रतनगड

Submitted by शुभम एडेकर on 30 December, 2016 - 10:45

रतनगड..... डिसेंबर महिन्यातला हा माझा पाचवा ट्रेक आणि ह्यामुळे हा महिना कधी संपला हे कळलच नाही. दर्शन दादा ह्या वर्षीचा शेेवटचा ट्रेक प्लॅन करत होता अणि तोही कॅम्पफायर वाला, पण कधी ते नक्की नव्हत. अखेर तारीख नक्की झाल्याचा मॅसेज आला. बहुतेक ख्रिसमसच्या सुट्टीची संधी साधत तारीख ठरवली होती. शनिवारी 24 तारखेला सकाळी 8.17 ची कसारा ट्रेन पकडायची होती. ट्रेकला जाण्याचा हावरटपणा जरा जास्तच नडला मला कारण मी मोबाईल मध्ये सकाळचा कोंबडा लावायचा विसरून गेलो होतो. शेवटी जाग आली ती ७.४५ ला. आता गेर टाकण्याषिवाय पर्याय नव्हता. इतक्यात ८ वा. दादाचा फोन आला की दोघांची ट्रेन सुटली होती आणि तेव्हा कुठे जिवात जीव आला की आता थोडा ओरडा कमी बसणार. गाडी पकडण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण शेवटी मागे राहिलेल्या दोघांबरोबर जाण्याचच नशिबात होत. आता गाडी होती ती थेट दोन तासांनी आणि तीही आली अर्धातास लेट. ११.३० ला आम्ही तीघजण कसारा स्थानकात पोहचलो. दर्शनदादा ला नेहमीप्रमाणे गृप ला सोडुन मागे थांबाव लागल होत. अकोला बसने आम्ही शेंडी गावापर्यंत आलो. पुढे आलेल्या गृपने मधल्या वेळेत खाण्याची जरा जास्तच मजा केली अस कानावर पडल पण चुकी शेवटी आमचीच होती. आता आमच्या सेवेत येणार होती एक टेम्पो. या टेम्पोतला १५ किमी चा प्रवास रबर सारखा ताणतच होता.
1.jpeg
भर उन्हात आम्ही रतनवाडीत उतरलो आणि जेवणाप्रमाणे न्याहारी करून घेतली. रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावं आहे. या रतनवाडीतच अमृतेश्वराचे महादेवाचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या चहु बाजुंनी असलेली नक्षीदार शिल्प मन मोहुन टाकणारे होते.
2.jpeg
श्री अमृतेश्वराचे दर्शन घेत वरती जाउन टेंट लावण्यासाठी आम्हा पाच जणांचा गृप आधी निघाला.
5.jpeg
बराच पुढे गेलो आणि विज पडावी तसे वासु दादाचे तीन शब्द कानावर पडले ‘माचिस’ ‘माचिस’ ‘माचिस’. आता काय कराव हे सुचेना. मोबाईलला नेटवर्क नाही आणि तसच वरती गेलो आणि माचिस नसली तर त्या कुडकुडणार्या थंडीत उपाशी रहाव लागणार. आता शंकेच निरसन कराव तरी कस. शेवटी वासुदादाची परमिशन घेउन मी पाठी फिरलो आणि धावत धावत दर्शन दादापाशी आलो. दर्शनदादा धीर देत बोलला की तुम्ही नेलेल्या माझ्या बॅगेत लायटर आहे. एका शंकेच निरसन करण्यात माझी बरीच एनर्जी वाया गेली होती. मी परत पुढच्या गृपला जाॅईंट होत चढाईला सुरवात केली. जाता जाता वासुदादा त्याच्याकडे असलेल अफाट ज्ञान आमच्या डोक्यात ओतत होता.
4.jpeg
अंधार पडायच्या आत आम्ही बेसकॅम्पच्या जागी पोचलो होतो. जागा साफ करून तिथे फ्लेक्स अंथरला, तोपर्यंत मागच्या गृपला घेउन दर्शन दादाही तिथे पोहचला. वासुदादा आणि दर्शनदादाच्या बॅगमधुन एखाद्या गोडाउन प्रमाणे वस्तु निघत होत्या. आम्ही सगळ्यांनी मिळुन टेंट उभा केला.
6.jpeg
लाकड जमा करून कॅम्पफायर चालु केला. चहाच्या बॅग खोलुन चुलीवर चहा उकळत ठेवला. गुलाबी थंडी, पक्ष्यांचा गलबलाट, रतनगडच्या कुशीत, कॅम्पफायरच्या उजेडात, 11 जणांसोबत हातात आलेला गरमागरम चहा. यासारखी संध्याकाळ कुठल्याच दुकानात विकत मिळणार नाही.
7.jpeg
आता वाढत चाललेली भुक सतावत होती. जेवण होईपर्यंत पापड भाजुन खाण्याव्यातिरीक्त पर्याय नव्हता. भरपुर वेळांनी ताटात आलेला विकासदादाच्या हातचा पुलावभातावर सगळ्यांनी चांगलाच हात मारला.
