परदेशात स्थायिक होणे, गरज की निर्लज्जपणा?

Submitted by सिंथेटिक जिनियस on 18 December, 2016 - 09:49

थांबा थांबा,जुनाच विषय आहे ,मान्य.लगेच मला राष्ट्रभक्तीचे सर्टीफुकट देऊ नका.मी काही तितकासा प्रखर राष्ट्रभक्त नाही.हा विषय मनात आला त्याला कारण हा प्रसंग.
परवा नेहमी प्रमाणे फिरायला गेलो होतो.अर्ध्या वाटेवर असताना एका बुजुर्ग माणसाने लांबुनच मला थांबायची सूचना केली.मी थांबलो.ते जवळ आल्यावर मला चेहरा ओळखीचा वाटला .त्यांनी ओळख करुन दिल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला ,ते होते माझ्या बालपणीच्या मित्राचे वडील.मी ओळख विसरलो असलो तरी त्यांनी मला ओळखले.साहजिकच मित्राचा विषय निघाला .मी काय करतो हे त्यांचे आधिच विचारुन झाले होते.शेतीत लक्ष घातले आहे हे सांगितल्यावर माझ्याकडे गॉन केस असल्यासारखा कटाक्ष टाकला.माझा अधिक पंचनामा व्हायच्याआधी मी चर्चा ताब्यात घेतली.त्यांना विचारले मित्र सध्या काय करतो? हा प्रश्न आल्यावर स्वारी जरा खुश झाली.चिरंजीव सध्या अमेरीकेत Charlotte का कॅरोलायना कुठेतरी स्थायिक झाले आहेत असे त्यांनी सांगितले.त्याला ग्रीन कार्ड मिळाले आहे हे सांगताना त्यांच्या चेहर्यावर भारी कौतुक दिसत होते.पोराने नाव काढले हो ! आम्हीही काही दिवस अमेरिकेला जाणार आहोत हे ही दिवाळीच्या आनंदात सांगुन झाले.एवढे बोलुन काकांनी रजा घेतली.
मला आठवायला लागले ते शाळेतले दिवस,ती प्रतिज्ञा....
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझ
े सौख्य सामावले आहे।
मित्रही ही प्रतिज्ञा म्हणायचा ,आम्ही सर्वच जण ही प्रतिज्ञा म्हणायचो.पण त्या प्रतिज्ञेला फाट्यावर मारुन तो अमेरिकेत स्थायिक झाला.विचारचक्र सुरु झाले.देशाने काय दिले नाही त्याला? माध्यमिक शिक्षण मोफत दिले,इबीसीची सवलत दिली,बापाला सरकारी नोकरी होती.हुशार होता,देशात थांबला असता तर त्याच्या बुद्धीमत्तेचा देशाला काहीतरी फायदा नक्कीच झाला असता.IIT तित दाखल होणारे बहुतेक जण परदेशात जाण्यासाठी/स्थायिक होण्यासाठी आटापिटा करत असतात हे माहीत होते.पण आजकाल प्रत्येकाला परदेशातच स्थायिक व्हायचे असते.कुणी हॉटेल मॅनेजमेंट करुन कुणी आर्कीटेक्ट होऊन अन काय काय होऊन परदेशात जाण्याचा आटापिटा करत असताना बघितला तर मला माझ्या शेतकरी असण्याचा अभिमान वाटतो.चार दाणे पिकवून मी देशाची सेवा तरी करतोय.प्रखर देशभक्ती वगैरे नाही पण देशातल्या जनतेला काहीतरी परत करतोय याचे समाधान आहे.
महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध टुर्स कंपणीच्या संचालिकेचा अनुभव आठवला.तीही अमेरिकेत होती,तिला तिथले नागरिकत्व देताना एक प्रश्न विचारला गेला ,उद्या भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध झाले तर तुम्ही कुणाच्या बाजुने उभ्या रहाल? तिने ' अमेरिका ' असे उत्तर दिले .त्यावर मुलाखतकार छद्मी हसला.तिला बाहेर आल्यावर स्वतःचीच लाज वाटली.तिने निर्णय बदलला व भारतात येऊन एक यशस्वी उद्योजीका झाली.
परदेशात शिकायला जाण्यात काही वाईट नाही,काही दिवस तिथे नोकरी करणेही वाईट नाही.पण आपली बुद्धीमत्ता आपल्या देशासाठी वापरण्याऐवजी इतर देशांची सेवा कशाला.? हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. तिकडून इथे आल्यावर पेट्रोल पंपला ' गॅस स्टेशन म्हणने,भारतात चायला मायला म्हणणारे भारतवारीत fuck ! असे बिंधास्त बोलून स्वतःच्या आंग्लाळलेपणाची जाणिव करुन देतात तेव्हा आश्चर्य वाटते की यांनी देश विकुन खाल्ला आहे याची यांना जाणिव तरी आहे का?.स्वतःच्या देशात स्वाभिमानाने राह्ण्याऐवजी परदेशात निर्लज्ज होऊन राहणे यात मला तरी काही मोठेपणा दिसत नाही.
मला मान्य आहे मायबोलीवर बरेच परदेशस्थ आहेत ज्यांना मी आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहे.पण आमच्यासारख्या शेतकर्यांनी,इतर कष्टकर्यांनी देश उभा करायचा ,इथले इन्फ्रास्ट्र्कचर उभे करायचे.यातुन होणारा विकासावर स्वार होऊन बरेच लोक परदेशाची वाट धरणार असतील तर् आम्ही का फुकट मरायचे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प.परी आणि मोरपंखीज, फारच
सिरिअसली लिहिता बुवा
तुम्ही>>>
महेश दादा प्रामाणिकपणे लिहिलं हो पण सिरियसचं झालं. Happy

