मिसो

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2016 - 06:37

मिलिंद सोमण मिलिंद
सोमण
मिलिंद सोमण
मिलिंद
सोमण मिलिंद सोमण

Milind-Soman1.jpeg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०० मैल...
अबब ! ( वाक्यात उपयोग Proud )

हो लहान आहे हे शक्य आहे, माझ्या पिढीत तरी मला मिसोची क्रेझ ओळखीच्या पाळखीच्या मित्रांमध्ये कुठेच आढळत नाही..>> आपण एकाच वयोगटातील असु रे.. मिसो ची क्रेझ सापडत नाही म्हण्जे काय.. अन् सई, स्वजो सोबत मिसोची तुलना कशी होईल? या सार्‍यांच फॅन फॉलोविंग्/इंग लय डिफर करत.. नकोच ती कंपॅरिझन..

सध्या तो बरीच धावाधावच करतोय . त्याची आई पण त्याच्या बरोबर मध्यंतरी कधी तरी पळत होती ना ? फोटो बघितले आणि बातमी पण वाचली त्याच बरोबर " वजनदार" सिनेमा साठी सई ( ऋ वाचतो आहेस ना ? )आणि प्रिया ने वजन वाढवल्यानंतर परत बारीक होण्यासाठी त्या मिलिंद बरोबरच सकाळी सकाळी पळायला जात होत्या म्हणे. " संहिता " मी यु ट्यूब वर बघितला Happy

१०० मैल ! १६१ किमी.. बापरे, .. २१ - ४२ वगैरे जोशात धावतो ईथवर माहीत होते, कौतुक होते. पण १६१ किमी म्हणजे बॉन्ड आहे तो तर Happy

" वजनदार" सिनेमा साठी सई आणि प्रिया ने वजन वाढवल्यानंतर परत बारीक होण्यासाठी त्या मिलिंद बरोबरच सकाळी सकाळी पळायला जात होत्या म्हणे. "
>>>
ओह हे नव्हते माहीत होते. कुठे पळायला जाते सई ?

मी ही मिसोची फॅन नाही... मला तो क्रश मटेरिअल वाटत नाही पण या माणसाबद्दल क स ला आदर वाटतो..

मिसो नुसता नट नसुन खरा हिरो आहे. त्याचं जितकं फॅन फोलोईंग आहे ते तो सगळं डिजर्व्ह करतो...

ग्रेट ग्रेट आणि फक्त ग्रेट!

रात शबनमी..जानम समझा करो
इस कदर प्यार है.. तुमसे ऐ हमसफर

सगळं आठवलं पण लिहिलं नाही. पहिलं आशामुळे आवडतं तर दुसरं सोनु निगम मुळे.

आज सकाळी सकाळी मिसो शिवाजी पार्कला एकटाच चालत जाताना दिसला. साधा tshirt घालून निवांत एकटाच फिरत होता. मस्त दिसत होता. अजिबात वयस्कर वाटत नव्हता. फार तर 30-35चा वाटला..

ओह हे नव्हते माहीत होते. कुठे पळायला जाते सई ? >> अरे ते माहित नाही पण इंस्टाग्राम वर तिने आणि प्रियाने त्या दोघींचे मिलिंद बरोबर पळताना व्हिडियो टाकले होते . साधारण महिन्याभरापूर्वी आणि आम्ही त्याच्या बरोबर रोज सकाळी पळायला जातो असं काहीतरी लिहिलं पण होत Happy

शिवाजी पार्क वर बहुतेक वेळा सकाळी दिसतो जॉगिंग करताना. फडकें च्या क्लिनिक मधे ब्लड टेस्ट करायला गेले तेव्हा दोनदा हि दिसला. ईच्छुकांनी लाभ घ्यावा.

ये बाळा ऋन्म्या ! अरे नको रे मिसो आणि स्वजोची कंपेरिजन करु , त्या मैद्याच्या पोत्याला साधं एक किलोमीटर पळुन दाखवं म्हणावं.

ये बाळा ऋन्म्या ! अरे नको रे मिसो आणि स्वजोची कंपेरिजन करु , त्या मैद्याच्या पोत्याला साधं एक किलोमीटर पळुन दाखवं म्हणावं.>>>>>:हहगलो: पण मला जाऊ द्यां ना बाळासाहेब पासुन सई आवडायला लागलीय हे प्रामाणीकपणे कबुल करते.:फिदी: ऐक रे ऋ.