8.jpeg
पोटभर जेवण झाल्यानंतर आता थंडीची मजा घ्यायची वेळ होती. आम्हाला लागलेली लकी ड्राँ म्हणजे आश्विनी ताई. आश्विनी ताई इतक वेगळवेगळ खायला देत होती की पहिल्यांदा कुठल्या तरी ट्रेकला आम्ही एवढे पदार्थ खाले होते. चुलीवर आपले हात शेकत सगळ्यांच्या गप्पा-गोष्टी चालु होत्या. आता वेळ होती एक संगीतमय वातावरण करण्याची. अक्षयदादा आम्हाला माउथ आॅरगन वाजवून दाखवणार होता. अक्षयदादाी भैरवगडला माझी पहिली ओळख झाली होती पण पहिल्या भेटीत त्यांने आपले सगळे रंग नव्हते दाखवले. आता कुठे तो आपला एक-एक रंग दाखवत होता. त्याने आमच्या समोर त्याची एक सुंदर कला ठेवली ती म्हणजे माउथ आॅरगन. तस तो म्हणत होता की मी अजुन शिकतोय पण त्याने माउथ आॅरगन इतकी सुरेख वाजवली की मन अगदी प्रसन्न होउन गेल.
9.jpeg
रात्रीचे बारा कधी वाजले हे कळलच नाही सगळ्यांच्या पापण्या लवत चालल्या होत्या. दर्शन दादा आणि वासु दादा बाहेरच झोपणार होते. आणि आम्ही पाच जणांच्या टेंटमध्ये 7 जण झोपणार होतो. 'ए जरा तिकडे सरकना' करत सगळे कसेबशे अॅडजेस्ट झाले. संपूर्ण ट्रेक मध्ये नावजलेला आपल्या गोरगोमट्या रंगाने गाजलेला रोहित दादा दोन मिनीटात झोपला आणि घोरायला ही लागला. दुर्दैवाने मी त्याच्या बाजुलाच झोपलो होतो. याआधी कधीच कुठल्या घोरणार्याच्या सानिध्यात झोपला नव्हतो. त्यामुळे मला जरा जास्तच त्रास होत होता. अर्धातास कसतरी त्रास सहन केला आणि टेंटच्या बाहेर निघालो आणि आतुन आवाज आला की जागा असेल तर मलापण आवाज दे. मी वासुदादच्या आणि विकास दादा दर्शनदादाच्या बाजुला झोपलो. पण रोहीतदादा मुळे मला चांदणात न्हात असलेल्या आकाशाकडे बघत झोपण्याची संधी मिळाली. ४ वाजता कोणाच्या तरी कोंबड्याने शेवटी उठवलच त्यात वाढत चालेलेली थंडीही सतावत होती. वासुदादाही उठला आणि आम्ही शेकोटी पेटवली. आम्ही आ वासुनच होतो हे वासुदादाला बघवल नाही आणि त्याने परत त्याच्याकडे असेलल ज्ञान आच्या डोक्यात ओतायला सुरवात केली. ५.३० वाजता मी परत झोपलो. ७ वाजता जाग आली आणि परत थंड पडलेले पाय शेकोटी वर गरम केले. सर्व नैसर्गिक कार्यक्रम आवरते घेतले. आता चुलीवर शिजत होती काॅफी. काॅफी झाली, नाष्ता झाला, आणि किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. वासुदादा बेसकॅम्प जवळ थांबणार होता त्यामुळे बॅंगेच लोंढ पाठीवर घ्यायची गरज नव्हती.
10.jpeg
अर्ध्या तासातच आम्ही शिड्या संपल्यानंतर लागाणार्या बालेकिल्ल्याजवळ आलो. तिथे दोन अद्भुत शिल्प कोरलेली पहायला मिळाली.
11.jpeg12.jpeg13.jpeg14.jpeg15.jpeg16.jpeg
पूढे जाउन बहुप्रचलित असलेल्या सेल्फी पाॅईंट म्हणजे बुरूजावर गेलो तिकडे फोटोग्राफी चांगलीच रमली.
17.jpeg18.jpeg19.jpeg
तिथुन दिसणारी घनचक्कर रांगेची सरळ उभी असलेली भिंत काळजाला भिडणारी अशी होती. बुरूजानंतर रतनादेवीचे गुहेतील मंदीर मन अगदी प्रसन्न करते. मंदिराच्या पुढे २५ ते 30 जण आरामात झोपतील एवढी मोठी गुहा आहे आणि त्या गुहेसमोरून दिसणारे भंडारदरा धरणाचे पाणी नजरेच्या पलिकडे जात होते. भंडारदराच्या बाजुलाच महाराष्ट्रातील कळसुबाईचे सर्वात उंच शिखर हळुच डोकावत होते. डोळ्यांना भारावून टाकणार नयनरम्य दृष्य पाहुन आम्ही निघालो रतनगडावर सगळ्यात उंच असलेल्या नेढ्याजवळ. कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे खरच खुप सुंदर आहे.
