Submitted by सिम्बा on 21 December, 2016 - 23:25
थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.
,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
नोटांच्या दुष्काळावर मात करायला पेटीम, किंवा इतर wallet 2वापरायचा प्रयत्न म्हणजे एका जास्तीची गैरसोय ठरला आहे, (वृद्ध, अशिक्षित, स्मार्ट फोन नसणारा वर्ग)
या व अशाच गैरसोयी चा ट्रॅक ठेवण्यासाठी हा दुसरा धागा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.aksharnama.com/cli
http://www.aksharnama.com/client/article_detail/326
सिम्बा, २००० प्रतिसादांकरिता
सिम्बा, २००० प्रतिसादांकरिता अभिनंदन!
आता बँक ऑफ बरोडा मधे गेलो
आता बँक ऑफ बरोडा मधे गेलो होतो. २००० च्या नोटा स्विकारण्यासाठी एकाच काउंटरला जाण्यासाठी सांगत होते कारण एकच मशिन २००० च्या नोटेचा खरेपणा तपासुन पाहु शकते. इतर बँकांची स्थिती ठाउक नाही.
आमची धाकटी परवा ग्रामिण भागात
आमची धाकटी परवा ग्रामिण भागात म्हणजे "लातुरला"
गेली होती
तर तिला ८ नोव्हेंबरपासुन आजवर इकडे पिंचिमध्ये एटिएमवर पैसे मिळाले नव्हते, तिलाच काय? मी पण गेल्या दीडेक महिन्यात एटीएमचे तोंड बघितले नाहीये.
तर मुद्दा काय, की लातुर मध्ये एटीएमना गर्दी नव्हती, तिला लगेच पैसे काढता आले. नोटा २००० च्या गुलाबोच होत्या, पण काढता आले.
त्याउलट इकडे पिंची.... निवडणूका जवळ आल्यात इकडच्या... तेव्हा पाणीटंचाई सुरु केलीये आत्तापासुनच...
दर निवडणूकीआधीचा अनुभव आहे हा.... आपली "किंमत" दाखवुन द्यायला (इकडचा) "सत्ताधारी" जमाव, ठरवुन टंचाया निर्माण करतो.
नोटाबंदीबाबतही तसेच......
इतर शहरे/गावांच्या तुलनेत, कामगार/बहुजन बहुल असलेल्या पिंचीवर कायमच अन्याव होत आलाय.... याला वाचा फोडलीच पाहिजे
फोड ..... सगळीकडे सत्तेत
फोड ..... सगळीकडे सत्तेत भाजपाच आहे.... जाउन विचार त्याना
>>> सगळीकडे सत्तेत भाजपाच
>>> सगळीकडे सत्तेत भाजपाच आहे.... जाउन विचार त्याना <<<<
जीके सुधरवा हो तुमचं ..... पिंची मध्ये बीजेपी सत्तेत नाही....... पींचीमधे दूर दूर तक बीजेपी का कोई नामोनिशाण नही......
पण हां, आताचा म्युन्शिपालटी निवडणूकांचा ट्रेण्ड बघता इकडे बीजेपी दखल घेण्याइतपत येऊ शकेल असे वाटतय...
लातुरमध्येच काय आमच्या
लातुरमध्येच काय आमच्या बहामनीतही दोन हजारच्या गुलाब्बो देणार्या एटीएमांना कुणी हिंग लावून विचारत नाही.
मीच परवा (म्हणजे शनिवार रवीवार )लातूरला जाऊन आले.
ब्यान्क पोस्टावर मुन्शिपलची
ब्यान्क पोस्टावर मुन्शिपलची सत्ता चालते का ? जीके वाढवा
http://www.business-standard.
http://www.business-standard.com/article/economy-policy/demonetisation-m...
आमच्या उत्तर मुंबैतल् एया
आमच्या उत्तर मुंबैतल् एया बोरिवलीतही एटीएमचं शटर चुकून खुलं दिसलं तरी तिथे शुकशुकाट आहे. अंबानींनी फुकट जियो मार्च २०१७ पर्यंत ताणलं, तसंच मोदीकाका १ जानेवारीला २००० ची नोटच रद्द करतील म्हणून कोणी बघेना तिच्याकडे.
गेल्या आठवड्यात मला बँकेतून
गेल्या आठवड्यात मला बँकेतून दहा हजार रूपये मिळाले होते. आता घरात समारंभ असल्याने दोन तीन दिवस सलग दहा हजार हवेत. बँकेने द्यायचे कबूल केले आहे. माझा प्रश्न मिटला.