शिवाजी पार्कात नको नको ते मराठी लोकं दिसत असतात. मी लहान असताना आमच्या शाळेत एक अफवा लागायची. अमुक तमुक वेळेला पार्कात सचिन दिसतो. त्या नादात दर शुक्रवारचे पीटीचा तास मध्येच सोडून तिथल्या कट्ट्यावर बसायचो. वेळ नाही जात म्हणून भेल खायचो. सचिन आलेला नसायचा. पण बजेट एका भेलचेच असायचे. मग मनात श्रद्धा नसतानाही गणपती मंदिरात जाऊन जोरजोरात घंटा वाजवून यायचो. असे पाच शुक्रवार गेले. आम्ही गणपतीला फसवायचो, मग गणपतीनेही आम्हाला फसवले. सहाव्या शुक्रवारी सचिन पिळगावकर दिसले.

येनीवेज, सई पळताना किती भारी दिसत असेल. मजा असते मिसो असणार्‍यांची Happy

शुगोल यांच्या लिंकवरून,

9. India: Milind Soman

The image of Milind Soman emerging, shirtless, from a wooden container in the music video for Alisha Chinai's pop hit 'Made In India' is firmly etched in the mind of everyone who was, well, alive in the '90s. A national swimming champion who went on to become a supermodel, an actor and an entrepreneur, Soman is now also known for his passion for running (he completed the Ironman triathlon last year, on his first attempt). -

सही आहे Happy

कुठे पळायला जाते सई ? >>> जाते कुठे ते माहीत नाही पण त्यावेळी त्या दोघी मिसो बरोबर जात होत्या पुणे विद्यापीठात आणि पुण्यातल्या रेसकोर्सवर (होय जिकडे घोडे पळतात तिकडेच बाजूने एक ट्रॅक आहे जिकडे माणसे पळतात Proud ).

"उगाच च नाही पुण्याचे स्तोम माजवले जात " - ऋन्मेष, आता हा मिलिंद सोमण आणी सई चं स्तोम माजवतोयस तू. Happy

पण मला सुद्धा मायबोली वरच मिलिंद सोमण चे ईतकं फॅन फॉलोईंग आहे हे कळलं. मॉडेल आहे ईथपर्यंत माहीत होतं. मेड ईन ईंडिया, जानम समझा करो वगैरे गाण्यात बघितलं होतं. भेजा फ्राय मधलं त्याचं काम बघून, गेला माधव कुणीकडे मधला, 'ए चल, मॉडेल्स नाही बोलत एव्हढं' हे वाक्य आठवलं होतं.

मदत हवी आहे - धागाकर्त्याचे नाव कसे संपादीत करावे Happy

पण हे कारण खरे मानले तरी याचा अर्थ मिसोप्रेम कमी आहे असाच झाला. शायद वो मिसो से ईतना प्यार नही करते जितना मेरे धांगो से नफरत.

एखाद्याबद्दलची क्रेझ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर रईसच्या ट्रेलरखाली असणारया कॉमेंटस बघा.

मिलिंद सोमण अजून एक अचाट अतुलनीय पराक्रम करायला निघाला आहे.
१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान फ्लोरिडा येथे होणार्‍या 'अल्ट्रामॅन' नामक (http://ultramanflorida.com/) सलग तीन दिवस चालणार्‍या ट्रायथलॉन मधे भाग घेत आहे. ह्या स्पर्धेत पहिल्या दिवशी १० किमी पोहोणे, दुसर्‍या दिवशी ४२३ किमी सायकलिंग आणि सलग तिसर्‍या दिवशी ८४ किमी धावणे यांचा अंतर्भाव असतो.

मलाही वाचूनच दम लागलाय.
ह्या स्पर्धेत पुण्याच्या कौस्तुभ राडकर आणि पृथ्वीराज पाटील यांच्यासह एकूण ५ भारतीयांनी भाग घेतला आहे. http://ultramanflorida.com/individual-entrants/

तर मिलिंद सोमण आणि मंडळी यांना अनेकानेक शुभेच्छा !

अरे वा! ग्रेट!
मिलिंद सोमण आणि मंडळी यांना अनेकानेक शुभेच्छा >>+१

अफाट आहे...
यातली प्रत्येक गोष्ट एकेक दिवसात पुर्ण होते का हाच एक प्रश्न आहे.. त्यात आधीच्या दिवशी दमल्यावर दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी.. कुठून बळ आणणार हे लोकं.. कमाल आहे Happy

Pages