रात्र काळोख्याची

Submitted by Dipak gosavi on 25 December, 2016 - 03:35

००००० रात्र काळोख्याची ०००००
रात्री मुक्कामाला येणारी बस पहाट झाली तरी आजुन आली नव्हती. गावातील लोकांनी शोधा-शोध केल्यावर त्यांना ४ कि.मी च्या अतंरावर ती बस बंद अवस्थेत आढळुन आली.गावकर्यानी बस मधील चालक व वाहकाला नजीकच्या हॉस्पिटल मध्ये नेले.डॉक्टरांनी वाहकाला मृत घोषीत केले.त्यांचा मृत्यु ह्रदयाच्या तीव्र झटक्याने झाला होता.तर चालक बेशुद्ध अवस्थेत होता.दोघांच्याही शरिरावर कुठल्याही जखमा नव्हत्या.चालकाची अवस्था खुपच गंभीर झाली होती.शुद्ध आल्यावर त्याला त्याच्या घरी आणण्यात आले.तो त्याच गावाचा होता,म्हणुन त्याला बरे वाटल्यावर गावकरी त्याला भेटण्यास गेले.
गावातील जेष्ठ असलेले सुभाष काका राम्याच्या जवळ आले.
सुभाष काका:- ''काय रे राम्या अस काय घडल की तुझी अवस्था अशी झाली''
सुभाष काका बोलले आणि राम्याच्या चेहर्यावर एक विलक्षण भीती दाटून आली.संपुर्ण अंगावर काटा उभा झाला.तो काही बोललाच नाही.
सुभाष काका पुन्हा बोलले.
''अरे घाबरू नकोस,आम्ही इथे सर्व आहोत,बोल''
आता राम्याला थोडा धीर आला होता.त्याने स्वताला सावरून बोलण्यास सुरूवात केली.
सर्व गावकर्यांच्या चेहर्यावर उत्सुकता होती.सर्व राम्याच्या तोंडाकडे बघत होते.
राम्या बोलत होता.
        ''त्या रात्री आमची बस ८.3० च्या सुमारास घाटावरुन जात होती.त्या
दिवशी अमावस्या असल्याने अंधार जरा जास्तच होता.रात्रीची वेळ असल्याने
प्रवासी कोणी ही नव्हते.बस घाटातुन जात असल्याने मी बस हळुच चालवत
होतो.घाटातील झाडीतुन मध्येच शरीरावर काटा आणणारा कोल्हेकुईचा भयाणक आवाज
येत होता.वाहक जगताप आिण मी दोघे बोलत होतो.
मी:- ''अरे जगताप आज माहिती आहे ना काय आहे?''
जगताप:-''आज? काय आहे?''
मी:-''अरे आज अमावस्या आहे!''
जगताप:-''अमावस्या???''
मी:-''अरे घाबरला का?''
जगताप:-''नाही रे मी नाही घाबरत!
अमावस्या असली म्हणुन काय झाल?कुठ लगेच भुत येणार आहेत.
मी:-''अरे भुताच नाव काढू नकोस! मी याच भागातला आहे आणि मला माहिती आहे
कि अमावस्याच्या रात्री भुत, पर्थ्या(पुरूष भुत), हडळी निघतात म्हणुन,आणि
त्यांच नाव काढल्यावर ते येतात!
जगताप काहीच बोलला नाही,कदाचीत तो वरून धडधाकट होता पण मनातुन घाबरट
होता. मी ही विषय बंद केला.
बस हळुवार चालू होती. गाव येण्यास ४-५ कि.मी बाकी असतील.तेव्हा कोणी तरी
हात देऊन बस थांबवताना दिसले.ती एक म्हातारी आजी बाई होती.
बसच्या उजेडात ती दिसत होती.मी बस थांबवली.ती बसच्या दरवाज्याजवळ आली.खुप
म्हातारी जरी वाटत असली तरी चालताना ताठ चालत होती.ती दरवाज्या जवळ येताच
झाडीतुन एक भयाणक कोल्हेकुई झाली.त्या आवाजाने सर्वांगावर शहारे उभे
झाले.ती म्हातारी आत येताच बस मधील वातावरणच बदलून गेले.बसच्या सर्व