मुंबईत रिक्षावाले काय
मुंबईत रिक्षावाले काय म्हणताहेत ? त्यांचा पण धंदा बसला असेल. पे टी एम वगैरे त्यांना जमणारे नव्हतेच.
माझेच उदाहरण घ्या, काही कारणास्तव मला कुर्ला पूर्व ते मरोळ पर्यंत ३/४ वेळा जावे लागले. घराजवळून रिक्षा पकडली, तर त्यानेच सांगितले नव्या फ्लायओव्हर पेक्षा घाटकोपरहून जाऊ, जवळ पडेल. ३ वेळा तसेच गेलो. २०० रुपयांच्या आतच मीटर व्हायचे पण सोयीचे होते. मग हे असे झाले.
मग मी कुर्ला स्टेशनपर्यंत चालत, मग घाटकोपर पर्यंत रेल्वेने तिथून मरोळ पर्यंत मेट्रोने आणि तिथून परत चालत.
अर्धा पाऊण तास जास्तीचा. पण पैसे वाचले. पैसे वाचले पण ते माझे हो, रिक्षावाल्याचे काय ?
त्यांचा पण धंदा बसला
त्यांचा पण धंदा बसला असेल>>>>>> नाही दिनेशदा,मुंबईत टॅक्सी, रिक्षावाले व त्यांची गिर्हाईके यांच्यात तीच गर्दी तसेच व्यवहार,मुजोरपणा चालू आहेत.
आताच एका क्लाएंट्कडुन आलो.
आताच एका क्लाएंट्कडुन आलो. ऑर्डर घेऊन काउंटरवर फास्टफूड डिलिव्हर करण्याचा व्यवसाय सुरु केलाय.. म्हणजे २ महिने सगळं इन्फ्रा उभारण्याचं काम सुरु आहे. सोमवारपासुन कामाला सुरुवात करायची होती पण पॉस मशिन्स नाहीयेत. कधी येतील माहीत नाही. पेटीएम बाबत साशंक कारण नफ्यातील २.५% बुडणार. शिवाय पेटीएमचे पैसे दोन दिवसांनी मिळणार. कोथरुडात किंवा ठाण्यात धंदा उघडा असा सल्ला द्यायचा मनात होता, पण माझा चेक लिहित होता म्हणुन शब्द गिळले.
आज आलेला माझा अनुभव. बायकोला
आज आलेला माझा अनुभव.
बायकोला फ्लिपकार्टवर एक ड्रेस आवडला होता. तो घेण्यासाठी तिने माझे नेट बँकिंग वापरले, बँकेतून पैसे वळते झाले पण ऑर्डर कन्फर्म झाली नाही. तिने हा प्रकार मला सांगितल्यावर मी फ्लिपकार्टला फोन करून तक्रार केली. त्यांना बँकेचा रेफ्रन्स नंबर वगैरे सगळे दिले. ३०-४५ मिनिट डोक खपवल्यानंतर फ्लिपकार्टवाल्यांनी पैसे आल्याचे मान्य केले. परंतू ऑर्डर तुम्हाला परत नोंदवावी लागेल . यावेळी कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन वापरा. असे सांगितले. बायको ने आता कॅश ऑन डिलिवरी वर ड्रेस मागवला. तो ड्रेस २ दिवसात येणार पण माझे पैसे परत माझ्या खात्यात यायला ३-५ दिवस लागतील. म्हणजे सध्यापुरता तरी मला दुप्पट किंमतीमधे १ ड्रेस मिळाला. विनाकारण माझे पैसे ३-५ दिवसांसाठी अडकून गेले. आता पुन्हा एटीएम वापरून कॅश काढून कुरिअरवाल्याला द्यावी लागणार.
https://www.thequint.com/curr
https://www.thequint.com/currency-ban/2016/12/23/note-bandi-as-tourists-...
जपानी बाई आणि स्वकौतुकाबाई
जपानी बाई आणि स्वकौतुकाबाई दिसत नाहीत हल्ली माबोवर.?
प्राण साहेब कोथरूड मध्ये
प्राण साहेब कोथरूड मध्ये रहायला या.
रच्याकने. भाजप आमदारांच्या क्षेत्रातील एटीम मध्ये पैसे टाकावेत असे गुप्त आदेश आहेत म्हणे ?
