Submitted by सिम्बा on 21 December, 2016 - 23:25
थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.
,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
नोटांच्या दुष्काळावर मात करायला पेटीम, किंवा इतर wallet 2वापरायचा प्रयत्न म्हणजे एका जास्तीची गैरसोय ठरला आहे, (वृद्ध, अशिक्षित, स्मार्ट फोन नसणारा वर्ग)
या व अशाच गैरसोयी चा ट्रॅक ठेवण्यासाठी हा दुसरा धागा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असं का वाटलं ? माझ्या भावना
असं का वाटलं ? माझ्या भावना मी प्रकट केल्या. तुम्ही काहीही गृहीत धरता..
आमच्या हस्पिटलाचे डॉ.
आमच्या हस्पिटलाचे डॉ. ऑन्कॉलॉजिस्टना सी बी आय ने पकडले. ब्लॅक मनी !
http://www.newsnation.in/article/155240-cbi-files-case-against-oncologis...
जिथे अफरातफर होणार होती , ती ब्यान्क बीजेपी नेत्याची होती.
जमोप्या , मग ऑन्कॉलॉजिस्ट
जमोप्या ,
मग ऑन्कॉलॉजिस्ट काँग्रेसचेच असतील !!
पेट्रोल पंपाचे पैसे होते की
पेट्रोल पंपाचे पैसे होते की दे दा दुकानाचे ?
Santa Claus standing in an
Santa Claus standing in an ATM queue to withdraw money in order to buy Gifts for children.(2016)
- History Of India
१.शुक्रवारी सकाळी११ च्या
१.शुक्रवारी सकाळी११ च्या सुमारास, आकुर्डी चौक येथल्या सेंट्रल बँकेत सुमारे ५० जणांची लाईन.संध्याकाळी चिंचवडची २ एटीएम पाहिली.तिथे ८-१० जण होतेच.
२.शनिवारी चिंचवड ते बिबवेवाडी येथे जाताना/येताना बस/ऑटोमधून जी काही १०-१२ एटीएम पाहिली,त्यांची शटर्स अर्ध्यावर आणली होती.त्यामुळे तिथे कोणीच नव्हते.
<<<<<< Santa Claus standing
<<<<<< Santa Claus standing in an ATM queue to withdraw money in order to buy Gifts for children.(2016) >>>>>>
सँटा क्लॉसच्या नावाने भारतीय जनतेला कधी पर्यत मुर्ख बनवणार ?
हो ना ! तुम्ही पूतना
हो ना ! तुम्ही पूतना मावशीच्या नावे सण साजरा करा
ते म्हणताहेत , भारतीय जनतेला
ते म्हणताहेत , भारतीय जनतेला मूर्ख बनवायला नवा बाबा आलाय, तर सांताबाबाची गरज काय?
(No subject)
भरत
भरत
आता बेइमानांचे बुरे दिन येणार
आता बेइमानांचे बुरे दिन येणार म्हणे.
तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही बेईमान. समजलं?
हो मूळ सिद्धान्तापेक्षा
हो मूळ सिद्धान्तापेक्षा व्यत्यासच अधिक खरा असतो किंवा फक्त व्यत्यासच खरा असतो.
(No subject)
शेअर मार्केट प sssssरssssत
शेअर मार्केट प sssssरssssत कोसळ लं.....
अन्ना ट्याक्स बढातुं बोले. मार्कीट पानी में डूबा डूबा रहता है.
आया अन्ना आया अन्ना सब्बी
आया अन्ना आया अन्ना
सब्बी लोगां चौबिसों घंटे चौकन्ना!
श्रीमंत राहिलेच नाहीत तर गरीबांना त्यांच्या गरीबीचे वाईट वाटणार नाही.
काल एसबीआयच्या एटीम मधे कॅश
काल एसबीआयच्या एटीम मधे कॅश आली, लयी झुंबड. आणि मी मुंबईतल्या एटीएम बाबतच बोलतो आहे.
अमिर खानच्या दंगल नावाच्या
अमिर खानच्या दंगल नावाच्या सिनेमाने सर्वांच्या गैरसोईवर टिच्चुन गेल्या तिन दिवसात १०६.९५ कोटी जमवले.
बरीच गैरसोय पब्लिकला झालेली सर्वांच्या समोर परत एकदा आलेली आहे.
एका सिनेमाने १०६ कोटीचा धंदा
एका सिनेमाने १०६ कोटीचा धंदा केला, याचा अर्थ, भारत व बाहेरच्या देशांत मिळून पाऊण ते एक कोटी लोकांनी आतापर्यंत सिनेमा पाहिला. देशातल्या उरलेल्या १२९ कोटी लोकांचं काय?
त्यातले तुमच्यासारखे पगारी देशभक्त, कार्डं घासू घासू तिथे गेले होते, ते केवळ आमीर नावाच्या मुसलमानाने नोटबंदीला वावा केलं म्हणून. कदाचित आदेशही आलेले असतील वरतून.
दुसरं, घरात कुणी गेलं, की १३व्या दिवशी बाहेर काढतात, गोडाचं जेवण करतात. आता तुमच्या नोटबंदीला ४३ दिवस व्हायला आले की! कर्ज काढून का होइना, बाहेर काढावं लागतंच.