खिडक्या बंद होत्या.आम्ही दोघांनीही स्वेटर घातलेले होते तरी ती म्हातारी
येताच आम्हा दोघांना कडकडून थंडी वाजु लागली.मी आरशातुन मागच बघत होतो.मी
बस पुन्हा सुरु केली.
     ती म्हातारी आत आली आणि थेट बसच्या शेवटच्या सिटावर जाऊन बसली.
     जगताप ने माझ्याकडे वळुन बघितल आिण तो पुन्हा म्हातारीकडे वळुन
वैतागल्यासारखा बोलला.
      ''अहो आजीबाई,तुम्ही पुढे बसायच सोडून माग जाऊन बसल्या! आता मला
टिकीट काढण्यास तेथे यावे लागेल!
    म्हातारीने एक रागाचा कटाक्ष जगतापकडे टाकला.आणि ती क्रुर हास्य करू
लागली .तीच ते हसण खरच खुप भयाणक होत.त्या विचीत्र हास्याने जगताप खुपच
घाबरला होता. मी आरशातुन सर्व काही बघत होतो. त्या अमावस्याच्या काळोख्या
रात्री तीच हसण त्या भयाणक वातावरणात आणखीच भर घालत होते.
ती म्हातारीने हसु थांबवुन बोलली.
   ''अरे बाळा तु कशाला त्रास करून घेतोस.तुला येथे येण्याची काहिही
आवश्यकता नाही.मीच येते ना तेथे!'
    ती असे बोलुन जोरजोर्यात हसु लागली.ती उभी राहिली.बसची लाइट अचानक
बंद चालू होऊ लागली. ती पहिल्या पेक्षा अधिकच भयाणक दिसु लागली.खिडक्या
बंद असताना देखील बस मध्ये जोर्याचा वारा वाहू लागला.त्या वार्याने
म्हातीरीचे केस उडत होते आणि त्याच्याने ती आणखीच भयाणक वाटू लागली.
        म्हातारीने तीचे दोन्ही हात जगतापकडे केले.ती  जागेवरच उभी होती
पण तीचे हात जगतापच्या दिशेने झपाट्याने येत होते.
     मी बसला ब्रेक लावला.जगताप थरथरत होता. आजुबाजुच्या झाडीतुन
कोल्हेकुईचा भयाणक आवाज येत होता.
  म्हातारी हसता-हसता बोलत होती,
   ''घे बाळा पैसे घे, घे ना ! घाबरू नकोस घे !
       हे दृष्य बघुन,माझ्या तळपायापासुन एक भीतीची लहर थेट मेंदूपर्यंत गेली.
     जगताप जागच्या जागी थिजला होता.त्याने एक जोर्याची किंचाळी फोडली
आणि छातीवर हात ठेवून थेट खाली कोसळला.
     त्या म्हातारीचा हात आता माझ्या दिशेने येऊ लागला.मी ही समोरचे
दृष्य बघून चागच्या जागीच बेशुद्ध झालो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा
दवाखान्यात होतो.
   राम्या बोलायचा थांबला.
सगळे गावकरी राम्या कडेच बघत होते. सगळे शांत होते.सुभाष काका बोलले,
      ''अरे राम्या देवाची कृपा म्हणुन वाचलास रे बाबा. वाचलास या बद्दल
देवाला धन्यवाद कर.''
राम्यानेही हात जोडून देवाला धन्यवाद कले!
--------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाबरलो ना राव>>>>+१११११११११११११११११
पण पुढे काय??

ashu patil
पुढे काय झाले?>>>>>>
पुढील कथा अपडेट केली आहे.

पुढे काय झाले?>>>>>>

पुढील कथा अपडेट केली आहे.????
नवीन कथा अपडेट केली का?
लिंक पाठवा plz

पुढे काय झाले?>>>>>>
पुढील कथा अपडेट केली आहे.>>>>तुम्हीच बोलतात ना कि अपडेट केली,मग संपली कशी काय ???