Brain Rules
Brain Rules हे जॉन मेडिना या मूळ इंग्रजी पुस्तकाचे माझे भाषांतर नुकतेच प्रकाशित झाले आहे.
प्रकाशक आहेत साकेत प्रकाशन. हे न्यू यॉर्क बेस्ट सेलर आहे.
हे पुस्तक तुमच्या आमच्या सारख्या सामान्य वाचकांसाठी आहे, ( तुम्ही चेतापेशी शास्त्रज्ञ वा मानसोपचार तज्ञ नाहीत असे मी गृहित धरतो. सर्वसामान्यत: आपण वैद्यकीय वा मानसशास्त्रावरील पुस्तक विकत घेणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला जॉन मेडिनाचे हे आपल्या सारख्या वाचकांसाठी लिहिलेले पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल.
आपल्यातील बहुतेकांना आपल्या मेंदूत काय उलथापालथ होत असते हे मुळीच ठाऊक नसते. त्या मुळे प्रत्येक व्यावसायिक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना त्या बद्दल काय ठाऊक असलेच पाहिजे या वर संशोधन करून त्या बद्दल या पुस्तकात रोचक भाषेत विवरण केले आहे.
या पुस्तकात मेंदूच्या १२ नियमांचे विवरण केले आहे.
आपण कसे शिकतो? निद्रा आणि तणावाचा आपल्या मेंदूवर तसेच जीवनशैलीवर काय परिणाम होतो? आपण एखादी गोष्ट एवढ्या सहजासहजी कशी विसरू शकतो? पुरुष आणि स्त्रियांच्या मेंदूची जुळणी भिन्न असते असे म्हणतात ते खरे आहे का?
• हे पुस्तक मेंदूची रचना आणि आपली जीवनशैली, याची शास्त्रोक्त आणि संशोधनावर आधारित वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे वाचकाशी संवाद साधून भेट घडवते.
• लेखक मेंदूविज्ञान तसेच मानसशास्त्र व रेणुविज्ञान यातील प्रतिथयश शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक आहेत.
• शरीर विज्ञान शास्त्रातील, मेंदूशी निगडित महत्त्वाच्या व अत्यंत विद्वत्ताप्रचुर संशोधनाची अत्यंत मनोरंजक, विनोदी शैलीत मांडणी या पुस्तकात केलेली आहे.
• मेंदू आणि व्यायाम यांचा अन्योन्य संबंध,मेंदूची आणि मानवाची परस्परावलंबी समांतर उत्क्रांती,एकाग्र होणे म्हणजे काय,स्मरणशक्ती व स्मृती या दैनंदिन स्वभाव-वैशिष्ट्याची उकल, निद्रा आणि शारिरिक व मानसिक स्वास्थ्य यांचा थेट परस्पर संबंध, दृष्टि म्हणजे काय या व यासारख्या असंख्य अन अद्यापि बहुतेकांसाठी अतर्क्य असणार्या बाबी या पुस्तकातील अत्यंत आकर्षक लेखनातून उलगडतात.
• जीवनात कुतुहल म्हणजेच चिरतारुण्याचा मार्ग कसा या बद्दल विवरण करण्यात आले आहे.
• आपल्या संपूर्ण हयातीत मेंदूचे साम्राज्य कशा प्रकारे आपले नियम प्रस्थापित करते याचे विवेचन.
• वृध्दापकाळातील अल्झायमर सारख्या व्याधी का होतात याचे सोप्या शब्दात विवेचन.
संभाव्य वाचक व श्रोतृवर्ग
• विद्यार्थी, व्यावसायिक
• जिज्ञासू ज्ञानपिपासू वाचक
• मानसशास्त्रज्ञ
-चिकित्सक
• सामान्य सुशिक्षित वाचक
• स्वास्थ्य क्षेत्रातील व्यावसायिक
या पुस्तकाचा अनुवाद करतांना - मी मानस शास्त्राचा व न्युरोसायन्सचा विद्यार्थी नसल्याने अनेक आव्हाने निर्माण झाली. प्रत्येक फंक्शन समजावून घेण्यासाठी तज्ञ डॉक्टरांना भेटावे लागले आणि त्या मुळे खूप शिकता आले.
जिज्ञासू मायबोलीकरांनी संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक.
मित्रहो व मैत्रिणींनो --- कि
मित्रहो व मैत्रिणींनो --- कि मित्रों असे लिहू !!!! ( असं लिहायला भिती वाटते सध्याच्या संदर्भात
}
धन्यवाद
कुरुडी : शक्यतो दोन्ही वापरल्या आहेत परंतु सातत्याने काही पाने वाचल्यावर मराठी संज्ञांची सवय होते
सचिन : सविस्तर उत्तर लौकरच लिहितो.. हे पुस्तक करायला २४ महिने लागले.... मर्यादा... मी मेकॅनिकल इंजिनियर आहे.... इ. इ.
सोन्या बापू : इथे मिळेल
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%AC%E0%...
परंतु
Currently not in stock but we will collect it in 3-5 working days from the Publisher provided it is not out of print.
अथवा मी कुरियरने रु २७५ + कुरियर चार्ज नुसार पाठविन. ( मूळ किंमत रु ३२५ आहे)
स्तुत्य! अभिनन्दन!
स्तुत्य! अभिनन्दन!