तिसरं, आता एक काम करा, जाधव.
गेले ४३ दिवस, रोज सकाळी नाश्टा, दुपारी जेवण व संध्याकाळी जेवण करणार्या, किंवा अर्धपोटी, एकवेळ जेवणार्या, भारतातल्या लोकांची आकडेवारी काढा, मग त्यावर किती करोड रुपये आतापर्यंत निर्लज्ज देशद्रोही भारतीयांनी खर्च केले, व वरतून नोटबंदीबद्दल बोंब मारली, तेही लिहूनच टाका.
आस्मानी/सुलतानी आली म्हणून दुनिया जगायचं थांबत नाही.
तुम्ही कोडगेपणाने समर्थन करीत राहता, व तुमच्या प्रमाणेच तुमचे सुलतान, देश लायनीत उभा आहे, हे गेल्या ५०-६० वर्षांच्या काँग्रेसच्या चुकांचंच फळ आहे, अशी भाषणं देत राहतात. मज्जाय!
माझ्या देशाचं तळपट होताना दिसतंय म्हणून वाईट वाटतं, इतकंच.
***
ता. क.
तुम्ही तुमचे ६१-६२ स्टाईल प्रतिसाद प्रत्येक नोटबंदी धाग्यावर दिले म्हणून मी सगळीकडे येणार नाही उत्तर द्यायला>
ते काम तुम्ही कराल याची ग्यारंटी आहे मला
Has RBI again changed the
Has RBI again changed the rules?
I got this msg from SBI yesterday..Use SBI ATMs for better security, convenience & faster complaint resolution. As per RBI directive, more than 3 txns in metro & 5 in non-metro are chargeable.
I am able to withdraw only 2000 on SBI debit card in other ATMs. Does that means I can withdraw only 6000 rs in month without charges?
SBI ATMs are not working in our area. Nearest branch asks me to visit home branch which 20km away to withdraw money.
स्पेंड मनी फॉर नेशन अँड गो
स्पेंड मनी फॉर नेशन अँड गो .... ईट इज युर ड्युटी ...
सोल्जर्स आर डाइंग अँड यू आर क्राइंग ?
रिझर्व बँकेचे २ नोव्हेंबरचे
रिझर्व बँकेचे २ नोव्हेंबरचे परिपत्रक
किरकोळ व्यवहारासाठी १०० रुपयांच्या नोटांची अधिक गरज असते. तरीही बँकांच्या एटीएममधून या नोटा कमी प्रमाणात मिळतात. यासाठी एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत बॅंकांनी आपली १० % एटीएम्स फक्त १०० रुपयांच्या नोटा देतील असे पहावे. ही प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने १५ दिवसांत पूर्ण केली जावी व त्याचा कृती अहवाल रिझर्व बँकेला पाठवावा.
याचा नोटबंदीशी काही संबंध असेलच असं नाही.
पण तरीही हे प्रश्न पडतात
१. गुप्तता पाळणं आवश्यक असल्याने एटीएम्स आधी रिकॅलिब्रेट करता येणार नव्हती असं सांगितलं गेलं होतं.
आता हे परिपत्रक पाहूनही ८ नोव्हेंबरच्या रात्रीच्या ८ वाजण्यापूर्वी कोणाला काही शंका आलेली नसावी.
२. हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत थांबण्याचीही सरकारची तयारी नव्हती. उलट तो मध्येच सोडून देण्यात आला असं काही बातम्यांत म्हटलंय.
२. फारशी किचकट नसलेली प्रक्रिया १०% एटीम्सवर पूर्ण करायला १५ दिवस. नंतर अगदी दुप्पट वेगाने काम केले तरी १००% एटीम्ससाठी ७५ दिवस?
३. दोन हजारी नोटेसाठी एटीएम रिकॅलिबरेशन टास्क फोर्स १४ नोव्हेंबर रोजी स्थापन केला गेला.
४. गंमत म्हणजे नव्या ५०० रुपयाच्या नोटेबाबतचे परिपत्रकही आणि नव्या २००० रुपयांच्या नोटेबाबतचे अशी दोन्ही परिपत्रके ८ नोव्हेंबरचीच आहेत. (पुन्हा गुप्ततेचा मुद्दा येतो.)
५. पुन्हा एटीएम्स कडे वळूया. आधी २००० रुपयाच्या नव्या नोटेसाठी (२ नोव्हेंबरच्या घोषणेच्या बरोबर १८० अंश विरोधात) , मग ५०० रुपयांच्या नोटेसाठी आणि आता १००० ची नोट आली तर त्यासाठी, मग २००० ची नोट रद्द केली (इति गुरुमाऊली गुरुमूर्ती) अशी किती वेळी एटीम्स रिकॅलिब्रेट केली जाणार आहेत?
दरम्यान १०० रुपयांच्याही नव्या नोटा येऊ घातल्यात. त्यांचाही आकार जुन्या नोटांप्रमाणेच असेल तर ठीक,
या सगळ्यापोटी आलेल्या खर्चाबद्दल प्रश्न विचारायची सोय नाही.