एखादी क्रिकेट टीम जिंकण्यासाठी त्या टीमच्या प्रत्येक सदस्याने म्हणजे ११च्या ११ खेळाडूंनी आपली टीम जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आपले सर्वोत्तम द्यायला हवे. जर सचिन तेंडुलकरला खूप चांगले पैसे मिळतात म्हणून तो इंगलंड कडून खेळला असता तर आपण वर्ड कप जिंकलो असतो का ? टीम चांगली बनण्यासाठी आपण आपल्या टीमच्या सदस्यांना योग्य मार्गदर्शन करावयाचे असते न कि हे चांगले खेळत नाहीत म्हणून मी चाललो बुवा दुसऱ्या टीम मधून खेळायला....! हे योग्य होईल का ?

परदेशी जाण्याबद्दल मागच्या पिढीची जी मते होती ती या पिढीची नाहीत. हल्ली ब्रेन ड्रेन हा शब्द ऐकू येत नाही. ७० ते ८० च्या दशकापर्यंतचे जुने लेख, मासिकं चाळली तरी सहजपणे कुणाचं न कुणाचं ब्रेन ड्रेन बद्दलचं मत वाचायला मिळतं. जी मागच्या पिढीची मतं होती ती आता खाली खाली झिरपत गेलेली आहेत. ज्यांची ही मतं होती त्यांच्या पुढच्या पिढीने ती केव्हांच धुडकावून लावलेली आहेत.

हल्ली ब्रेन ड्रेन हा शब्द ऐकू येत नाही
याचे कारण पूर्वी बहुधा उच्च शिक्षणासाठी, म्हणजे मास्टर्स वा डॉक्टरेट साठी शिकलेले हुषार लोक इथे येत. (माझ्यासारखे अपवाद सोडून).
पण १९९० च्या दशकातली गोष्ट - माझा मित्र अमेरिकेतून भारतात गेला, जुन्या मित्राला भेटला, विचारपूस केली, मुले काय करतात वगैरे. भारतीय मित्राने सांगितले मोठा शहाणा आहे, अभ्यास करतो. डॉक्टर, वकील, इंजिनियर काही तरी बनेल, धाकटा मात्र अजिबात अभ्यास करत नाही, नापास होतो. जरा मोठा झाला की अमेरिकेलाच पाठवावे लागेल त्याला!

