तर तुम्हाला आस्तिक आहात असे म्हटले मी
>>वॉव! प्रेम म्हणजेच
>>वॉव! प्रेम म्हणजेच आस्तिकत्व .. काय सुंदर विचार आहे
येस, प्रेम ही भक्तीची पहिली पायरी आहे.
आठवा, मीरेची मधुरा भक्ती (ही ३ मुलींची नावे नाहीयेत)
जो किसी भगवान को नही मानता
जो किसी भगवान को नही मानता वो अपने बीवीसे क्या प्यार करेगा........ असे काहीतरी सुनावून माझी गर्लफ्रेंड लग्नाला नकार देतेय असे माझ्या डोळ्यासमोर आले
>>> होय आणि आस्तिकत्व म्हणजे
>>> होय आणि आस्तिकत्व म्हणजे प्रेम...<<< अगदी बरोबर हर्पेनजी...
श्रद्धाभाव नसेल, तर "प्रेमही" उद्भवु शकत नाही, अन मग प्रेमापोटी त्याग वगैरे फार दूरच्या गोष्टी...!
तेव्हा आम्ही दगडी देव मानित नाही /देवच मानित नाही वगैरे "गमजा" खरे तर कुणी मारू नयेत.
ती बेअक्कल पाजळवण्याचा मक्ता अन्निसनी घेतलाय त्यांनाच लखलाभ होवो.
माझ्या मता प्रमाणे देव मानने
माझ्या मता प्रमाणे देव मानने अथवा न मानने असे न करता देव अनुभवा,
'देतो तो देव' या भावनेने सगळीकडे पाहिल्यास तो सर्वत्र असल्याचा आपल्याला भास होईल.
उदाहरण बघायचे झाल्यास
हवे मुळे आपण जिवंत आहोत तिला देव माना तिची कृतज्ञता माना, तिचा आपल्यात वास आहे म्हनुन, नाहीतर तीचा वास नसेल तर बॉडीला वास यायला लागतो,
पाणी हे जिवन आहे, त्याच्या प्रति कृतज्ञता माना त्याला देव माना,
झाडांना देव माना.
जन्म झाल्यापासुन आता पर्यन्त ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली, चांगलं ज्ञान दिलं, उत्तम शिक्षा दिली अश्या आई, वडील, शिक्षक यांना देव माना.
ऋन्मेष जर नास्तिक पणाचा टेंभा मिरवतोय पण गर्लफ्रेंड बोलतेय म्हणुन परडी सांभाळत रांगेत उभं राहणे त्याला चालतंय, असंच प्रत्येकाचे प्रोब्लेम्स वेगळे असतात, काहींना घरुन, समाजा कडुनच तसा दबाव असतो, त्यामुळे ज्याला जमतंय त्याने आस्तिक रहा ज्याला नाही जमत त्याने नास्तीक व्हा, पण आपल्याला जमतंय म्हणुन सगळ्यांना जमेलच अथवा जमलंच पाहिजे असा हट्ट करणे चुकीचे आहे.
जर ऋन्मेष गर्लफ्रेंड रागवु नये म्हणुन असे करत असेल तर इतरांनी त्यांच्या घरचे, त्यांचा समाज रागवु नये म्हणुन आस्तिकपणा अंगिकारला तर ते चुकीचं का?
ऋन्मेषने त्याच्या गर्लफ्रेंड ला स्पष्ट शब्दात सांगावे की "मी हे मानत नाही, मी तुझ्या बरोबर रांगेत उभा राहणार नाही," आणि मगच इथे गमजा माराव्यात
Pages