अर्थमंत्र्यांनी नोटाबंदी हे वेल कन्सीव्ह्ड वेल प्लान्ड ऑपरेशन आहे असं छातीठोकपणे सांगितलं आहे. वेल कन्सीव्ह्ड आणि वेल प्लान्ड ऑपरेशन असं असेल, तर उद्या आणीबाणी(१९७५ वाली नव्हे)च्या परिस्थितीत एखादा निर्णय घेऊन तो अंमलात आणायची वेळ आली, तर ही मंडळी काय करतील याची कल्पनाही करवत नाही.
एकीकडे ३१ मार्च पर्यंत तुम्ही
एकीकडे ३१ मार्च पर्यंत तुम्ही १०००-५०० च्या नोटा बँकेत भरू शकतात (१ जानेवारी पासून रिझर्व बँकेत) असे जाहीर केले होते आता १०००-५०० च्या नोटा असणार्यांविरुध्द गुन्हा दाखिल होणार असे नविन अध्यादेश सरकार काढणार आहे.
इतका विरोधाभास?
जुन्या १,००० च्या नोटांत
जुन्या १,००० च्या नोटांत १०,००० पेक्षा जास्त रुपये सापडले तर ५०,००० दंड आणि जेलही होणार असं काहीतरी एफेमवर सांगत होते सकाळी.
खरंच असे वाटायला लागलंय कि
खरंच असे वाटायला लागलंय कि डोके गहाण ठेवून का असे निर्णय घेतले जात आहेत ? देशाची अर्थव्यवस्था म्हणजे पोरखेळ आहे का ? या देशाची लाँग टर्म इकॉनॉमिक पॉलिसी आहे कि नाही ? त्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत का ?
>>> खरंच असे वाटायला लागलंय
>>> खरंच असे वाटायला लागलंय कि डोके गहाण ठेवून का असे निर्णय घेतले जात आहेत ? <<<

गुड विनोद....
याच प्रकारे विचार करीत राहिलात तर लौकरच हिटलरच्या राज्यात रहात असल्याचे "आभास" तुम्हांस होऊ शकतात हे नक्की..... तसे ते २००२ पासुन "मौत के सौदागर" वगैरे विशेषणांनी होत आहेतच म्हणा.....
समजा एक अनिवासी भारतीय अथवा
समजा एक अनिवासी भारतीय अथवा जो परदेशी काही कामासाठी गेला आहे तो आता जानेवारी मधेच येणार आहे. अशा व्यक्तीकडे जर घरात काही पैसे जुन्या नोटांच्या स्वरुपात मिळाले आणि तो बँकेत भरण्याकरीता गेला तर त्याला अटक होणार का?
छान. म्हणजे टॅक्स भरून पण तुमच्या कडे ते पैसे सापडले तरी तुम्ही देशद्रोही.
देशाची वाटचाल अगदी योग्य दिशेने चालू आहे.
२४.१२.२०१६ - सायंकाळी ७.३४ ला
२४.१२.२०१६ - सायंकाळी ७.३४ ला भ्रमणध्वनी खरेदीचे बिल भागवण्यासाठी कार्ड स्वाईप रु. ७५००/- करीता केले तेव्हा 'नो रीस्पॉन्स फ्रॉम होस्ट' अशी एरर येऊन पावती आली नाही, पैसे खात्यातून वजा झाले.
पुन्हा ७.४१ ला मात्र व्यवहार सुरळीत झाला. पुन्हा ७५००/-
आता बँकेला मेल, ७ वर्कींग डेजची वाट पाहणे, पैसे परत येईपर्यंतची घालमेल हे सगळे गैरसोयीमधे मोडते का ते माहीत नाही.
https://www.theguardian.com/w
https://www.theguardian.com/world/2016/dec/27/india-bjp-party-ordering-o...
धक्कादायक
सोशल मिडीयावर सरकारच्या प्रत्येक चुकिच्या निर्णयाचे सुध्दा समर्थन करणार्यां मागची बाजू उघड झाली. भाजपा किती खालच्या थरावर गेली आहे बहुदा भविष्यात नाझी नंतर भाजपाचा नंबर लागणार हे आता स्पष्ट झाले.
झी न्युजच्या एका अँकरने खट्टर यांना नोटबंदी विषयी प्रश्न विचारला तर त्याच्या हातात राजिनाम्याचे पत्र पडले अशी देखील बातमी २-३ दिवसापुर्वी आली होती.
झी न्युजच्या एका अँकरने खट्टर
झी न्युजच्या एका अँकरने खट्टर यांना नोटबंदी विषयी प्रश्न विचारला तर त्याच्या हातात राजिनाम्याचे पत्र पडले अशी देखील बातमी २-३ दिवसापुर्वी आली होती.
<<
तो एकदम विनोदी प्रकार होता.
याने नोटबंदीवर प्रश्न विचारला, तर खट्टर साहेब त्या प्रश्नाला टोटल बगल देऊन काहीतरी तिसरंच बोलू लागले होते.
https://www.youtube.com/watch?v=FwDcDdMv91E
Pages