अरे वा ,ग्रेट.बुकगंगावर आहे
अरे वा ,ग्रेट.बुकगंगावर आहे का?
अरे वा! अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
छान
छान
अभिनंदन! वाचायला नक्कीच
अभिनंदन! वाचायला नक्कीच आवडेल!
रेव्युजी काल मी लिॅक दिली
रेव्युजी काल मी लिॅक दिली तेव्हा बुकगंगाने माझी ऑर्डर not in stock असे काही न दाखवता स्विकारली.
बघुया आज डिस्पॅच केल्याचा मेसेज येतो का ते.
अन्यथा कॅन्सल करुन तुमच्या कडुन कुरियरने मागवेन.
व्वा..अभिनंदन.पुस्तक नक्की
व्वा..अभिनंदन.पुस्तक नक्की वाचुन इथे लिहणार.
अभिनंदन रेव्यु..
अभिनंदन रेव्यु..
अभिनंदन रेव्यु
अभिनंदन रेव्यु
अभिनंदन रेव्युजी!
अभिनंदन रेव्युजी!
अभिनंदन रेव्युजी.!
अभिनंदन रेव्युजी.!
अभिनंदन रेव्यु!
अभिनंदन रेव्यु!
सर्वांना धन्यवाद... वाचून
सर्वांना धन्यवाद... वाचून अभिप्राय कळ्वावा ही विनंती
आज मिळालं पुस्तक
आज मिळालं पुस्तक बुकगंगेकडुन.
वाचून अभिप्राय कळवेन.
खूप छान पुस्तकाची निवड केलीय
खूप छान पुस्तकाची निवड केलीय तुम्ही अनुवादीत करण्यास.
मी मूळ पुस्तक वाचलेले नाही. तुम्ही अनुवादीत केलेले वाचतोय.
आणि हे पुस्तक सामान्यांनासाठी आहे असे म्हटले तरी या सगळ्या गोष्टी आम्हा सामान्यांना सहज समजावून सांगण्या इतपत सोप्या नाहीत,
(मग पुस्तकाची भाषा कुठलीही असो), असे जाणावले.
आणि अशा पुस्तकाचे अनुवादन करणे अर्थातच सोपे नाही!
तुम्ही ते खूप चांगल्या रितीने केलेय असे माझे प्रामाणिक मत आहे.
न्युरोप्लास्टिसीटी, मानवी मेंदुची उत्क्रांती , झोपेच्या अवस्था, स्मरणशक्ती वाढवण्याच्या युक्त्या वगैरेंची जुजबी माहिती होती.
पण हे पुस्तक वाचून हा विषय केवढा गहन असू शकतो याची कल्पना आली. व्यक्ती तेवढे ब्रेन मॅप्स हे वाचून (आणि त्यावर कसे संशोधन केले हे वाचून) स्तंभीत व्हायला होते.
आणि झोप का आवश्यक, झोपेत मेंदुत काय चालते हे वाचून विश्वासच बसत नाही.
तसेच बुद्ध्यांकाबद्दल बदलेले मत.. वगैरे...
दुर्दैवाने पूर्ण होण्यापूर्वीच प्रवासात मी ते पुस्त्क हरवले (त्यालाही दोन/तीन आठवडे झाले), आणि पूर्ण वाचू श़़कलो नाही.
तो पर्यंतचा हा प्रसिसाद.
एक सांगावेसे वाटते. तुम्ही बर्याच शास्त्रीय संज्ञांचे अनुवादन करुन सोबत इंग्रजी संज्ञासुद्धा देवनागरीत दिल्या आहेत.
त्या इंग्रजी अल्फाबेट मध्ये द्यायला हव्या होत्या, असे काही ठिकाणी जाणवले.
कुमारवय ते पुढील सगळ्यांनी आवर्जुन वाचावे असे पुस्त्क आहे, असे माझे मत.
मनःपूर्वक अभिप्राय!
मनःपूर्वक धन्यवाद..... अभ्यासपूर्ण विवेचन!
हे पुस्तक आणखी कोणी वाचले
हे पुस्तक आणखी कोणी वाचले असल्यास अभिप्राय जरूर कळवावा ही विनंती!
>>>> अथवा मी कुरियरने रु २७५
>>>> अथवा मी कुरियरने रु २७५ + कुरियर चार्ज नुसार पाठविन. ( मूळ किंमत रु ३२५ आहे)
Can I still get this book from you, if I send my details? I can even transfer the amount by NEFT, if you provide me details.
नक्की
नक्की
बिन्डोक ... प्लीज वि पू पहा
बिन्डोक ... प्लीज वि पू पहा
रेव्यु, आत्ताच रक्कम
रेव्यु, आत्ताच रक्कम ट्रान्स्फर केली आहे, तसेच संपर्कातून पत्ता कळविला आहे. आपल्या सवडीप्रमाणे पुस्तक पाठविणे ही विनंती.
रेव्यु, आत्ताच रक्कम
डब्बल पोस्ट
बिंडोक : पत्ता मिळाला नाही
बिंडोक : पत्ता मिळाला नाही.पैसे मिळाले. कृपया त्वरा करा
सम्पर्कातुन इमेल पाठविली होती
सम्पर्कातुन इमेल पाठविली होती, ओउपुन्हा पाठवतो
सम्पर्कातुन इमेल पाठविली होती
सम्पर्कातुन इमेल पाठविली होती, ओउपुन्हा पाठवतो