20.jpeg
इथुन अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा हा सर्व परिसर डोळ्यांना दिसण्यार्या अंतरावर आहेत. इथुन दिसणारी सह्याद्रीची अवाढव्य रांग, दरी, उंच उंच सुळके अजुन खुप काही बघण्यासारखे आहे.
27.jpg
पाण्याच्या टाक्यांनी तर संपूर्ण किल्ल्याला दागदागीन्यांप्रमाणे नटवले आहे.
21.jpeg22.jpeg23.jpeg24.jpeg25.jpeg26.jpeg27.jpeg28.jpeg
संपूर्ण किल्ला अगदी मनसोक्त फिरून आम्ही किल्ला उतरायला सुरवात केली. साधारण अर्ध्या तासातच आम्ही आमच्या बेसकॅम्प जवळ पोचलो. तिकडे जाउन पाहतो तर वासुदादा नेहमीप्रमाणे काहीन काही काम करतच होता.
29.jpeg28.jpg30.jpeg31.jpeg
थोडीशी पोटपुजा करून आम्ही बेसकॅम्प जवळुन निघालो. मी आणि आश्विनी ताई सगळ्यात पुढे होतो. आम्ही दोघही सगळ्यांच्या अर्धा तास आधी पोहचलो. वाटेत ओढ्याच अडवलेल्या पाण्यात आम्ही मनसोक्त पाणी प्यायलो. सगळे खाली उतरल्यावर लिंबु सरबत पिउन मन शांत केले. रतनवाडीहून शेंडीपर्यंत जाण्यासाठी आम्ही खाजगी गाडी केली. येताना टेम्पोत आलो असल्याने आम्हाला बाहेरच काही बघायलाच मिळाल नाही. आता मात्र सगळ बघायला मिळणार होत. भंडारदरा धरणावर पडणारे रतनगडच्या खुट्टयाच्या मागुन डोकवणार्या सुर्यदेवाचे किरण..... हे मनमोहक दृश्य पाहुन तर अगदी पैसे वसुल झाल्याचा फील येत होता. शेंडीत पाय टेकले आणि मोबाईल ला नेटवर्क आले आणि मॅसेजवर मॅसेज येउ लागले. तिथल्या दुकानदारांकडून माहिती मिळाली की साधारण ६ वाजता कसारा बस येते. आम्ही चातकासारखे त्या बसची वाट पाहत होतो. बस तिच्या वेळेवर आली सुध्दा पण आपला कोटा पूर्ण करत. बस मध्ये पाय ठेवण्याइतकीही जागा नव्हती. गर्दी पाहुन व कंडक्टरशी थोडी चर्चा करत आम्ही मागे फिरलो. आम्हाला परत खाजगी गाडी करावी लागणार होती. एक सफारी गाडीवाल्याची बोलणी केली आणि तो आम्हाला घेउन कसर्याला निघाला. ६.१५ ला आम्ही निघालो. ८.१५ ची सी.एस.टी. गाडी होती पण आम्ही पोचु की नाही यात शंकाच होती. आम्ही पोचलो आणि गाडीतुनच कसार्याहुन सी.एस.टी. कडे निघालेल्या गाडी कडे सर्वजण पाहत होतो. २ मिनीटांसाठी आमची गाडी गेली होती. अजुन १ तास थांबाव लागणार, त्यावेळेत दर्शनदादाने गरम गरम समोसे आणले. समोसे तेलात तळले होते की तेलच आणल होत आणि त्याच्यात चुकन समोसा आला होतो हे काही समजत नव्हत असो ‘तुका म्हणे त्यातल्या त्यात मिळेल ते घाल ............’. अस म्हणत तो समोसा कसातरी खाल्ला. आता प्रत्येक ट्रेक प्रमाणे प्रत्येकाच्या प्रतिक्रया येणार होत्या. प्रत्येक जण दर्शनदादा आणि वासुदादाच खुपच कौतुक करत होते आणि खरच त्या दोघांमुळे या ट्रेकचा आनंद द्विगुणीत होतो. माझ्यावर ही प्रतिक्रीया देण्याची वेळ आली पण कमी बोलण्याची सवय तिथेही नडली आणि मी जे काही सांगायचय ते ब्लाॅग लिहुन सांगेन अस सांगुन मी माझा प्रतिक्रीया संपवली. ट्रेन मधुन सगळ्यात पाहिले मीच उतरणार होतो. सगळ्यांना टाटा-बाय करत मी माझया घरी पोचलो पण अजुनही मनात रतनगडच होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटली....!! मला पण ट्रेक चा खुप मोठा नाद होता...!! दरवर्षी किमान ३ वेळा तरी आम्ही ट्रेक ला जायचो...., पण....., २ वर्षापुर्वी एका ट्रेकमध्ये मी माझा एक मित्र गमावला...!! त्यावेळे पासुन कोठेही ट्रेकला जावेसे वाटत नाही...!!! Sad

छान..