मिसो

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2016 - 06:37

मिलिंद सोमण मिलिंद
सोमण
मिलिंद सोमण
मिलिंद
सोमण मिलिंद सोमण

Milind-Soman1.jpeg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टफ शूज च्या एकाच जाहीरातीबाबत आठवण आहे का ? त्या तीन जाहीराती होत्या. एकात तो एका खांबावर बसला होता. दुसर्‍यात मधु सप्रे एका बाकावर बसली होती आणि तिसर्‍यात ते दोघे होते. तिन्ही जाहिरातीत ते न्यूड होते पण तरीही त्या सुंदर होत्या.. ते शूज काही नंतर कुठे दिसले नाहीत.

त्या जाहिरातीनंतरच बहुदा दोघांचे बिनसले.

तो पाश्यात्य मॅगॅझिन मधेही मॉडेल म्हणुन झळकायचा, पण त्या जाहीराती अगदी इंडस्ट्रीयल देखील असायच्या.
मॉडेलच असल्याने फोटोशूट कसे ( कुठल्या अँगलने ) करायचे हे त्याला बरोबर माहीत आहे पण त्याचे दात आणि हिरड्या काही चांगल्या नाहीत ( तश्या त्या प्रिटि झिंटाच्याही नाहीत ) केवळ काही कोनातूनच ते दोघे चांगले दिसतात.

मला सी हॉक्स आठवतेय. म्हणजे काहीतरी भारी होती इतकंच आठवतंय कारण बाकी काही समजायचंच नाही त्यावेळी. आणि मिसोचं ते जे सी हॉक्समधलं धूसर चित्र आठवतंय त्यावरून तो त्यावेळी (अर्थातच आतापेक्शाही!) जास्त हँडसम वगैरे दिसला असणर हे नक्की. १६ डिसेंबर मी १० मिनिटं प्रतेय्की असा ३ तुकडेच बघितलाय! कारण रिमोट माझ्याकडे नसतो.

गंध-मिसोची कथा- आवडला होता. मी मुळातच त्याच्याकडून अभिनय वगैरे अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे हल्लीच्या बाजीराव-मस्तानीमध्ये त्याने केलेला अंबाजीपंताचा रोल म्हणजे माझ्या मते त्याचा आजवरचा उत्तम अभिनय म्हणायला हवा Wink

भरत हो तो स्विमिंग चँप होता, हे मुलाखतीत त्याने सांगितलं होतं.

सी हॉक्स, येस माधवन आणि हा असे दोन होते, माझे आवडते.

सध्या तो जास्तच धावाधाव करतो असं वाटत. खूपच रापलेला आणि हडकुळा वाटतो.>>> मला नाही वाटत, अजूनही त्याला बघितल्यावर ओय होय होतं. परवाच माझ्या भाचीने त्याच्याबरोबर फोटो टाकलेत ती पिंकथॉनमधे आज भाग घेणार म्हणून मिसोची भेट झाली कुठेतरी मॉल मधे. मी जेलस.

माऊथफुल ऑफ स्काय, नाव नव्हतं आठवत. उशीरा लागायची बहुतेक. आई बाबा नाही बघू द्यायचे.

भरतजी ग्रेट, खूप लक्षात रहातं तुमच्या.

तो सलीम पण होता, एका सिरीयलमधे ज्यात गौरी प्रधान, मृणाल कुलकर्णी होत्या. डीडीवर असायची.

आणखी एक हिंदी मालिका होती हॅम्लेटवरून प्रेरणा घेतलेली. बहुतेक रंजीता आणि पंकज धीर होते, आई आणि काकाच्या भूमिकेत.

परवाच माझ्या भाचीने त्याच्याबरोबर फोटो टाकलेत ती पिंकथॉनमधे आज भाग घेणार म्हणून मिसोची भेट झाली कुठेतरी मॉल मधे. मी जेलस.>> माझ्या एका कॉलेजमधल्या मैत्रीणीने काढला फोटो त्याच्याबरोबर पिंकथॉन मधे भाग घेतल्यानंतर... मला पन अ‍ॅसिडीटी झाली खुप... लय राग अन हेवा वाटला तिचा.. श्या...

ऋ, मामिक हा जो जिता वही सिंकंदर मध्ये आमीर खानचा मोठा भाऊ दाखवलाय.
>>>>
हो, मला त्याचे नाव माहीत नव्हते, मामिक या नावावरून तर हे नाव कधी आयुष्यात ऐकल्याचे आठवत नव्हते.
मी त्याला तेव्हा दिपक तिजोरी समजायचो आणि म्हणायचो.. म्हणजे ते आपले लहानपणी असे असते ना .. कन्फ्यूजन

ऋन्मेष, १६ डिसेंबरला मिसोची आठवण झाली आणि १७ ला धागा काढला का ?
दुसर्‍या कुठल्या धाग्यात ह्याचं मूळ आहे ते काही मिळालं नाही.

मंजू ताई आणि अन्जू भरत. यांनी लिहिल्यानंतर मी जास्त काही लिहू शकणार नाही.

पण सगळ्यांना विशेषतः मुलींना इतकं मात्र सांगता येईल की तुम्हाला त्याच्या सोबत फोटो घेणे एक्दम सहज शक्य आहे विशेषतः पिंकेथॉनमधे धावलात तर नक्कीच.

मिलिंद सोमणवर धागा काढला आणि 'संहिता'चा उल्लेख नाहीच????
मिलिंद 'संहिता' मधे, त्याच्या वाढलेल्या पांढर्‍या दाढीत जेवढा हॉट & हॅन्डसम दिसला आहे, तसा इतर कुठेच नाही. रणजित शिंदेच्या रोलमधला मिलिंद........................... वॉव दिसतो.