नि आता जर तुम्ही इंग्लंड अमेरिकेत आला नि भारतीय लोक पाहिले तर ब्रेन ड्रेन मुळीच नाही, उलट बरे झाले हे लोक इथे आले, भारतात राहून त्यांना खायलाहि मिळाले नसते नि चोर्‍या मार्‍या, फसवा फसवी करत राहिले असते असंख्य भारतीय लोकांसारखे, असे कळेल.

टीम चांगली बनण्यासाठी आपण आपल्या टीमच्या सदस्यांना योग्य मार्गदर्शन करावयाचे असत

केलं असतं हो, पण भारतीयांना परदेशी गोरेच हवे असतात मार्गदर्शन करायला.

नि कित्येक गडी भारतातर्फेहि खेळतात नि इंग्लंड काउंटी मध्यहि खेळतात. आता इंग्लंडमधे त्यांना जेव्हढे पैसे मिळतात त्याच्या दुप्पट भारतात मिळतात, शिवाय जाहीराती वगैरे आहेच. फुकटच्या फाकट राज्यसभेत.

बरे त्यांना आणखी क्रिकेटमधे काय शिकायचे, तेच तर वर्ल्ड चँपियन.

मग कशाला जायचे परदेशात रहायला? उगीचच काहीतरी!

असे बरेच लोक इथून पूर्वी परत गेले - माझा भारत, देशप्रेम वगैरे म्हणत. इतके वाईट अनुभव आले भारतीय लोकांचे की त्यापेक्षा इथे रहाणे नको म्हणून परत परदेशी आले. फक्त ज्यांच्याजवळ भारतात अमाप पैसा आहे, तेच लोक परत भारतात जाऊन राहिले, तेसुद्धा देशप्रेम पेक्षा नोकर चाकरंची चैन, स्वस्ताई म्हणून. मग दरवर्षी काही महिने इथे येऊन रहातात उन्हाळ्यात.

फुकटच्या गप्पा हो! संधि मिळेल तिथे नि जिथे परवडेल तिथे रहातात लोक.

नंद्याजी
तुमच्या पोस्टी वाचून पुन्हा ते गाणे आठवायला लागलेय. तुम्ही तिथल्या भारतीय क्लबात जाता कि नाही ? तिथल्या भारतोयांची बिघडलेली पुढची पिढी . गोल फिरणारी टेबले. एका टेबलवर तुम्हाला सिंथेटीक जिनीयस भेटतात. मग तुम्ही त्यांना म्हणणार " क्या दिया तुम्हारे भारत ने - झिरो, सिर्फ झिरो "

मग सिंजी त्यांच्या झब्ब्यातून धाग्याचं बंडल काढत जाळे विणू लागतात आणि त्याच वेळी गाणे म्हणतात

जब झिरो दिया मेरे भारत ने
दुनिया को गिनती तब आयी

तुम्ही अशा वेळी रागाने निघून जाता का गाणे संपल्यावर ?

सुबोध खरे यांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. धागा वाहता आहे आणी आणखी चार पाच प्रतिसाद आले तर खरेंचा प्रतिसाद वाहून जाईल. कृपया आणखी प्रतिसाद देऊ नयेत.

