मिसो

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2016 - 06:37

मिलिंद सोमण मिलिंद
सोमण
मिलिंद सोमण
मिलिंद
सोमण मिलिंद सोमण

Milind-Soman1.jpeg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेड इन इंडिया
मेड इन इंडिया
इक दिल चाहिये बस मेड इन इंडिया

ह्यात पहिल्यांदा पाहिलेलं. तेव्हा लहान असल्यामुळे (मी) इतकं काही वाटलं नाही. आणि नंतर मोठी झाल्यावर शाहरुख खान वर लै भयंकर क्रश होता मग ह्या साइड अ‍ॅक्टरांकडे लक्ष नाही गेलं Wink

पहिल्याच प्रतिसादात शाहरूख.
पुढे कोणी आणू नका ही विनंती Happy

मिलिंद सोमन = मेड ईन ईंडिया .. ईटरेस्टींग.
माझ्यासाठी आजवर मेड ईन ईंडिया = अलिशा चिनॉय होते.

मला डाऊट होताच. म्हणून मी छापा काटा केला त्यात न आला. आणि थोडी माझी गट फिलींगही होती की सोनम तसे सोमन असेल.
तरी तुम्ही एवढे कन्फर्म बोलत असाल तर बदलतो.. मोबाईलवर संपादीत करायचे म्हणजे त्रास आहे बाबा.. दहा शब्दांतही पाच चुका

मिसो साठी डोळ्यात बदाम. रिया माझ्यावतीने ती स्मायली टाक ग तू.

ग्रेसफुल एजिंगचं हे पण एक उदाहरण. काही गोष्टी आधीच्या त्याच्याबाबतीत घडलेल्या आवडल्या नाहीत तरी बाकी आवडता माझा. धावपटू आहे म्हणून फुल रीसपेक्ट. फोटो छानंच.

त्याच्यातल्या धावपटूला रिस्पेक्ट +786

फोटो मला हाच लेटेस्टमध्ये छान वाटला. उगाच रसरसलेले तारुण्य दाखवायला 1996 चा टाकण्यात अर्थ वाटला नाही.

मधू सप्रेचा आजचा लेटेस्ट कोणी टाकला तर बघायला आवडेल.
जुन्या गाजलेल्या फोटोत नजर अजगरावरच खिळून राहते. यांना कोणी बघत नाही, भाव देत नाही.

>>जुन्या गाजलेल्या फोटोत नजर अजगरावरच खिळून राहते. यांना कोण>>
- तसं नाही झालं. त्यावेळी परदेशात कोणी असा फोटो काढलेला होता त्याची कॅापी मारण्यासाठी फोटोग्राफरला हे दोघे मॅाडेल म्हणून मिळाले. त्यामुळे फार कौतुक झालं नाही. पण सिनेब्लिट्झवर सॅल्यन नावाच्या फोटोग्राफरने ममता कुलकर्णीचे जे प्लेन पोर्टेट दिले होते ते फार गाजले होते. तो अंकही लगेच खपला होता.

अमोल१९७९ | 17 December, 2016 - 18:31

पिअर्स ब्रोसनन सारखे लुक्स आहेत मिलिंद सोमणचे ह्या फोटोत.

मिसो वर तू कसा काय धागा काढलास?
कुछ तो गडबड है दया 
>>>

खरंय.
आजूबाजूच्या धाग्यात याचे उत्तर मिळेल. पण ते शोधण्याआधी मिलिण्द सोमणला बघून जे पहिला मनात आले ते येऊ द्या Happy

मिसोला बघितल्यावर मला फक्त "16 डिसेंबर" आठवतो. त्याच्यासाठी मी तो खूप वेळा पाहिलाय.

धावपटू आहे म्हणून फुल रीसपेक्ट. फोटो छानंच.>> +

मेड इन इंडियाच्या वेळी मी खुप लहान होते पण त्याची ती पेटार्‍यातुन बाहेर येतानाची एंट्री मनात कोरली गेलेली आहे. Happy

कालच १६ डिसेंबरच्या मुहूर्तावर त्याचा तो सिनेमा पाहिला. त्यात त्याचा अभिनय बराचसा अक्षयकुमारसारखा वाटला. भेजा फ्राय मध्ये त्याने स्वतंत्र शैली जोपासल्याचे दिसले आणि आवडलेही.

मिसोला बघितल्यावर पहिल्या प्रथम लगेचच जाणवतं ते म्हणजे सहजता. ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन त्याच्या वावरण्यात एक सहज मोकळेपणा आहे.

बरंच काही लिहिता येईल. पण सध्या पुरे!