तुमच्या सर्वांच्या भागात किती
तुमच्या सर्वांच्या भागात किती एटीएम सुरु आहेत? माझ्या भागात फक्त एसबीआयचे एटीएम तेही पैसे असतील तोवर चालू असतं, बाकी सगळे एटीएम बंद. अनेकांची शटर जी ९ तारखेला डाऊन झाली ती परत वर गेलीच नाहीत. माझी बॅन्क घरापासून १० किमीवर आहे, पैसे काढायचे तर २० किमी चा फेरा म्हणजे २०० रुपयाचे पेट्रोल जाते, वेळ जातो.
(घराजवळच्या बॅन्केत खाते का नही वगैरे उपदेश नकोत)
http://www.forbes.com/sites/s
http://www.forbes.com/sites/steveforbes/2016/12/22/what-india-has-done-t...
हे आर्टिकल सप्रेस केलं जातंय. पण वाचनीय आहे.
कोथरुड काय मी भारतात सुध्दा
कोथरुड काय मी भारतात सुध्दा नाही. म्हणूनऑनलाईन घ्यावा लागला. विकतचा मनस्ताप काय असतो याचा अनुभव घेतला.
देश को २०० रु दिया ?
देश को २०० रु दिया ? सिर्फ ?.... उधर सैनिक प्राण दे रहे है ..
जोक्स अपार्ट, पण सैनिकांचे
जोक्स अपार्ट, पण सैनिकांचे जीव जातात ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे अजरामर सत्य कोणी भक्त कधी समजून घेतील तर मिळवलं!
गेल्या दोन वर्षांत जितके
गेल्या दोन वर्षांत जितके सैनिक गेले नव्हते तितके या गेल्या ६ महिन्यात गेले आहेत.
नोटबंदीमुळे ते आज डिस्कस होतच नाहीये.
सई, दुर्दैव आहे हे !
सई, दुर्दैव आहे हे !
>>>> रच्याकने. भाजप
>>>> रच्याकने. भाजप आमदारांच्या क्षेत्रातील एटीम मध्ये पैसे टाकावेत असे गुप्त आदेश आहेत म्हणे ? <<<<<

आयला, असेही आहे काय? तर्रीच, आमच्या पिंचीमधे एटीएममधे खडखडाट अस्तो...
सर्व बँकांचे प्रवक्ते का मौन
सर्व बँकांचे प्रवक्ते का मौन धरुन आहेत ? आज स्टेट बँकेच्या मॅनेजर म्हणाल्या कि, अजून ३ महिने लागतील, सर्व सुरळीत व्हायला.
आपण ज्या नोटा वापरतो, त्या तश्याही रोजच्या हाताळणीत खराब होत असतात. त्याही रद्द करून नव्याने छापाव्या लागतात. पुर्वी कमी वापरात असलेल्या नोटा जर आता जास्त वापरात आल्या, तर त्यांचाही तुटवडा होऊ शकतो.
( याबाबात नेमकी आकडेवारी कुणी बघितलीय का कुठे ? )
बाबांची सर्वात मोठी बहीण आलीय
बाबांची सर्वात मोठी बहीण आलीय घरी. ती सांगत होती की नेमके ८ तारखेलाच १०००० काढले होते परसात कामाला गडी होते म्हणून. रात्री बातमी समजली. लेकीने सगळे पैसे परत बँकेत भरायला सांगितलं म्हणून भरून आली. नंतर सलग तीन दिवस रांगेत पैसे काढायला उभी होती. ज्येनांची वेगळी रांग नव्हती. चौथ्या दिवशीही पैसे संपल्याने तिला मिळाले नाहीत तेव्हा ती तिथेच बसली. माझ्याकडे एकही पैसा नाहीय, १०० तरी द्या, काहीच करायला पैसे नाहीत, जवळचे सगळे बँकेत भरलेत, पैसे नाही मिळाले तर उठणारच नाही वगैरे रडारड झाली. शेवटी बँकवाल्यांनी १० ची काही नाणी दिली तिला. परसातलं काम तर ९ तारखेलाच बंद झालं होतं.
http://www.snopes.com/crime/g
http://www.snopes.com/crime/graphics/crybaby.jpg
सपनाजी, दुसर्यांच्या
सपनाजी, दुसर्यांच्या जेन्युइन समस्यांची आपण खिल्ली उडवत आहात काय?
Pages