Indians settled in USA are the reasons why so much software work ends up in India. There are other options and nations around world and this is where Indians in USA help. I am in USA a for a long time and I think India already has enough talent and educated people to accomplish anything they want. There is no need for Indians settled all over the world to go back and work in India. In fact they are doing the best by being outside. See how many Indian goods are getting exported all over the world due to spread of Indian population all over. So much business is coming to India. Indians help shape US foreign policy towards India.
>> स्वतःच्या देशात स्वाभिमानाने राह्ण्याऐवजी परदेशात निर्लज्ज होऊन राहणे
I did not understand this at all. हे "परदेशात निर्लज्ज होऊन राहणे" म्हणजे नेमके काय? देशाला गरज आसती व लोक सोडुन चालले असते तर त्यांना देशद्रोही म्हणा. पण ज्या देशात आधीच ईतकी qualified and skilled manpower आहे त्यात काही बाहेर गेलेत तर काय वाईट?

सुबोधजींनी वेगळा धागा काढणे योग्य राहील. त्यावर सिरीयस चर्चा देखील होऊ शकते.
मला पण त्यांनी आकडेवारी कुठून घेतली हे जाणून घ्यायचे होते, पण वाहता धागा असल्याने नाही विचारलं...

असं सरसकट वर्गीकरण योग्य नाही. नाण्याची दुसरी बाजू पण बघा. माझ्या मते आम्ही परदेशस्थ मंडळी भारताचा आरसा आहोत. आम्ही इथे जगाला दाखवून देतोय 'हम किसीसे कम नही' भारतात बसून आपण कस काय जगाला सांगणार आपण कोण आहोत ते. आपल्या पैकीच कुणाला तरी जगात आपले प्रतिनिधी व्हायला लागतं. आता काही पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत. कोणीही आपल्याला तुच्छ लेखत नाही. हे सगळं शक्य झालंय परदेशस्थ लोकांमुळे. कृपया हिंदी सिनेमे बघून मत बनवू नका. इथे आलो म्हणजे देशाला विसरलो असेच काही नाही. मी नियमितपणे एका NGO मार्फत गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत करते. खूप लोक असा करतात. आम्हाला जाणीव आहे आमच्या मातृभूमीच्या ऋणाची. परदेश ही फक्त कर्मभूमी आहे आमची. जरा गीता वाचा. मातृभूमी आणि कर्मभूमी दोन्हीचं महत्त्व कळेल. देशात राहून देशविरोधी कारवाया करण्याऱ्या लोकांपेक्षा बरे आहोत आम्ही.

लिहिण्यासारखं बरंच आहे पण ते नंतर कधीतरी

देशात का राहतो किंवा परदेशात का राहतो याचं उत्तर 'इच्छा' सोडून दुसरं काहीही आलं तर काहीतरी चुकतंय. देशप्रेम, त्याग असं काही नसतं. देअर इज नो सेल्फलेस गुड डीड.:)

हे निर्लज्जपणा वगैरे मुद्दाम सनसनीखेज का काय म्हणतात ते बनवण्याकरता लिहिलय त्यामुळे जास्त मनावर न घेतलेलच बरं. परत एकदा मूळ विचारच चुकीचा आहे. किंवा यु नो व्हॉट? विचार म्हणून तुम्ही तो स्वतः केला आणि स्वतःच्या बाबतीत, स्वतःच्या आयुष्यात जर राबवला तर विचार म्हणून स्तुत्य आहे. फक्त जेव्हा हा विचार तुम्ही समोरच्या वर लादायला बघता, समोरच्याला त्या विचाराला अनुसरुन जज करायला बघता तेव्हा तो शुद्ध उपटसुंभपणा होतो. तुम्ही स्वतः जर तुम्हाला परदेशात जायची संधी असताना ती डावलून मुद्दाम भारताकरता काहीतरी करावं म्हणून देशातच राहून काहीतरी केलत तर लोकं फक्त लीड बाय एग्जॅम्पल ह्या तत्वानुसार तुमचं अनुकरण करायला बघतील. शेवटी तुम्ही त्यांना मार्गच दाखवत आहात, भारतात राहून काहीतरी चांगलं करायचा आणि स्वतःची सुद्धा प्रगती घडवून आणण्याचा मार्ग.
मी इथे आधी गरज म्हणून आलो, आता इच्छा म्हणून इथेच राहतो.मला वाटतं एखाद्या देशाच्या रहिवाश्याला देश सोडून जाऊच नये असं वातावरण जेव्हा तयार होतं तेव्हा लोकं बाहेर जायची थांबतात. ह्यात देशाची चूक, लोकांची चूक वगैरेचा काहीही संबंध नाही. इट्स जस्ट नॅचरल. आता अमेरिका सोडून अशी कितिकशी अमेरिकन लोकं दुसर्‍या देशांमध्ये स्थलांतर करतात? करतात पण भारत आणि इतर डेवलपिंग ईकॉनॉमीज च्या तुलनेमध्ये फारच कमी. आणि हो, देश सोडून जाणं इतकं वाईट असलं असतं तर देशाच्या सरकारनी (कुठल्याही सरकारनी) लोकांना जाता यावं म्हणून इतर देशांशी चांगले संबंध ठेवून तिकडचा विजा वगैरे मिळवता यावा ह्या करता सुविधा कशाला उपलब्ध करुन दिल्या असत्या? देशाचाही त्यात फायदा असतो.