मिसोला पाहून 16 डिसेंबरच चटकन आठवतो कारण असे फारसे सिनेमे नाहीतच त्याचे. पण तो चांगला चित्रपट होता. त्यात त्याने काही भारी अभिनय वगैरे केलेला अश्यातला भाग नाही. वर हर्पेन म्हणतात तसा सहज वावर होता. दिग्दर्शकाने उगाच त्याकडून अभिनय करवून घ्यायचा अट्टाहास न करता त्याला चांगले प्रेजेंट केले होते. रोल सूट झाल्याने तो देखील चांगला वाटलेला.

मिसो ला पाहिल्यावर पहिले आठवतो तो कॅप्टन व्योम अन मग मेड इन इंडीया गाणे...
दुरदर्शन असल्यामुळे हमेशा सुरभी मधे टॉप फाईव्ह गाणे, छायागीत न चुकता बघायची...

१६ डिसेंबर बरोबरच मला रुल्स-प्यार का सुपरहिट फॉर्म्युला हा चित्रपट सुद्धा हतकुन आठवतो..
लव्ह हिम टिल डेट..

बरंच काही लिहिता येईल. पण सध्या पुरे! >>> लिहाच ... स्वतंत्र लेख येऊ देत ...>>> येस मंजुताईला मम.

हर्पेन प्लीज लिहाच.

जुन्या गाजलेल्या फोटोत नजर अजगरावरच खिळून राहते. यांना कोणी बघत नाही, भाव देत नाही. << ह्यात तुझ्या बर्याच धाग्यांवरचा प्रॉब्लेम च एक्ष्प्लनेशन आहे का? Lol

मिलिंद सोमण भारताचा (नॅशनल लेव्हल) स्विमिंग चॅंपियन होता हे कोणालाच माहीत नाही का?
सध्या तो जास्तच धावाधाव करतो असं वाटत. खूपच रापलेला आणि हडकुळा वाटतो.

त्याची सगळ्यात पहिली टीव्ही मालिका `अ माउथफुल ऑफ स्काय' (इंग्रजी). मालिकेतल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीपात्राशी त्याच्या पात्राचे संबंध आलेले दाखवलेत. कृत्तिका देसाई, तनाझ करीम, निशा सिंग, सिमॉन सिंग, इ.

हिप हिप हुर्रेच्या (शाळकरी म्हणजे ११-१२वीतल्या मुलांची, शाळेतच फिरणारी मालिका) एका भागात तो , अ‍ॅज मिलिंद सोमण , पाहुणा कलाकार म्हणून आला होता. त्यात शाळेतल्या दोन मुली कशानेतरी त्याच्या घराशी पोचतात आणि त्याला पाहून हर्ष-आश्चर्य आणि आणखी काय काय यांच्या धक्क्याने एक मुलगी बेशुद्ध पडते असा प्रसंग होता.

कॅप्टन व्योमच्याही बर्‍याच आधी सी हॉक्स नावाच्या एका मालिकेतही होता. मार्गारिटा नावाची गोवा बेस्ड मालिका- निर्मिती आणि मुख्य भूमिका. यातलं आणि माउथफुल ऑफ स्कायमधल्यं त्याचं कॅरॅक्टर कुठेही न स्थिरावणारं, सतत नवंनवं शोधणारं होतं. प्रत्यक्षातही तो तसाच वाटतो.

बोर्नव्हिटा क्विज काँटेस्टच्या (डेरेक ओब्रायन) सेलेब्रिटी एपिसोडमध्ये तो आला होता. त्याचं सामान्यज्ञानही चांगलं आहे (त्यावेळी तरी होतं). जिंकला होता.

अग्निवर्षा, तरकीब हे आणखी काही थोडे जुने चित्रपट.

मला डाऊट होताच. म्हणून मी छापा काटा केला त्यात न आला. आणि थोडी माझी गट फिलींगही होती की सोनम तसे सोमन असेल.>>>> Lol

'जो जीता वोही सिकंदर' मध्ये 'मामिक'ऐवजी 'मिसो' होता आधी. का बाहेर पडला माहित नाही, पण तसं नसतं झालं तर करियर फार वेगळं असतं त्याचं.

आदिती हो शक्य आहे. कदाचित मला कुठे काय बोलायचे हे कळत नाही त्याप्रमाणेच कुठे काय बघावे हे देखील कळत नसावे. पण तो अजगर खरेच भारी होती. एवढा सुडौल बांध्याचा अजगर कधी राणीबागेतही बघणे झाले नव्हते. मग नजर खिळणारच ना..

Pages