ऋन्मेष,
'वजनदार'च्या प्रमोशन करता प्रिया आणि सई यांनी पुण्यातल्या पिंकेथॉन मधे भाग घेतला होता. खुद्द सई देखिल मिसो ची मोठी फॅन आहे.

तुझ्याकरता पचायला अवघड असेल ते पण तू पिंकेथॉनला जाऊन बघ, मिसो ची क्रेझ म्हणजे काय ते!

>> काय तर म्हणे मिसोची क्रेज स्वजो आणि सई पेक्षा जास्त आहे <<

'स्वजो'पेक्षा तर माझीसुद्धा क्रेझ जास्त असेल ऋन्म्या !

'स्वजो'पेक्षा तर माझीसुद्धा क्रेझ जास्त असेल ऋन्म्या !
>>>>
रसप हा आपला मोठेपणा झाला Happy

हर्पेन, मी मिसोची क्रेझ एखाद्या गटात असेल हे अमान्य करत नाहीये. फक्त स्वजो आणि सई पेक्षा जास्त आहे ईतकेच अमान्य आहे.

ऋन्मेष, मिसो ची क्रेझ तुला नाही समजणार, तु अजून खुप लहान आहेस.... Happy

ंमिसो चे नाव आले आनि जाई नाही आली............

हर्पेन, मी मिसोची क्रेझ एखाद्या गटात असेल हे अमान्य करत नाहीये. फक्त स्वजो आणि सई पेक्षा जास्त आहे ईतकेच अमान्य आहे.

अरे त्या गटात सर्व थरातले स्त्री-पुरुष आहेत आणि ती क्रेझ फक्त 'जाली'य नाहीये. खरीखुरी आहे.

मला तर मिसो नावाची व्यक्ती दखल घेण्याजोगी आहे हेच मुळात मायबोलीवर येऊन समजले.
तरी प्रयोग म्हणून मी ऑफिसमध्ये लंच टेबलवर त्याचा विषय काढून पाहिला. पण सर्वांनी शेपूच्या भाजीसारखे त्या विषयाला दूर सारले Happy

माफुऑस्का , सी हॉक्स , कॅ. व्योम , मेड इन इंडिया ,१६ डि -- अहाहा .
तो आणि मधू सप्रे एकत्र मस्त दिसायचे.

त्याची संवादफेक फार सदोष वाटते . पण त्याचा गंध बघावाच.
विशेषतः " रावी के उसपार ..." . भारीच. आपली एक्दम पापण्या फडफडवणारी बाहुली होउन जाते .

हो लहान आहे हे शक्य आहे, माझ्या पिढीत तरी मला मिसोची क्रेझ ओळखीच्या पाळखीच्या मित्रांमध्ये कुठेच आढळत नाही.. तरी वरच्या वयोगटात ट्राय मारतो.. अर्थात त्यातही महिलावर्गात बघावे लागणार

बहुश्रृत गटातल्या सगळ्यांना ठाऊक असतोय मिसो.

मध्यंतरी त्याने आयर्नमॅन ट्रायथलॉन (३. ८ किमी. पोहोणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी पळणे असे सलग एकामागोमाग) पुर्ण केले त्यावेळी सगळ्या माध्यमांमधे त्याची बातमी आली होती.

त्याच्या वयाच्या ५०व्या वर्षी त्याने हे केले.

माझाही रोल मॉडेल आहे तो. मी ही माझ्या ५०व्या वर्षी आयर्न मॅन करेन असे म्हणतोय. आयर्न मॅन करायला बरेच पैसे लागतात तेही तोवर जमा होतील असा अंदाज आहे Proud

माझ्या पण आजुबाजुला वर खाली असणार्‍या वयोगटात, महिलागटात कुठेच मिसो क्रेझ नाहीये.
मिलिंद सोमण? छान आहे तो. मस्त दिसायचा ना आधी. एवढंच. क्रेझ बिझ काय नाय.
हे इथे माबोवरच मिसो मिसो ऐकतेय.

'जो जीता वोही सिकंदर' मध्ये 'मामिक'ऐवजी 'मिसो' होता आधी. का बाहेर पडला माहित नाही,
>>>

आज मी थोडी आतली खबर काढली. आमीरने त्याचा पत्ता कट केला. कारण आपल्यापेक्षा चिकणा हिरो त्याला पिक्चरमध्ये नको होता .. अन्यथा पहिला नशा गाण्यात मिसोच भाव खाऊन गेला असता

मी मिलिंद सोमण फॅन नाही. पण आवडतो. decent व्यक्तीमत्व, स्पोर्टी लूक, त्याच्याकडे पाहून त्याने एकेकाळी, ते देखील अगदी त्या नव्वदीच्या काळी न्यूड फोटोसेशन केले असेल असे वाटत नाही. कदाचित वयानुसार maturity येते म्हणतात तेच खरे. १६ दिसंबर छान चित्रपट आहे, त्यात देखील तो आवडलेला.

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार मिसो येत्या २५-२६ डिसेंबर रोजी पुण्यात ऑक्सफॉर्ड गोल्फ क्लब येथे आयोजित होत असलेल्या अल्ट्रा मॅरॅथॉन मधे १०० मैल म्हणजेच १६१ किमी अंतराच्या स्पर्धेत भाग घेत आहे.

हे अंतर नुसते ऐकूनच छाती दडपली जात्ये.

सुपरमॅन

Pages