बरोबर आहे वैद्यबुवा.
अहो सिंजीचा धागा, असाच असणार!

तिथल्या भारतीय क्लबात जाता कि नाही ?
पूर्वी जात होतो. पण तिथे
भारतोयांची बिघडलेली पुढची पिढी . गोल फिरणारी टेबले. " क्या दिया तुम्हारे भारत ने - झिरो, सिर्फ झिरो "
असले काही बोलत नाही.
कोण म्हणेल माझा मुलगा/मुलगी बिघडलेली आहे? कोण नतद्रष्ट म्हणेल क्या दिया भारतने ?

झिरो चे महत्व बहुतेक सर्वांना कळते इथे कारण अनेक लोक काँप्युटरमधेच .

>>>> उलट बरे झाले हे लोक इथे आले, भारतात राहून त्यांना खायलाहि मिळाले नसते नि चोर्‍या मार्‍या, फसवा फसवी करत राहिले असते असंख्य भारतीय लोकांसारखे, असे कळेल. <<< Biggrin
तरी बरं, जरा तिकडे पलिकडे युरोप अमेरिकेतच स्वतःहून गेलात !
हल्ली तर काय नविनच बी'ग्रेडी फ्याड निघालय इकडे देशात, काय ? तर म्हणे त्या अमक्यातमक्यांना "उत्तर धृवावर" पाठवा.... Proud

पैसे कोण देणार?
जाणारे जातील, तिथेहि सुखात रहातील, मग जळू नि ढोंगी लोक त्यांना काय म्हणणार?

>>> जाणारे जातील, तिथेहि सुखात रहातील, मग जळू नि ढोंगी लोक त्यांना काय म्हणणार? <<<<

काय म्हणणार?
उत्तर धृवावर राहू लागलो आम्ही, की तिथेही येऊन कचरा करुन म्हणू लागतील, की हे अमकेतमके ना "परग्रहावरुन" आले आहेत... एलियन आहेत ... त्यांना हाकला, मारा ...... Lol

मग्ग काय? आपण मंगळावर जायचे... हा का ना का...... तिथेही सुखात राहू लागायचे..... Happy

मग जळू नि ढोंगी लोक तिथेही येऊन पोहोचतीलच मागोमाग....
अन तिथेही येऊन कचरा करुन म्हणू लागतील, की हे अमकेतमके ना "पर-सौरमालेतुन" आले आहेत... परकीय आहेत ... त्यांना हाकला, मारा ...... Biggrin

<<त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझ
े सौख्य सामावले आहे।>>
-------- भारतात राहुन भारताचे नुकसान करण्यापेक्षा, परदेशात स्थायिक व्हायचे आणि भारताचे नुकसान कमी करायचे (किव्वा त्या देशाचे नुकसान करायचे Happy ) म्हणजे तुलनेने देशाची समृद्धी होतेच आहे.